आमची जमखंडी * ನಮ್ಮ ಜಮಖಂಡಿ * Our Jamkhandi
माझा जन्म जमखंडी इथे झाला त्यावेळी ते मुंबई इलाख्यातले एक संस्थान होते. देशाला स्वराज्य मिळाल्यानंतर ते भारतात विलीन होऊन मुंबई प्रांताचा भाग झाले. राज्यांची पुनर्रचना होतांना त्या भागाचा समावेश मैसूर राज्यात झाला आणि पुढे त्या राज्याचे नामकरण कर्नाटक असे झाले. माझ्या लहानपणी आमचे गाव विजापूर जिल्ह्यात होते. नंतरच्या काळात विजापूरचे विजयपुरा झाले, पण जमखंडीचा समावेश बागलकोट नावाच्या नव्याने स्थापन झालेल्या जिल्ह्यात झाला. त्यामुळे आजचे जमखंडी गाव उत्तर कर्नाटकातल्या बागलकोट जिल्ह्यात आहे. या गावाची माहिती आणि जमखंडीच्या तसेच जमखंडीकरांच्या काही संस्मरणीय आठवणी या पानावर जमा करायचा हा एक प्रयत्न आहे. यात हळूहळू भर टाकून हे पान सजवले आहे.
या पानाचे चार भाग आहेत. १.जमखंडीची माहिती, २. जमखंडीमधील प्रमुख व्यक्ती, ३. जमखंडीकरांच्या आठवणी आणि ४. छायाचित्रे (Photo Gallery)
*** नवी भर दि. ०६-०४-२०२४ आजच्या जमखंडीचे काही फोटो छायाचित्रे या सदरात जोडले आहेत.
*** नवी भर दि. २८-०१-२०२४ माझे वडील कै.बाळकृष्ण पांडुरंग घारे यांनी परशुराम भाऊ हायस्कूलच्या सुवर्णमहोत्सवानिमित्य निघालेल्या स्मारकग्रंथामध्ये लिहिलेला लेख आणि कविता.
*** नवी भर दि. ०न२-०१-२०२४ जमखंडीकरांचे संमेलन , कर्मवीर वि.रा.शिंदे यांचा लेख , दोन कविता, छायाचित्रे , डॉ.बी.आर.साबडे यांना श्रद्धांजलि आणि इतर
*** नवी भर दि. ०४-०५-२०२३ जमखंडीचे दिवस - वर्षा जोशी आणि स्मृतिसुगंध डॉ.रवींद्र आपटे (आठवणींमध्ये) ***
*** नवी भर दि. १७-०१-२०२३ : जमखंडीकरांचे स्नेहसंमेलन (२०२३) कृपया खाली पहा ***
*** नवी भर दि. २८-०४-२०२२ : जमखंडीच्या मराठी शाळा (जमखंडीची माहिती मध्ये) ***
*** नवी भर दि. ५-१२-२०२१ : जमखंडीकरांचे स्नेहसंमेलन (२०२१) कृपया खाली पहा ***
जमखंडीकरांचे स्नेह संमेलन (डिसेंबर २०२३)
जमखंडी वासियांचा स्नेहमेळावा २०२३
जमखंडी हे स्वातंत्र्यपूर्व काळातील श्रीयुत पटवर्धन राजेसाहेबांचे अत्यंत सुखसोयींनी संपन्न असे एक संस्थान. हे सध्या कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यात आहे.
सर परशुरामभाऊ हायस्कूल, जमखंडी येथून शालांत परीक्षेत उत्तीर्ण झालेले आणि जमखंडीचे इतर सर्व जमखंडी प्रेमी यांचे संमेलन, बुधवारी, दिनांक २७ डिसेंबर २०२३ रोजी, सकाळी ९.०० ते दुपारी ४ वाजेपर्यंत, श्री स्वामी कृपा हॉल, कर्वे रोड, कोथरूड, पुणे येथे संपन्न झाले.
सर्व जमखंडीकर मंडळी, डिसेंबर महिन्यात होणाऱ्या स्नेहसंमेलनाची आतुरतेने वाट पाहत असतात.
ह्या वर्षी २७ डिसेंबर ही तारीख ठरताच संयोजक कमिटी तयारीला लागली. निरोप प्रत्येकांपर्यंत पोचवले गेले, कार्यक्रम कोणते ठेवायचे, नवीन काही प्रयोग करून पाहता येईल काय, जेवणाचा बेत यावर चर्चा रंगली.
संमेलनाचा दिवस उजाडला. संमेलनास जोडून सुट्ट्या आल्याने किती उपस्थिती होईल याबद्दल सर्वजण साशंक होते. प्रत्यक्षात चित्र बदलले आणि म्हणता म्हणता ७१ ज्येष्ठांनी हजेरी लावली. जमखंडी गावावरील प्रेम आणि ज्येष्ठांचा उत्साह याला खरोखरच सलाम.
संमेलनात सर्वांचे स्वागत चहा / काॅफी आणि उपमा यांनी झाले. सुरवातीला दीप प्रज्वलन, श्री गुरुदेव रानडे यांची आरती झाली.
आपल्यामधून जे सहकारी अनंताच्या प्रवासासाठी मार्गस्थ झाले आहेत त्या सर्वांना श्रध्दांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
श्री राजू वाटवे यांनी नेहमीप्रमाणे सुंदर सूत्रसंचलन केले, एकमेकांच्या ओळखी करून घेतल्या, गावाकडच्या आठवणींना उजाळा दिला, उत्स्फूर्तपणे काही कविता सादर झाल्या, शालेय जीवनातील काही प्रसंग रंगवून सांगितले. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या सर्व गुरुजनांबद्दल असलेले प्रेम, सद्भावना अनेकांनी व्यक्त केली.
प्रत्येकांनी आपले कलागुण गाण्यातून, नाचातून, कवितेमधून, छंदातून प्रकट केले. एक डिस्प्ले काऊंटर पण ह्या वर्षी प्रथमच ठेवला होता.
सर्वांचा एकत्रित फोटो तसेच प्रत्येकांच्या १० वीच्या बॅच प्रमाणे फोटो काढून झाले.
कार्यक्रमात सर्वजण एवढे सहभागी झाले की प्रत्येकाला वेळ कमी पडला असेच वाटले.
गरमागरम भोजनाचा आस्वाद, गप्पांचा अड्डा, थोडी विश्रांती जेवणानंतर घेऊन झाल्यावर श्री विश्वास पटवर्धन यांचा राशिभविष्यावरील कथनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
सर्वजण बरेच वर्षांनी भेटल्यामुळे आनंदीत झाले होते. पुढील वर्षी न विसरता पुन्हा भेटूया असा निरोप एकमेकांना देत सर्वांनी निरोप घेतला.
अनिल पोंक्षे
**********
कर्मवीर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
श्री सद्गुरू समर्थ.
ब्राह्मो समाजाचे पाईक, तत्वचिंतक, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे.
जन्म ठिकाणः जमखंडी जि. विजापूर कर्नाटक दि. २३.४.१८७३
कालवशः पुणे दि.२.१.१९४४
त्यांनी एक ईश्वर, एक धर्म व एकच मानवता मांडून कार्य केले.
हे गुरुदेवांच्या विचाराशी मिळते जुळते आहे असे मला वाटते. विशेष म्हणजे त्यांचे जन्म गाव श्री क्षेत्र जमखंडीच आहे.
तरी महर्षी, विठ्ठल रामजी शिंदे महाराजांना विनम्र 🙏🙏 अभिवादन.
महर्षी शिंदे यांनी लिहिलेला लेख
-----
जमखंडीकरांचे स्नेहसंमेलन (जानेवारी २०२३)
जेकेडी फ्रेंड्स या जमखंडीकरांच्या समूहाचे वार्षिक स्नेहसंमेलन पुणे येथे दि.११-०१-२०२३ रोजी दणक्यात साजरे झाले. आपापल्या लहानपणी (पण निरनिराळ्या कालखंडांमध्ये) जमखंडीला राहिलो होतो आणि तिथल्या शाळेत शिकलो होतो एवढ्या एकाच धाग्याने गुंफल्या गेलेल्या या सर्वांचे सौहार्द कौतुकास्पद होते. सुमारे ऐंशी जणांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. यात मुख्यतः सध्या पुण्यात रहात असलेली मंडळी असली तरी मुंबई, डोंबिवली, पनवेल, नाशिक, कऱ्हाड वगैरेकडचे अनेक उत्साही लोक आले होतेच, काही जण तर इंदौर, धुळे, बंगळूरू यासारख्या दूरदूरच्या ठिकाणांहून आवर्जून आले होते. संमेलनातला सर्वसाधारण वयोगट साठी- सत्तरी उलटलेल्या लोकांचा होता, तरी काहीजण ऐंशी पार करून नव्वदीला आलेले होते, तसेच पुढल्या पिढीतले म्हणजे चाळिशीतलेही होते. वर्षा गोगटे कुमठेकर या सिद्धहस्त कवयित्रीने लिहिलेला या स्नेहसंमेलनाचा वृत्तांत आणि काही छायाचित्रे खाली देत आहे.
आनंद घारे
🌹 जमखंडी ग्रुप चे स्नेहसंमेलन🌹
आज लिहिताना मला खूप आनंद होत आहे, की जमखंडी ग्रुप चे स्नेहसंमेलन, ठरलेल्या तारखेला म्हणजे 11 / 1/ 2023 या दिवशी उत्साहात पार पडले.
सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत देसाई आंबेवाले यांच्या स्वामी कृपा हॉल पुणे येथे हे संमेलन भरवले होते.
मी माझ्या मैत्रिणी सोबत प्रवेशद्वाराशी आले, तेव्हा जमखंडी स्नेहसंमेलन, सुस्वागतम अशी पाटी वाचली, आणि मन आनंदाने बहरून आले.
पूर्वी जशी कथेमध्ये एक परी असायची आणि तिने जादूची छडी फिरवली की माणूस एका वेगळ्या जगात जातो अशा काल्पनिक गोष्टी असायच्या तसे जमखंडी नावाचा या जादूच्या छडीने, सर्वांना भारून टाकले आणि सर्वजण उंबऱ्यातून आत पाऊल टाकताना एका सुंदर भारावलेल्या विश्वात पोहोचले.
दाराशीच नटून थटून अनुजा आणि ज्योती सर्वांचे हसतमुखाने तिळगुळ देऊन पुरुषांचे आणि हळद-कुंकू अत्तर लावून, स्त्रियांचे स्वागत करत होत्या. राजू वाटवेची पत्नी सुजाता सुद्धा सर्व कामात आनंदाने सहभागी होत होती. सर्वजण आत शिरत होते ते अतिशय आनंदाने ,उत्साहाने आणि जल्लोष करतच. कारण बरेच जण एकमेकाला कित्येक वर्षांनी पाहत होते, आणि त्यामुळे ,अगं किती छान वाटते तुला भेटून किंवा अरे काय किती दिवसांनी आपली भेट, असा सर्वांचा सूर होता.
ते पाहून मला वाटले जमखंडीच्या घरट्यातून, लहान वयात, हुंदडुन बागडून, आई-वडिलांच्या पंखाखाली सुखाची मीठ भाकर खाऊन, सर्व पाखरे तरुण वयात आपल्या कर्तृत्वाची गवसणी घालण्यासाठी आकाशात उत्तुंग झेप घेऊन, बाहेर पडली होती ती सर्व पाखरे, शिक्षणाने वैभवाने आणि वयाने, समृद्ध होऊन, या जमखंडी ग्रुपच्या घरट्यात,
एकमेकांना भेटायला, उत्सुकतेने आली होती आणि आनंदाने किलबिलाट करत होती. प्रत्येकाला कुणाशी बोलू आणि किती बोलू असे झाले होते, कारण उपस्थिती खूप होती. ओळखीच्या लोकांशी गळा मिठी आणि काही मित्र-मैत्रिणींबरोबर, आनंद गप्पा चालू असतानाच, ब्रेकफास्ट ची वेळ झाली.
जमखंडी कर आवडत्या उपीटाचा आस्वाद घेता घेता सुद्धा इतके आठवणीत रमले होते की वेळ पुढे कसा सरकत आहे हे भानच कोणाला नव्हते. शेवटी खाणे आटपून सर्व स्थानापन्न झाले. आणि राजू वाटवेने कार्यक्रमाची सुरुवात होत आहे अशी घोषणा केली. सुरुवातीला, मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि, श्री गुरुदेव रानडे यांची आरती झाली आणि पुढील कार्यक्रमाची सूचना सर्वांना दिली. सर्वच एकमेकांना ओळखत होते तरी औपचारिक म्हणून शितल आपटे ने आणि राजू वाटवेने प्रत्येकाला उभे राहून आपले नाव , दहावीचे वर्ष आणि जमखंडीत पूर्वी कुठे राहत होते आणि आत्ता कुठे राहतात, याचा थोडक्यात परिचय करून देण्यास सांगितले.
ते समाप्त झाल्यावर उत्सुकता होती विविध गुणदर्शन या कार्यक्रमाची. अनेक मान्यवरांनी त्यात हजेरी लावली आणि आपले आपले अनुभव सांगितले. सुरुवातीला श्री आनंद कुलकर्णी यांनी जमखंडी वरील सुंदर भावुक कविता म्हणून सर्वांची मने हेलावून सोडली. त्यानंतर सर्व ज्येष्ठांनी आपले मनोगत अतिशय सुंदर शब्दात कथन केले. नंतर शशिकांत रास्तेने, आपल्या सुंदर आवाजात गायलेले,... प्रथम तुज पाहता हे गीत ऐकून सर्व जण भान हरपून गेले होते. त्यातून बाहेर पडण्याआधीच मधू दादा आपटे यांनी माउथ ऑर्गन वर दोन जुनी गाणी ऐकवून सर्वांना मंत्रमुग्ध करून टाकले आणि त्यातच सर्वांनी हरवून जाऊ नये म्हणून उज्वला नागनूर पटवर्धन ने आपल्या सुंदर आणि बहारदार नृत्याने सर्वांना वेड लावून टाकले, बहात्तर वर्षाची ही हर्षौत्फुल्ल तरुणी सर्वांना वेगळ्या विश्वात घेऊन गेली.
पुष्पा आपटे ची मुक बधीर मुलाची कथा तिने अगदी छान सादर केली, त्याचा शेवट चटका लावून गेला.अशा व्यक्तींबरोबर खूपच प्रेमाने वागले पाहिजे असा सुंदर संदेश यातुन सर्वांनी घ्यावा. सुजाता ने मधुर आवाजात तोरा मन दर्पण केहलाए हे गीत गाऊन प्रेक्षकांची मने जिंकली आणि जमखंडी पाहिली नसून सुद्धा जी कौतुकाने आपल्या पूर्वी जमखंडीत राहिलेल्या वडिलांबरोबर आली होती, त्या मंजिरी भातखंडेने मोरपीस या सुंदर कवितेद्वारे हुळहुळणाऱ्या शब्दांचे गहिरे रंग भरून, सर्वांना हुरहूर लावत, काहींना त्यांची स्वप्ने जागी करण्यास भाग पाडले. या सर्व कार्यक्रमात सर्वजण इतके दंग भान हरपून बसले होते. जेवणाची वेळ कधी झाली हे कोणाला कळले नाही इतके आत्मानंदात मग्न होते.
अखेर जिलेबी बरोबर अनेक सुंदर पदार्थांच्या रुचकर जेवणाचा आस्वाद घेत परत गप्पांची किलबिल सुरू झाली. जेवण आवरल्यावर घोषित केले की आता कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा सुरु झाला आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीरंगदादा घारे यांनी सर्वांना नूतन वर्ष शुभेच्छांची सुंदर भेट दिली होती, आणि शीतल आपटेने सर्वांना स्वहस्ते शिवलेले छान छान मास्क पण दिले होते. आता पुष्पा आपटे ने अतिशय सुंदर स्वतः तयार केलेल्या रांगोळ्या ची पाकिटे आणि छान पुस्तके सर्वांना भेट दिली. या सर्वांनी एवढ्या प्रेमाने इतक्या लोकांसाठी गिफ्ट आणल्या होत्या याचे खूप कौतुक वाटले.
कार्यक्रमाच्या शेवटी विश्वास पटवर्धनने गोविंद पोंक्षे ची मुलाखत घेऊन, त्यांनी जमखंडीत आपल्या छापखान्याची सुरुवात कशी केली, याची माहिती खूप छान सादर केली आणि पसायदान म्हणून कार्यक्रम संपल्याची घोषणा केली.
सकाळी भेटीचा उत्साह घेऊन आलेली माणसे आता दूर जाण्याच्या आणि वियोगाच्या विचाराने हळवी होत जड पावलाने निघत होती,पण निरोप घेऊन बाहेर पडण्या आधी हा कार्यक्रम तडीस नेण्यासाठी राजू वाटवे ,अनिल आणि गोविंद पोंक्षे, शितल , रेखा , वैजू पेंडसे या उत्साही कार्यकर्त्यांचे कौतुक करण्यासाठी सर्वच जण थांबून त्यांना धन्यवाद देत बाहेर जात होती. कारण हा कार्यक्रम ठरवल्यापासून तो पार पाडे पर्यंत त्यांनी अपार कष्ट घेतले होते, त्यासाठी त्या सर्वांचे योगदान खूप मोठे होते.
हॉल बाहेर पडताना सगळ्यांचे तन आणि मन मात्र जमखंडी, आपले गाव , आपली माणसे यांच्या प्रेमात न्हाऊन निघाल्यामुळे तृप्त होते. आणि हा दिवस प्रत्येकाने आपल्या हृदयावर सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवला होता असे मला वाटले आणि परत जर असे स्नेह संमेलन करायचे तर ते जमखंडीतच करूया, असे ठरवत मी पण माझ्या मैत्रिणींसह जड पावलाने सर्व प्रेमळ जमखंडीकरांचा निरोप घेऊन बाहेर पडले.
या स्नेहसंमेलनाचे शब्दांकन मला जसे जमले तसे मी केले आहे, पण तरीही अनवधानाने माझ्याकडून कोणा कोणाची नावे घेतली गेली नसतील किंवा कौतुक केले गेले नसेल, तर त्यांनी मला मोठ्या मनाने माफ करावे.
🌹 वर्षा गोगटे कुमठेकर 🌹
या लेखाला आलेले काही प्रतिसाद :
श्रीरंग घारे - या अनुपम शब्दांकनाने संमेलनात अनुभवलेले रोमांचित करणारे सर्व क्षण पुन: प्रत्ययास आले. अथ पासून इति पर्यंत सगळ्या कार्यक्रमांची उजळणी झाली. इतक्या सुंदर स्वप्नवत कार्यक्रमाची असे सुंदर शब्दांकन केलेत यास्तव अभिनंदन पूर्वक धन्यवाद. अचंबित करणारी नृत्य कला या वयात ही तुम्ही जपलेली आहे पाहून अभिमान वाटतोय तुमचा .खरेच धन्य आहे तुमच्या पॅशन आणि कला प्रेमी वृत्तीची. आपल्या संमेलनाचे कार्यकारी मंडळाचे खूप खूप धन्यवाद कार्यक्रमाचे आयोजन 👌👌👌
विश्वास पटवर्धन : अप्रतिम शब्दांकन👌💐💐🙏🙏
-श्रीराम : वर्णन वाचून संमेलनास हजर असल्यासारखं वाटले 👌फोटो चांगल्ले निघालेत
आनंद कुलकर्णी :वर्षाताई आपण संमेलचा वृत्तांतअतीशय सुरेख शब्दात कथन केलाय. मी संमेलन पुनः अनुमवले तुमच्यामुळे.
वैजयंती पटवर्धन :कार्यक्रमाची छान कल्पना आली अनुपस्थित लोकांना
शेखर आपटे : संमेलन यशस्वी रित्या पार पडले व सगळे जमखंडीकर खूप दिवसांनी एकमेकास भेटून आनंद लुटला । आपापल्या कलांचे दर्शन घडवले सगळ्यांना। उज्वलताईची स्फूर्ती, शशी चे गायन याची मी कल्पना करूनच येथून आनंद लुटला । ह्या संमेलनयाचे आयोजन करणारे श्री अनिल पोंक्षे, व इतर सर्व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन
जमखंडीकरांचे स्नेहसंमेलन (२०२१)
दि.३ डिसेंबर २०२१ला पुण्यातल्या कर्वे रोडवरील स्वामीकृपा सभागृहात जमखंडीकरांचे स्नेहसंमेलन आयोजित केले होते. त्याला जमखंडीकरांनी चांगला प्रतिसाद दिला. पुण्यातली बहुतेक सगळी मंडळी तर आली होतीच, शिवाय नाशिक, डोंबिवली, नवी मुंबई यासारख्या ठिकाणांहूनही अनेक लोक आले होते. एकजण जमखंडीहून आल्या होत्या. गुरुदेव रामभाऊ रानडे यांच्या प्रतिमेला हार घालून आणि आरती म्हणून, तसेच दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. आलेल्या प्रत्येक सदस्याने सकाळच्या सत्रात थोडक्यात आपली ओळख करून दिली. त्यात आपले नाव, जमखंडीतले वास्तव्य कुठे होते आणि शालांत परीक्षेचे वर्ष सांगून आपली आणि आपल्या कुटुंबाबद्दलची माहिती सांगितली. भोजनानंतर श्री.विश्वास पटवर्धन यांनी खुमासदार शैलीत स्वभाव राशींचे सांगितले आणि श्री.शशीकांत रास्ते व सौ.सुधा आपटे जोशी यांनी सुश्राव्य गाणी ऐकवली. कार्यक्रमाच्या आधी आणि जेवणाच्या काळात सर्वांना एकमेकांशी गप्पागोष्टी करण्याची भरपूर संधी मिळाली होती. काही दशकांच्या ताटातुटीनंतर भेटलेल्या मित्रांना एकमेकांना भेटून खूप आनंद वाटला हे या स्नेहसंमेलनाचे सर्वात मोठे यश होते. या संमेलनानिमिच्य वॉट्सॅपवर आलेल्या प्रतिक्रिया खाली संकलित केल्या आहेत. तसेच काही छायाचित्रे दिली आहेत.
आनंद घारे . . दि.५ डिसेंबर २०२१
---------
जमखंडीची देवस्थाने या विषयावरील माहिती एका वेगळ्या ब्लॉगवर दिली आहे. दि.२५-०९-२०२२.
https://anandghan.blogspot.com/2022/09/blog-post_25.html
--------
राजू शामराव वाटवे
आज आपल्या संमेलनाचा दिवस. जे येणार आहेत ते संपूर्ण उत्साहात या, आनंद घ्या...
इतर सहकाऱ्यांना फोटोच्या आणि आठवणींच्या माध्यमातून शेअर करा.
वेंकटरमण गोविंदा, गोविंदा... रमारमण गोविंदा, गोविंदा, भक्तवत्सल स्वामी गोविंदा गोविंदा
---
सुरेखा काणे
अनिल, वैजू चंदू राजू आणि विश्वास तुम्ही सर्वांनी अरेंज केलेले जमखंडीकरांचे संमेलन खूप सुरेख झाले. सर्वांच्या चेहऱ्यावर खूप वर्षांनी भेटल्याचा आनंद दिसत होता. सर्वांना किती बोलू काय काय बोलू असे झाले होते सर्वजण तृप्त मनाने समाधान आणि आनंद घेऊन परतले. हे याचे श्रेय आपल्याला आहेच त्याबद्दल धन्यवाद आणि कौतुक 🙏🏻🙏🏻
--
अर्चना गोरे
आजचे संमेलन खूपच छान झाले कितीतरी मित्र मैत्रिणी ४०-४५ वर्षा नंतर भेटले रेखा फडके उषा आपटे शरयु बापट रेखा आणि भारती पटवर्धन विश्वास पटवर्धन खूप आनंद झाला कितीतरी नवीन ओळखी झाल्या आयोजक तुमचे खूपखूप आभार
--
शरद कुलकर्णी
आजचा कार्यक्रम खुपच छान रितीने आयोजित केलयाबद्ल आयोजकाचे मनापासून आभारी आहे, धन्यवाद
--
आनंद घारे
मला शाळेतले मित्र, कॉलेजमधले मित्र, नोकरीतले मित्र, जवळचे नातेवाईक आणि काही मित्रांचे भाऊ अशा विविध प्रकारच्या व्यक्ती भेटल्या, त्यातले काही तर तब्बल साठ वर्षांनंतर भेटले. हे सगळे अद्भुत अनुभव होते. आयोजकांना धन्यवाद.
--
सुचिता शहा
आजचा कार्यक्रमाचे आयोजन फार सुंदर झाले.मला कार्यक्रमाला येईपर्यंत आपल्याला कोण ओळरवेल की नाही असे वाटत होते पण कार्यक्रम ला आल्यावर बरे वाटले.बर्याच वर्षानी सगळयाचीं भेट झाली.छान वाटले. सुचिता शहा.
--
सुरेश फाटक
आजचा कार्यक्रम बिलकुल अनौपचारिक ठेवल्याने फार बरे वाटले.एकेक जण ओळख करून देताना आपलं जमखंडीतील ठिकाणी सांगत होते त्या वेळी डोळ्यासमोर तो तो भाग येत होता त्या मुळे जमखंडी सफर झाल्यसारखी वाटली.त्यासाठी आयोजकांना शतशः धन्यवाद🙏🙏🙏👌👌👌
--
राजू वाटवे
सुप्रभात, मी एक संमेलनात भाग घेणारा म्हणून माझ्या भावना व्यक्त करतो.
१ एकूण संमेलन छान पार पडले
२ ओळखीचा कार्यक्रम थोडा लांबला असे वाटले, पण बरेच जण पहिल्यांदाच आले होते आणि बऱ्याच वर्षांनी एकमेकांना भेटत होते, त्यामुळे हे जरुरीचे होते. यानिमित्ताने सर्वात व्यक्त होण्याची संधी मिळाली
३ जेवण मेनू आणि टेस्ट छान
४ विश्वासचा कार्यक्रम सुंदर झाला, पण त्याला कार्यक्रम रंगला असतानाच वेळे अभावी आवरता घ्यावा लागला. पुढच्या वर्षी त्याला आपण १ ते १.३० तास तरी दिला पाहिजे
५ शशी रास्ते आणि सुधा आपटे यांची गाणी छान झाली
आपल्या सर्वांचा एक ग्रुप फोटो घ्यायचा राहिला
पुढच्या वर्षी काय करुयात
१ संमेलनाचे ठिकाण पुणेच असावे आणि डीसेंबर पहिल्या आठवड्यात घ्यावे
२ संमेलन संपूर्ण दिवसाचे असावे, सकाळी ९ ते ४ किंवा ५ वाजेपर्यंत
३ आपल्या मेंबर्सचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम एक तासभर असावा
जे विचार मनात होते ते तुम्हा सर्वांसमोर मांडले
---
मधुकर आपटे
सर्व फोटो छान. सर्वांचे मेसेज वाचून दूर असूनही मजा अाली. आयोजक सर्वश्री अनिल, चंदू, राजू, विश्र्वास व सौ. वैजयंती यांचे अंत:करणातून आभार व अभिनंदन.
--
वैजयंती पटवर्धन
किशोर कुलकर्णीला आठवताना: आपलं संमेलन छान झालं. आम्ही या ग्रुपची सुरुवात १९६९ बॅच ने केली. तेव्हा इतर मेंबर्स ची माहिती काढण्यासाठी किशोरने खूप मदत केली होती.. तो जमखंडीला जायचा त्यामुळे हायस्कूल मध्ये जाऊन रजिस्टरचे फोटो काढून होते पाठवले त्याने. कारण ५० वर्षानंतर नाव आठवण साऱ्यांची हा ही प्रश्नच होता. त्यानंतर फोन शोधायला सुरुवात केली.
--
सीमा भिडे
Anil, Raju, Chandu, Vaiju & Vishvas yana khup khup dhanyavad kalache get together yashaswi zale🙏🙏🙏
Parat tumache sagalyanche abhinandan🙏🙏🙏👌👌
--
सुजाता कबुले
50 वर्षा मागे गेलो असे वाटले खूप छान
सगळ्या चे अभिप्राय वाचून संमेलनाचा मेंबर्स व आयोजका चे अभिनंदन💐
--
अनिल पोंक्षे
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो🙏 आपल्या सर्वांच्या सहभागाने आणि सहकार्याने जमखंडी वासियांचे स्नेहसंमेलन उत्कृष्टपणे पार पडले.
