Friday, September 02, 2011

गणपती, तुझी नावे किती ?

कोटी कोटी रूपे तुझी कोटी सूर्यचंद्रतारे, कुठे कुठे शोधू तुला तुझे अनंत देव्हारे ।। असे एका गाण्यात म्हंटले आहे. या रूपांची अशीच अगणित नावेही आहेत. या लेखमालिकेच्या पहिल्या भागातल्या दोन स्तोत्रांमध्ये श्रीगणेशाची बारा नावे दिली आहेत. नारद विरचित संकटनाशन गणेशस्त्रोत्रातील नावे आहेत
१. वक्रतुंड, २. एकदंत, ३. कृष्णपिंगाक्ष, ४ गजवक्त्र, ५. लंबोदर, ६. विकट. ७.विघ्नराजेंद्र, ८.धूम्रवर्ण, ९. भालचंद्र, १०.विनायक, ११. गणपती आणि १२. गजानन

तर गणेशद्वादशनामस्तोत्रातील नावे आहेत
१.सुमुख, २.एकदंत, ३.कपिल, ४.गजकर्णक, ५.लंबोदर, ६.विकट, ७. विघ्ननाश, ८. विनायक, ९.धूम्रकेतू, १०.गणाध्यक्ष, ११.भालचंद्र १२.गजानन

यातील काही नावे दोन्ही याद्यांमध्ये आहेत
१.एकदंत, २.लंबोदर, ३.विकट, ४.भालचंद्र, ५.विनायक, ६.गजानन

काही नावांचे अर्थ एकसारखे आहेत
१.गणपती आणि गणाध्यक्ष

काही नावांचे अर्थ परस्परविरोधी आहेत
१.वक्रतुंड आणि सुमुख, २.विघ्नराजेंद्र आणि विघ्ननाश

काही नावे स्वतंत्र आहेत
१.कृष्णपिंगाक्ष, २.धूम्रवर्ण, ३.कपिल, ४.धूम्रकेतू

या बारा नावांशिवाय गणपतीची खाली दिलेली नावे किंवा त्याला दिलेली विशेषणे या स्तोत्रांमध्येच आली आहेत
गौरीपुत्र, शुक्लांबरधर, शशिवर्ण, चतुर्भुज, प्रसन्नवदन, विघ्नहर, गणाधिपती, चंड, त्रिलोचन, वरदात

महाराष्ट्रामधील अष्टविनायकांची नावे आहेत
मोरेश्वर, बल्लाळेश्वर, गिरिजात्मज, वरदविनायक, विघ्नेश्वर, चिंतामणी, महागणपती, सिध्दीविनायक,

पूर्वीच्या पिढीमध्ये हेरंब हे गणपतीचे नाव ठेवले जात असे, श्रीपती आणि अनंत ही विष्णूचीही नावे आहेत. नव्या पिढीमधील अमित, अमेय, अमोघ वगैरे नावे सुध्दा गणपतीचीच आहेत. माझे नाव आनंद हेसुध्दा गणपतीचे नाव असल्याचा शोध मला आजच लागला. गणपतीच्या ११० नावांची खालील यादी जालावर मिळाली. त्यात अशी इतरही काही नावे मिळाली.