आपण सर्वजण आलात याबद्दल आभारी आहे.
धन्यवाद 🙏
--
विश्वास पटवर्धन
महत्त्वाचे म्हणजे सौ अनिल पोंक्षे आणि सौ. चंदू पोंक्षे यांनी सस्मित सेवा व सहकार्य करून रजिस्ट्रेशन व रोख रक्कम जमा करून घेण्याचे शिवधनुष्य पेलले. त्यांचे धन्यवाद मानायचे राहून गेले असे मला व्यक्तिशः वाटते.म्हणून ते इथे मानतो. त्यांच्या पर्यंत कृपया पोचवावेत ही अनिल व चंदूला विनंती.
तसेच चंदू पोंक्षेने न विसरता जमखंडी पेढे आणल्याने सम्मेलन- प्रारंभ मधुर झाला आणि हा गोडवा शेवटपर्यंत राहिला त्यामुळे चंदूचेही आभार.
जमखंडीचे पेढे मला फार आवडतात. (हल्ली पूर्वीप्रमाणे खवा भाजत नाहीत हे मात्र खरे)मी जमखंडी ला गेलो की येताना भरपूर पेढे आमच्या बँकेत वाटायचो. कारण सगळ्या सहका-यांना ते आवडायचे. अजून एक आठवण1975 -76ला पावसाळ्यात पेढे अक्षरशः साडेपाच रु किलोने मिळायचे. चोपडेकडे मी व लहान भाऊ विद्याधर शंभर - शंभर ग्राम पेढे व आठ आणे चिवडा घेऊन चोपडा दूकानात पाटावर बसून कित्येकदा खाल्लेत. आम्ही दोघे हाँस्टेल मधे असल्यागत जमखंडीत राहिल्याने जमखंडीतील सगळी हाँटेल्स पालथी घातली. गेले ते दिन गेले.🙏🙏
काल कित्येक दिवसांनी ज्योति भेटली. राजू भेटला. निशा तर कित्येक वर्षांनी भेटली. या ग्रुपचे अनेक उत्साही सदस्य भेटले. अनिलला त्याबद्दल विशेष धन्यवाद. खंत वाटते ती उत्साही लेखिका वर्षाताई कुमठेकरची अनुपस्थितिची.
खरं तर सम्मेलनाबद्दल खूप भरभरुन लिहिता येईल पण विस्तारभयास्तव विराम घेतो.🙏💐
--
उज्वला नागनूर
संमेलनाचा कार्येक्रम छान झाला. सर्वजण आनंदात होते.खूप छान वाटले.
घरी येऊन पेढा पाहिला लगावला तेव्हाच चवी वरून बाळू चोपडे यांचा पेढा होता.
आणि आत्ता कळले चंदू पोंक्षे जमखंडी चे पेढे अमृताचे. चव अगदी लहानपणासारखीच अजिबात बदल नाही. खूप छान.
👌👌संयोजकांचे सस्नेह आभार🌹🌹
--
दिलीप पेंडसे
आणखी पण एक ठिकाण आहे,दोन नंबर शाळेसमोर एकजण खूप छान बनवितो.
कालचे स्नेहीजन सम्मेलन खूप छान झाले.मला हि नि दीड शिकविणारै अथणी सर आठवले,त्यांचे मुळेच श्री मैथिलीशरण गुप्त यांच्या काही कविता मला कंठस्थ झाल्या.
दोघे जण कानडीत बोलले.आवडले.
चिरतरुण स्त्री व चिरतरुण घारे असा समसमा संयोग झाला.
सुरेश फाटके रिझर्व बॅंकेतून निवृत्त होताच एक लाख रुपये संचकार्यातील सेवा योजनासाठी समर्पित केले होते.वर्णन करायचे खूप आहे.संयोजक कुटुंबियांचे मनापासून अभिनंदन चरैवेति चरैवेती.पेंडसे.
--
वर्षा कुमठेकर
विश्वास माझी आठवण काढलीस, खूप बरे वाटले.वाचून खरेतर माझे डोळेच, भरून आले मला पण तुम्हा सगळ्यांना खूप खूप भेटायची इच्छा होती, श्रीजी घारे दादा, यांनी आणि तुम्हा सर्वांनी माझ्या कथा कवितांचे खूप खूप कौतुक केले त्याबद्दल प्रत्यक्ष आभार मानायचे होते, मनाने खरे तर काल मी दिवसभर तिथेच होते. जमखंडी संमेलनात आपण खरेच भेटूया नक्की
--
अनिल पोंक्षे
माझी डायरी
दिनांक 3 डिसेंबर, आजचा दिवस विशेष म्हणजे जमखंडी करांचे स्नेहसंमेलन, स्वामी कृपा हॉल मध्ये आयोजित केले होते. पाच जणांच्या संयोजक कमिटीची तयारी महिन्यापासून चालू होती. आजचा दिवस उजाडला पण अवेळी पाऊस, बोचरी थंडी, यामुळे किती उपस्थिती होईल याबद्दल सर्वजण साशंक होते. प्रत्यक्षात चित्र बदलले आणि अकरा वाजता म्हणता म्हणता 62 ज्येष्ठांनी हजेरी लावली. जमखंडी गावचे प्रेम आणि ज्येष्ठांचा उत्साह याला खरोखरच सलाम.
संमेलनात सर्वांचे स्वागत चविष्ट पेढा आणि वाफाळलेली कॉफी यांनी झाले. दीप प्रज्वलन, श्री गुरुदेव रानडे यांची आरती नंतर ओळख परेड, राजू वाटवे यांचे सुंदर सूत्रसंचलन, गरमागरम भोजनाचा आस्वाद, जेवणानंतर श्री विश्वास पटवर्धन यांचे रसपूर्ण राशिभविष्यावरील कथन व श्री शशिकांत रास्ते आणि सौ सुधाताई आपटे जोशी यांची दोन सुंदर गाणी वर चहा पान, असा सर्व कार्यक्रम संपन्न झाला. सर्वजण बरेच वर्षांनी भेटल्यामुळे उल्हसित झाले होते.
या सुंदर आनंद सोहळ्यात मला सहभागी व्हायला मिळाले याचा खूप आनंद आणि समाधान वाटले.
अनुजा अनिल पोंक्षे
--
🌹 आनंद मेळा🌹
कधी कधी मला वाटतं,
फार उशिरा भेटलो आपण एकमेकाला.
उत्साहाचं झाड ,तसंच आहे टवटवीत, पण,वयाची फुलं,
लागली आहेत,गळून पडायला.
जिथे आपण जन्मलो, वाढलो,
शिकलो ,हसलो ,खेळलो.,
चिडलो रडलो भांडलो सुद्धा.
तिथली माती आपल्या देहाच्या कणाकणात, घट्ट रुतली आहे.
वर्षानुवर्षाच्या स्नानानंतर,ही,
ती देहातच रुजली आहे म्हणून वाटते.......
जसं, रामेश्वराच्या सागराचं जल,
काशीला नेतात,
आणि परत काशीची गंगा
रामेश्वराला अर्पण करतात.
........ तसंच
आपल्या नेत्रात असलेलं,
गाव प्रेमाचं, पवित्र जल,
आपण कुठे कुठे वाहून नेलं,
आता ते आनंदाश्रु,
आपल्या मातीत मिसळण्यासाठी,
पुन्हा भेटू आपण लवकर.
हीच प्रतीक्षा मनी निरंतर.
तेव्हा नका करू कुणी,
निरोप समारंभ वेगळा.
हा तर आहे, पुनर्भेटीच्या,
नियोजनासाठी जमलेला,
आनंद मेळा
🌹 वर्षा गोगटे कुमठेकर🌹
कालच्या तीन तारखेच्या, कार्यक्रमाला हे माझे काव्य पुष्प अर्पण🌹🌹🌹🌹
--
अनिल पोंक्षे
संमेलनास मुकलेले कलाकार
कवियीत्री - वर्षा
विनोद वीर - शेखर
वर्णन कार - मधू
अजुनही काही सुप्त कलाकार आहेत
--
दिलीप पेंडसे
कन्नड भाषेत बोलणारे पहिले होते कॅ.भालू शिरोळकर,दुसरे कोण?
कृपया नाव व नंबर कळवावा.पेंडसे.
वैजयंती : अरुण गोठे आमचा बॅचमेट
--
Jamkhandi on Wikipedia : https://en.wikipedia.org/wiki/Jamakhandi
उत्तर पेशवाईच्या काळात म्हणजे बारभाईंच्या कारभारात परशुरामभाऊ पटवर्धन नावाचे एक शूर लढवय्ये होऊन गेले. ते काही काळासाठी पेशव्यांचे सेनापतीही होते. त्यांनी निजाम, हैदर आणि टिपू सुलतान यांच्याशी लढाया केल्या, एकदा इंग्रजांनाही हरवले होते, पण मराठा साम्राज्याचे राजे आणि सरदारांच्या आपापसातल्या भांडणामध्येही त्यांना भाग घ्यावा लागला होता. अशातच ते कोल्हापूरच्या राजाकडून मारले गेले. त्यांनी दाखवलेल्या शौर्यासाठी पेशव्यांच्याकडून त्यांना दक्षिण महाराष्ट्र आणि कर्नाटक भागात अनेक गावे मिळाली. पुढे त्यांच्या वंशजांनी वाटण्या करून जमखंडी, सांगली, कुरुंदवाड वगैरे राज्ये किंवा संस्थाने स्थापन केली. श्रीमंत गोपाळराव पटवर्धन यांनी सन १८११ मध्ये जमखंडी संस्थान स्थापन केले. ते जमखंडी आणि कुंदगोळ अशा दोन ठिकाणी विभागलेले होते. जमखंडी गावाजवळील रामतीर्थ येथे त्यांनी एक सुंदर असा राजवाडा बांधला होता. तिथे त्यांचे वास्तव्य असायचे.
पुढे रामचंद्रराव अप्पासाहेब, सर परशुराम भाऊसाहेब आणि शंकरराव अप्पासाहेब हे राज्यकर्ते होऊन गेले. त्यानंतर हे संस्थान मुंबई राज्यात विलीन झाले. जमखंडीच्या उदार आणि दूरदर्शी राज्यकर्त्यांनी जमखंडी गावासाठी अनेक लोककल्याणकारी कार्ये केली. जमखंडी येथील आमचे परशुरामभाऊ हायस्कूल ही एक नावाजलेली आणि सुसज्ज अशी शाळा होती. जमखंडीच्या सरकारांनी पुण्याच्या एस पी कॉलेजला भरघोस देणगी देऊन सर परशुरामभाऊ हे नाव दिले आणि तिथे जमखंडीच्या मुलांना मोफत शिक्षण मिळावे अशी व्यवस्था केली. जमखंडीजवळ सनाळ इथे कृष्णा नदीतील पाणी उपसून ते नळावाटे गावाजवळील टेकडीवरील एका टाकीत आणायचे आणि तिथून नळामधून घरोघरी पोचवायचे अशी व्यवस्था करून ठेवली. जमखंडीसारख्या लहानशा गावातसुद्धा त्या काळी पोलो या खेळासाठी ग्राउंड बांधले तसेच क्लब, वाचनालय, मंडई, पॉवर स्टेशन वगैरे सगळ्या आधुनिक सोयी करून दिल्या.
सर परशुराम भाऊसाहेब पहिल्या महायुद्धात इंग्रजांच्या बाजूने लढाईच्या मैदानात उतरले होते आणि त्यांनी केलेल्या कामगिरीसाठी त्यांना सर इंग्लंडच्या राणीकडून हा खिताब मिळाला होता. पण त्यांच्याच हत्तीच्या धडकेमुळे त्यांचा प्राण गेला आणि त्या दुःखाने व्याकूळ होऊन पुढे त्या हत्तीनेही प्राण सोडला असे सांगतात.
❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄
पुण्याच्या स.प. महाविद्यालयाच्या (एस पी कॉलेजच्या) नामकरणाविषयी श्री न.चिं.केळकर यांनी लिहिलेला लेख खाली दिला आहे.
❄❄🏵❄❄ ❄❄❄🏵❄❄❄
🔸जमखंडी संस्थान.🔸
---------------------------------------------
🔸संकलन: सदानंद पाटील, रत्नागिरी.
---------------------------------------------
ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील मुंबई इलाख्यातील दक्षिणेकडील एक संस्थान. क्षेत्रफळ सु. १,४२० चौ. किमी. लोकसंख्या सव्वा लाख (१९४१). जमखंडी, बिद्री आणि कुंदगोळ हे तालुके त्यात समाविष्ट होते. संस्थानचा प्रदेश सलग नव्हता. पेशव्यांनी पटवर्धन कुटुंबास दिलेल्या सरंजामातील हे एक संस्थान असून परशुरामभाऊ पटवर्धनांच्या जहागिरीची १८०८ मध्ये वाटणी झाली. त्यांचा मुलगा रामचंद्रपंत हा या संस्थानचा पहिला अधिपती झाला. तेव्हाचे त्याचे उत्पन्न सु. साडेपाच लाख रु. असून त्याबद्दल त्यास १,७२८ स्वार बाळगावे लागत.
पेशवाई-अस्तानंतर अधिपती गोपाळराव यांनी इंग्रजांशी तह करून ३०० स्वार बाळगावे व तीस हजारांची त्यांना तैनात मिळावी असे ठरले. १८२१ मध्ये चिंचणी फुटून निघाली. १८४८ मध्ये तासगावला वारस नाही म्हणून ते खालसा झाले. सु. अडीच लाखांवर आलेल्या उत्पन्नापैकी तैनाती फौजेच्या बदल्यात इंग्रजांस संस्थानला २०,५१६ रु. खंडणी द्यावी लागे. गोपाळरावांनंतर दत्तकपुत्र रामचंद्रराव गादीवर आले (१८४०). तेव्हा इंग्रजांनी नजराणाही घेतला. त्यांना अखत्यारी मिळेपर्यंत (१८५३), दत्तक आई व पुढे इंग्रज कारभारीच प्रशासन व्यवस्था पाहात होते. १८५७ च्या उठावात भाग घेतल्याच्या संशयावरून ते वर्षभर प्रतिबंधात होते.
रामचंद्रराव व त्यांच्या मृत्यूनंतर गादीवर आलेले (१८९७) दत्तकपुत्र परशुरामभाऊ यांनी संस्थानात अनेक सुधारणा केल्या विशेषतः प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले, त्यामुळे प्रजा शिक्षित झाली. आरोग्य, सरकारी बँक, जनावरांची प्रदर्शने, पाण्याची सोय इ. क्षेत्रांत कामे झाली. प्रजेची गाऱ्हाणी राजा जातीने ऐकत असे. प्रजेला शासनावर टीका करण्याचा अधिकार होता. स्वातंत्र्योत्तर काळात (१९४७) प्रथम ते मुंबई प्रांतात विलीन झाले.
पुढे स्वतंत्र म्हैसूर (आता कर्नाटक) प्रांत झाल्यावर त्यामध्ये ते अंतर्भूत केले.
मराठी विश्वकोश.
❄❄🏵❄❄
जमखंडीतील मराठी शाळा
जमखंडी संस्थानाचा राज्यकारभार मराठी भाषेतून चालत असल्यामुळे मराठी ही तिथल्या सुशिक्षित लोकांची प्रमुख बोली भाषा होती. त्याच्या मुलांच्या शिक्षणासाठी रामचंद्रराव पटवर्धन सरकारांनी सुमारे दीडशे वर्षांपूर्वी जमखंडीत एक मराठी शाळा सुरू केली. याची माहिती सन २०१९मधील एका वर्तमानपत्रात छापून आलेल्या एका लेखात दिली गेली होती. श्री.अनिल पोंक्षे यांनी त्याचे एक सुंदर कात्रण पाठवले आहे. ते खाली दिले आहे. त्या लेखाचे शीर्षक 'जमखंडी मराठी शाळेची दीड शतकाकडे वाटचाल' असे आहे. २०१९मधले हे कात्रण आहे, त्याच्या १५० वर्षे आधी म्हणजे सुमारे १९६९चा काळ येईल. या प्राथमिक शाळांनी आपला शतक महोत्सव १९८८ मध्ये साजरा केला असे या लेखात लिहिले आहे. पण प.भा.हायस्कूलही १८८८मध्ये सुरू झाले असेही लिहिले आहे. म्हणजे कदाचित मराठी आणि इंग्रजी या दोन्ही शाळा एकाच वर्षी उघडल्या असण्याची शक्यता आहे असे वाटेल.
जमखंडी इतिहास दर्पण या माहितीपूर्ण पुस्तकात अशी माहिती आहे की सन १८७४मध्ये पागा शाळा सुरू केली गेली आणि त्याच्याही आधी सन १८७०मध्ये दोन नंबर मराठी शाळा सुरू केली होती. हे नंबर बहुधा नंतरच्या काळात ठरवले गेले असावेत. १८८० मध्ये अँग्लो व्हर्नाक्युलर या नावाची शाळा फेरिसकूलमध्ये सुरू केली. १८८८मध्ये ती हनुमान मंदिराच्या समोर बांधलेल्या नव्या इमारतीत नेली आणि १८९८ मध्ये प.भा.हायस्कूलच्या नव्या भव्य इमारतीत स्थलांतरित केली. त्यानंतर हनुमान मंदिरासमोरच्या जागेत शकुंतला गर्ल स्कूल सुरू झाले. काही वर्षांपूर्वी त्या शाळेची इमारत पाडून तिथे बाजार भरवला जात आहे.
माझ्या लहानपणी मी १९५१-५२मध्ये पागाशाळेत शिकायला जायला लागलो. त्या काळात ती पागा म्हणजे गोठा किंवा तबेला यासारखीच होती. एका लांबच लांब अशा उघड्या पडवीमध्ये पहिली, दुसरी आणि तिसरीचे वर्ग बाजूबाजूला भरत असत. त्यांच्यामध्ये पार्टीशनही नव्हते. फक्त चौथीच्या वर्गासाठी वेगळी बंदिस्त अशी खोली होती. फोटोत दाखवलेली पागा शाळेची इमारत नंतरच्या काळात बांधली असावी. दोन नंबरची शाळा जमगीच्या वाटेवर होती, तिची इमारत सुंदर दिसत असली तरी ती शाळा थोडी कमी दर्जाची समजली जात असे. आम्ही चौथी इयत्ता पास झाल्यावर पाचवी ते सातवी इयत्तेत असतांना कचेरीपलीकडे, गवळी गल्ल्लीच्या पुढे असलेल्या फेरिस्कूलमध्ये जात होतो. त्याकाळी सातवीला व्हर्नाक्युलर फायनल म्हणत असत आणि त्यासाठी एक बोर्डाची परीक्षाही होती.
स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात फायनल परीक्षा पास झाल्यावर मराठी शाळेतले शिक्षण संपत असे. मराठी शाळेतली चौथी पास झाल्यानंतर हायस्कूलमध्ये प्रवेश मिळत असे आणि ते इंग्रजी पहिलीपासून सुरू होत असे. इंग्रजी सातवीला मॅट्रिक म्हणत असत आणि ती परीक्षा पास होणारे विद्यार्थी हुषार समजले जात असत. माझ्या माहितीतले त्या काळातले कितीतरी लोक ती परीक्षा पास होऊ न शकल्यामुळे 'नॉनमॅट्रिक' राहिले होते. आमच्या वेळेपर्यंत 'इंग्रजी पहिली, दुसरी' वगैरे नावे नाहीशी झाली होती. आम्ही हायस्कूलमध्ये एकदम आठवीत प्रवेश घेतला आणि अकरावीला एस एस एल सी ची परीक्षा देऊन शाळा आणि जमखंडी सोडली, कारण त्या काळात तिथे कॉलेज नव्हते.
जमखंडी संस्थान भारतात विलीन झाल्यानंतर ते मुंबई राज्यात समाविष्ट झाले होते. त्या काळातच किंवा त्याच्याही आधीपासून कन्नड या बहुसंख्य स्थानिक लोकांच्या भाषेला महत्व येत गेले आणि कन्नड माध्यमाच्या शाळांना सरकारचे प्रोत्साहन मिळून त्यांची झपाट्याने वाढ होत गेली. मी फेरिस्कूलमध्ये शिकत असतांनाच (१९५५-५७ मध्ये) तिथे कन्नड माध्यमातल्या प्राथमिक शाळेचे वर्गही भरत होते. आता फेरिस्कूल आणि दोन नंबरची शाळा या पूर्णपणे कन्नड शाळा झाल्या आहेत असे समजते. मराठी माध्यमाच्या मुलांच्या आणि मुलींच्या शाळा पागा शाळेत एकवटल्या असाव्यात असे या लेखावरून वाटते. पण तिथली प्रत्यक्ष परिस्थिति काय आहे याबद्दल मला संभ्रम वाटतो.
आनंद घारे.
आमची शाळा - एक ऐंशी वर्षांपूर्वीचा लेख
❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄
२. जमखंडीच्या प्रमुख व्यक्ती
डॉ.इंदुताई पटवर्धन
जमखंडीचे राजे शंकरराव अप्पासाहेब यांच्या कन्या डॉ.इंदुताई पटवर्धन (1926-1999) यांनी अविवाहित राहून आपले सर्व आयुष्य समाजकार्यासाठी वाहून घेतले होते. त्यांनी महात्मा गांधीच्या चळवलईत भाग घेतला, दुसऱ्या महायुद्धात रेडक्रॉसमध्ये काम केले आणि पुण्याजवळ महारोग्यांसाठी आश्रम स्थापन केला.
Princess of the people
A very illustrious personality from Jamkhandi of those times was Dr Indutai Patwardhan (1926-1999), sister of the ruler Parshuramrao. The princess was educated in Jamkhandi and Kolhapur where she studied occupational therapy and homoeopathy. Sacrificing her palatial comforts, she joined Gandhiji’s movement in Sabarmati in 1942. She was later trained by Madam Maria Montessori, the Italian educationist herself, and worked at St Columbia High School, Bombay.
She joined the Indian Red Cross and volunteered to work on the Burma front during the Second World War. She was the first Indian woman to work in South East Asia. After Partition, she worked for the rehabilitation and resettlement of refugees and women abductees from Pakistan in Ferozepur where, along with Lady Martten, she was the joint camp commandant. She was awarded the Dalit Mitra by Maharashtra and Tamra Patra Prashasti by Karnataka. Dr Indutai Patwardhan established Anandgram on the outskirts of Pune to care for leprosy patients.
Read more at: https://www.deccanherald.com/content/364366/migrant-rulers-jamkhandi.html
बाबा आमटे यांनी सुरू केलेल्या नंदनवन या कुष्ठरोग्यांच्या आश्रमाबद्दल बहुतेकांनी वाचले असेल, पण त्याच्याही आधी पुण्याजवळ एक आनंदग्राम स्थापन करण्यात आले होते आणि ते काम आपल्या जमखंडीच्या राजकन्येने केले होते हे मात्र कुणाला फारसे माहीत नाही या ताईंनी आजन्म समाजसेवा केली, पण त्या प्रसिद्धीच्या प्रकाशझोतात आल्या नाहीत. मी लहानपणी जमखंडीलासुद्धा कुणाच्या तोंडून त्यांच्या कार्याबद्दल कधी ऐकले नव्हते. आपल्या सदस्यांनी माहितीत भर टाकावी. . . . . आनंद घारे
----------
डॉ.भा.र.साबडे
--------
पू.गुरुदेव रामभाऊ रानडे यांची आरती
जय जय आरती करितो
तुझं श्री स्वामी राम राया।
भक्तजनासी, उध्दरण्यासी, धरी कृपाछत्र छाया ।।धृ।।
श्री रामेश्वराच्या , तीर्थ प्रसादे जन्म घेतलासी ।
जमखंडी ग्राम ते पावन झाले, कर्नाटक देशी ।।
बुद्धिवंत तू, ज्ञानवंत तू जगी मार्गदर्शक होशी ।१।
जय जय आरती करितो
बालपणी तुज उंमदिशानुग्रह ज्ञान प्राप्त झाले ।
नामस्मरणी ध्यान लागले, अलौकिक आले ।
दिव्य प्रचितीच्या दिव्य साक्षीने, गुरुपदी बैसविले । २।
जय जय आरती करितो
संत वांङमय अध्यात्म चिंतन मोक्ष परमार्थ ।
ग्रंथ निर्मिती करुनि केला सुलभ गुढार्थ ।।
तत्त्व चिंतनी देह समर्पित ना मोह ना स्वार्थ ।३।
जय जय आरती करितो
निंबाळा ग्रामी आश्रम स्थापिला, भक्तिचे पीठ ।
ज्ञानामृत प्राशुनी तृप्त जाहले, जणू दुसरे वैकुंठ ।।
नाम सुधेचा ओघ लागला ती मुक्तीची पेठ ।४।
जय जय आरती करितो
साक्षात्कार ईश्वरी हेचि,…
नमस्कार. डॉ. दोडवाड यांच्या नेतृत्वाखाली मा.श्री.गुरुदेव रामभाऊ रानडे यांची आरती तयार करण्यात आली. ती सौ.शोभा पांडे यांनी लिहिली आहे. आणि सौ.संजना पाटणकर यांनी गायली आहे .
*****************************
काही आठवणीतली माणसे
महादेवप्पा मुरगोड
आता मी जे नाव सांगणार त्यावर तुमच्या भुवया प्रश्नचिन्हांकित होतील.जेव्हां बी डी जत्ती आमदारकीचा उभे रहायचे त्यांचे विरुद्ध महादेवप्पा मुरगोड उभे रहात.माझ्या घरी प्रचारासाठी ते वडिलांना बैठकीचे खोलीत येऊन भेटल्याचे आठवते. त्यांचे काळात इंचिगेरी संप्रदाय विजापूर जिल्ह्यात खूप सक्रिय होता बहुतेक प्रत्येक खेड्यात रोज संध्याकाळी काही आध्यात्मिक ग्रंथाचे आंशिक वाचन व नंतर त्या वाचनानंतर कानडी भाषेत त्याचा अर्थ विस्तार कथन व्हायचे.मित्रहो तो मूळ मराठी ग्रंथ म्हणजे समर्थ रामदास रचित दासबोध! कल्पना करा,एका मराठी ग्रंथाचे रोज सायं शेकडो खेड्यात,प्रसंगी कंदिलाचे उजेडात क्रमशः पारायण व कानडीत अर्थविस्तार हा नित्यक्रम,अनेक वर्षे चालू होता,आहे.शैलेशजी आपटे याला नक्कीच दुजोरा देतील..मी शेती करीत असताना हिप्परगीला मुक्कामाला होतो तेव्हां सायंकाळी अनुभवले पाहिले आहे!मग सांगा अशी परंपरा जपणारे महादेवप्पा थोर नाहीत का? . . . . . दिलीप पेंडसे
जमखंडीचे देशभक्त
श्री.मेघःशाम पटवर्धन
विश्वास पटवर्धन ः कै ,मेघ:श्याम सीताकृष्ण यादवाडकर पटवर्धन जन्म १२३_१९२१ ,यांचे जन्म शताब्दी वर्ष सुरू होत आहे त्यांना नम्र अभिवादन🙏🙏
कै. हर्डिकरांनी 1923 -1924 मधे सेवादल स्थापना केली. मूलतः सेवा दल हे हिंदूस्थानी (काँग्रेस) सेवा दल होते. त्याचे पहिले अध्यक्ष नेहरु होते. डाँ. हेडगेवार ही या सेवा दलाशी संबंधित होते. 🙏
श्रीरंग घारे : श्री शामराव पटवर्धन यादवाडकर चलेजाव चळ्वळीतील जमखंडीचे हीरो होते व त्यानी भूमीगत होऊन कार्य केले असे आठवते सादर प्रणाम 🙏🏻🙏🏻
मी आठवणीने लिहितोय काहीं दुरुस्ती असल्यास सांगणे. श्री शामराव व भानुमती रानडे राष्ट्र सेवादला चे कार्य करीत जमखंडीत राष्ट्र सेवादल सुरू झाले पण शामरावांचे अनुपस्थितिमुळे बंदपडले असे आठवते
साँरी श्री शामरावांचे आनुपस्थितीत राष्ट्रसेवादल सुरू नव्हते नंतर सुरू झाले असणारच मी माझे आठवणीचे काळा बद्दल लिहिले त्यांच्या सारखे ध्येयनिष्ठ आजीवन कार्य करणारच.,पण जमखंडीत काँग्रेस से्वादल सूरू होते दिवाणांचे (सस्था नचे दिवाण) बंगल्याशैजारील मैदानावर.. कारण काय माहित नाहीं पण ते भास्कर जोगळेकर मुरगोड वगैरे चालवत असे आठवते
---
उज्वला : तुमची आठवण अगदी बरोबर छान वाटले. अभिमान वाटला. पण एक सांगते. राष्ट्र सेवा दल पुण्यात स्थापन झाले. आणि सन्मित्र संघ जमखंडी तर स्थापन झाला. नंतर श्यामराव पटवर्धन स्वातंत्र्य मिळाल्यावर राष्ट्रीय सेवा दलातून कार्य करु लागले. धणे कार्य अगदी शेवटपर्यंत केले. पण आपल्या जमखंडीतील चालूच होता. एवढे मला माहीत आहे. धन्यवाद👍👍
🙏🏻👆राष्ट्र सेवा दल. राष्ट्रीय नाही.
----------
श्री. मेघःशाम शंकर वाटवे
१९४२ च्या लढ्यातले जमखंडी संस्थांनातील स्वातंत्र्य सैनिक....
१ मेघःशाम शंकर वाटवे उर्फ शामराव वाटवे, माझे वडील स्वातंत्र्यानंतर जमखंडीतच कार्यरत होते
२ शामराव पटवर्धन, माझ्या वडीलांचे जेष्ठ स्नेही, स्वातंत्र्यानंतर कोल्हापूरला स्थाईक होऊन राष्ट्र सेवा दलाचे कार्य करत राहिले
या दोघांच्या पैकी मी माझ्या वडीलांच्या कार्याबद्दल सांगू इच्छितो....
शामराव वाटवेंचा जन्म ७ जून १९२३ रोजी जमखंडीला झाला. वडील हायस्कूल मध्ये शिक्षक आणि राष्ट्रीय विचारांचे, त्यामुळे राष्ट्र भक्तीचे बाळकडू घरातूनच मिळाले. पण दुर्दैवाने त्यांना वयाच्या तीसऱ्या वर्षी आई आणि विद्यार्थी दशेतच वडीलांना गमवावे लागले. त्यांचे आजोबा जे मुलींच्या शाळेत शिक्षक होते ते त्यांचे काळजी वाहक झाले.
शामराव मॅट्रिक नंतरचे शिक्षण घेण्यासाठी पुण्याला आले. आर्थिक अडचणींमुळे रेग्युलर काॅलेज शिक्षण घेणं शक्य नव्हते. मग एक वर्षाचा काॅमर्सचा डीप्लोमा (GCD) आणि स्वतःच्या पायांवर उभे राहण्यासाठी त्यावेळचं नवीन तंत्रज्ञान म्हणून रेडिओ रिपेरिंग शिकले. त्याच वेळी पुण्यातील मुक्कामात ते राष्ट्र सेवा दल आणि स्वातंत्र्य आंदोलनाशी जोडले गेले.
९ ऑगस्ट १९४२ रोजी जेंव्हा महात्मा गांधी यांनी मुंबईत गोवालीया टॅंग मैदानात ब्रिटीश सरकारला निर्वाणीचा इशारा दिला " छोडो भारत " आणि कार्यकर्त्यांना आदेश दिला " करो या मरो " त्या प्रसंगी शामराव वाटवे प्रत्यक्ष हजर होते. हा विचार घेऊनच ते पुण्यात परतले. जेष्ठ मंडळी सोबत त्यांच्या बैठका सुरू झाल्या.
त्यांच्या बरोबर ३-४ कार्यकर्त्यांना एक कामगिरी सोपवण्यात आली. आत्ताच्या रायगड जिल्ह्यातील महाड येथे आंदोलन करुन तेथील मामलेदार कचेरी वर तिरंगा फडकवायचा. त्याप्रमाणे महाड येथील स्थानिक पातळीवर संपर्क करुन, ऑगस्ट महिना अखेरीस हे आंदोलन यशस्वी केले. ऐनवेळी पोलीसांची कुमक आली आणि त्यांनी आंदोलन चिरडण्यासाठी लाठीमार आणि गोळीबार केला. बहुधा याच्या पाठीमागे कोण आहेत याचा पोलीसांना सुगावा लागला होता. कार्यकर्ते पोलीसांच्या हाती न लागता पुण्यात आले आणि पुढील आदेशानुसार सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात पुढील कामगिरी साठी खेड (राजगुरुनगर) पोचले. पण पोलीसांना सुगावा लागला होता आणि एका मंदिरात यांची गुप्त बैठक सुरू असतांना पोलीसांनी यांना अटक करुन येरवडा कारागृहात रवानगी केली. तेथे त्यांची रितसर चौकशी होऊन त्यांना दहा महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात आली आणि ते ब्रिटिश सरकारचे राजबंदी झाले.
जुलै १९४३ मध्ये ते शिक्षा भोगून जेलमधून बाहेर पडले, प्रश्न होता आता पुढे काय. देशातील सर्व महत्त्वाचे नेते अजूनी देशभरातील वेगवेगळ्या तुरुंगातच होते. काही दिवस जमखंडीत राहुन ते रत्नपण्णा कुंभार यांच्या सांगण्यानुसार भुमिगत कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहिले. ते रहायचे औंधला. औंध हे स्वतंत्र संस्थान असल्याने भुमिगत काम करणे सोपे पडायचे. एक वर्ष रत्नपण्णा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करुन ते जमखंडीस परत येऊन स्वतःचा रेडिओचा व्यवसाय करु लागले.
राष्ट्र सेवा दलाचे काम चालूच होते. १९५२ साली कर्नाटक राष्ट्र सेवा दलाचे शिबीर बागलकोटला होते. त्या शिबिराचे ते दलपती होते आणि या शिबिराच्या समारोपाला तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद आले होते.
१९६१ साली जगातील समाजसेवी संस्थांचे (NGO) सहा आठवड्यांचे श्रमदान शिबीर युरोपीय देश युगोस्लाव्हाकीयाच्या बेलग्रेड येथे घेण्यात आले होते. त्या शिबिराला राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते म्हणून ते हजर होते. १९७१-७२ साली ते जमखंडी नगर परिषदेचे नगराध्यक्ष होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी जमखंडीला भुयारी गटार योजना कर्नाटक सरकार कडून मंजूर करून आणली.
संसारीक जवाबदाऱ्या पार पाडून १९८२ पासून राष्ट्र कार्यासाठी वाहून घेण्याचा त्यांचा मानस होता. पण एप्रिल १९८१ ला, वयाच्या ५८ व्व्या वर्षी त्यांचे आकस्मिक निधन झाले आणि त्यांचे देश आणि समाज कार्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.
अशा या भारत मातेच्या पुत्रास माझा मानाचा मुजरा....
दत्तात्रय मेघःशाम वाटवे
नाशिक
शामराव वाटवे यांच्याबद्दल अजून काही....
१ त्यांनी त्यांच्या हयातीत स्वातंत्र्य सैनिकाची पेन्शन नाकारली, कारण ते म्हणायचे आम्ही देशसेवा निरपेक्ष वृत्तीने केली आहे आणि मला गरज पण नाही
२ मात्र ते गेल्यानंतर आम्ही आईला पेन्शन मिळावी म्हणून प्रयत्न करुन मिळवली, केंद्राची आणि राज्याची, त्यामुळे ती जमखंडीला व्यवस्थित मानाने त्यांच्या नंतर १८ वर्षे राहिली आणि कधीच मला पैसे पाठवावे लागले नाहीत
४ प्रत्येक माणूस लहानपणी आलेल्या प्रसंगातून आणि अनुभवातून घडतो, तसे शामराव घडले. स्वतःच्या घडण्यावरुन ते नेहमी एक वाक्य बोलायचे
मुलं चांगली घडायची असतील तर लहानपणीच त्यांचे आई-वडील गेले पाहिजेत आणि त्यांना काही महिने जेल मध्ये टाकले पाहिजे
दत्तात्रय (राजू) मेघःशाम वाटवे
---
दिलीप पेंडसे लिहितात . . .
माझे कै.शामराव वाटवे यांचे पुण्यस्मरण प्रसंगी साष्टांग नमस्कार.
मला आठवते ते शामराव यांची स्वज्ञाती साठीची कठोर कर्तव्य भावना.माझे चुलते कै.रघुनाथ पेंडसे व शामराव,कोणाच्याही घरातील मर्तिकाला,कोणत्याही वेळी लगेच हजर होत.
लाकडे..९मण,जंबगी कृष्णातीरी बैलगाडीतून पुढे पाठवायची, आठ किलो मीटर कच्च्या रस्त्यावरून कलेवर खांद्यावर वहायचे,सरणावर रचून ते ठेवायचे,अग्नि द्यायच्या,सर्व प्रेत पूर्ण जळेपर्यंत शेजारी बसायचे.तीन तासांहून अधिक,राख नदीत सोडायची स्नान करायचे व मग बैलगाडीत दाटीने बसून परत जमखंडीस यायचे मयताचे घरी,सर्व पार पडल्याची पोच द्यायची मग आपल्या घरी,पुन्हा स्नान व मग नित्य कामे चालू.
असे शंभराहून अधिक वेळा,या कर्तव्यतत्पर महाभागांनी हजेरी लावली..नक्कीच.
तालुक्याचे ठिकाणी हे स्वज्ञातीसाठीचे कटु,खडतर कर्तव्य पार पाडणारे! यांना असे विसरायचे?
.
जमखंडीचे हुतात्मे
दिलीप पेंडसे यांच्या आठवणीतून
छट्टूसिंग हा विश्वासू सेवक जमखंडी सरकार पटवर्धन यांचेकडचा,तत्कालीन राजांनी दक्षिणेत पण नरगुंदचे भावे सरकार व अन्य संस्थानिक मिळून इंग्रजांविरुद्ध उठाव करावा अशा विचाराने अशा सेवकांचे मार्फत पत्रव्यवहार चाचपणी चालायची, छट्टूसिंग नरगुंदहून परत येताना इंग्रजांच्या गुप्तहेराला सापडला, त्याने जवळचे पत्र फाडून गिळून टाकले पोलिस तपासात काही आढळले नाही पण गुप्तहेराचे जबाबावर त्याला प्रथम हाल केले, मग जंबगी रस्त्यावर आॅइल मिलचे अलिकडे फासावर दिले. त्याचे समाजातील..रजपूत..कोणीही अंत्यक्रियेला आले नाही, शेवटी मुस्लिम समाजाने पुढाकार घेतला व त्याची दफन क्रिया केली. हे सारे माझ्या लहानपणी वयस्क मंडळी कुजबुजायची.
हुतात्मा साबडेंचा खून कदाचित संस्थानिकाचे आदेशाने फौजदार कडील एन्काउंटर बिगर पोलिसांनी आमचे घराजवळील पिठाचे गिरणी शेजारी केला,(असा लोकांना संशय आहे.) वेळ मध्यरात्र.समोर राहणारे एन डी जोशी व डॉ.दामुअण्णा हुल्याळकर दर १५ ऑॅगस्टला तिथल्या उभारलेल्या स्मृती स्तंभापाशी यायचे खुर्चीवर स्व.साबडेंचा फोटो ठेवून राष्ट्रगीत व्हायचे.आता आठवले..कोणी पुसाळकर नावाचे फौजदार होते,त्यांचे वैयक्तिक वैर नसूनही राजांचे मर्जीत रहायचे म्हणून हे दुष्कृत्य घडविलेअसावे. आठवणी कटु आहेत म्हणून विसरलो तर ब्रिटिशांनी डंकर्कला सपाटून हरलेले लाखो सैनिक खाडीतून जर्मन विमानांच्या वेळा चुकवून परत आणायलाच नको होते! विन्स्टन चर्चिल चे वाक्य..The country that delves deep into its past has a great future,and not otherwise.!
दिलीप पेंडसे
काही सर्वसामान्य जमखंडीकर
- आनंद कुलकर्णी.
जमखंडीच्या आठवणी
~~~~जमखंडीच्या वास्तव्यात मोठी माणसं भेटली तशी छोटी छोटी माणसंही भेटली जी माझ्या आजही लक्षात आहेत.लक्षात रहायच कारण म्हणजे त्यांच्या वागण्यातील सहजता सरलता व आत्मीयता अशी सरळ स्वभावाची माणसे शहरी वातावरणात अभावानंच भेटली म्हणून ही माणसे पन्नास वर्षानंतरही मला आठवतात.
तुम्ही यानां ओळखत असाल नसाल तरीही वाचा.
गौरव्वा व कल्लप्पा कौजलगी हे जोडपे पागागल्लीत पागा शाळे समोरील जुनाट वाड्यात रहात असे..त्याना एकच मुलगा शेखर मुली चार पांच होत्या.परव्वा ईरव्वा ही दोनच नांवे मला आठवतात.
त्यांच्या घरात पाण्याचे कनेक्शन नव्हते म्हणून आमच्या घरातून ते पाण्याचे हंडे भरून नेत.हे काम घरातील महिलांचे असे.आणी याच्या मोबदल्यात गौरव्वा माझ्या आईला घरकामात मदत करीत असे .हा अलिखित नियम होता.
कल्लप्पा हा पोटेसावकारांकडे Full time attendant म्हणजे घरगडी होता.मुलगा शेखर हा पोस्टाजवळील जिरली यांच्या कौष्ठौषधीच्या दुकानात कामास होता.या घरातील सर्व माणसे आम्हाला मदत करीत केवळ दहा बारा कळशी पाण्याच्या मोबदल्यात.
जिरलींच्याच दुकानात अजून एक व्यक्ती होती जी माझ्या स्मरणात राहिली ती म्हणजे बाळकाका फाटक.
प्रसन्न चेहरा हंसतमुख व्यक्तीमत्व गोरापान कोकणस्थी वर्ण.अखंड कार्यमग्न.यांच्या चेहर्यावरमला कधीही उदासी दिसली नांही कधीकाळजी विवंचना दिसली नांही.
खाकी हाफपँट निळा हाफशर्ट हा कायमचा वेष .एकटा सडाफटिंग.लहानपणी कांही विशेष वाटलं नांही. पणआज विचारकरून मी अचंबित होतो.कोकणस्श ब्राम्हण कुलात जन्मलेला हा माणूसआठ बाय दहाच्या खोलीत जन्मभर एकटा राहिला.एका खोलीत.काय यानी स्वप्न पाहिली नसतील? मध्यंतरी ऐकल की बाळकाका रहायचे तौ वाडा एका बिल्डरने विकत घेतला.पाडून तिथेflat बांधले.मला बाळकाकांची काळजी वाटली म्हणून चौकशी केली तर सुखद धक्का देणारे वृत्त कळले की बिल्डरने नव्या इमारतीत बाळकाकांसाठी आठ बाय दहाची नवी खोली बांधून त्याना दिली. ऐकून खूप बरं वाटलं माणुसकी शिल्लक आहे अजून.
--- बाळ फाटक नावाचे गृहस्थ शरद आपटे यांच्या दुकानात बरीच वर्षे कामास होते आम्ही लहानपणी पाहीले आहे.
Jayashri मलाही आठवते आमच्या दुकानात बाळू फाटक कामाला होते अतीशय प्रामाणिक खूप वर्षे होते
Anil Ponkshe :बाळ काका त्यांच्याबद्दल मी सप्टेंबर महिन्यात थोडीफार माहिती दिली होती. ते माझ्याकडे १९८२ नंतर दरवर्षी पंधरा दिवस तरी घेऊन हक्काने राहून जात. आम्ही पोंक्षे कुटुंबीय त्यांना अजूनही विसरू शकत नाही. आज आनंदनी पाठवलेली माहिती, केलेले वर्णन वाचले. खुपच छान लिहिले आहे. धन्यवाद🙏
: पण हे सदाशिव आपटे (आमचे काका) यांच्या दुकानात काम केले आहे. नंतर शरद बरोबर काम केले आहे, भालचंद्र कोल्हटकर यांचे ते खास मित्र
: हेच बाळू फाटक आमच्या दुकानात होते. अत्यंत गुणी व सज्जन माणूस,अजित फाटक निवर्सित किराणा दुकानदार यांचा शेजारी राहत होते.माझे वडिलांचे दवाखान्यात ते यायचे, डोंबिवलीला त्यांचे नातेवाईक होते तेथे मी त्याचबरोबर गेलो होत.बरीच वर्षे झाली.बहुतेकअजित फाटक हा त्यांचापुतण्या होता
: बाळू काका माझ्या वडिलांच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये होते. साधारण १९७० साला पर्यंत ते जिरलींच्या काष्ठ औषधी दुकानात होते. नंतर शेवटपर्यंत ते आपटेंच्या दुकानात कार्यरत होते आणि अनिल म्हणाला तसं वर्षातून एकदा महिना दिडमहिना सुट्टी घेऊन पुणे, मुंबई, नाशिक असे फिरुन यायचे. माझ्याकडे पण ते नाशिकला येऊन गेले आहेत...
Balkaka phatak was a regular visitor to our house. He, banda sabade and Anil's father balukaka were good friends. They were members of the bhak bhak company a group of 15-20 people who use to arrange eating fest at regular interval. All the members were heavy eaters. Our neighbor madhu patwardhan was also a member. Once when it was his turn to arrange food the menu was batatavada. The size of the vada I still remember was extraordinary. One vada is sufficient for anybody. But the gp members use to eat 8- 10 vadas..
Dilip Pendse
सकाळी नियमाने,रोज,सूर्यौदयाला ही बी बी सी म्हणजे भग भग कंपनी..ज्यांना कुठल्या ना कुठल्या दुखण्याने घेरले..अशी कंपनी म्हणजे अनेक जण,तरा तरा चालत तळ्याकडून टाकी व पुढे मेरुगिरी लिंगप्पाच्या शिखरावर चे देऊळ,तिथे थोडे जमतील तेवढे व्यायाम,मग पहिल्या पायर्या उतरल्यावर डावीकडे चालत चालत गव्हर्नर बंगल्याचे मागे उंचावरून परत तळ्याकडे व आप आपल्या घरी.यात आरटी देसाई,अनंतपूर,बाळकाका फाटक,साबडे अशी अनेक मंडळी असायची.त्यांच्यात लहान थोर,गरीब श्रीमंत असा भेदभाव कधीच नसायचा,मिना..नौव्वुन ही प्रेमळ संबोधने फोडणीला! मला या जमखंडीच्या बीबीसीचा सार्थ अभिमान आहे.
शेखर आपटे : आमचे काका सदाशिव राव आपटे, पटवर्धन (पोग्याकाका) हे ही ह्या ग्रुप मध्ये होते। दर महिन्याला त्यांच्या पार्ट्या व्हायच्या कुणा एक मेंबर कडे। भाकभक महणजे हे तिखट खूप खायचे। खण्यात सगळे उस्ताद। पैज लागायची जेवणानंतर। आमच्या काकांच्या कडे एकदा पार्टी होती। गुलाबजामुन आग्रहाने वाढले गेलेले। पानात टाकायचे नाहीत ही अट। सगळ्यांची जेवण झाली आणि पैजे ला सुरुवात। सगळ्यात जास्त गुलाबजामुन खाणारा सम्मान पोग्या काका पटवर्धनांनी पटकाविले। नंतर सगळे घरी गेले आपापल्या। आम्ही जेवण बघितले आणि मनात विचार केला की आता काका उद्याच जेवतील पण.......पाहतो ते दुपारी 4 वाजता दुकानात जायच्या अगोदर काका शक्ती हॉटेल ( सोनी यांच्या घराजवळ) इडली खात होते😄😄😄
जमखंडीच्या आठवणी - आनंद कुलकर्णी.
~~~~~ भाग2
असंच अजून एक व्यक्तीमत्व म्हणजे रास्तेकाका. हे गृहस्थ आपल्यापैकी अनेकानी पोस्टात पाहिले असतील.धोतर शर्ट काळी पुठ्ठ्याची टोपी हा कायमचा वेश .पोस्टाच्या काॅरीडाॅरमधे कोपर्यात त्यांची भारतीय बैठक असे.भोवती ग्रामीण बाया बापड्यांचा गराडा असे.पोस्टाचे विविध फाँर्म ते ग्रामिणानां भरून देत. गरजूना कन्नड वा मराठी भाषेत पत्रे लिहून देतअसंत.प्राप्ती बरी होत असावी. त्यांच्या याSelf employmentची मला फार गंमत वाटे.
असंचअजून एक प्रसन्न व स्मरणात राहिलेले व्यक्तिमत्ब म्हणजे कमीटी वैद्यडबल काच्याचे धोतर पांढरा शर्ट सोनैरी गुंड्या .वरकोट प्रसन्न मुद्रा.कपाळा वर उभे गंध व अक्षंती शांतपणे पेशंटशी बोलणे.तुरूतुरू चालणे..ही त्यांची वैशिष्टे . देसाई गल्ली व मुधौळ रौरोडच्या crossing वर जमखंडी मुन्सीपाल्टीचा दवाखाना होता .तिथले हे वैद्यकीय अधिकारी.माझी आजीने अॅलोपॅथीची औषधे कधीच घेतली नव्हती शेवट पर्यंत घेतली नांहीत.एकदा तिची दाढ दुखू लागली.मी तिला कमीटी वैद्यांकडे नेले. वैद्य म्हणाले दाढ काढून टाकू.मी म्हणालोत्रास होईल ते म्हणाले .त्रास झालाच तर मला होईल त्याना नांही. आणी खरंच पक्कड नांही चिमटानांही भूल नांही हँडग्लोव्हज नांही फक्त ऊजव्या अंगठ्याने दाढ काढली. आजीनेही हूं की चूं केले नांही. पन्नास वर्षे झाली मी अजून अचंब्यातून बाहेर आलो नांही.
. . . .
3. जमखंडीकरांच्या आठवणी
ज्यांनी जास्तीत जास्त रम्य अशा आठवणी सांगितल्या होत्या ते आनंद कुलकर्णी आता आपल्यात राहिले नाहीत. त्यांनी लिहिलेल्या आठवणी वाचणे ही सुद्धा त्यांना एक श्रद्धांजलि होईल. . . . आनंद घारे
. . . . . . . ..
नवी भर दि. २०-९-२०२१: सध्या अमेरिकेत गेलेले जमखंडीचे एक सुपुत्र श्री.सुधीर काळे यांनी तिथल्या महाराष्ट्रमंडळात केलेले भाषण :
माझे गांव जमखंडी
लेखक: सुधीर काळे
· जमखंडी हे तालुक्याचे गांव असून आमच्या लहानपणी ते विजापूर जिल्ह्यात होते व आता ते बागलकोट जिल्ह्यात आहे. आम्ही तिथे राहात होतो तेंव्हां ते २४००० वस्तीचे गांव होते. आता तेथील लोकसंख्या सुमारे दीड लाखाच्या घरात आहे.
· गांवाच्या एका टोकाला पूर्वी जांभळांच्या झाडांच्या जंगलात असलेले व हेमाडपंती पद्धतीने बांधलले जंबुकेश्वर हे खूप जुने मंदिर आहे. ढोबळपणे कोरलेले दगडी स्तंभ, या स्तंभांमधून भाविकांना पूजे-अर्चेसाठी गाभार्यातील शंकराच्या मूर्तीकडे येण्या-जाण्यासाठी ठेवलेला अरुंद मार्ग, दोन दालनांनंतर येणारा अंधारा गाभारा व तेथील शंकराची पिंडी अशी मंदिराची रचना आहे. परिसरात बरीच झाडे व पुजार्यांची राहायची जागा असं हे देऊळ जमखंडीत खूप लोकप्रिय आहे.
· आमच्या गांवाला जमखंडी हे नांव या देवळावरूनच पडले असे म्हणतात.
· या मंदिराच्या मागे मेलगिरीलिंगप्पा डोंगरही आहे. तो जमखंडीभोवती बराच पसरलेला आहे. तिथे नागरझरी या नांवाचा एक झरा पावसाळ्यात जिवंत होई व तिथे पाण्याखाली भिजायला आम्ही जायचो. तसेच तिथे घरून भाकरी-भाजी नेऊन शाळकरी मुले-मुली सहलही करत असत!
· तिथून ’फौजदार कचेरी’कडे येणार्या रस्यावर एक छान गणपती मंदिर आहे. ते माझ्या जिवलग वर्गमित्राचे आहे. तिथे आजतागायत रोज मूर्तीची यथासांग पूजा होते व दर संकष्टीला आणि गणेश चतुर्थीच्यावेळी पाच दिवस गणेशमूर्ती पालखीत बसवून देवाच्या भोवती प्रदक्षिणा घालत तिची मिरवणूक घेतली जाई. मी तिथे असताना बर्याच वेळा या प्रदक्षिणा समारंभात भाग घेतलेला आहे.
· स्वातंत्र्यापूर्वी जमखंडी हे एक संस्थान होते व तिथले राजे होते पटवर्धन. रामचंद्रराव अप्पासाहेब, सर परशुराम भाऊसाहेब व शंकरराव अप्पासाहेब व शेवटी ज्यांनी विलीनीकरण केले ते परशुराम बापूसाहेब या चार राजेसाहेबांची नांवे मी ऐकली आहेत. रामचंद्रराव अप्पासाहेबांचा संगमरवरी पुतळा शाळेच्या मध्यवर्ती सभागृहात आहे.
· सर परशुराम भाऊसाहेब पहिल्या महायुद्धात इंग्रजांच्या बाजूने लढाईच्या मैदानात उतरले होते आणि त्यांनी केलेल्या कामगिरीसाठी त्यांना ब्रिटिश सरकारकडून ’सर’ हा किताब मिळाला होता.
· शंकरराव अप्पासाहेब यांच्या विवाहानिमित्त्य हत्तीवर अंबारी चढविण्याचे प्रयत्न केले जात होते व ते प्रयत्न सर परशुराम भाऊसाहेब जातीने पाहात होते. या प्रयत्नादरम्यान हत्ती कांही कारणाने चिडला व एका तिरिमिरीत त्या हत्तीने रागाने सर परशुरामराव भाऊसाहेबाना धडक दिली. या हत्तीच्या धडकेमुळे त्यांचा प्राण गेला. पुढे त्या दुःखाने तो हत्तीच इतका व्याकूळ झाला कीं त्या दु:खात त्यानेही प्राण सोडले असे मी ऐकले आहे.
· स्वातंत्र्यानंतर आमच्या परशुराम बापूसाहेब या राजेसाहेबांनी आपण होऊन संस्थानाच्या विलीनाकरणाचा निर्णय घेतला व १९४८ च्या फेब्रुवारी महिन्यात त्यांनी जमखंडी संस्थानाचे भारतीय गणराज्यात विलीनीकरण केले. त्यावेळी मी पाचच वर्षाचा होतो. त्यामुळे संस्थानकाळातील सार्या कथा मला तरी ऐकीवच आहेत.
· जमखंडीपासून दीड-एक मैलावर आधी उल्लेखलेल्या मेलगिरीलिंगप्पा या डोंगरावर रामतीर्थ नांवाचे एक क्षेत्र आहे. तिथे शंकराचे जुने देऊळ आहे. बाजूला ३-४ इतर मंदिरेही आहेत. शेजारीच रामचंद्रप्रासाद हा जमखंडीकरांचा राजवाडाही आहे. श्रावणाच्या प्रत्येक सोमवारी रामतीर्थला जत्रा भरते, कधी-कधी ’बुत्तीपूजा’ही केली जाते. त्यातल्या दोन सोमवारी तरी, शक्य तो ’बुत्तीपूजे’च्या दिवशी, आम्ही जत्रेला जायचो. त्यावेळी केलेल्या अनेक सुखद गमती-जमती आजही मला आठवतात.
· गांवापासून पांच-एक मैलावर कल्हळ्ळी नावाच्या गांवी आणखी एक विष्णूचे देऊळ आहे. इथे प्रतिपदेच्या घटस्थापनेपासून दसर्यापर्यंत दहा दिवस रोज जत्रा भरत असे. तिथे दसर्याला रथावर विष्णूची मूर्ती घेऊन मंदिराभोवती प्रदक्षिणा घालत रथयात्राही होत असे. प्रदक्षिणेदरम्यान ’वेंकटरमण गोविंदाSSS, गोSSSविंदा’ असे विष्णूचे नामस्मरणही केले जात असे.
· जमखंडीकरांचे कुलदैवत गणपती असल्यामुळे गणेशचतुर्थीच्या सणाला ते गांवजेवण देत. सार्यांना सामुदायिक निमंत्रण असे व बेत श्रीखंड-पुरीचा असे. ते श्रीखंड इतके घट्ट असे कीं कांही निमंत्रित ज्यांच्या कुटुंबात रामतीर्थला चालत येऊ न शकणारे कुटुंबीय होते ते केळीच्या पानाची सुरळी करून कोटाच्या खिशात घालून श्रीखंड घरी घेऊन जात कारण ते घट्ट असल्याने खिशातच राही.