१) विघ्नेश
२) विश्ववरद
३) विश्वचक्षू
४) जगत्प्रभव
५) हिरण्यरूप
६) सर्वात्मन्
७) ज्ञानरूप
८) जगन्मय
९) ऊर्ध्वरेतस
१०) महावाहू
११) अमेय
१२) अमितविक्रम
१३) वेददेद्य
१४) महाकाल
१५) विद्यानिधी
१६) अनामय
१७) सर्वज्ञ
१८) सर्वग
१९) शांत
२०) गजास्य
२१) चित्तेश्वर
२२) विगतज्वर
२३) विश्वमूर्ती
२४) विश्वाधार
२५) अमेयात्मन्
२६) सनातन
२७) सामग
२८) प्रिय
२९) मंत्रि
३०) सत्त्वाधार
३१) सुराधीश
३२) समस्तराक्षिण
३३) निर्द्वंद्व
३४) निर्लोक
३५) अमोघविक्रम
३६) निर्मल
३७) पुण्य
३८) कामद
३९) कांतिद
४०) कामरूपी
४१) कामपोषी
४२) कमलाक्ष
४३) गजानन
४४) सुमुख
४५) शर्मद
४६) मूषकाधिपवाहन
४७) शुद्ध
४८) दीर्घतुण्ड
४९) श्रीपती
५०) अनंत
५१) मोहवर्जित
५२) वक्रतुण्ड
५३) शूर्पकर्ण
५४) परम
५५) योगीश
५६) योगेधाम्न
५७) उमासुत
५८) आपद्धंत्रा
५९) एकदंत
६०) महाग्रीव
६१) शरण्य
६२) सिद्धसेन
६३) सिद्धवेद
६४) करूण
६५) सिद्धेय
६६) भगवत
६७) अव्यग्र
६८) विकट
६९) कपिल
७०) कपिल
७१) उग्र
७२) भीमोदर
७३) शुभ
७४) गणाध्यक्ष
७५) गणेश
७६) गणाराध्य
७७) गणनायक
७८) ज्योति:स्वरूप
७९) भूतात्मन्
८०) धूम्रकेतू
८१) अनुकुल
८२) कुमारगुरू
८३) आनंद
८४) हेरंब
८५) वेदस्तुत
८६) नागयतज्ञोपवीतिन्
८७) दुर्धर्ष
८८) बालदूर्वांकुरप्रिय
८९) भालचंद्र
९०) विश्वधात्रा
९१) शिवपुत्र
९२) विनायक
९३) लीलासेवित
९४) पूर्ण
९५) परमसुंदर
९६) विघ्नान्तक
९७) सिंदूरवदन
९८) नित्य
९९) विभू
१००) प्रथमपूजित
१०१) दिव्यपादाब्ज
१०२) भक्तमंदर
१०३) शूरमह
१०४) रत्नसिंहासन
१०५) मणिकुंडलमंडित
१०६) भक्तकल्याण
१०७) अमेय
१०८) कल्याणगुरू
१०९) सहस्त्रशीर्ष्ण
११०) महागणपती

18 comments:

Kaushal.... said...

Awesome Sir. Hats off to you. Your blog serves as a very good source for us to keep in touch with Marathi. Amchyasarkhe Marathi bhasha aikayla traslelya lokansathi tumche lekh faar upyogi tharthat!

Unknown said...

thanks sir

Unknown said...

कपिल दोनदा का आहे

Unknown said...

कविष हे सुध्दा गणपतीचे नाव आहे का ?

Unknown said...

Varad he nav pan ahe ka

Anand Ghare said...

मी ही सर्व नावे निरनिराळ्या श्रोतांमधून गोळा केलेली आहेत. कपिल हे नाव ओळीने दोन वेळा का आले आहे हे मलाही समजत नाही. कविष किंवा कविश असे नाव कुठे दिसत नाही. वरद विनायकाचे मंदिर महड इथे आहे. त्याची गणना अष्टविनायकांमध्ये होते. वाचकांनी दाखवलेल्या उत्सुकतेबद्दल त्यांचा आभारी आहे.

Rohan Vare said...

सुंदर माहिती

Unknown said...

अथर्व हे नाव गणपतीचे आहे का

Anand Ghare said...

अथर्व हे एका वेदाचे नाव आहे आणि अथर्वशीर्ष हे गणेशाचे प्रसिद्ध स्तोत्र आहे. कदाचित हे स्तोत्र अथर्ववेदामध्ये असेल म्हणून हे नाव दिले असेल किंवा कदाचित अथर्व हे गणपतीचे आणखी एक नाव असूही शकेल. मला याबद्दल संदर्भासह काही निश्चित माहिती उपलब्ध नाही.

Unknown said...

Thank you...

Unknown said...

Shrehaan he naav ganpatiche ahe ka

Unknown said...

Shree he naav pan Ganpati Che ahe ka

Anand Ghare said...

मी ही सर्व नावे निरनिराळ्या श्रोतांमधून गोळा केलेली आहेत. यांच्या पलीकडे मला फारशी माहिती नाही. श्री हे लक्ष्मीचे नाव आहे, तसेच कुठल्याही देवाच्या नावाच्या आधी जोडले जाते, जसे श्रीराम, श्रीगणेश वगैरे. आजकाल श्रीहान, श्रेहान ही नावे मुलांना ठेवतात, पण त्यांचे अर्थ मला माहीत नाहीत.

Unknown said...

Thank you sir

Unknown said...

नवीन पिढीतील गणपतिचे आणखी नावे सांगा ना

Unknown said...

'Shrinay' name meaning lord ganesh ahe google wr search kele

Anand Ghare said...

सर्वांचे आभार.

Anonymous said...

Ho