· ही कथा माझ्या आजीने बर्याचदा आमच्या घरी श्रीखंड करताना सांगितलेली आहे आणि आमच्या घरचे श्रीखंड अगदी ’तस्से’ करावयाचे माझ्या आजीचे व आईचे ध्येय असे.
· जमखंडीत मुख्यत: ज्वारी, तेलबिया व ऊस ही पिके घेतली जातात. आमच्या लहानपणी गांवात तेलाचे बरेच घाणे होते. लहानपणी तिथे असताना करड्याचे धान्य घेऊन आजोबांबरोबर जाऊन तेलाच्या घाण्यातून तेल काढवून तेल आणि पेंड घरी घेऊन आल्याची आठवण आहे. आमच्या शेतावर जाऊन गरम-गरम हुरडासुद्धा बर्याचदा खाल्लेला आहे.
· आता मात्र तेलाच्या घाण्यांच्या जागी तेलाच्या गिरण्या आल्या आहेत. एक तर माझ्या वर्गमित्राचीही आहे. तसेच गुळाचेही कांहीं कारखाने आहेत. तिथे गांवातील बर्याच तरुणांना उपजीविकेचे साधन मिळाले आहे. एरवी केवळ शेतीवर अवलंबून असलेले बरेच तरुण आता आपल्या सायकलीना जेवणाचे डबे लटकवून कामाला जाताना दिसतात.
· आमच्या घरी गोठ्यात कायम एक किंवा दोन गायी असत. त्यांच्यासाठी ’कडबा’ व ज्वारीचे कोवळे देठ (याला ’बाटुक’ म्हणतात) कापून या गायींना खाण्यासाठी तयार करण्याचे काम मी केल्याचे अजूनही आठवते.
· शाळेत असताना ’कंठ’ नावाचा एक प्रकार सर्व मुलांकडे असे. अर्ध्या इंचाच्या पोलादी सळीचा कमरेपर्यंत पोचणारा दोन-एक फूट व्यासाचा कंठ व त्याला चालवायला सुमारे १ फुटी एका बाजूला लूप असलेली सळी असे ’वाहन’ घेऊन आम्ही रस्त्यांवरून पळत जात असू. माझी आई कित्येकदा ’सुधीर, तुझ्या कंठावर ’बसून’ बाजारात जा आणि ४ लिंबं घेऊन ये’ अशी आज्ञा देत असे व मी ती पाळतही असे.
· जमखंडीत मी कधी कुठलेही पादत्राण घातले नाहीं. कारण पादत्राणे घालायची पद्धतच नव्हती. सगळीच मुले व मुली अनवाणी हिंडत असल्यामुळे कुणालाच त्याचे कांहीं वाटत नसे. फक्त उन्हाळ्यात दुपारी शाळेत जाताना पाय भाजत असत, मग दुकानांच्या सावल्यांवरून उड्या मारत मारत आम्ही शाळेला जात असू.
· किशोरवयातील मुलींसाठी एका ’गुळ्ळव्वा’ नांवाच्या देवतेची पूजा करण्याची पद्धत जमखंडीत होती. कुंभाराकडे जाऊन ती गुळ्ळव्वाची मातीची ओली मूर्ती आणली जायची व त्या मूर्तीवर करडे, गुंजा वगैरे वापरून तिचे सौंदर्यप्रसाधन आम्हीच करायचो आणि मग आमची बहीण मीना तिची पूजा करत असे. देवीची आरती कानडीत होती व त्यातील “गुळ्ळव्वान गंडा, वणकी तुंडा, वैय्यं वैय्यं, गुळ्ळव्वा गुळ्ळव्वा” हे एकच कडवं मला आता आठवते आहे. आज वक्त्यांपैकी फक्त शिवदास पै यांनाच याचा अर्थ कळेल.
· गांवात ओकळी नांवाचा सण आषाढाच्या पहिल्या रविवारी साजरा होई. त्यावेळी एक २५-३० फूट उंचीचा व खालच्या बाजूला २-एक फूट व्यासाचा गुळगुळीत स्तंभ मारुतीच्या देवळासमोरील छोट्या मैदानात उभारला जाई. त्याला निसरडे करणारा एक लेप लावला जाई व आमच्या गावातील तरुण त्यावर चढून वरच्या टोकाला पोहोचत. ते चढत असताना पिचकार्यांतून बरेच उत्साही तरुण पाणी मारून त्या खांबाला निसरडा करण्याचा प्रयत्न करत. या सर्व अडचणींना तोंड देऊन जो वरपर्यंत चढे त्याला कांहीं तरी बक्षीस मिळे. अग्निशामक दलाचा बंब जमखंडीला आल्यावर सुरुवातीला त्या स्तंभाला ओला करण्यासाठी बंब बोलविण्यात येई.
· जमखंडीचे राजेसाहेब अतीशय पुरोगामी राजे होते. जमखंडीला कित्येक सुधारणा त्यांनी आणून दिल्या होत्या ज्या इतर संस्थानात किंवा संस्थानाबाहेरच्या मुलुखात असलेल्या गांवात त्यावेळी नव्हत्या. जमखंडीकर प्रजेसाठी नक्कीच खूप काम करत असत.
· आधी उल्लेखलेली मेलगिरीलिंगप्पा ही टेकडी गावाच्या या बाजूलाही पसरलेली आहे. ४-५ मैलावर कृष्णा नदी वाहाते. जमखंडीकरांनी ’सनाळ’ या कृष्णाकाठावरील गावापासून कृष्णेचे पाणी पंप करून या मेलगिरीलिंगप्पावरील टाकीत आणणे, ते साठविणे, त्याचे शुद्धीकरण (filteration etc) करणे आणि सार्या गावाला शुद्ध पाणी पुरवठा करणे असा एक प्रकल्प पूर्ण केला होता. त्यामुळे आमच्या गांवी सर्वांना नळाचे पाणी मिळे, विहिरींतून रहाटाने पाणी ओढण्याची गरज नव्हती. कधी यंत्रणेत बिघाड होऊन ’पाणी गेलं’ तरच रहाटाने पाणी काढले गेल्याचे मी पाहिले आहे.
· माझ्या लहानपणी वीजही नव्हती. मी चौथी-पाचवीत असताना वीज आली. वीजनिर्मितीचा कारखानाही जमखंडीकरांनीच बांधला होता. म्हणजे आमचा अभ्यास विजेच्या दिव्यातच झाला.
· कृष्णाकाठावरचे आणखी एक गांव जंबगी. येथे मृत्यूनंतर हिंदूंची शवे दहनासाठी आणली जात. म्हणूनच जमखंडीतला ’जंबगी’चा उल्लेख म्हणजे पुण्यातल्या ’ओंकारेश्वरा’चा उल्लेखासारखाच होता.
· गांवाच्या मध्यावर मारुतीचे मंदिर आहे. मंदिराच्या थेट समोर ’शकुंतला गर्ल्स स्कूल’ या नांवाची संस्थानिकांनीच बांधलेली मुलींची शाळा होती. त्याच्या शेजारी छान बांधलेली भाजीमंडी व फळफळावळीची दुकाने होती. मंदिराभोवती तर्हेतर्हेची दुकाने होती. माझ्या शाळकरी मित्राचे मोठे भाऊ चालवत असलेले प्लास्टिक वस्तूंचे दुकान, टेंबुर्जी यांचे वृत्तपत्रे, पंचांग, तत्सम गृहोपयोगी वस्तूंचे दुकान, किराणा मालाची दुकाने अशी अनेक दुकाने होती. मंदिराच्या पाठीमागील रस्त्याच्या दुतर्फा सराफ गल्ली आहे. तिथे सोन्याची खरेदी-विक्री करणारी दुकाने होती. माझ्या एका जिवलग मित्राच्या वडिलांचे दुकानही तिथे होते. तसेच औषधाची दुकाने होती. थोडक्यात म्हणजे मारुती मंदिराच्या मागे व भोवती गांवाची मुख्य बाजारपेठ होती.
· रस्त्याच्या कोपर्यावर पोस्ट ऑफीस आहे. हा कचेरी रोड. आसपास बरीच उपहारगृहें आहेत पण ’बाहेरचं खाणं’ निषिद्ध असल्यामुळे मी त्यापैकी एकाही उपहारगृहातील खाद्याचा स्वाद घेतला नव्हता. तसेच तिथे बर्याचशा बॅन्काही आहेत.
· त्याला समांतर जाणार्या रस्त्याला ’उमाशंकर रोड’ या नांवाने संबोधले जाते. त्याच्या एका टोकाला उमारामेश्वर मंदिर आहे. शेजारीच सिव्हिल हॉस्पिटल आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वारावरील कमानीवरील दालनातून चौघडा वाजविला जाई असे ऐकले आहे.
· या रस्त्यावर कापड बाजारपेठ, अशोक स्तंभ, मी जिथे शिकलो ते परशुराम भाऊ हायस्कूल, रमाबाई वाचनालय, जकात नाका, एस्टी स्टॅन्ड, आधी उल्लेखलेला संस्थानिकांनीच सुरू केलेला जमखंडीला वीजपुरवठा करणारा कारखाना (यापूर्वी आम्ही कंदिलात वाचन करायचो), जमखंडीतील SR क्लब (जिथे बिलियर्ड्स, टेनीस व पत्ते खेळायची सोय होती) व पुढे प्रचंड ’पोलोग्राउंड’ मैदान होते, ट्रेनिंग कॉलेज व तसेच पुढे गेल्यावर संस्थानिकांचा ’रामचंद्रप्रासाद’ हा अतीशय सुंदर राजवाडा ही जमखंडीची खास वैशिष्ठ्ये! जमखंडीला पहिल्यांदा भेट देणारे सर्व पाहुणे हा राजवाडा पाहायला आवर्जून जात असत.
(https://c1.staticflickr.com/9/8424/7525207930_b8e601c28b_b.jpg) याबरोबरच दाखविण्यासाठी आणखी एक चित्र जोडले आहे.
· गांवातून चालत पोलोग्राउंडपर्यंत येऊन परत चालत घरी जाणे हाही एक व्यायाम माझ्या वडिलांसह बरेच ज्येष्ठ लोक करत असत.
· आमच्या शाळेने अतीशय उच्च प्रतीचे शिक्षक नेमले होते. शाळेच्या पुढच्या व मागच्या मैदानात जिमखाना व अनेक मैदानी खेळांच्या सोयी होत्या, अगदी पोल व्हॉल्टसुद्धा! याच मैदानावर सुटीच्या दिवशी आणि एरवी पोलोग्राउंडवर रोज आम्ही क्रिकेट खेळायचो.
· हायस्कूलमधील एक अविस्मरणीय आठवण आहे ती मी लो. टिळकांच्या पुण्यतिथीला केलेल्या माझ्या आयुष्यातील पहिल्या-वहिल्या भाषणाची. प्रत्येक वर्गातून दोघांना निवडले होते. मी पाचवीत होतो, वय १०-११ वर्षे. पहिल्यांदाच ऐटीत स्टेजवर गेलेल्या माझे समोरचे २०० लोक पाहून अवसानच गळून गेले व मग रडक्या सुरात मी टिळकांबद्दल कसाबसा बोललो.
· पण नंतर मी सभाधीट झालो व आमच्या शाळेतील प्रत्येक स्नेहसंमेलनात मी भाग घेऊन बासरी व माऊथ ऑर्गन वाजवीत असे.
· कचेरी रोडवर ’सुवर्ण चित्र मंदिर’ या नांवाचे चित्रपटगृह आहे, तिथे हिंदी, कानडी व मराठी चित्रपट दाखविले जात. कधी-कधी मराठी आणि कानडी अशा दोन्ही भाषांतली नाटके तिथे होत असत. खास प्रसंगी तिथे झालेल्या समरंभात मी एकदा बासरीवर ’छुप गया कोई रे दूरसे पुकारके’ हे चंपाकली या चित्रपटातील गाणे वाजविले होते याची मला आजही आठवण आहे.
· शाळेत असताना पोलादी सळीचा दोन फूट व्यासाचा ’कंठ’ व त्याला चालवायला १ फुटाची एका बाजूला लूप असलेली सळी असे ’वाहन’ घेऊन मी रस्त्यांवरून पळत येत-जात असे. कित्येकदा ’सुधीर, तुझ्या कंठावर ’बसून’ बाजारात जा आणि अमूक-अमूक घेऊन ये’ असं माझ्या आईने सांगितलेले काम मी लगेच करत असे.
· जमखंडीलाच मी सायकल चालवायलाही शिकलो. पुढे पुण्यात कॉलेजला गेल्यावर या विद्येचा मला खूप उपयोग झाला.
· मी आणि माझा धाकटा भाऊ ११वी पर्यंत परशुराम भाऊ हायस्कूलमध्येच शिकलो व आम्ही दोघेही मेरिट लिस्टमध्ये आलो होतो. (सोबत शाळेची दोन चित्रें जोडलेली आहेत) माझी धाकटी बहीण आधी शकुंतला गर्लस स्कूलमध्ये व नंतर परशुराम भाऊ हायस्कूलमध्येच शिकली.
· याच संस्थानिकांनी पुण्याच्या स.प. कॉलेजच्या बांधणीत त्या काळी दोन लाखाची देणगी दिली होती म्हणून त्याला ’सर परशुरामभाऊ कॉलेज’ असे नांव तर दिले गेलेच पण पुढील कित्येक वर्षे जमखंडीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षणाची सोय केली गेली. इथेही संस्थानिकांची प्रजेबद्दलची आस्थाच दिसते.
· आमची शाळा दोन पाळ्यात चालायची. एक पाळी सकाळी ७ ते १२ तर दुसरी पाळी १२:३० ते १७:३० पर्यंत असे. मी शाळेत होतो तेंव्हां २ तुकड्या मराठी माध्यमाच्या तर दोन तुकड्या कानडी माध्यमाच्या होत्या. भाषावार प्रांतरचनेपूर्वी मुंबई राज्यात असलेला धारवाड-हुबळीपर्यंतचा भाग नंतर कर्नाटकात गेला व मग मराठी माध्यमाच्या तुकड्या कमी होत गेल्या. आताही मराठी माध्यमाची एक तुकडी इथे चालू आहे असे चौकशीअंती कळले!
· मी या शाळेत शिकत असताना मागे आणि पुढे मैदान होते. एक जिमखाना होता. मल्लखांबसारख्या सोयी होत्या. पुढच्या मैदानात बास्केट बॉल, रिंग टेनिसची कोर्ट्स होती. शाळेच्या इमारतीभोवती १०० मीटर्सची व २०० मीटर्सची शर्यत घेतली जाई. मागच्या मैदानात उंच उडी, लांब उडीसह अगदी पोल वॉल्टचीसुद्धा सोय होती. आम्ही तिथे सुटीच्या दिवशी हॉकी व क्रिकेट खेळत असू. (पोलोग्राउंडवर रोज खेळायचीही सोय होती.) शिवाय चिंचेची झाडे होती. त्यांना दगड मारून चिंचा पाडणे व खाणे हाही विद्यार्थ्यांचा आवडता उद्योग होताच. शाळेच्या मागच्या बाजूला एक विठ्ठलमंदिर होते व तिथूनच मेलगिरीलिगप्पाला जायचा रस्ता होता. पायथ्याशी लेक्कनकेरे तलावही होता व तिथे गावातल्या बायका कपडे वगैरे धूत असत. पण त्याखेरीज तो तलाव तसा कांही उपयोगाचा नव्हता. आता कदाचित चित्र बदलेले असेल. तळ्याच्या काठावर वटवृक्षही होता. तिथे वटपौर्णिमेला खूप गर्दी व्हायची.
· जमखंडीची घडण त्यावेळी तरी द्विभाषिक होती. मी २००२ साली जमखंडीला गेलो होतो तेंव्हा ६० वर्षाचा होतो व रस्त्यात विशीतल्या तरुण मंडळींशी मी कानडीत बोलत असे तर ही तरुण मंडळी मला कानडी येत नसेल या समजुतीने माझ्याशी मराठीत बोलण्याचा प्रयत्न करीत. जमखंडीची ही खासियात आजही असेल व हे यावेळी मी जेंव्हां २०२२ मध्ये तिथे जाईन त्यावेळीही अनुभवायला मिळेला याची मला खात्री आहे.
· आता गेल्या १९ वर्षांत तिथे खूप बदल झाले असतीलच. आता २०२२ साली परत भारतात जाईन तेंव्हां जमखंडीला भेट द्यायचा बेत नक्की ठरविला आहे.
· आमचे शिक्षण, आमचा सांस्कृतिक आणि शारीरिक विकास या सर्व बाबतीत जमखंडीचे आणि जमखंडीकरांचे आम्हां सर्वांवर अनंत उपकार आहेत व त्याबद्दल आम्ही त्या गावाचे आणि जमखंडीकरांचे कायमचे ऋणी आहोत. जमखंडीबद्दल आणि जमखंडीकरांबद्दल आम्हा सर्वांना आजन्म आदराच्या भावना आहेत.
जमखंडीप्रेमी लोकांच्या वॉट्सॅप ग्रुपवरील लोकांनी आपापल्या आठवणी सादर कराव्यात अशी कल्पना श्री,राजू वाटवे यांनी सुचवली आणि उत्साही जमखंडीकर मंडळींनी त्याला त्वरित आणि उदंड प्रतिसाद दिला. दोन महिने उलटून गेले तरी अजूनही नव्या नव्या अशा जुन्या काळातल्या आठवणी येतच आहेत.
पोटासाठी भटकत जरी दूर देशी फिरेन,
मी राजाच्या सदनी अथवा घोर रानी शिरेन ।
नेवो नेते जड तनुस या दूर देशास दैव,
राहो चित्ती प्रिय मम परि जन्मभूमी सदैव ।।
जेथे माझे जनन घडले पूर्व पुण्येच थोर,
जेथे गेले दिवस,असता बाळ, सौख्यात फार ।।
असे कवि वासुदेवशास्त्री खरे यांनी खूप पूर्वी लिहून ठेवले आहे. जन्मभूमी या शब्दाचा अर्थ जन्मगाव किंवा ज्या गावात मी लहानाचा मोठा झालो ते गाव असा मर्यादित घेतला तरीही ते खरेच आहे असा अनुभव मला गेल्या दोन महिनाभरातल्या आठवणी वाचून येत आहे. जमखंडीकरांच्या या आठवणी इथे संकलित केल्या आहेत.
सुरुवातीला मी या आठवणींचे थोडे संपादन करून त्यांना विषयानुसार मांडायचा प्रयत्न केला होता. पण आठवणींची संख्या वाढतच गेल्यामुळे दि.०७-०३-२०२१ या दिवसानंतर मी त्या जशा येतील तशा देत गेलो. पुढेही मी तसेच करणार आहे.
आनंद घारे
*************
Shrirang Ghare: मुदकी भाळ हुशार
पिलू सरकार यांचे घरा सम़ोरील बोळात जिथे सर्वच घर मैगूरांची होती म्हणून मैगूर गल्ली या नावाने ओळखली जाते तिथे वडिलांनी गल्लीतलं शेवटच घर विकत घेतलं आणि आम्ही पोटेंच घर सोडून स्वत:च्या घरी राहण्यास १९४० साली आलो. आमच्या गच्चीवर गुलाब शेवंती मोगरा तुळस गवतीचहा ही रोपे होती. दोन खुजी लाल तोंडी माकड ऱोप विसकटत नासधूस करत. काठी घेऊन त्यांना हूसकावले तर अंगावर येत. मग आम्ही घासलेटचे रिकामे डबे वाजवत आरडा आरडा करत गेलो कीं आवाज मोठ्यांदा झाला की मग पळ काढत. एकदा एकच माकड आलं आरडाओरडा व डबे बडवण्याला बिचकून त्याने खाली बोळात उडी घेतली ती थेट खाली खेळत असलेल्या दोन लहान मुलांसमोर. त्याला पाहून एकजण किंचाळत घरी पळाला तर दुसऱ्याने भोकाड पसरले. मुलांचा आवाज ऐकून सर्वच घरातली मंडळी बाहेर आली इतकी गर्दी पाहून ते माकड बुजलं व त्या रडणाऱ्या मुलांला पकडून बसल. आता याला मारायला गेलं तर मुलाला लागेल.म्हणून सर्व नुसते ओरडत होते पण ते माकड पळेना तेवढ्यात मुलाची आजी घरात जाऊन चुलीतलं जळकं लाकूड घेऊन आली व जळक्या लाकडाचा निखारा पाहताच माकड पळाले व पोर सुटले. सर्वजण मुदकी भाळ हुशार (म्हातारी लई हुषार) म्हणून टाळ्या वाजवू लागले.
ही लहानपणीची आठवण शेअर केली
Shrirang Ghare:
गल्लीतली एक आठवण सांगितली
लहानपणी ची एक आठवण आजसाठी आम्ही मुल सन्मित्र सघात सध्या काळी जमत असू. श्री बाबूराव वाटवे व श्री किशौर वाटवे त्याचे संस्थापक होते ते दोघे नोकरी व्यवसायानिमित्त परगावी गेल्यावर संन्मित्र संघ बंदपडला कालांतराने राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जमू लागलो.संघबंदी नंतर संध्या काळी आमचा वेळ घालवायचा कसा सुचतच नव्हते. टाकी मिरगिर लिंगप्पा इकडे फिरायला जायच असे ठरले.
मी माझा बंधू श्रीपाद भालू सोमण भाऊ रानडे काशिनाथ फडके असे पाच सहाजण जात असू तिथे नवीनच उद्योग मिळाला.तेथे दगडाखाली विंचू सापडत त्यांच्या नांगित करगोट्याच्या दोरींचे
फास आवळून त्यांची शर्यत लावत असू नंतर नांगी छाटून सोडून देत असू तुम्ही कोणी खेळलाय विंचवांची शर्यत खूप संभाळून खेळाव लागत तिथ भोरंग्या हि सापडत त्या काडेपेटीत ठेवून खायला पाला देत असू. अशा गमती जमतीत एक वाईट घटनाही घडली परतीचा मार्ग रामतीर्थ रस्त्याने सरकारी अंबराईतून पोलोग्राउंडवरून घरी येत असू एकदा आंब्याच्या झाडापाशी चार विड्याची पान शेंदूर लावलेली व त्यावर सुया खोचलेले लिंबू बुक्का लावलेल ठेवलेल दिसल.आम्ही चेटूक वगैरे वर अंधविश्वास न ठेवणे म्हणजे मर्दुमकी समजत थोडी फुशारकी म्हणून ते लिंबू उचलून.फेकून द्यायचे ठरवले व सर्वानीच हताळून ते फेकले व घरी.आलो पण त्या रात्री भाऊ रानडेला सडकून ताप व तो तापात बरळतोय असे कळले आमची मात्र हे चाटूक उलटले असे वाटून घबराट झाली. अठवडा झाला तरी भाऊ रानडेचा ताप उतरेना त्याची.चोकशी करायला गेलो आणि त्याने लिंबूवाली गोष्ट घरी सांगितली असेल तर आमची कानशिलरंगवतील त्याचे वडील हे पक्के होते.पण त्याला ताप मुदतीचा म्हणजे टायफॉईड झाल्याचे कळले व आमची.धास्ती मिटली ही होती वाइट घटना जिचा आधी उल्लेख केलाय. हीएक आठवण लहानपणी ची
हो एक राहलच भाऊ रानडे दोन महिन्यांच्या उपचारा नंतर ठणठणीत बरा झाला.
. . . . . . . . . . . . . . . . .
श्रीरंग घारे
सायकल शर्यत
पूर्वी जमखंडीस दरवर्षी सायकल शर्यत घेत असत. शर्यत क्लब हाऊस पासून सुरू होई नदीतीरी.जंबगी पर्यंत जाऊन परत येऊन पोलोग्राउंडला फेरी मारून क्लब हाऊस पाशी संपत असे. बरेच सायकल स्वार यात भाग घेत जमखंडी खेरीज आसपासच्या गावाचे स्पर्धक भाग घेत. जमखंडी चा सोनू असुगडे शर्यत जिंकत असे त्याचा स्वतःचा व्यवसाय सांभाळून तो वर्षभर शर्यतीची तयारी करत असे. सायकल शर्यत जिंकणार सोनू अस समीकरणच झाल होत. दरवर्शी शर्यत निर्विघ्नपणे पार पडे.
एका शर्यतीचे वेळी वाद झाला होता. त्या वर्ष हून्नूरचा एकस्पर्धक शर्यतीत.होता वयाने सोनू पेक्षा जास्त तरुण व जास्त दमदार वाटत होता. त्याला चिअरअप करायलात्याचा अख्खा गाव लोटला असावा इतकी गर्दी होती. संपूर्ण शर्यतभर सोनू आणि त़ो एकमेकांना मागे टाकत पुढे जात होते शर्यत जेंव्हा संपायला आली होती तो स्पर्धक लीड राखून होता व आपणच जिंकलो अशा अती आत्मविश्वासात त्याच भान हरपल व क्लबहाऊस पाशी येताच सीमारेशेवर जाऊन थ़ांबला. शेवटची पोलोग्राउंडची फेरी मारण विसरला व
जिंकलेली रेस.हरला. त्याच्या समर्थकानी खूप हुज्जत घातली पण नियमानुसार तो हृरला हे त्याला स्वीकारण भाग पडल. शांत संय्यम न राखता उतावळेपणा भोवला अशी. ही शर्यत व.तिची कहाणी.
-------------------------------
दिलीप पेंडसे
राजू वाटवे खूप चांगली कल्पना आहे, माझे वडील पेंडसे वकील व शामरावजी वाटवे यांचे हृद्य ऋणानुबंध होते, तुझे दोन काका श्री बाबूराव व श्री किशोरजी माझे चुलते रघुनाथ पेंडसे यांना भेटत. तुझे आजोबा मा. वाटवे मास्तर हे माझ्या वडिलांचे जणु दैवत होते. शिक्षकानी विद्यार्थ्यांशी किती घनिष्ट नाते जपावे यांचा ते आदर्श च होते.माझे चुलते रघुनाथ पेंडसे व मा.शामराव आणखी एका अलिखित मंडळाचे अभिन्न सदस्य होते..खांदा पार्टी..ब्राम्हण समाजात कुणाच्याही घरी मयत झाली तर हातामधील कामे बाजूस ठेऊन तिरडीला खांद्यावर वाहणे..आठ किलो मीटर चालून कृष्णाकाठी अग्नी देणे शांत झाल्यावरच,नदीत अंघोळ करून घराकडे परतणे दिवसा अथवा रात्री प्रसंग बरेच आहेत परत कधीतरी..
. . .
माझी आजी म्हणजे पेंडसे वकीलांची आई.तिचा निवडक मैत्रीणीतील सरस्वती काकू रास्ते..तशा निरक्षर पण स्मरणशक्ती दांडगी.ज्ञानेश्वरी मुखोद्गत.सप्त्यामधे व्यासपीठावरून वाचणारा जरा उच्चारात चुकला तर लगेच थांबवून दुरुस्त करीत..समोर पोथी पण नसायची,बहुतेक वेळा बोटे वाती वळत पण एकाग्रता भयाण.माझ्या आत्या,आजी,तंगूबाई व अन्य काकडारती करायच्या.दुपारी हरिविजय असे वाचन.दिवेलागणीला आपापल्या घरी.हे महिला मंडळ भक्तिरसाने ओतप्रोत.
ताक घुसळायला आजी बसली की मी जवळ बसून ती पदे म्हणायची ती मी सहजच म्हणायचा,पण माझा मतलब वेगळा,तिने लोणी काढले कि त्यातला गोळा माझ्या हातावर ठेवायची मी घट्ट करायचा..गेले ते दिन!
. . .
दिलीप पेंडसे
त्या पेरू बागेच्या गावाचे नाव जनवाड...मी कोजागिरी पौर्णिमा आली की सकाळी आवरून सायकलवर दोन बरण्या..मोकळ्या..हॅंडलला बांधून आलगूरला जायचो.तिथे मुख्य रस्त्याजवळ दड्डीत आमचा सत्यप्पा यलगुद्री माझी वाट पहात बसलेला,तडा भाळ माडिद्री म्हणाला,पण उठला बाजेवर कांबळे अंथरले..कूडरी स्वल्प व्हत्त..यम्मी हिंड कोडतिनू..म्हणत उठायचा.दांडगी म्हैस,तिची घागरी एवढी कास आणि पत्ताही शिंगे.सत्त्यप्पा मोठ्ठी कांडी घेऊन बसायचा दोन्ही हातांनी धार काढायचा,अक्षरशः केवळ दहा मिनिटात कासंडी फेसाळ दाट दुधाने भरायची.उठून मी नेलेल्या बरण्या भरायचा..सुदिन खेटे दौंड बर्री न्याहारी माडक्याशिंद आलेले हिंड कोडतिनु..असे प्रेमाने म्हणायचा..वकील्रिगे मत्त नाथावरिगे नमस्कार हेळरी..मी त्याला वाकून नमस्कार करून सायकलवर टांग मारायचा..लक्षात यायचे वारा छातीवरचा आहे,मग श्वास मोठ्ठे घेत घामाघूम होत घर गाठायचे.पुढची दूध तापविणे इ.कामे घरच्या वडिल वार्ता स्त्रियांची..असा सत्त्यप्पा,असे आलगूर,अशी कोजागिरी!
. . . . . . . .
आनंद कुलकर्णी
महादेवप्पा मुरगोड ऊर्फ देवरू यांचावर उल्लेख आलाय त् संदर्भात माझी एक मजेशीर आठवण आहे..
63/64 साल असावे.त्यावेळी संघाची शाखा ST standसमोरील मैदानात भरायची तेथे महादेवाप्पांचा एक कार्यकर्ता संघस्थानावर आला. प्रार्थना झाली वीकिर झाल्यावर सर्वाना थोडे थांबावयास सांगीतले.त्याने छोटेसेच भाषण केले.निवडणुकीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.दुसरे दिवशी बारा एकच्या सुमारास दत्ताच्या देवळामागील त्यांच्या कार्यालयात बोलावले.आम्ही गेलो
दिवसभर राबलो संध्याकाळी मिरवणूक attend केली.पोटात जाम कावळे कोकलत होते. त्यांच्यातील एकsenior कार्यकर्ता आम्हाला म्हणाला आजचा कार्यक्रम सुरेख झाला. आता आपण हाॅटेलात जाऊ पोटभर जेऊ मग घरी जाऊ
तो अगदी माझ्या मनातलं बोलला होता.
एवढ्यात दुसरा एक शहाणापुढे आला व म्हणाला अनरे ही RSSची मुलं आपल्या बरोबर येणार नांहीत हे फार कट्टर असतात, कुणाच कांही खात पीत नांहीत .मी मख्ख उभा. जत्था पुढे निघून गेला. आम्ही चार सहा स्वयंसेवक मुकाटपणे तआपलं चारित्र्य संभाळत घरी परतलो.. . . . . . . . . .. आनंद कुलकर्णी
माझ्या लहानपणची एकच निवडणूक मला थोडी आठवते. त्या काळात पं.नेहरूंच्या नावावर दिव्याचा खांबही निवडून येत असे म्हणे. जत्ती तर सुशिक्षित आणि सुसंस्कृत होते. गावात सगळीकडे त्यांचे नाव आणि बैलजोडीचे फलकच दिसत होते. मुरगोड यांचा विशेष प्रचारही नव्हता. ते कुठल्या पक्षातर्फे निवडणूक लढवत होते आणि त्यांचे कोणते चिन्ह होते यातले काहीही मला आठवत नाही. . . . . . . . आनंद घारे
. . . . . . . . . .. . . . . . . . .. .
शोभा जोग परांजपे
पूर्वीचे भास्कर जोगळेकर यांचे आजोबा जमखंडी ते वास्तव्य होते त्यांनी मंडूक स्तोत्र म्हणून पाऊस पडला होता अशी आख्यायिका आहे कोणते साल ते माहित नाही
दिलीप पेंडसे
भास्कर जोगळेकर यांचे वडील,हणमंत भट जोगळेकर,त्यांचे वडील नरहरभट जोगळेकर.दशग्रंथी व घनपाठी होते.अर्थार्जन जेमतेम घर चालावे इतकेच,पण वेदो नारायण व शारदा देवी प्रसन्न होत्या,साधी राहणी,सर्व वेदनांचे मुखोद्गत पठन.एकादशी,शिवरात्री,इ. दिवशी ती.हणमंत भटजींना जंबगी चे कृष्णा नदीचे पात्रात स्नान करणे तेही पायी प्रवास करून..मी खूप वेळा अनुभवले आहे.
. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .
जमखंडीचे दिवस - वर्षा जोशी , लंडन
शाळेला उन्हाळी सुट्टी लागली की वेध लागायचे ते आजोळचे. आईचे माहेर कर्नाटकातील जमखंडी. आमचे मूळ गाव वेळणेश्वर पण वडिलांच्या बदलीच्या नोकरीमुळे आम्ही रहायला महाराष्ट्रात, कुलाबा (आता रायगड) जिल्ह्यातील छोट्या गावांत. त्यामुळे आजोळी जायचं म्हणजे थेट दुसऱ्या राज्यात जायचं!
नारळ-पोफळी, आंबे-फणस-काजू, लाल माती, शांत समुद्रकिनारे आणि कौलारू घरं मागे टाकून; सपाट काळ्या जमीनीवर डोलणारी ऊस, ज्वारी, बाजरी, मक्याची हिरवीगारं शेतं, धाब्याची घरं आणि संथ वाहणाऱ्या कृष्णामाईला पहात, एकदम भाषा आणि चालीरिती विभिन्न असलेल्या परप्रांतात जायचे!
आजोबांचे काळे कुटुंब कोकणातील नांदिवड्याचे. तीन-चार पिढ्यांपूर्वी सांगलीकर संस्थानिक पटवर्धनांमुळे कुटुंब घाटावर स्थलांतरीत झाले. माझे पणजोबा हरीशास्री काळे त्यांच्या काकांकडे संस्कृत, ज्योतिषशास्त्र शिकले आणि मग जमखंडीच्या पटवर्धन संस्थानिकांकडे पंचागकर्ते (वैय्याकरणी-व्याकरणी) म्हणून दाखल झाले. अशा तऱ्हेने कोकणातले काळे कुटुंबिय जमखंडीकर झाले. किंबहुना पटवर्धन संस्थानिकांमुळेच अनेक मराठी लोक जमखंडीत आले.
माझी आजी फार लवकर गेली त्यामुळे तिच्याबरोबर काही थोड्याच पण प्रेमळ आठवणी आहेत. त्यानंतर आजोबा कित्येक वर्षे आजोळच्या घरात एकटेच राहिले. आपल्या दोन्ही मुलींना वर्षातून एकदा तरी रीतीने माहेरपण मिळावे हा त्यांचा शिरस्ता! उन्हाळ्यात एक-दीड महिना आमचा मुक्काम आजोळी असे. लहान असताना आजीची फणी-करंड्याची पेटी काढून त्यातले मेणावर कोरडे कुंकू आजी लावे अगदी तस्संच मी लावून घेत असे आणि सांडासांडी पण करत असे. आजीच्या जुन्या नऊवारी साड्यांच्या चौघडीवर माझा हक्क असे. मी आजी-आजोबांचे सर्वात मोठं नातवंडं, त्यामुळे लाड होत असत. आजी नऊवारी कशी नेसते, त्याला ओचा, पदर कसा असतो याचे कुतूहल! नऊवारी साडीच्या केळ्यात खरोखरीचं केळं लपवलेलं असतं, अशीही माझी ठाम समजूत होती.
जमखंडी हे तसं बऱ्यापैकी मोठं तालुक्याचं गाव. मार्केट, धान्यबाजार, तहसीलदार कचेरी, पोस्ट ॲाफिस, हायस्कूल, वाचनालय, उमा रामेश्वर, जंबुकेश्वर, दत्ताचे, रामाचे, गणपतीचे अशी मोठी आणि अनेक छोटी देवळं; याबरोबरच रामतीर्थचे देऊळ, संस्थानिक पटवर्धनांचा मोठा राजवाडा आणि त्यांचे विशाल पोलोचे मैदान हे खूप आकर्षक वाटायचे.
पणजोबा वेदपाठशाळा चालवित. तिथेच आजोबा सर्व पौरोहित्य शिकले; त्याबरोबर संस्कृतमधे बी.ए. ही झाले. आजोबांनी नोकरीबरोबरच पणजोबांचे ज्योतिषशास्त्र पुढे चालू ठेवले. संस्थान विलीन होईपर्यंत राजे व राणीसरकारांकडून आजीसाठी मानाची साडी-चोळी-बांगडी येत असे. पूर्वी राजवाड्यावर ब्राह्मणभोजन असे, त्याला रमणा म्हणायचे. राजेसरकार स्वत: पानापुढे दक्षिणा ठेवत आणि राणीसरकार पंक्तीत आवर्जून तूप वाढत. या अशा अनेक राजेशाही गोष्टी आम्ही मावस-मामे भावंड खूप कुतुहलाने आजोबांकडून ऐकत असू.
तेंव्हाचा काळ वेगळा होता, गावात मुलांना एकटे बाहेर सोडायची भीती नव्हती. काळे शास्त्रींची नातवंडं म्हणून गावात आम्ही ओळखीचे होते. सकाळी आन्हिके, खाणे उरकून आम्ही जवळपासच्या देवळांत जात असू. तिथेही मित्रमैत्रीणी जमवले होतेच. सकाळी लहान मारुतीजवळ किंवा पोंक्षे, बर्वे यांच्या वाड्यात टिपरी-पाणी, डबा-एैसपैस, काचाकवड्या, सागरगोटे, कानगोष्टी असे खेळ खेळताना धमाल यायची. दुपारी कधी घरी भातुकली तर कधी जवळच्या घाणेकरांच्या वाड्यात पत्त्यांचा डाव रंगायचा. आमच्या तिथल्या मैत्रिणी अंजू-मंजू बर्वे यांची शेती होती म्हणून ट्रॅक्टरही होता, त्यात बसणं ही अजून एक मजा!
मार्केटमागेच घर होते त्यामुळे तिथून टपोरी रसाळ जांभळं, भाजलेली किंवा उकडलेली मक्याची कणसं, उसाचे करवे, बोरं, रायआवळे, चिंचा असा झकास मेवा खायची एक आगळीच मजा होती. प्रोसेस्ड फूड वर जगणारी आजची पिढी या सगळ्या मेव्याला दुरावत चालली आहे. तेंव्हाही फास्ट फूड होते पण पौष्टिक; जसे पोहे, उपमा, शिरा, घावन, उकड, मोकळ भाजणी, थालीपीठ. सकाळच्या न्याहारीला दूधपोहे, दूधभाकरी गूळ घालून किंवा पोळीचा लाडू, मेतकूट भात पापड, ज्वारीच्या लाह्या, कुरमुरे-दाणे, असे सकस पदार्थ असत. कृष्णाकाठचे पेरूंची चव शब्दात सांगता येणार नाही!
संध्याकाळी स्टॅंडजवळच्या बागेपर्यंत फेरफटका मारून क्वचित कधीतरी भेळपुरी खायची. पण मुख्य म्हणजे भरपूर खेळायचे ज्याने आपोआप व्यायाम होत असे. जाता येतां एकदा तरी वाटेत पटवर्धन हायस्कूलच्या जवळील सर्वेश्वराचे दर्शन घ्यायचे. कट्ट्यावर बसून रस्त्यावरची रहदारी बघत बसायचे. रस्त्यावर दुतर्फा कडुनिंबाच्या पिवळसर लिंबोण्या आणि गुलमोहोराच्या फुलांच्या लाल पाकळ्यांची पखरण असायची. त्यावर मावळतीच्या तांबूस सोनेरी किरणांची उधळण झाली की एक मनोहारी सांजरंग तयार होई. खूप मोहक दृश्य असे! मग रमत-गमत सातच्या आत घरी जायचे. हातपाय धुवून शुभंकरोती, परवचा म्हणायच्या. दर शनिवारी माडीवर हनुमानाच्या आरतीला जमायचे आणि आरती झाल्यावर सर्वात आवडता प्रसाद “बातुचो” म्हणजेच बाळू तुकाराम चोपडेंचा अस्सल, खरपूस खव्याचा मोठा पेढा खायचा. या “बातुचो” यांचा आणखी एक खास पदार्थ म्हणजे तळलेल्या पोह्यांचा चिवडा! अत्यंत चविष्ट! तसा आजपर्यंत कुठेच खाल्ला नाही.
सोमवारी जंबुकेश्वराला आजोबांबरोबर जायचे. शंकराला नमस्कार करून प्रदक्षिणेच्या वेळी छोट्या गाभाऱ्याच्या खिडकीतून शंssssभोsss असं म्हणताना खूप छान वाटायचे. देवळाजवळच्या विहीरीवर चाकावरून दोराने कशा घागरी/कळशा आत सोडतात हे निरखायचे. कारण पाणी शेंदायचा कोकणात लाकडी रहाट पाहिलेला, त्यामुळे ह्या वेगळ्या पद्धतीचे कुतुहल! गुरूवारी दुपारी धान्य बाजारात जाऊन मातीची भातुकलीची खेळणी, सुपं, विणलेल्या टोपल्या, असं काहीबाही खरेदी करायचं. तेंव्हा सगळं इको_फ्रेंडलीच असायचं. सायंकाळी गुरूवारी दत्ताच्या देवळात धूपारतीची अनुभूति; तर अंगारिका चतुर्थीस गणपती गल्लीतील गणपतीच्या देवळात पालखी बघायची. शनिवारी मोठा मारुती तर सोमवारी काडसिद्धेश्वराच्या देवळांत शिवलिंगाची दहीभाताची पूजा बघायला जायचं. खूप सुरेख दिसायची ती बुत्तीपूजा! सारं कसं मंत्रमुग्ध वातावरण असे.
रात्री जेवणं उरकून आवरून सगळेजण गच्चीत गार वाऱ्याला बसायचो. मजेत गप्पा, आपली आवड ऐकणे किंवा पत्ते खेळणे असा कार्यक्रम असायचा. आजोबा माडीवर खोलीत झोपत पण आम्ही सगळे गच्चीत! धाब्याच्या घरांना सहाणी असतात. सहाणी म्हणजे छतातील खिडकीच! दोन सहाणींच्यामधे अंथरूण घालून चांदण्या बघत, एक एक तारकासमूह ओळखत, गार वाऱ्यात जी झोप लागायची ती सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटांनीच जाग यायची ! हल्ली मुलांना “स्टार गेझिंगसाठी” खास न्यावे लागते कुठेतरी. सहज मिळणाऱ्या गोष्टीच दुर्मिळ झाल्यात.
तेव्हा दुधाचे रतीब घालायला दुधवाला यायचा. तसंच जवळच्या गावातून आठवड्यास शेतकरी बायका ताजं दही आणि लोणकढं साजूक तूप विकायला, “मसरव्वा....” असं ओरडत येत असत. मग लिटरच्या मापानी दही, तुपाची खरेदी होई. कोकणात जसे हिराचे झाडू तसे कर्नाटकात शिंदीचे झाडू; “शिंदी बारगीsss” करत ते विकणारे देखील येत. या सर्वात वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे शिराळ्याची रांगोळी विकणारे! “तगोsssरीव्वा रांगोळी हळ्ळी...” अशी हाळी ऐकू आली की बाहेर धावायचं! शिराळ्याचे दगड विकत घेऊन, स्वच्छ धुवून पाण्यात भिजवायचे. मग बारीक कुटून घेऊन ते जात्यावर दळायचे. खूपच मऊसूत आणि स्वच्छ रांगोळी बनायची! इतकी मुलायम रांगोळी मी अजून कुठेही बघितली नाही.
आजोळच्या घरापासून जवळच एक मोठ्ठ तळं आणि पुढे टेकडीवर “मेलगिरी_लिंगप्पाचे” देऊळ! तिथे चढून गेलं की सगळं जमखंडी गाव दिसे. धाब्याच्या घरांच्या चुन्याने रंगवलेल्या गच्च्या, त्यावरील धुराडी खूप छान दिसत. एखादे वेळेस रामतीर्थचा राजवाडा बघायला जायचं आणि त्या ऐतिहासिक वास्तूची भव्यता अनुभवायची! जमखंडी कर्नाटक राज्यात जरी असले तरी पटवर्धन संस्थानिकांमुळे तिथे बरीच मराठी कुटुंब स्थायिक होती. त्यामुळे तिथल्या एकमेव लायब्ररीतसुद्धा मराठी पुस्तकं, मासिकं, बालकुमार वाचनसाहित्य मिळायचे. काही प्रेक्षणीय ठिकाणंही जवळ होती; विजापूरचा गोलघुमट, कडपट्टी बसवण्णाचे देऊळ, जोग फाॅल्स, बदामीची लेणी!
मार्केटजवळच एक आईस्क्रीम फॅक्टरी होती. त्यामुळे मुक्कामात शेवटच्या दिवसांत एकदा आईस्क्रिमचा कार्यक्रम हमखास, न चुकता पार पडायचा. सगळी मजा अनुभवताना सुट्टी कधी संपायची ते कळायचं नाही. जायचे दिवस आले की आजोबा हळवे होत, ‘अजून रहा रे’ म्हणत. जाताना माहेरवाशीणीला बांगड्या, साडीचोळी ओटी याबरोबरच बातुचो पेढे, चिवडा, साजुक तूप, खारीक, बदाम इतके काही देत, की विचारूच नका! लेकी, नातवंडं पुन्हा एक वर्षानी भेटणार याची खंत, मग हे प्रेम असं ओसंडून वाहत असे! पहाटे पाचची पुणे एस् टी सुटताना निरोप देणारे-घेणारे बापलेक गलबलून जात आणि आम्ही मुलं डोळे चोळत नकळत पुढच्या उन्हाळी सुटीची स्वप्नं रंगवत झोपी जात असू!!
जमखंडी आता शहर झालंय, गर्दी खूप वाढलीय. पोलोग्राऊंड विभागले असेही ऐकलेय. बहुतेक मराठी कुटुंबातील पुढच्या पिढ्याही बाहेरगावी स्थायिक असतील. आमचेही आजोळचे घर अजून आहे परंतु आजोबांच्या माघारी जमखंडीला जाणे बंद पडले. आज तीस वर्षांनी देखील आठवणी मात्र ताज्या आहेत.
आईचे हायस्कूल रियुनियन
. वर्षा जोशी गानू
वय वर्षे....nearing to #Eighty... मनांत उत्साह ... that as of #Eighteen, जणू काही आत्ताच शाळेतून बाहेर पडलेत.... मॅट्रिक होऊन ६० वर्ष झाली, तरीही गेली ३५ वर्षे, दरवर्षी नियमित भेटणारी, गेटटुगेदर करणारी ही मंडळी म्हणजे जगातले आठवे आश्चर्यच म्हणावे लागेल !!!
माझ्या आईच्या १९५८-५९ मॅट्रीकच्या बॅचचे (P. B. High School, Jamkhindi) स्नेहसंमेलन दरवर्षी २५ डिसेंबरला असते. २३, २४, २५ डिसेंबर असा एकूण तीन दिवसांचा कार्यक्रम असतो. त्याची सुरवात कशी झाली, हे श्री. हरीकाका आपटे यांनी सांगितले. १९८५ च्या मे महिन्यात एका समारंभात त्यांना आपले वर्गमित्र भेटले. प्रथम त्यांनी ओळखले नाही पण ओळखल्यावर जमखंडीच्या जुन्या आठवणींना उजाळा न मिळता तरच नवल!! मग 'कोण मित्र काय करतो, कुठे असतो'... वगैरे मनसोक्त गप्पा झाल्या. हे वर्गमित्र म्हणजे श्री. शशीकाका आपटे! तेव्हाच 'आपण मॅट्रीक बॅचच्या सर्वांनी परत एकत्र यायला हवं', असा विचार सुरू झाला.
जेव्हा फेसबुक / व्हाॅट्सॲप तर सोडाच पण इंटरनेट-ईमेलही नव्हते तेव्हा सगळ्यांना शोधणे हे एक मोठेच काम होते, विशेषत: मुलींना...कारण लग्नानंतर आडनावे बदललेली असतात.
हरीकाका सांगतात... 'त्या काळी मुलींच्या घरचे परिचित असले तरी रस्त्यात थांबून मुलींशी बोलणे प्रचलित नव्हतेच'. त्यामुळे इतक्या वर्षांनी देखील काही वर्गमैत्रिणी पुण्यात होत्या हे कळल्यावरही त्यांच्या घरच्यांमार्फत ( भाऊ वगैरे) संपर्क साधला. माझी आई सिंधू काळे-जोशी... तिला ही कल्पना सांगायला, माहिती घ्यायला तिचे वर्गमित्र राजाकाका पटवर्धन, माझा मामा उदय रानडे बरोबर (दोघेही एकाच कंपनीत होते) आमच्या घरी आले होते.
सर्वप्रथम सगळ्यांचे पत्ते, फोन नंबर असल्यास तोही घेऊन यादी करायला सुरूवात केली. बरेचसे पुण्या-मुंबईतच होते तर काही जमखंडी, सोलापूर, सांगली-मिरजेत. ही सगळी जमवाजमव १९८५ आॅक्टोबरपर्यंत झाली. त्यानंतर २६ जानेवारी १९८६ हा दिवस पहिल्या संमेलनाकरता निश्चित केला. शशीकाकांच्या बंधूंच्या कोथरूड येथील फ्लॅटवर हा कार्यक्रम करायचे ठरले.
२६ जानेवारीला सर्वजण सहकुटुंब जमले होते; सर्वांचा परिचय व्हावा या उद्देशाने! २५ वर्षांहून अधिक काळ लोटला होता मॅट्रीक होऊन; त्यामुळे इतक्या वर्षांनी सर्वजण भेटले तेंव्हा ती एक ओळख परेडच होती. आम्ही पुढच्या पिढीतल्या सर्व मुलां-मुलींनीही आपापला परिचय करून दिला.
श्री. विलासकाका गोखलेंच्या मुलाने आपला परिचय सांगतानाच पुढे "माझ्या बाबांना (त्यांचे मित्र) "विल्या गोखले" म्हणतात असे सांगीतल्याचे अजून माझ्या लक्षात आहे... 😀 शशीकाका आपटे गोरेपान, गोल चेह-याचे, खूप गोड, खळीदार हास्य असलेले.. म्हणून लहानपणी यांना सगळे शशा ऐवजी #सशा म्हणायचे! 😁 शालेय जीवनातल्या अशा गमतीजमती आणि हास्यविनोदात पार पडलेले हे संमेलन सगळ्यांसाठी अविस्मरणीय होते. वर्षातून एकदा संमेलनासाठी एकत्र जमायचेच असे ठरले.
संमेलनाची तारीख मात्र २५ डिसेंबर ठरली, त्यालाही एक खास कारण होते. मॅट्रीकच्या या बॅचचा निरोपसमारंभ शाळेने २५ डिसेंबरला केला होता. त्या काळी शेतातील मळ्यात हा कार्यक्रम झाला होता. २५ डिंसेबर, शाळेत काम करणा-यांनाही २६ जानेवारीपेक्षा सोयीस्कर होता. त्यानंतर दरवर्षी हे संमेलन अधिकाधिक उत्साहात साजरे होत गेलेयं... विशेष म्हणजे संमेलनासाठी वर्गबंधू व त्यांच्या अर्धांगिनी आणि वर्गभगिनी व त्यांचे यजमान असे दोघांनाही आमंत्रण असते. आपापल्या आवडीनुसार काही जण उभयतां तर काही एकटे सहभागी होतात.
ठरवणं सोपं असतं पण ते तडीस नेणं कठीण.... मात्र हरीकाकांसकट काही उत्साही मित्रांनी ती जबाबदारी आनंदाने स्वीकारली. एवढंच नव्हे तर काही वर्गभगिनींच्या #अहोंनी देखील या संमेलनांच्या संयोजनास मदत केली. इतर वर्गमित्र-मैत्रिणींनी आपल्या सर्व व्यापातून तीन दिवस वेळ काढून, दरवर्षी संमेलनास आवर्जून उपस्थित राहून हा उपक्रम यशस्वी केला. कुठल्याही सोहळ्याला खूप माणसं असल्याशिवाय मजा येत नाही.
आतापर्यंत पुणे, ठाणे, नाशिक, पंढरपूर, सांगली, कोल्हापूर, गणपतीपुळे, मालवण आणि अर्थातच जमखंडी अशा अनेक ठिकाणी संमेलने झाली आहेत. आजतागायत पत्रव्यवहार, संमेलनाची वर्गणी, जमाखर्च ठेवून तो सर्वांना कळवणे असे सर्व व्यवस्थित केले जाते. प्रत्येक ठिकाणी तेथील स्थानिक मित्र/मैत्रिणी, संमेलनासाठी निवास व्यवस्था, केटरिंग, जवळपास एखाद्या छोट्या सहलीचे आयोजन; अशी तिथली जबाबदारी घेतात. मुख्यत्त्वे फोन व पत्रं याद्वारेच हे सगळे आयोजित केले जाते आणि तेही अतिशय सुसूत्रपणे. याचे खूप जणांना मोठे अप्रूप वाटते!!
मॅट्रीक बॅचची ५० वर्षे आणि संमेलनाची २५ वर्षे असा सुवर्ण-रजत महोत्सवी आनंदसोहळा जमखंडीला आयोजित केला होता; तेंव्हाही सहकुटुंब आमंत्रण होते... म्हणजे अगदी पुढच्या पिढीच्या मुलगे-सुना, मुली-जावई, नातवंडे यांनाही ! माझ्या इंग्लंडच्या पत्त्यावरही व्यवस्थित आमंत्रणपत्र आले होते पण मला जायला जमले नाही. 😔 जमखंडीचे वर्गमित्र श्री. शरदकाका पटवर्धन यांनी तिथली व्यवस्था अगदी चोख ठेवली होती.
सर्वांनी शाळेत जमून सर परशुरामभाऊ पटवर्धन (जमखिंडी संस्थानचे दानशूर राजे) यांच्या पुतळ्याला हार अर्पण केला. तेव्हाचे या सर्वांचे सर - श्री. कलकेरी, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले. आजी-माजी शिक्षकांचा सत्कार, आठवणींची भाषणे, मनोगते वगैरे कार्यक्रम झाले. तिथल्या तेव्हाच्या मुख्याध्यापकांना या बॅचचे खूपच कौतुक वाटले. या कार्यक्रमाची CD आणि एक स्मरणपुस्तक देखील काढले. एक दिवस रामतीर्थ, एक दिवस कुल्होळ्ळी आणि शरदकाकांच्या शेतावर छोटी सहल झाली.
विशेष म्हणजे या वर्षीही उद्यापासून तीन दिवस २४, २५, २६ डिसेंबर २०१८ ला जमखंडी येथे मॅट्रीक बॅचची ६० वर्ष आणि संमेलनाची ३५ वर्ष साजरी होत आहेत. मॅट्रिकनंतर अनेक वर्षांनंतर सर्वप्रथम एकत्र जमलेले हे मित्रमैत्रिणी आज ३५ वर्ष त्याच उत्साहानी अजून दरवर्षी एकत्र जमतायत.
या सर्वांमध्ये कुठल्याही प्रकारची आर्थिक भिन्नता, मानापमान, आढ्यता असले काहीही कधीही आड आले नाही. वर्गभगिनी आणि वर्गबंधूंच्या बायकांचाही एक छान ग्रुप जमलाय. व्यक्ती तितक्या प्रकृती असल्या तरी सगळेच मिळूनमिसळून आहेत. माझ्या आईच्या पंचाहत्तरीला हरीकाकांनी आईच्या खूप छान जुन्या आठवणी सांगीतल्या. ज्यांना येणं शक्य होतं त्या मित्रमंडळींनी कार्यक्रमाला उपस्थित राहून आमचा आनंद द्विगुणीत केला.
वयाचा अमृत महोत्सव पार केलेली ही मंडळी आता मात्र थकत चालली आहेत. फार लांब प्रवास वगैरे झेपत नाहीत, त्यामुळे अनेकांना इच्छा असूनही सहभागी होता येत नाही... काळ कुणासाठी थांबत नाहीच... अलिकडे वर्षा-दरवर्षाआड कुणी ना कुणी त्यांच्यातून निघून जातयं... कायमचं... 😪😔 पण या मंडळींच्या उत्साहाने एक जाणीव मात्र दिली.... चिरंजीवित्त्व कुणालाच नसतं पण आपण ठरवलं तर मनाने चिरतरूण नक्कीच रहाता येतं... आनंद द्यायला आणि घ्यायला पैसे लागत नाहीत, फक्त मनापासून इच्छा असायला हवी.
या बॅचपासून प्रेरणा घेऊन आता इतर काही बॅचॅसनीही संमेलने सुरू केली आहेत. एक पुणेस्थित जमखंडीकरांचा मेळावा दरवर्षी जानेवारीत कर्वेनगरच्या #हाॅटेल_रूद्रमध्ये असतो. आई २०१५ साली गेली होती तेव्हा आताचे युवराज पटवर्धन (बहुदा शेवटच्या संस्थानिकांची ही तिसरी पिढी) हे आवर्जून उपस्थित होते. उद्योग व्यवसायानिमित्त पुण्यात होते तरीही निवृत्तीनंतरचे आयुष्य जमखिंडीत राहून गावाच्या विकासात सक्रिय रहाण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. राजवाड्यात जमखंडीविषयी एक संग्रहालय करण्यात येत आहे.
केवळ आपल्याच नव्हे तर आपल्या भावी पिढीपुढे या मंडळींनी हा इतका उत्तम आदर्श घालून दिलाय... खरोखर सारंच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी.... या सर्वांच्या दीर्घायुरारोग्यासाठी ईश्वर चरणी प्रार्थना! अखेरचा निरोप घेऊन गेलेल्यांच्या स्मृतीस भावपूर्ण आदरांजली !! 🙏🏼🙏🏼
हे सर्व लिहीताना बोरकरांच्या कवितेतील ओळींची सतत आठवण होत होती...
देखणी ती जीवने
जी तॄप्तीची तीर्थोदके..
चांदणॆ ज्यातून वाहे
शुभ्र पार्यासारखे....
🙏🏼🙏🏼🙏🏼
Varsha Joshi-Ganu
Bracknell, Berkshire, England
(सिंधू काळे-जोशी यांची मुलगी)
(कै. व्यंकटेशशास्त्री काळे ज्योतिषी, जमखंडी यांची नात)
जमखंडीविषयी आठवणी वाचल्यावर अनेकांनी मी लिहावे असे आवर्जून सांगितले, म्हणून ही भावपुष्पांजली !!
. . . . . . . . . . . .
परोपकारी व्यक्ती.
मी शेखर आपटे। शाळेत माझे नाव शिरीष होते।
गावात सुद्धा सगळे शेखर च म्हणायचे। मी पागा गल्लीत राहायचो। आमच्या घरासमोर केदारी मुधोळ नावाचा माणूस राहायचा। घरची आर्थिक परिस्थिती कठीणच होती। पावसाळ्यात सगळे घर गळायचे। असो अशी हि व्यक्ती मात्र औषधी वनस्पती ची जाणकार होती। दात दुखी, कण दुखी, कुत्रा चावला तर, विंचू चावला तर ह्यांच्याकडे रामबाण औषध होते। हे मी कित्येक उदाहरण स्वतः बघितली आहेत।
ह्याची विशेषता ही की हा पठ्ठा कुणाकडूनही एक पैसे ही नाही घ्यायचा। घरून दरिद्री पण गुरूला वाचन दिलेल्या वाचनाचे तंतो तंत पालन। त्याला कित्येकांनी अमिश दिले की हवा तेवढा पैसे घे आणि औषध सांग। पण पठ्ठा हलला नाही।
अश्या ह्या थोर मनाच्या गुरू सेवकाला मनापासून नमन
मी शेखर आपटे
आज दुसरी आठवण : अप्पासाहेब विठ्ठल मंदिराचे प्रमुख संत तात्यासाहेव घोरपडे। खरेच संत। शांत सहनशील। पेशा वकिलीचा पण मी बघितला नाही काळा कोट।
असो हे विंचू विषावर मंत्र घालायचे। माझी बघितलेली आठवण।
एकदा सकाळी एक शिक्काल्गार बाई आमच्या घरासमोर केदारी जडे इंगळि चावलि म्हणून अक्षरशः वेदनेने बोंबलत होती। पण केदारी गावाला गेलाता त्यामुळे ती रडायला लागली।
मला एक माळी म्हणाला तात्यान् कडे घेऊन जा। मी आवड असल्याने घेऊन गेलो।
त्यांनी एका वाटीत पाणी ठेवले बाईला ज्या बोटाला विंचू चावलाता ते बोट पाण्यात बुडवून डोळ्या ला पाणी लावायला सांगितले। स्वतः 3 दा मंत्र टाकून हात झटकायला सांगितले। विष उतरलेले । डोळ्याला पाणी लावून जा म्हणाले। ( ही अंधश्रध्दा नाही अनुभव घेतला आहे)
असे संत तात्या घोरपडे त्यांना माझे श्रध्दापूर्वक नमन।🙏
----
शाळेतल्या आठवणी
मी मधुकर आपटे,
पागा शाळेजवळ आमचे घरी सतीश, रमेश व शेखर यांचा मोठा भाऊ, शोभाताई, शरद व शैलाताई यांचा चुलत भाऊ,
पागा शाळा ही मराठी शाळा नं़१ मराठी शाळा नं २ ही ५ वी पर्यंत होती, शाळेजवळ घर असल्याने मास्तरांना पाणी आणणे हे आमचे कर्तव्य होते
गोविंदराव हुल्याळकर, कुलकर्णी हेडमास्तर, खास निस, जोग, लिमये, हुल्याळकर, कन्नड मास्तर यानी आमचा पाया घातला, या सर्वाना दंडवत,
---- पुढील भाग नंतर
मी मधुकर आपटे पागा गल्ली मधे रहात होतो
आमच्या मित्रमंडळी मधे विजय परांजपे, प्रमोद जोग, बबन जोशी, विमल ओसवाल, अनिल खाडीलकर वगैरे होती, पण मैत्री खरी निभावली ती महावीर पाटील ने. ५ वीत माझ्या पायाचे ऑपरेशन झाले व जवळ जवळ ५ महीने मी शाळेत जाऊ शकलो नाही, माझी काकू माझा अभ्यास घेत होती पण महावीर ने जी मला त्यावेळी आणि नंतर जी मला मदत केली ती विसरू शकत नाही. १९६६ नंतर आमची भेट नाही. हा महावीर मराठी असून हायस्कूल चा कलुतीला हरवुन जनरल सेक्रेटरी झाला होता
------------
मी मधुकर आपटे
आमच्या वर्गातील मुलांना गाण्याची, नाटकात काम करण्याची प्रबळ ईच्छा होती
हे जाणून ऊज्वलाच्या आईने(भानुमती पटवर्धन काकू) बबन जोशी व ऊज्वलाच्या माध्यमातून दोन गट केले एक मुलांचा व एक गट, मुलीचा तयार केला व चांगली तालीम घेऊन देशभकित वर आधारित ३ तासांचा कार्यक्रम सादर केला होता पागा शाळेच्या हॉलमध्ये. जिंकु किंवा मरू; मी शुर शिपाई आहे, भास्वर तुज सम भास्वर वगैरे गाणी होती.
कार्यक्रम खुपच छान झाला होता
: दुसरी आठवण १९६५ सालची आहे भारत पाकिस्तान युध्दाच्या वेळी हायस्कूल मधे संरक्षण निधी गोळा करणे कोणता वर्ग जास्त निधी गोळा करणार त्या वर्गाला मान मिळणार
आमचा वर्ग कॉमर्स जास्त विद्यार्थी गरीब च होते मग आमचे वर्ग शिक्षक कुमशी सरानी नाटक बसवायचे ठरविले ईतर शिक्षकांनी खुप अडचणी निर्माण केल्या प्रकाशकाची परवानगी न मिळविणे वगैरे. हे पण आम्ही स्विकारले व मग मी आणि वसंत लाड (नान्या) दोघांनी "बंधु प्रेम" नाटक स्वत: लिहिले हुल्याळकर सरानी निर्देशित केले नांदी पण आम्ही लिहिली व गुरव मास्तरांनी संगीत दिले नाटकात आम्ही सर्व विद्यार्थी सहभागी झालो व ४ आणे तिकीट लावून पागा शाळेत नाटक छान पार पडले व आमच्या वर्गाने रू, ५८८ निधी जमा केला व नं १ पटकावला .
आज किती मित्र हयात आहेत माहीत नाही. पण मी हसमुख कोठारी भेटलो की आजही सर्वांची आठवण येते
Ujwala :कार्येक्रम करून तिकिटांचे पैसे सरकारला पाठवले
दिलीप पेंडसे
मुधोळ रस्त्याला मशीद व मशिदीसमोर परशुराम तालीम आहे.कडपट्टीचा परसप्पा पैलवान हा भल्या सकाळी येऊन जोर बैठका,लोड,मातीत जड खोरे असे व्यायाम करायचा.राम व विद्राव्य कुणी या श्री मेळ्याप्पा कलुतीचे मुलांकडुन मल्लखांब करून घ्यायचा.बागवान समाजातील तरुण पण यायचे.आमच्या गल्लीतील रवी बिळगी व प्रकाश पटवर्धन पण यायचे.पण हा प्रकाश बाहेर येताच परसप्पाची थट्टा करायचा,हायस्कूलच्या डबल बारवर अफलातून व्यायाम प्रकार लीलया करायचा.असेच सिंगल बारवकर माझा वर्गमित्र बाबुशा..बहुतेक पोंक्षे नाॅन स्टाॅप पुलप्स मारायचा मला आश्चर्य वाटायचे. रामा हा शाळेतील तालिमखाना व खेळाचे साहित्य संभाळायचा.शाळेचे मागे पळणे तेही सेकंदात मोजणे,बरोबर शंभर मीटरची खूण असायची.स्टाॅप वाॅच घेऊन सर कागदावर नोंद करायचे.मैदानावर क्रिकेट,फुटबाॅल खेळ चालायचे,वडाचा खूप पारंब्या आणि मोठ्ठा घेर असलेला वृक्षराज!.त्यांचे मागे अप्पासाहेब विहीर.बहुतेक सरकारांनी बांधलेली.दरारा व उत्तम शिकविणारे अथणी मास्तर,इंग्रजी मात्र अपसंगीच हवेत.नाडगौडा सर गणित व सायन्स छान उलगडुन सोपे करून शिकवायचे,मराठी माध्यमात सगळ्या भाषा व्ही बी जोशी सर.गणित स्वतःचे वैशिष्ट्य स्टाइलने शिकवायचे फाटक सर. आर जी जोशी स्काउटचे तर फाटक मास्तर एसीसी चे. विसरू नयेत असे अनेक गुरुवर्य!
मी शोभा आपटे पूर्वीचीआताची जयश्री जोशी
मी पुण्यात गेली 52 वर्षे आहे .मी1963 मध्ये मॕट्रीक झाले व पुढे दोन वर्षे जमखंडीला व दोन वर्षे सोलापूरला राहून B sc झाले. शैला व शरद सख्खी भावंडं .व शेखर मधूचुलत भाऊ पण आम्ही सख्यासारखेच होतो.माझे शकुंतला girl's शाळेत पहिली ते सातवी पर्यंत शिक्षण झाले मला अजूनही माझ्या शाळे बद्दल अभिमान वाटतो. आमच्या सगळ्या बाई अतिशय चांगल्या होत्या .
मुळगुंद बाई मुख्याध्यापक होत्या.सुब्बा बाई ,घारे बाई , देवळे बाई, तिकोटेकर मास्तर आम्हाला शिकवायला होते व गायन मास्तर (नाव आठवत नाही) होते सगळे मन लावून शिकवायचे.मारुतिच्या देवळासमोर आमची शाळा होती शाळेला जाण्यासाठी ब-याच पाय-या होत्या समोर मोठा hall आणि बाजूला office होते.
शाळेसमोर ओकळी असायची. मध्ये मोठा उंचच उंच खांब असायचा. त्यावर चिंचोक्याचे पाणी ओतायचे.मग जे भाग घेत ते सरासरा घसरुन पडत आणि जो शेवटी जो वर चढेल तो विजयी होई. खूप मजा येई .अशा खूप आठवणी आहेत.बघू जमेल तशा पाठवीन.
आनंद कुलकर्णी
त्या खांबाला ओकळी खंबा म्हणायचे. तुमच्या शाळेचे रूप फार आकर्षक होत. शाळेसमोरील दगडी पायर्या चढायची मला तेंव्हा खूप इच्छा व्हायची पण आजतगायत ती पूर्ण झाली नांही.
आनंद कुलकर्णी.
वैजयंती पटवर्धन
आमचा सहवी चा वर्गाजवळ माग होता नी असा ऐकलं होत की पूर्वी मागावर कापड विणणे शिकवले जाई. आम्हाला मात्र फक्त सुत कताई ज्याला आम्ही सुतक ताई म्हणायचो ती पेलू बनवणे नी टकळी नी चारख्यावर पेळूपासून सुत काढणे असा शिकवत असत. नी सफाई असापण तास असायचा जेव्हा आमच्याकडून शाळेचे अंगण झाडून घेत असत. बाथरूम धुवायला पण विद्यार्थी निनाच लागायचं. वर्ग पण झाडाने सारवणे अशी कामं असत. अर्थात ते काम वर्गातील मोठ्या मुलीच करायचा. आम्ही आपले सतरांदा रस्त्यात ठेवत आमचा किंवा अशाच कुणाकडून जिथे गाई म्हशी पाळल्या जायचा त्या घरातून शेणाची पाटी आणून द्यायचो. माझा अठवणीनुसार देवळे बाई नी तिकोटेकर बऱ्यापैकी मारायचे पण सुब्बाबाई घारेबाई प्रेमळ नी फडकेबाई हुंडेकर मनापासून शिकवायचे पण कडक . मी कधी मार नाही खाल्ला कुण्या तीचरचा. कन्नड शिकवायला दाणी म्हणून बाई होत्या. सोनुबाई मुळगुंद या हेडमिस्त्रेस होत्या. त्यांच्याबद्दल आदरयुक्त भीती असायची आमचात.
वैजयंती पटवर्धन: शकुंतला गर्ल्स स्कूल ला समोर ७ विचा वर्ग डावीकडे ६ नी त्या मागे ५ वी आणि उजवीकडे हेड मिस्त्रेस च ऑफिस कम स्टाफ रूम नी मागील इमारतीत पहिली ते चवथीच्या वर्ग नी त्यांना बिन कठड्या चा जिना. त्यावरून मी पण निम्या जिन्यातून एकदोनदा पडल्याचे आठवते. सहली साठी आवडीची मटकीची उसळ मिळाली नी ती सांडली याच जास्त दुःख होतं तेव्हा.
. . . . . . . . . . . .
🙏सुप्रभात सर्वांना
मी विलास गोगटे,माझे ७वी पर्यंतचे शिक्षण पागा शाळेत झाले.आम्ही पागा गल्लीत डॉक्टर बेडेकर यांचेघरात भाड्याने राहत होते.माझे शेजारी मंगल चोपडे यांचे घर होते,त्यांचे जमखंडी मध्ये पेढे
विक्रीचे दुकान होते. ते सर्व कुटुंब विठ्लभक्त होते. कार्तिक वारी जेव्हा पागा गल्लीतून घराजवळआल्यावर सर्व वारकर्याना सोडा लेमन देत असत.या साठी घरातील सर्वजण सेवा करत.यात माझा पण सहभाग असे.उद्या दुसरी.
. . . . . . . . . . . . . . . . .
जमखंडीच्या आठवणी : आनंद कुलकर्णी
मी पागा शाळेत होतो.तिथे पूर्वी सरकारांची पागा होती म्हणे. ते कांही मला ठाऊक नांही.मी पाहिली ती नवीन RCCची पिवळी धमक इमारत पुष्कळ शिक्षक मला आठवतात. बहुतेक शिक्षक भारतीय वेष धोतर किंवा पायजमाच घालत डोक्यावर विद्यार्थी व शिक्षकानां टोपी compulsary होती. जर टोपी विसरली तर घरी जाऊनटोपी आणावी लागे. शाळेत मुली व शिक्षिका नव्हत्या. मला पुष्कळ शिक्षक आठवतात. अप्पाजी मास्तर पाचवीला वर्गशिक्षक होते. हणमंत मास्तर खासनीस हुल्याळकर मास्तर मला आठवतात. सारी शिक्षक मंडळी शांत स्वभावाची. परंतू गंभीर पण कुणाला मारकुट म्हणता येणार नांही.
अप्पाजी मास्तर काळी पुट्ठ्याची टोपी घालत.शाळेसमोर एक पन्नास बाय पन्नासचा रिकामा प्लॉट ह्रोता. बहुधा शाळेच्या मालकीचा असावा.जागि रिकामी असल्याने शेजार्या पाजार्यानी त्याचा उकिरडाच केला होता.एकेदिवशी सकाळची प्रार्थना झाल्यावर मुख्य गुर्जीनी जाहीर केले की आज आपल्याला श्रमदान करायचे आहै..
शाळे समोरचे मोकळे मैदान साफसूफ करायचेआहे. पोरं खुष अभ्यास नांही म्हणून. आम्ही गुर्जीना गुर्जीच म्हणत असू सर किंवा टिचर नव्हे.
फावडी घमेली खराटे यांची व्यवस्शा शाळेनी केली होती. कचरा गाडी पण होती. त्यावेळी गावात फारसे संडास नव्हते. लोक लोटाभर पाणी घेऊन टेकडीवर जात. आम्ही ताला लोटा परेड म्हणत असू.ज्याचा वाटेवरच control सुहटे तो अशा मोकळ्या जागांचा आडोसा शोधे. त्यामुळे या pllot ची दुर्दशा झाली होती. अर्धा दिवसात plot चकाचक झाला. कांही पोरानी शेण मिळवले शैणाचा सडा शिंपला ऊदबत्या लावल्या असंआनंद देणारं श्रमदान आयुष्यात परत जमलं नांही
गोविंद (चंदू) पोंक्षे
पागा शाळेची गोष्ट निघाली आहे तर मलापण त्या शाळेतील दिवस आठवले। हुल्याळकर सरांचा चिमटा, खासनीस सरांचा धपाटा व हातावरच्या छड्या कोणीही विसरणार नाही. याचबरोबर लिमये सर, गोविंद सर यांची पण आठवण येते. नंतरही या सरानां अनेक वर्षे भेटत होतो व तो आपलेपणा व आदर तसाच होता.
G G Ponkshe
आम्ही दहावीला असतानाही हस्तलिखित अंक प्रसिद्ध केला होता त्याचे सर्व काम लेखन, बांधणी, प्रत्येक पानामध्ये जिलेटीन पेपर हे किट्टूच्या घरी बसून केले होते. अंकाचे मार्गदर्शन व्ही बी जोशी किंवा अथणी सरानी केले होते.
----
दिलीप पेंडसे
माझे प्राथमिक म्हणजे चौथीपर्यंत शिक्षण पागा शाळेत,मग फेरिस स्कूलमध्ये..प्राथमिक शाळेत चिनगुंडी,अण्णप्पा,कांबळे,हुल्याळकर,हणमंत हेड मास्तर एवढे आठवतात. फेरिस स्कूलचे जोग,लिमये,गलगली,देशपांडे,एवढे आठवतात.
आनंद घारे
मी लहानपणी अशक्त होतो म्हणून सात वर्षांचा होईपर्यंत मला शाळेत पाठवलेच नाही, पण घरीच अंकलपीवरून सगळी अक्षरे आणि अंक शिकून घेतले होते. रोज दिवेलागणीनंतर घरातली सगळी मुले एकत्र परवचा म्हणायचे त्यामुळे सगळे पाढे ऐकून ऐकून मलाही तोंडपाठ झाले होते आणि रोजच त्याची उजळणीही होत असे. मी सात वर्षांचा होऊन गेल्यानंतर एकदा मोठ्या भावाचे बोट धरून पागा शाळेत चिनगुंडी मास्तरांच्या वर्गात जाऊन बसलो. ते जे काही सांगत ते मी पटकन पाटीवर लिहून दाखवत होतो, त्यांनी मला काही बाराखड्या आणि आकडे लिहायला सांगितले ते मी लगेच लिहिले. ते म्हणाले की तुला तर सगळं येतय् कीरे, तू आण्णाप्पा मास्तरांच्याकडे जा. त्या वेळी जुनी घोड्याच्या पागेची गोठ्यासारखी सलग लांबसचक शेड होती. त्यात वर्गांसाठी भिंतींची पार्टीशन्स नव्हती. मी उठलो आणि पलीकडच्या बाजूला आण्णाप्पा मास्तरांकडे गेलो. एक दोन दिवसात त्यांनी पाहिले की मला दुसरीतलेही सगळे येत होते. त्या काळात पहिली व दुसरीला मिळून फक्त एक अंकलपीच होती, इतर कोणते विषयच नव्हते. त्यामुळे आण्णाप्पा मास्तरांनी सांगितले की अमक्या अमक्या दिवशी वार्षिक परीक्षा आहे. तू एकदम त्या दिवशीच ये. मी परीक्षा देऊन पासही झालो आणि थेट तिसरीत गेलो. शाळेत नाव घालण्याचा सोपस्कार कुणी आणि कधी पूर्ण केला ते मला कळलेच नाही. याप्रमाणे मी तिसरी आणि चौथी इयत्ता अशी दोनच वर्षे पागा शाळेत काढली आणि नंतर पाचवी ते सातवी फेरिस्कूलमध्ये.
----
आनंद कुलकर्णी
VBजोशी मराठी शिकवायचे प्रसन्न व्यक्तीमत्व .गंभीर प्रकृती.अनावश्यक बोलणे नांही. विनोदसुद्धा ते गंभीरपणे सांगत. वेषही रुबाबदार असे. पँट शर्ट खोचलेला व वर वुलनचा कोट. कधी पायजमा कधी धोतर हा भोंगळपणा नांही. आम्ही त्यांच्या नजरेच्या धाकात होतो. ते कवी मनाचे होते. कधीकधी त्यानां हुक्की येई व ते म्हणत चला आज आपण बागेत जाऊ व तिथे निसर्गाच्या सान्निध्यात कविता शिकू. मग कुणीतरी त्यांची खुर्ची बागेत नेई. सर्व विद्यार्थी त्यांच्या भोवती अर्ध गोलाकार भारतीय बैठकीवर बसत असू. त्यांच्या वाकरसवंतीला बहार येई. एखाद्या रुषि मुनींच्या आश्रमात बसल्यासारखे आम्हास वाटे तास संपल्याचे कळत नसे.
अशा या अत्यंत संवेदनशील माणसाला एकदा आम्ही विद्यार्थ्याना अनवधानाने दुखावले होते.
त्याचे असे झाले. शास्री नांवाचे एक शिक्षक होते.त्यांचा विषय होता ई. भु.ना. सर जाम बोलके.त्यांचातास म्हणजे विविध विषय विभाग.सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांच्यावर खुष. ते स्वतःउत्तम कवी वलेखक होते. एकदा बोलता बोलता ते म्हणाले.तुम्ही सर्वजण हुशार आहात.चला मी तुम्हाला आव्हान देतो तुम्ही तुमचा एक हस्त लिखित अंक अथवा स्मरणिका काढा.कुणी लेख कुणी कथा .लिहा कुणी कविता लिहा तर कुणीअनुभव शब्दबद्ध करा. सर्वांचेलिहून झाल्यावर मी तपासून देईन. मग ज्यांचे हस्ताक्षर चांगले असेल त्यानी सर्व साहित्य गुळगुळीत कागदावर लिहावे. त्याला आपण बाईंडिंग करून शाळेला अर्पण करू.शाळा तो अंक जतन करील.या कामी कांहिही मदत लागली तर मी आहेच.
सगळे कामाला लागले. मला आठवतं त्या अंकासाठी मी डॉ हेडगेवारांवर कविता लिहिली होती
त्रिवार वंदन तुला केशवा, त्रिवार वंदन तुला
तुझी प्रेरणा घेउन येथे, युवा सर्व जमला
पुढच्याओळी विस्मरणात गेल्या.सर्वांचे लेख लिहून झाले. लेख आम्ही घरी बसूनच सुट्टीच्या काळात... लिहिले. शास्री सरांनी तपासून दिले.
अंक तयार झाला. सर्वानां आवडला. पण VBजोशी सर मात्र कमालीचे नाराज झाले. ते म्हणाले की तुम्ही खूप चांगलं काम केलय हे नक्की. त्याबद्दल मी तुमच अभिनंदन करतो. पण तुम्ही हे काम करीत आहात हे मला कां सांगीतले नांही? मी तुमचा मराठीचा वर्ग शिक्षक नां? मग माझं मार्गदर्शन घ्यावस वाटलं नांही तूम्हाला?
सरांच्या आवाजात कंप होता. वर्ग सारा चिडीचूप शांत. कुणाची हिंमत नव्हंती बोलायची. कारण सरांच म्हणणं बरोबर होत. आमची वय लहान होती सरांविषयी आदरयुक्त भीती होती..त्यामुळे ही चूकझाली. मी सरांची क्षमा मागतो. सर जिथे असतील तिथून क्षमा करतील अशी आशाकरतो.
आनंद कुलकर्णी.
--- विविध प्रतिसाद
- ते (VBजोशी सर) निळा कोट जास्त घालत असत
- मला शास्त्री सर माहिती नाहीत, आम्हाला इतिहास व भूगोल ला आर जी जोशी सर होते ते १९६५ च्या चीन युद्धाचे वर्णन खुप छान करायचे
- आम्हाला पण आर् जी जोशीच होते
- व्ही बी जोशी आमच्या कॉमर्स क्लास वर फार चिडायचे
- R G जोशी सर यांचा claas सुरू असताना पुढच्या बाकावर कोण बसायला तयार नसायचे। कारण ते बोलताना त्यांची थुंकी खूप उडायची।😄🙏 त्यामुळे गमतीने आम्ही त्यांचे नाव ' तुषार कुमार ' असे ठेवले होते... 😄 पण स्वभाव फार छान होता पण
- कुमशी सर प्रेमळ पण उलट्या हाताची थप्पड लै भारी होती।
- G T Kumashi Sir Ring Khelayala Shikawale
- हो ते एक्स्पर्ट होते। क्रिकेट सुद्धा मस्त खेळायचे
- A A Dhundasi Sir Hindi Shikawayache. Aathawata
- शास्त्री सर आमच्या वाड्याच्या मागील गल्लीत गलगलींच्या घरी रहात होते.
वैजयंती पटवर्धन: Mala RG Joshinche etihas bhugol social studies sgikavana kadhich awadla nahi ni parinam mhanaje mala tyat sslc la 42 marks ahet. Pan tya groupmadhe gen.maths n general science ase vishay hote mhanun sslc cha class firstclass zala eravi % changla pan class gela asta
Vb जोशी नबद्दल आदरयुक्त दरारा , पटवर्धन सरांची शिकवण्याची पद्धत, दुंडसी सारंच हिंदी कविता उलगडून सांगणं, कामत सरांचा इंग्लिश प्रोनाऊनसेशन शिकवणं हे सारं आठवतं. अर्ध वर्ष मी गुरू हुळ्यालकरांचा शिकवणीला गेले पण sslc ला पटवर्धन सरांची शिकवणी होती.
साऱ्या सरांनी अभ्यासाची गोडी लावली आम्हाला.
तुमच्या सारखे चागले सर आमच्या नशिबात नव्हते हळूहळू सर्व चांगले सर निघून गेले आमचे मराठी चे अथनि सर खूपछान शिकवायचे आमच्या कडून त्यांनी अलंकार छान करून घेतले होते
---------
आनंद घारे
आम्ही दहावी का अकरावीला असतांना 'धडपड' नावाचे एक हस्तलिखित तयार केले होते. मला आठवते की त्यात व्ही बी जोशीसरांचे नाममात्र मार्गदर्शन घेतले होते. आपला दिलीप पेंडसे याचे अक्षर मोत्यासारखे होते आणि तो खाडाखोड न करता सलगपणे लिहू शकत असे म्हणून ते सगळे पुस्तक त्यानेच लिहून काढले होते. त्याची चित्रकलाही चांगली होती म्हणून सजावटही त्यानेच केली होती. हे सगळे कामही त्यांच्याच घरी बसून केले होते. मी एकादा लेख लिहिला असेल, पण आता तो आठवत नाही.
दिलीप : अरे हे सर्व जरी बरोबर असले तरी धडपड हे नाव मुंगळे यांनी सुचविले.दुसरे मी फक्त लेखनिक होतो.बाकी प्रत्येकाने आपापला लेख लिहिला होता it is always a team that succeeds!
आनंद : श्रीकृष्णाने करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलून धरला तेंव्हा त्याच्या सवंगड्यांनीही आपापल्या काठ्या त्याला टेकवल्या होत्याच. आम्ही इतर मित्र तुझ्या सहकार्यासाठी सोबत होतोच म्हणून तर ते आमच्या लक्षात राहिले आहे. पुढे त्या हस्तलिखिताचे काय झाले? तेंव्हा आतासारखे डिजिटायझेशन असते तर कदाचित तो पुन्हा पहायला मिळाला असता.
---------
आनंद कुलकर्णी
लवकरच आमचा १९६९ चा बॅच पर्यंत मराठी मिडीयम ला वर्ग मिळेनासे झाले. मला आठवतं आहे आमचा चिंचेचा झाडाखाली कठड्यावर वर्ग व्ह्यायचा. कधी वर्गाबाहेर वरांड्यात. अर्थात त्याला आणि एक कारण होतं की आधी कमी मुले नी तीही आर्ट्स सायन्स कॉमर्स मध्ये वर्ग त्यामुळे कदाचित कानडी मुलांनाही हे करावं लागलं असेल. परवा मी निशा पटवर्धन कडे गेले होते तेव्हा तिची ताई उषा पण होती बॅच १९६६. ती म्हणे १०वी नी ११वी एसएससी अशी डबल बॅच होती. आम्ही काही वर्ष १८ ला graduate ni २० la post graduate झालो. वर्ग विखुरले.
. . . . . . . . .
. . . . . . . . . . .
. . .
-----------
मी आनंद कुलकर्णी
मी जमखंडीत असतानां संघकार्यात गुंतलेला असे.तेंव्हाची ही आठवण
संघाचा कुणी मोठा कार्यकर्ता येणार असेल तर आम्ही तीन चार स्वयंसेवक ST Standवर जात असू व पाहुण्यानां घेऊन संघचालक श्री.दादा पेंडसे यांच्या घरी आणून सोडत असू.मग दिवसभर रात्रभरही आमचा मुक्काम पेंडसेंच्या घरीअसायचा.
दिलीपच्या आई आम्हाला इंग्रजी शिकवीत.त्या कुठ व्यग्र असतील तर दादा पेंडसेही शिकवत.सगळे तर्खडकर आम्ही इथेच शिकलो.वहिनींच शिकवणे फार शिस्तबद्ध असायचे.दादांच शिकवणं म्हणजे विविवि अर्थात विविध विषय विभाग.पुस्तक हातात न घेता ते बोलायचे व आम्ही मंत्रमूग्ध होऊन ऐकायचो.वहिनींच शिकवण म्हणजे फक्त अभ्यास.वर्गात आम्ही तीघेच असायचो मी ,राम वझे व मुकुंद फाटक आज ते दोघेही हयात नांहीत या इंग्रजी शिकवणी मुळेच आम्ही sscला पहिल्या attemptला उत्तीर्ण झालो.
वर्गाची फी होती शून्य रुपए.
एकदा निरोप आला कि जगन्नाथराव जोशी जमखंडीस येणारआहेत वत्यांच्या सोबत असतील भाऊराव देशपाडे वज्योती प्रकाश साळुंखे.एकेक माणूस आभाळाच्या उंचीचा.आमचा आनंद गगनात मावेना. त्यांच्या स्वागताला आम्ही चार पांच स्वयंसेवक S T Stand वर पोचलो तेंव्हा घडलेली एक गमतीशीर आठवणसांगायची आहे.
बस आली तीघेही ST तून उतरलेआम्ही त्यांच्या बॅगा घेतल्या.दादा पेंडसेंच्या घरी जाण्यासाठीटांगा ठरवला. जगन्नाथराव टांग्यात मागे चढले. त्यांच्या शेजारी भाऊराव बसताच टांगा मागे कलला.दोन बलदंड माणसे बसल्याने मागचा भाग जवळ जवळ जमिनीला टेकला. घोडा खिंकाळू लागला.टांगेवाला पुढून टांग्याला लोंबकाळू लागला.ज्योतीबा घाईघाईने टांग्याच्या पुढील भागात चढले व आम्हा स्वयंसेवकानांही पुढे चढावयास सांगीतले. तेंव्हा कुठे टांगा थोडा balance झाला आणी मग ही वरात दादांच्या घरापर्यंत आली. टांगा घोड व प्रवासी सर्व सुखरूपणे .
--
मी निशा पटवर्धन
आमची थिएटर गल्ली माझ्या मैत्रिणी ज्योती वाटवे शोभा गाडगीळ अंजु तिकोटेकर रेखा वैद्य मंदा शिंदे आम्ही तिथेच कोणाकडे खेळायचो त्यामुळे शकुंतला शाळेपुढे कधी कधी गेलेच नाही माझे आजोबा पिलु सरकार यांनी जमखंडीचा अबुबकर दर्गा बांधला लहानपणी दर गुरुवारी त्यांच्या सोबत मी दर्ग्यात जात असे रामतीर्थकर ची जत्रा तर असायचीच पण आम्ही कडपट्टीच्या बैलांच्या जत्रेसही जात असु तेथे मातीची खेळणी खुप छान मिळायची जमखंडीला मोहरमची सोंगे पण छान असत हलगीच्या तालावर वाघ नाचायचे मजायायची अशी सोंग मी कुठल्याच गावात पाहिली नाहीत खूप आठवणी आहेत ते बालपण परत अनुभवासे वाटते
: तुमचे आजोबा घराबाहेरील कट्ट्यावर बसलेले मी नेहमी पहायचो.घराचं प्रवेशद्वार वसगळा घडीव दगडांचा front portion कमालीचा आकर्षक आहे .घर आतून पहावे असे फार वाटायचे पण जमले नांही.
आनंद कुलकर्णी
आम्ही घरी गेलो की काकू( फार प्रेमळ) मंगला काकू, लीलाताई। ( आमच्या आईची बालमैत्रीण) सगळे खूप प्रेमळ होते। आज आठवणी ताज्या झाल्या। मागच्या बाजूला प्रेमळ इंदूताई वाटवे काकू( माझ्या मामीची सख्खी बहीण) । खूप मजा होती लहानपणी। कशाला मोठे झालो असे वाटते। ...... Shirish
खूप छान घर होते घरची १५ माणसे आणि सतत पाहुणे आई आणि काकु कसे सांभाळत असतील हे लहानपणी कधी कळलेच नाही. मीपण आईबरोबर कधी निरोप सांगायला खूप वेळा तुमच्याकडे यायची ...... Archana Gore
वैजयंती पटवर्धन: खरंय. मलाही तो वाडा आवडायचा पण आमचा बरोबरच कोणी नसल्याने जायची वेळ नाही आली. त्यावर वाड्यावर बाल्कनी म्हणता येईल अशी गच्ची होती ना?
मी पण लहानपणी अबू बकर ल गेल्याच आठवत आहे. तिथला तो दाढीवाला मोरपिसांचा गुच्छां धरणारा मानूस नी रंगीत नक्षीदार खिडक्या आठवतात.
Usha Paranjape : निशानी आठवणी लिहिले ने माझ्या आठवणी,आशा निशाची बहीण व माझी मैत्री ण, मी रोजच आशा कडे जायचे ,खूप गप्पा सर्व आठवणी जाग्या झाल्या आम्ही मै गुर गल्लीत रहायचो ,घारे च घरात
-----
G G Ponkshe
जमखंडीचा ओकळी खांब हा एक वेगळाच उत्सव हाेता। त्याची तयारी ८-१० दिवस आधीच सुरु व्हायची। खांब उभा करणे, त्यावर एक अंबारी, व त्या खांबाला चिंचेचा कोळ लावायचे। ही तयारी पाहाण्यातही एक मजा हाेती। ओकळीत हाल ओकळी व नीर ओकळी असे दाेन प्रकार, त्या दिवशी त्या खांबावर चढणे हाच ओकळीचा खेळ। वर चढणार्या लाेकावर वरच्या अंबारीत बसलेले लोक पाणी वगैरे सोडत असत। वर जाणारे खांबाला पटगा बांधून त्यात पाय ठेवून वर जात। कांही जण अर्ध्यातून खाली येत। असे करता करता एक जण जोर लावून वर पोहोचायचा व ओकळी संपायची। कुठल्या गांवचा पठ्ठा जिंकला याची पण चर्चा असायची। असा हा खेळ आठवला की अजूनही ताे पाहतानाचा रोमांच जाणवतो।
----
आनंद कुलकर्णी
मी पोहायला शिकलो जमखंडीत . ठिकाण भूताळ्यप्पन त्वाट इथे दामूअण्णापोटे यांची शेती होती . पोहू इच्छिणार्याना तिथे मुक्त द्बार होते. रोजचं तिकीट वगैरे काढायची भानगड नव्हती.Dress code नव्हता.चड्डी लुंगी धोतर कांहीही अंगावर असेल तरी चालायचे. कांलहान मुले तर पूर्ण नग्न होऊन एक हात पुढे व एक हात मागे घेऊनआपली अब्रू झाकत बेधडक पाण्यातउडी मारीत
मी सुरवातीस कांही दिवस डबा बांधून पौहलोहळू हळू पाण्याची भीती कमी झाली. हा उपक्रमनाताळ व मे महिन्याच्या सुट्टीत चाले.माझे वडील DefenceAcctsमधे नोकरीस ते अधूनमधून जमखंडीसयेत'असत. एका सुट्टीत ते जमखिंडीत असताना मी त्याना मी पोहायला शिकल्याचे सांगीतलै. तर ते म्हणाले अरे वाह मस्त चला आज मी येतो बघायला. अरे बापरे आली का पंचाईत? मी आपला डबा लाऊन कसा बसा तरंगत होतो. व्हा पुढे मी येतो विहिरीवर भूताळ्यप्पाच्या मळ्यात. आम्ही विहिरीवर पोचलौ.कपडे काढतो न काढतो एवढ्यात वडील हजर! मला डबा बांधतानापाहून कडाडले ,,काढ तो डबा उतर पाण्यात.
माझ्या पोटात गोळा. मी कुढकुडत पायरीवर उभा. बारकी बारकी पोर मस्त उड्या मारत पोहतत होती व माझ्याकडे पाहून हंसत होती. वडिलानी धोतर वर खोचले ते खाली आले दोनचार टग्या पोरानां आवाज दिला पोरानी पाय धरले वडिलानी हात पखडले.दोन झोके दिले व गणपती बाप्पा मोरया या घोषणेने मला पाण्यात भिरकावले. नाकातोंडात पाणी मी भेदरलेलो. पुन्हा दोनतीनदा हाच प्रयोग.पोरांची काय फुकट करमणूक. वडिलांनी माझी समजूत काढली.व म्हणाले तुला कमरेला दोरी बांधतो तुला कुणीही धरणार नांही तुझी तू उडीमार. मी रडत भेकत तयार झालो पर्याय नव्हता.जय बजरंग बली म्हणत नाकधरुन उडी मारली.कसाबसा पोहत बाहेर हा प्रकार परत दोन चार वेळा झाला. शैवटच्या खेपेला वडील म्हणाले बघ आल किनई तुला पोहायला?
मी म्हणालो ते काय तुम्ही दोरी धरली म्हणून!
वडील म्हणाले अरे वैड्या मी दोरी केंव्हाछ पाण्यात टाकलीय. मीवळून पाहिले दोरी पाण्यावरतरंत होती.
पुढची प्रॅक्टीस स्टँड जवळील कल्ल्याणशशेट्टींची विहीर व अक्कतंगीच्या विहिरीत केली. तळ्यात पोहायचे मात्र राहून गेले.
G.G.Ponkshe : We also learned swimming there only. Our coach was our binder Aba Ghorpade.
-----
आठवणी जमखंडीच्या : आनंद कुलकर्णी
जमखंडीच्या बहुतेक विहिरीत पोहून झालं.
माझे मित्र श्री.नारायण आपटे यांची जमखंडी जवळील कुल्हळ्ळी या गांवी शेती आहेखूप वेळा मी त्यांच्या शेतावर गेलोय.शेतात दोनविहिरी आहेत दोन्ही विहिरीत मी मनसोक्त पोहलोय.
एकदा आम्ही चार सहा मित्र सायकली घेऊन नारायण आपटेंच्या शेतावर गेलो.पहाटे जमखंडीहून लवकर निघालो.आठ नउला पोचलो.चहापाणी झाल्यावर पोहायची हुक्की आली.नारायण म्हणालाआपण या खेपेस पोहायला नदीवर जाऊ.सर्वजण तयार झाले.नदी शेतापासूनदोन अडीच कि.मि. अंतरावर होती.आम्ही रमत गमत पोचलो.नदीला कमरे येवढे पाणी होतेसारेजण पाण्यातमस्त डुंबले
पोहणे सर्वानां येत होतेम म्हणून काळजी नव्हती.अघोळी म्हणजे पाण्यातीत मस्ती झाल्यावरनारायण म्हणाला वर्वानी आपापल्या पिशव्या डोक्यावर घ्या आपणनदीच्या पैलतीरी जाऊन नाष्टा करू..आम्ही सोबत कांही घेतले नव्हते पैलतिरावर हाॅटेल टपरी कांही दिसत नव्हते.नारायणवर भरोसा ठेऊन आम्ही पैलतीरी आलो
तिथे पेरूची मोठी बाग होती.त्याचा मालक आमची चाहूल लागल्याने आला, तो नारायणला म्हणाला, नमस्कार री दादागोळ. यान पावण्यार बंदार? आवरिगे नम्मत्वामटा तोरसरी, प्यारल हण्ण तिनसरी. नारायण बरोबर थोडै बोलून तो निघून गेला.
नारायण म्हणाला, हे पहा ही जातिवंत पेरूची बाग आहे. कुठल्याही झाडावर चढा.हवे तेवढे पेरू काढा.अट एकच.जेवढे पेरू काढाल तेवढे तुम्ही इथेच खायचे .खिशात पिशवीत हातातूनन्यायचे नांहीत. अट पाळून आम्ही उदंड पेरू खाल्ले.असा नाष्टा आयुष्यात परत कधी झाला नांही.नारायणच्या घरी आलो.चुलीवरचं पिठल भाकरीवर ताव मारला वआडवे पडलो.रात्रीघरा ंबाहेर पुनः भट्टी पेटली.त्या भट्टीत टोपल्या भर भरुन नारायणने भुईमुगाच्या शेंगा नतर कणसाच्या टौपल्या आणून ओतल्या. गाणी गप्पाटप्पा दंगामस्ती करत खाणे संपवले. सकाळी उठून चहा घेतला.आणीआमचा परतीचाप्रवास सुरू झालाडोक्यात एकच विचार.असं अगत्यपूर्वक आगत स्वागत खरोखरच दुर्मीळ.
पन्नासाहूनजास्त वर्षै झाली या सहलीलापण मी तिला विसरू शकलो नांही नां
आनंद कुलकर्णी
आनंद कुलकर्णी : आठवणी जमखंडीच्या
कल्हळ्ळीला मी ही अनेकदा गेलोय.रामतीर्थला वेढा घालून चालत तर कधी सायकलवर मदरखंडी वरून जात असू. ग्रुपमिळेल तसे जात असू.सायकलिंग खूप झाल,.संघाच शिबीर विजापुरला होत.तिथे दौन दिवसाचा मुक्काम होता आम्ही चार पाच स्वयंसेवक मिळून गेलो होतो .तेंव्हा खूप मजा आली खरी.पण आठवलं तर वाटतं आपण दुःसाहस केल की काय!
मुधोळला संघाची शाखा चालायची. तिथै श्री.मुरनाळ या नांवाचे प्रचारक अथवा विस्तारक होते.संघकार्य पसंत नसलेल्या कांही समाजकंटकानी त्यांची मध्यरात्री निघृण हत्या केली.तिथली शाखाही बंद पडल्याचे वृत्त आले.आम्ही चारपांच जण सायकली घेउन मुधोळला गेलो खून झालेली जागा पाहिली.स्वयंसेवकानां धीर दिला.न भीता शाखा भरवत चला येवढे.सांगून परतलो
अशा प्रकारे जमखंडीच्या चारही दिशाना सायकलवर भटकंती झाली.
. . . . . . . . . . . .
जमखंडीच्या आठवणी मी उज्वला पटवर्धन नागनूर.
आमचा वाडा मारुती देवळाजवळ होता. शेजारी भाजी मंडई त्या समोर फळांची दुकाने वाड्याच्या मागे आमची पिठाची गिरणी जोशी गुरुजी रहात असत. मारुतीच्या देवळासमोर आमची शाळा शकुंतला गर्ल्स स्कूल देवळा पलिकडे भडगुंजा होता. तेथील हुरकाडली इतकी छान असायची.अशी नंतर कुठेही मिळाली नाही. देवळा मागे पुस्तक वह्यांचे दुकान आणि तेथेच शेजारी विमल ओसवाल त्यांचे सर्व नातेवाईक अगदी छोट्या घरात रहात असत. आता तो विमल जमखंडीचा मोठा शेठ आहे. चौकात डाॅ.दोडमनी चार दातांचा दवाखाना होता. टेंभुरजींचे दुकान होते. तेथे रावळगाव चाॅकलेट मिळत असतं. मी तेथे जात असे. आमचा वाड्याच्या बाहेर दोन मोठे सोपे होते. तेथे सतत माणसे गप्पा मारत बसत. पण नंतर तेथे उजवीकडे संगपपा मुरगुडचे दुकान झाले व डावीकडे डाॅ. सत्तीकर कुलकर्णी चार दवाखाना झाला. असा आमच्या वाडया भोवताली परिसर होता. आता तो वाडा दिसत नाही. विमल ओसवाल आमचा वाडा घेतला. खरे काकू बरीच वर्षे तेथे रहात होत्या. अशा माझ्या वाडया संदर्भात आठवणी आहेत.
------------
अनिल पोंक्षे : वॉट्सॅपग्रुपचे सूत्रधार
Ponkshe Anil: आमची पागा शाळाच होती. फेरीस स्कुल आम्हाला माहित नाही. हुल्याळकर मास्तरांचे चिमटे अजुनी आठवतात, ते मांडीवर, दंडावर व छातीवर पिरगळून चिमटा काढायचे. हे टाळण्यासाठी त्यांनी दिलेला अभ्यास लगेच पूर्ण करन असू. बहूतेक मास्तरांच्या हातात छडी असे पण काही मास्तर त्याचा धाक दाखविण्यासाठी छान उपयोग करीत. मार कमी बसण्यासाठी आम्ही त्यांच्या घरी शिकवणीलाही जात असू. त्यांचा मुलगा नारायण उर्फ नान्या आमच्या वर्गात होता.
Ponkshe Anil: आज अजुन एक आठवण.
आमच्या घरा शेजारी बर्वे मास्तरांचे घर होते. बर्वे मास्तर हे सहा फुट उंची, सडपातळ, पहाडी आवाज व करारी होते. सुधाकर हा त्यांचा मुलगा. रोज त्यांच्या घरी दुपारी जेवण झाल्यावर वझे आजोबा येत. मग त्यांचे जोरजोरात केसरी पेपर वाचन व त्यावर राजकीय चर्चा चाले, ते बोलताहेत की भांडताहेत हे समजत नव्हते. मात्र दुसरे दिवशी पुन्हा त्याच उत्साहाने एकत्र येत येवढे मात्र खरे.
व्ही बी. जोशी मास्तरांनी त्यांच्या मुलाला प्रतापला (आपल्या गृपवर आहे) बर्वे मास्तरांकडे इंग्रजी / गणित शिकवायला पाठवले होते. प्रताप आमच्या बरोबर बोळात क्रिकेट व गोट्या खेळायचा.
----
मी आनंद घारे.
जमखंडीला थेटररोडवरील मैगूर बोळात टोकाला आमचे घर होते. बोळातील इतर सर्व घरे मैगूरांची होती. आमच्या समोर तिप्पण्णा आणि भंगारव्वा यांचे मोठे कुटुंब रहात होते. त्याच्या घरात शिरताच मोठा गोठा होता आणि त्यात गायी, म्हशी, बैल वगैरे बांधलेले असत. पण आम्ही त्यांच्याकडून दूध घेत नव्हतो. ते कडपट्टीहून येत असे. बोळाच्या टोकाला शिवप्पाची पिठाची गिरणी होती ती इंजिनावर चालत होती. तिच्या धुराड्यावर ठेवलेल्या डब्यातून पकपकपकपक असा आवाज यायला लागला की गिरणी चालू झाली असे म्हणत सगळे दळण घेऊन येत असत.
त्या बोळात फक्त आमच्या घरीच वीज, पाण्याचा नळ आणि संडास होता. बाकीचे सगळे लोक कंदिलाच्या उजेडात रहात असत, अप्पासाहेबांच्या विहिरीवरून पाणी आणत असत आणि तांब्या घेऊन डोंगरात जात. लहान मुले बोळाच्या टोकाला बसत आणि तिथे वावरणारी डुकरे घाणीची सफाई करत. बोळातल्या कुणाच्याच घरी आमचे जाणेयेणे नव्हते. आमच्या वाड्यातच दोन बिऱ्हाडकरू असायचे. ते मात्र घरच्यासारखे असायचे. त्यातले चिंचणीकर आणि आपटे कुटुंबीय या ग्रुपवर आहेत.
आमच्या बोळाच्या समोर पिलू सरकारांचे आलीशान घर होते. एका बाजूला अशोकस्तंभ आणि दुसऱ्या बाजूला सुवर्णचित्रमंदिर हे थेटर असलेला थेटर रोड चांगला प्रशस्त पण लांबीने अगदी लहानसा रस्ता होता. रोज संध्याकाळी सिनेमाचा खेळ सुरू व्हायच्या दहापंधरा मिनिटे आधी तिथे लाऊडस्पीकरवरून त्या काळातली लोकप्रिय गाणी लावत असत ती आम्हाला घरबसल्या ऐकायला येत असत. आमच्या घरी रेडिओ नव्हता आणि घरात सिनेमाची गाणी गुणगुणायलापण मनाई होती, तरी मला ती सगळी गाणी पाठ झाली होती आणि त्यातली काही अजूनपर्यंत लक्षात आहेत. या १९५०च्या दशकातल्या आठवणी आहेत.
----
राजू शामराव वाटवे
जमखंडीतील माझी बालपणातील गल्ली आणि काही आठवणी
मी राजू शामराव वाटवे, थियेटर गल्ली
बारावी पर्यंत १९५९ ते १९७६ जमखंडीला वास्तव्य
थियेटर समोर आमचे रेडिओचे दुकान होते 'कर्नाटक रेडिओ डीलर्स' आणि दुकानाला लागूनच बोळात घर होते.
गल्लीतील इतर कुटुंबे
बोळात पहिले घर पिलाजी सरकार पटवर्धन (उषा आणि निशाचे आजोबा), पडसलगीचे वकील एच बी कुलकर्णी, सुरेखा पटवर्धन यांचे घर
समोर गजानन आणि अरुण सुतार, करमुसे टेलर, शिरहट्टी सर, तिकोटेकर, गोटखिंडी इत्यादि
गुरुदेव रानडे यांचे ध्यान मंदिर शेजारच्या बोळात जिथे प्रवचनासाठी काका कारखानिस, भाऊराव आपटे, पेंडसे वकील, सी व्ही आपटे यायचे.
श्री हरकंगी यांचा विजय फोटो स्टुडिओ ज्यांच्याशी निगडित आपल्या सर्वांच्याच असंख्य आठवणी असतील. कारण फोटो काढणे हा एक सोहळाच असायचा.
मुख्य म्हणजे आपल्या बालपणी सिनेमा हे एकच मनोरंजनाचे साधन होते. जमखंडीतील एकमेव सिनेमा थिएटर आमच्या घरासमोर म्हणजे पर्वणीच. गणेश विलास, अंबा भुवन, पांडुरंग हॉटेल, कोल्ड्रिंक्स आणि पानाची दुकाने, त्यात सायन्स बाबूचे नंतर हमीदचे दुकान प्रसिद्ध.
कांही आनंददायी आठवणी.
१ त्यावेळी जमखंडीला सार्वजनिक गणेशोत्सव पाच दिवसांचा असे आणि सर्व मोठ्या गणेश मूर्ती गजानन आणि अरुण सुतार बनवत असल्याने आमच्या गॅलरीत उभे राहून मूर्ती वाजत गाजत घेऊन जाण्याचा सोहळा पाहणे
२ लग्नाच्या वराती मोठ्या प्रमाणावर निघत आणि थियेटर चौकात हमखास थांबून दोन तिन गाणी बॅन्ड वर वाजविणे आणि वधू वरास एकच कोल्ड्रिंग दोन स्ट्रॉ मधून आग्रहाने पाजणे
३ दिवाळीच्या दिवसात उडणारा आकाश कंदील बनवून आकाशात सोडणे
४ १९९१ ची लोकसभेची निवडणूक. आपल्या बागलकोट मतदारसंघात रामकृष्ण हेगडेंच्या विरुद्ध सिध्दु न्यामगौडा उभा होता. त्यावेळी प्रचाराचा भाग म्हणून थियेटर समोर एक मोठ्ठा कटआऊट लावला होता आणि सिध्दुच्या विजयात या पोस्टरचा खूप मोठा वाटा होता. ते पोस्टर असे होते
नुकतेच सिध्दुच्या पुढाकाराने पडसलगीचा कृष्णा नदीवरचा बंधारा पूर्ण झाला होता. त्या बंधाऱ्यावर सिध्दु विवेकानंद स्टाईलने उभा आहे उंची साधारण ४-५ फूट आणि त्याच्या पायाला दोरखंड बांधून रामकृष्ण हेगडे ओढत आहेत उंची ३५-४० फूट. कल्पना करा एका पोस्टर काय संदेश देतो आणि परिणाम घडवतो.
मित्रांनो आज इतकेच. १९७३ डीसेंबर मध्ये झालेल्या सीमाभागाच्या दंगली बद्दल (जी आम्ही प्रत्यक्ष अनुभवली आहे) पुढच्या भागात....
----
राजू वाटवे यांच्या बालपणीच्या आणखी काही आठवणी...
• एप्रिल १९६४ - शाळेचे गुरुजी घरोघरी जाऊन मुलांना शाळेत पाठवण्या संबंधी पालकांना सांगायचे आणि प्रत्येक घरावर कन्नडमध्ये ग आ (गणती आयतु) असं लिहायचे. श्री गोविंद हुल्याळकर गुरुजी आमच्या घरी आले आणि त्यांनी माझी चौकशी केली. शाळेत जाण्यासाठी नियम म्हणजे एक जूनला पाच वर्षे पूर्ण असली पाहिजेत असा होता. वडील म्हणाले अहो गुरुजी त्याला ३१ जुलैला पाच पूर्ण होतात. तर गुरुजी म्हणाले काळजी करू नकोस, त्याची जन्म तारीख मी २० मे दाखवतो. अशा रीतीने मी एक वर्ष आधीच शाळेत दाखल झालो.
गोविंद मास्तर - शामा हुडुगनीगे नन्न कडे शिकवणीगे कळसू.
माझे वडील - तुम्ही शाळेत शिकविता तेवढे पुरे. तुम्ही मराठी व्याकरण कसे काय शिकविणार.
मास्तर - अदू चिंते नी माडब्याडा व्याकरणी अंदरे शिकरणी माड बिडतीन नोड
मी काही शिकवणीला गेलो नाही
• तारीख २७ मे १९६४ दुपारी बातमी आली की आपले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले. सारा देश उस्फुर्तपणे बंद झाला. जमखंडीतील सर्व दुकाने आणि बाजारपेठ बंद झाली. वडील राष्ट्र सेवा दल, काँग्रेस आणि गांधी नेहरुंना मानणारे असल्याने त्यांना खूप दुःख झाले आणि घरातली व्यक्तीच जणू गेली असं समजून ते घरात येऊन बसले. त्यावेळी प्रसाराचे रेडिओ हे एकच माध्यम होते आणि जमखंडीत अजूनी घरोघरी रेडिओ पोचला नव्हता. आमच्या घरासमोर आणि दुकानासमोर खूप मोठा जमाव जमला आणि विनंती करु लागला की आम्हाला रेडिओ ऐकवा. आम्ही सभा समारंभाला लाऊड स्पीकर पण भाड्याने द्यायचो. मग रेडिओला माईक जोडला, दुकानाच्या वर गॅलरीत कर्णा बांधला आणि जमखंडीकर रात्री पर्यंत ऐकत होते...
मला एक जमखंडीची आठवण सांगायची आहे. मी व राजू वाटवे अशी एकूण पाच भावंडे शामराव वाटवेंची मूले व आमच्याकडे आमचा चूलत भाऊ पण रहायला होता. आम्ही दिवाळीच्या सुट्टीत आमचे कुटुंब, सुरेखा पटवर्धन व तिची आई, भावंडे, शिंदे व पोग्या(गोपाळ राव)पटवर्धन अशी 4 कुटुंबे मिळून दिवाळीच्या सुट्टी सोंगट्या पगडी खेळत होतो. रात्री 9ते12 वाजायचे.आमच्या घरी माडीवर खेळत होतो. दोन टीम असायच्या. एकीकडे महिला व दुसरीकडे पुरुष. महिलांची कँप्टन आमची आई व पुरुषांचै आमचे दादा असायचे. प्रत्येक दिवशी एका कुटुंबाने चुरमुरे चिवडा व काँफीचे सहित्य आणायचे. एक डाव संपल्यावर चिवडा काँफी व्हायची.नंतर दुसरा डाव व्हायचा. खूप मजा यायची. असे प्रत्येक दिवाळी सुट्टीत 4,5वेळा खेळत असू.आज हा खेळ बघायला पण मिळत नाही
मी आनंद घारे
आमचे घर राजूच्या घरापासून अगदी जवळ होते, पण मी तिथे वेगळ्या कालखंडात (१९४५ ते १९६१) रहात होतो. त्यामुळे आमची कधी गाठ पडली नाही. थिएटरसमोरच्या रस्त्यावर पिलू सरकारांच्या घराला लागूनच आमचे सदूकाका घारे यांचा दुमजली वाडा होता. त्यात तळमजल्यावर रांगेने निरनिराळी दुकाने होती ती भाड्याने दिली असणार. सदूकाका जरा कोपिष्ट होते म्हणून मी कधी त्याच्या जास्त जवळ गेलो नाही, पण काकू खूप प्रेमळ होत्या. ते कुटुंब माडीवर रहात होते. त्यांच्या घरी मी नेहमी जात होतो. त्यांची मुले आम्हा भावंडांच्याच वयाची होती. त्यातला धाकटा मुलगा नाना इंजिनियर झाला होता, तो डोंबिवलीला रहात होता आणि तिथे त्यांनी जमखंडीवासियांचा ग्रुप बनवला होता. सर्वात लहान मुलगी सिंधू माझ्यापेक्षा थोडीच लहान होती. त्यामुळे त्यांनीसुद्धा १९६५ च्या सुमाराला जमखंडी सोडले असण्याची शक्यता आहे.
-----
आनंद घारे
वॉट्सअॅपवर सिंधू घारे आणि व्यंकटेश घारे यांचे उल्लेख आले त्यावरून. त्यांचे वडील म्हणजे आमचे सदूकाका हे माझ्या वडिलांचे चुलत चुलत भाऊ होते. त्या दोघांचेही इगो जरा मोठे असल्यामुळे मी तरी त्यांना कधी एकत्र बसून गप्पा मारतांना पाहिले नाही. पण आमच्या घारेकाकू मात्र अतीशय प्रेमळ होत्या आणि त्या मला सख्ख्या काकूंसारख्याच जवळच्या वाटायच्या. लहान असतांना मी त्यांच्या घरी असंख्य वेळा गेलो आहे. व्यंकटेशला घरी नाना म्हणत असत. तो माझ्याहून थोडा मोठा आणि सिंधू थोडी लहान होती. आम्ही भावंडे आपुलकीने वागत असू. सिंधू लग्न होऊन सासरी गेल्यानंतर मला भेटली नाही. नाना इंजिनियर होऊन कळव्याला नोकरीला लागला आणि तो डोंबिवलीला रहात होता. त्याचा मोठा भाऊ राजा कल्याणला रहात असे. आमची जास्त वेळा भेट झाली नाही, पण आम्ही एकमेकांची खबरबात ठेवत होतो.
मी रिटायर व्हायच्या सुमाराला म्हणजे सुमारे पंधरा वर्षांपूर्वी माझ्या एका मित्राच्या मुलाच्या लग्नासाठी ठाण्याला गेलो होतो. तिथे मी माझ्या मित्रांबरोबर बोलत बसलेलो असतांना हॉलमध्येच बसलेल्या एका कोंडाळ्याच्या हसण्याखिदळण्याचे आवाज माझ्या कानावर पडत होते. ते मराठी आणि कानडीचे मिश्रण ऐकून मला कुतूहल वाटले आणि मी जवळ जाऊन पाहिले तर त्यात नाना घारे होता. त्याचा मित्र रंगा बापट याच्या मुलीच्या लग्नासाठी ती जमखंडी ग्रुपमधली आठदहा मंडळी आली होती. त्यात एक पटवर्धन होता, एक परदेशी की असाच कोणी होता. ही सगळी १९६३च्या बॅचची मुले होती. त्यानंतर सातआठ वर्षांपूर्वी मी दुसऱ्या एका लग्नासाठी डोंबिवलीला गेलो असतांना त्या हॉलच्या जवळच असलेल्या नाना घारेच्या घरी जाऊन त्याला भेटलो होतो. नुकतेच मला कुणी अमेरिकारिटर्नड मित्राने सांगितले की त्याला नाना घारे अमेरिकेत भेटला होता. त्या वेळी तोही आपल्या मुलाकडे गेला असावा.
--
वॉट्सअॅपवर गोपाळराव खरे यांचाही उल्लेख आला आहे. हे खरे कुटुंबसुद्धा मूळचे जमखंडीचेच होते. पागा शाळेला लागून असलेल्या गल्लीत औटएजन्सी का अशाच काही नावाचे एक ऑफिस होते. तिथेच खरे यांचा वाडा होता. फाटकातून आत गेल्यावर मोठे अंगण होते आणि त्यात अनेक फुलझाडे होती. ते माझ्या काकूंचे माहेर असल्यामुळे मी त्यांच्याबरोबर तिथे अनेक वेळा गेलो आहे. आमच्या काकूंच्या भावंडांमधला सर्वात मोठा भाऊ आरे मिल्क कॉलनीत अधिकारी होता. त्यांच्यानंतरचे दोन तीन भाऊ अकोल्याला स्थायिक झाले होते आणि गोपाळराव औरंगाबादला होते. त्यांच्या पुढच्या पिढीतल्या कुणाला जमखंडीचे प्रेम वाटत असेल असे मला वाटत नाही.
०२-०४-२०२१
----
---------------------------------
मी पूर्वाश्रमीची शैला आपटे आम्ही सख्खी तीन भावंडे आणि चुलत चार जण पण आम्ही सगळे एकत्र सगळीजणे मिळुन मजा करत होतो आमचे घर पागा गल्लीत अगदी शाळेला लागुन होते रस्ताच्या बाजूला दोन वेगळी दारे होती पण आत मधे सलग मोठा वाडा होता आमचे बालपण मजेत गेले बालपणी च्या आठवणी मनाच्या कुपीत बंदिस्त होत्या सगळ्यांच्या आठवणी वाचुन त्या कुपीचे झाकण उघडले आणि सुगंध दरवळला आठवणी आठवल्या की देवाकडे पुन: पुन:म्हणावसे वाटते "लहानपण देगा देवा खरच अगदी या क्षणाला लहान व्हावसे वाटते परत तो आनंद लुटावा आपण शाळेत केलेल्या गमती जमती आठवायला पण लागल्या आणि त्यात इतकी रमून गेले किती आठवणी लिहु असे झाले
शैला आपटे लग्नानंतर शैला बापट होऊन 72साली बेंगलोर ला आले त्याकाळी बेंगलोर म्हणजे खूप लांब वाटायचे त्यावेळी सगळ्यांना आश्र्चर्य वाटले आणि सगळे मला म्हणाले पक्की कर्नाटकी झालीस की जमखंडी पण खर कर्नाटकात आहे पण आपले पटवर्धन संस्थान असल्याने महाराष्ट्र च्या जास्ती जवळ होतो त्यावेळेस सगळ्यांना आश्चर्य वाटले होते
-----
Madhvi Bodas
मी पुष्पा आपटे (माधवी बोडस ) मी पागा गल्लीत आपटे वाड्यात रहायची मला अजून jkd चा मोहरम आठवतो इतका सुंदर मोहरम मी आज पर्यंत पाहिला नाही वाघाची सोंग अप्रतिम असयची अंग सगळे वाघसारखे रेखाटलेलं असायचे कान वाली टोपी घुंग्राची शेपूट लाकडी पाय वाले घोडे ते नाचायला लागले कि आम्ही घरातून पळत जाओन बघत असू व रात्री ताबूत ची मिरवणूक पण ताबूत चे विसर्जनाहून येताना बायका रडत येत असत मी आईला विचारायची असे का? तर आई म्हणायची त्यांचे हसेन, हुसेन लढाईत मारले गेले म्हणून असा हा jkd चा मोहरम
Madhvi Bodas
आणखीन एक jkd ची छान आठवण म्हणजे (बेंदूर )हे नाव असावे असे वाटते म्हणजे बैल पोळा तो jkd त जेष्ठ मध्ये असतो बहुतेक आजपर्यंत असा पोळा पाहिला नाही कारण त्या दिवशी प्रत्येक शेतकरी आपल्या बैलाला खूप सुंदर सजवत असत सुंदर झुली घालत असत व वाजतगाजत मिरवणूक काढत असत आपल्या कडचे खिल्लारी बैल खूप छान असत आजपर्यंत मी इतके रुबाबदार बैल पाहिलेनाहीत ह्या आठवणी लिहायला तुमचे कौतुकास्पद पाठबल असल्या्यामुळे हे शक्क होते धन्यवाद
श्रीरंग घारे : हा मोहरम तर आपल्या जमखंडीचि खासियत. मी मध्य प्रदेश आसाम बंगाल व मुस्लीम बहूल ठिकाणी राहिलो पण असा मोहरम नाही अनुभवला तुमच्या लिखाणाने तो साक्षात. पुन,: अनुभव ला. 👌👌👌👍
आनंद घारे
मोहरमच्या वाघाच्या अंगभर पिवळे आणि काळे पट्टे रंगवलेले असत आणि त्याच्याबरोबर निदान आणखी दोघे असत. एकजण समोर उभा राहून हलगीवर झडाड्डिनकनक असे बोल काढून एक पॉज घेत असे त्यावेळी वाघाच्या मागे असलेला मुलगा शेपटीला बांधलेल्या घुंगरांमधून खुळ्ळम खुळ्ळम असा आवाज काढत असे. तो वाघ या संगीताच्या ठेक्यावर हातवारे करून नाचत असे. दोन वाघ समोरासमोर आले की हलगी वाजवणाऱ्यांमध्ये जोरजोरात वाजवायची चढाओढ लागत असे. बागवानांचे वाघ जास्त आकर्षक आणि तडफदार असायचे. सगळ्या वाघांचे कोणीतरी प्रायोजक त्यांना पैसे देत असतील, आम्हा मुलांना ती फुकट करमणूक असायची. असा मोहरम मीसुद्धा फक्त जमखंडीलाच पाहिला, पुढे मुंबईपुण्यात कुठे मला तरी तो पहायला मिळाला नाही.
Archana Gore : हे वाघ पैसे मागायला आमच्या घरी पण येत
Shrirang Ghare: जमखंडी तील मोहरममधे वाघ नाचत पण आणखी एक पात्र केशी म्हणून येत असे त्या मुलाच्या गळ्यास एक बांबू बाधलेला असे व दुसरा मुलगा कडक लक्ष्मीचा चाबूक हवेत फडकावत मोठ्या ने ओरडत त्या मुलाला पळवत नेत असे आमचे लहान पणी केशी हे पात्र होत नंतर होत का हे जाणून घ्यायच आहे
शेखर आपटे: बडा राक्षस म्हणायचे त्याला
उज्वला : केशरी हे पात्र होत. आमच्या घरासमोर खूप वेळ असायचा. पण मी त्याला घाबरत असे. मी वाड्याचे अर्धे दार लावून बसले. माझे भाऊ बघत असत. साल 1962
--------
--------------
माधवी बोडस : मी अनुभवलेली भयानक होळी (jkd)ची
--
आनंद कुलकर्णी : होय ही गोष्ट खरी आहे .आमच्याही संडासाची दारे एक दोनदा तोडून नेल्याचे मला स्मरते. यात आपले आर्थिक नुकसान वमनस्ताप दोन्ही होते. पण या समाज कंटकानां आपण विसरून जाऊ.
जी जी पोंक्षे
होळीवरून जमखंडीतील होळीची आठवण झाली. प्रत्येक गल्लीत होळी पेटविली जायची. कुणाची मोठी, अशी स्पर्धा असायची. आमच्या गल्लीतील होळीमध्ये आमचा सक्रिय सहभाग असायचा. लाकडं आणि गोवर्या कुठे ठेवायच्या हे ठरले की ते जमवणे सुरु व्हायचे. त्यासाठी तळ्यावर गोवर्या चोरायला जाणे, घरोघरी जाऊन मागणे, दुकानदाराकडून वर्गणी हे सगळे असायचे. होळीच्या दिवशी दुपारपासून तयारी सुरु व्हायची. होळी पेटवायला जेव्हढा उशीर करता येईल तेव्हढे बरे. होळी पेटली की ती पूर्ण पेटावी म्हणून प्रयत्न. नंतर हलगी व बोंबांचा गलका. त्यानंतर भेळ खाऊन सर्वजण हलग्या घेऊन सर्व गल्यातील होळ्या बघायला जायचो. परत यायला १.३०-२.०० वाजायचे.अशी ही होळी अजून एकदा अनुभवावी असे वाटते.
अनिल पोंक्षे
चंदू व पुष्पा यांनी होळीचे वर्णन सुंदर केले आहे. आनंद व दुःखद दोन्ही आठवणी जाग्या झाल्या. दुसरे दिवशी कोणाकोणाचे दरवाजे होळीत गेले याची चर्चा व्हायची
आनंद घारे
मी लहान असतांना आम्हाला होळीमध्ये सामील होऊ दिले जात नसे कारण तिथे बोंबलणे आणि गलिच्छ भाषेतली शिवीगाळ होत असे. आम्ही तर 'आयला' किंवा 'लेकाचा' असले सौम्य शब्दसुद्धा कधी वापरत नव्हतो. त्यामुळे "xxxच्या xxत बंदुकीची गोळी" कसे म्हणणार? आमच्या मैगूर बोळातले लोक सुशिक्षित नसले तरी मवाली नव्हते. कुणीही आमच्या घरातली लाकडे, गोवऱ्या किंवा संडासाचा दरवाजा चोरून नेला नाही. आम्ही शास्त्रापुरती एक लहानशी होळी दरवाजासमोर पेटवून आणि तिला एक प्रदक्षिणा घालून चुपचाप घरी येऊन बसत होतो. हायस्कूलच्या रस्त्यावर होणारा धांगडधिंगा आमच्या गच्चीमधून दिसायचा. दुसरे दिवशी धुळवडीला तर गलिच्छपणाचा कहर होत असे. रस्त्याने जात असलेल्या अनोळखी माणसांनासुद्धा पकडून गटारात लोळवत असत. त्यामुळे आम्ही त्या दिवशी घरातून बाहेरच पडत नव्हतो. रंगपंचमीच्या दिवशी थोडा रंग खेळत होतो.
-----
Ujvala:
आपण पाठवलेल्या होळीच्या गाणयावरून एक जमखंडीतील होळीची आठवण आली. मी चौथीत असताना किंवा दर वर्षी आमच्या वाडया समोर मारूती चे देऊळ. आहे. आणि देवळासमोर च एक मोठा हौद होता. हौद भरून रंग तयार केला जाई. कोण हे करत असत . हे माहित नाही. पण आम्हा मुलांना खूप मजा येत असे . दुपारी आजूबाजूची मुले मुली रंग खेळतो असू. एका वर्षा मी खेळता खेळता अगदी बाळू पेढे वाल्या दुकानाजवळ गेले तेथे देसाईं घ्या मुली पण रंग खेळायला आल्या परत आम्ही रंग घेण्यास हौदाजवळ आलो . पिचकारी कोणाजवळ नव्हती बादली तांबे डबे घेऊन रंग खेळत. मी हौदात बादली बुडवून रंग घेतला. आणि पळून एका मुलीला भिजणार तेवढ्यात तो पर्यंत मी टेंभुरजी च्या दुकानाजवळ आले तोच कुणीतरी माझ्या अंगावर जोरात रंग उडवला माझ्या तो डोळ्यात गेला. मला दिसेनात .घाबरले . कुणाचे तरी लक्ष गेले. मला घरी आणून सोडले. तेव्हा पासून आजपर्यंत कधीही रंग खेळले नाही. पण आता मला असं वाटतयं माझ्या डोळ्यात रंग घालणारा मधू च किंवा.😂😂😂
किंवा कोणीतरी भावाचा मित्र असावा मुलगा होता हे निश्चित
M K Apte : मी नाही. आम्ही घरीच अंगणात खेळत होतो
Ujvala : अरे गंमत मला तरी कुठे आठवतंय.
आनंद कुलकर्णी : जमखंडीच्या आठवणी
न विसरता आलेले रक्षाबंधन
1963/64साल साल असावे. आम्ही नियमीत संघशाखेत जात असू. बापू खरे आमचे मुख्य शिक्षक. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कामे करीत असू
सालाबाद प्रमाणे रक्षाबंधन उत्सव आला. खरेंच्या गवळी विठोबा मंदिरातच उत्सव घ्यायचे ठरले. हे ठिकाण आम्हाला अगदी घरच्या सारखे होते.शाळा नसेल तेंव्हां आम्ही या देवळातच असू. आमच्या सततच्या येण्या जाण्याने बापूच्या आईला व बहिणीला गैरसोयीचे नक्कीच होतअसेल. पण त्या माउलीने कधीच दर्शविले नांही. त्या आम्हाला कधी खायला भाजलेल्या शेंगाकिंवा चहा मिळे. privacy disturb होणे ही संकल्पना तेंव्हा रूढ नसावी. दिवसभर उत्सवाची तयारी झाली सकाळी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून आम्ही गावात फिरून आम्ही फुले गोळाकरीत असू. विठोबाच्या देवळात चार हार बनवीत असू एक हार ध्वजासाठी महाराज डॉक्टर व गुरूजी असे चार हार लागत. संध्याकाळच्या उत्सवासाठी गादीखाली रात्रभर ठेवून इस्री केलेला गणवेश असे सगळ्या उत्सवांचे हेच रूटीन असे राख्यासुद्धा आम्ही रेशीम विकत आणून स्वतःच बनवीत असू. या वस्तू विकत आणणे अपराध वाटे. खिशात पैसे नसायचा हा भाग निराळा.
संध्याकाळी कार्यक्रम ठरल्या प्रमाणे पार पडला.एकमेकानां राखी बांधली. कार्यक्रम संपला. दहाबारा राख्या शिल्लक होत्या. त्या राख्या आपल्या शिक्षकानां बांधू त्यामुळे संघ विचाराचा प्रचार होईल व शिक्षक आपल्याशी सहानुभूतीने वागतील असे वाटले. दुसरे दिवशी आम्ही सकाळी सकाळी निघालो. शाळेला कसलीतरी सुट्टी होती. कालचा युनीफॉर्म तयार होताच. तोलून निघालो. प्रथम VBजोशी सरांचे घर. सर अंघोळ करून पेपर वाचीत बसले होते.
"काय रे पोरानो सकाळी सकाळी आलात?"
"सर काल रक्षाबंधन उत्सव झाला. आज तुम्हाला राखी बांधायला आलो. सारा हिंदू बंधू व्हावा ======"
"असू दे असू दे" म्हणत सरानी बोलणार्याला थांबवले व म्हणाले सर्वजण बसून घ्या. आम्ही त्यांच्या खानदानी सोफ्यावर बसलो. एकाने सराना राखी बांधली.
"वाः मस्त! आता बोला चहा घेताय की कॉफी?"
"नको नको सर अजून खूप ठिकाणी जायचे आहे . उशीर होईल."
"बराय! प्रताप आतले पेढे आण." सरांनी मुलाला आवाज दिला.
"घ्या चोपडेंचे ताजे पेढे आहेत." पेढे घेतले सरारांचा निरोप घेतला. वाटेतच तासगांवकर सरांची खोली होती. ते नुकतेच उठले होते. त्यांनाही राखी बांधली.
मग गणिताचे फाटक सर. त्यांचाही भला मोठा वाडा. तिथेही असेच स्वागत. राखी बांधली. इथे लाडू मिळाले.
पुढे पटवर्धन शास्र शिक्षक. बसायला सोफासेट. सरानी प्रत्तेकाची चौकशी केली. आम्ही सरांना राखी बांधली. सर म्हणाले "चांगल काम करताय पण अभ्यासाकडे दुर्लक्ष नको."
"अग सगळ्याना चहा टाक." चहा घेऊन आम्ही निघालो. व्हक्कळ विहिरीवर अप्पाजी मास्तर भेटले. त्यांच्याच ओसरीवर चार पाच जणांची बैठक जमली होती. सर्वाना राख्या बांधल्या. हुल्याळकर गल्लीत गुरूमास्तरांच्या घरी गेलो. तिथे भारतीय बैठक.
"आम्ही संघाचे काम करतो. काल आम्ही रक्षाबंधनोत्सव केला व आज घरोघर जाऊन राखी बांधतो व संघ विचार पोचवतो."
"फार चांगल काम करताय. संघ विचार फार मोलाचा आहे. आज तुम्हाला कुणी विचारत नसेल पण मी सांगतो कांही वर्षांनी तुमची या देशावर पूर्ण सत्ता असेल हे नक्की."
( हे माझे सत्य कथन आहे. कल्पना नव्हे) आज पंचावन्न वर्षे झाली. आज सरांचे शब्द सत्यात येताहेत. पण ते पहायला सर आपल्यात हयात नांहीत. सरानी सर्वाना खोबर्याच्या वड्या दिल्या व सराना राखी बांधून आम्ही परतलो.
पुढच्या गल्लीत अथणीसर. "काय रे इकडे कुठे?" आम्ही येण्याचे प्रयोजन सांगीतलेः सरानां राखी बांधली
"ते सर्व ठीक आहे पण अभ्यासआधी," .ते माझ्याकडे बघत म्हणाले, "काय रे करतोस ना अभ्यास? नांहीतर सांगतो तुझ्या बापाला. तो व मी classmet."
चहा पिऊन आम्ही निघालो. आता शेवटच धर RGजोशी सरांच. सरानी घरात घेतले व बसायला सांगीतले. आम्ही येण्याचे प्रयोजन सांगीतले. सर म्हणाले ,"तुम्ही RSS च काम करता का? "
"हो!"
"घरी आई बापाला ठाऊकआहे का?"
"हो. ठाऊक आहे"
"हे वेड कुणी भरवलं डोक्यात? आज माझ्याकडे का आलात?"
"कांही नांही सर, फक्त तुम्हाला एक राखी बांधायची आहे."
"कशासाठी?"
"आपण सर्व हिंदू आहोत, आपण संघटित रहावे यासाठी"
"हे असलं राख बांधून कांही होत नांही"
"राख नव्हे सर राखी"
"तेच ते. हिंदू संघटन? मग मुसलमानानी जायच कुठे? या देशाला जरूरी आहे गांधीजींची. त्यांच्या विचारांची. तोच विचार देशाला वाचवील. अहिंसा परमोधर्माः हेच सत्य आहे."
तोवर चहा आला. चहा झाला आम्ही उठलो.
"सर राखी?" कुणाचा तरी शेवटचा प्रयत्न.
"मी तर बांधणार नांहीच. तुम्हीही काढून टाका."
खालच्या मानेने आम्ही बाहेर. धाडकन दार लागलं.
-----------------
अनिल पोंक्षे
एक आठवण
आमच्या गल्लीत मारुतीच्या देवळा शेजारी दिवाणजींचा मोठा वाडा होता. मला आठवते त्यांच्या घरी दिवाळी झाल्यानंतरच्या काही दिवसांत चौडेश्वरी व नागेश्वरी नावांचे काही देव मुखवटे नाचत व वाजत गाजत येत. हा सोहळा पाहण्यासाठी येथे आम्ही जमत असू. ह्याबद्दल ची जास्तीची माहिती कोणाला असल्यास खुलासा करावा. दिवाणजी सोडून गेल्यावर ही प्रथा बंद झाली असावी.
जयश्री :: Nahi .Hi pratha ajuni chalu ahe aata te ghar budihalanche ahe .Tithe hi devi ajuni yete .Pudhe aamchya ghara javal bolat mayavva che Deual ahe tithe yete diwali padayala.
वैजयंती : होय मला आठवते दोन मुखवटे घातलेली नी पायलापण ८" १०" उंच बांबू बांधलेले दोन जण हळद नी कुंकू कापडाने उडवत यायचे दिवाळीत. तेव्हा कुणाकडे डोहाळजेवण असला तरी बायकांची वरात असे. नी लींगायातंची अंत्ययात्रा. कीड कीड क्यांग मनिकडे ह्यांग असा म्हणत केळीचा मखरात बसवायचे गेलेल्या माणसाला नी मागे पुरुष नी बायकासुधा. नी पाहावं पुण्य लागतं असं आमचा कावेरीबाई पद्माबाई म्हणायचा.
------------------------
अरविंद गोविंद लिमये
जमखंडीच्या आठवणी
मी अरविंद गोविंद लिमये गोविंदराव यांचे चिरंजीव. आम्ही करमरकर वाड्यात राहत होतो तिथे आमचे बरोबर पटवर्धन मास्तर ही राहायचं .करमरकर वाड्यात दोन दशरथ येत एक दशरथ करमरकरांच्या कामासाठी यायचा रात्री सोप्यावर गप्पा मारीत असे. तो दरवर्षी आषाढी यात्रेला पंढरपूरला जात असे .दुसरा दशरथ काकांच्या कामावर होता तो मोहरम मध्ये वाघाचे सॉंग घ्यायचा .सर्व अंगाला पिवळा रंग लावलेला त्यावर काळे पट्टे काढलेले असायचे एक मुलगा त्याची शेपटी धरून नाचायचा.टिमकीच्या तालावर दोघे नाचायचे मजा वाटायची
. चैत्र महिन्यात वाड्यात तिघांचे सामायिक हळदीकुंकू कार्यक्रम व्हायचा सोप्यावर गौर म़ांडली जायची .पटवर्धन यांच्याकडे गौरीचा लाकडी मुखवटा होता हिरवी साडी नेसून मध्यभागी मांडली जायची. गौरी पुढे आरास केली जायची सगळ्यांच्या घरातील खेळणी मांडायचो.समोरील जमीन शेणाने सारवून त्यावर काशीबाई साळुंके यांनी कातर काम केलेल्या छापाच्या रांगोळ्या त्या काढायच्या मोठ्या हंड्यात हरभरे भिजत घातलेले असायचे आंब्याचे पन्हे मोठ्या प्रमाणात केले जायचे हळदी कुंकू कार्यक्रमाला येण्याचे निमंत्रण देण्यासाठी आम्ही मुले जात असू मोठ्या प्रमाणात बायका यायच्या. समारंभ संपला की पुरुष मंडळी मुलांचा फराळ व्हायचा .नागपंचमीला वाड्यात श्रावणी होत असे सोप्यावर लाकडी पाट मांडले जात असत. गावातील ब्राह्मण मोठ्या संख्येने श्रावणीला उपस्थित असायचे. करमरकर वाड्याच्या बाहेर पडल्यावर उजवीकडे बोळात अण्णाप्पा मास्तर रहात होते. ते तिसरी चौथीला शिकवीत. त्यांच्याकडे आम्ही शिकवणीला जात असू ते पुष्कळ गोष्टी सांगत. त्या काळात काही काळ हुपरीकर मास्तर राहत होते उजवीकडे टेंभुंर्जी डॉक्टरांचे दुमजली घर होते त्यांचा मुलगा माझ्या वर्गात होता आमच्याकडे रेडिओ नसल्याने त्यांच्याकडे गाणे ऐकण्यासाठी गेलो होतो.
आमच्या वाड्या समोर सी.व्ही.आपटे वकील यांचे घर. त्यांचा मुलगा हरी माझ्यावर होता त्याने मोठे कुत्रे पाळले होते हरीच्या घराला लागूनच भाऊराव आपटे यांचा वाडा होता. त्या घरासमोर याळगी राहत होते त्यांचे मोठे कुटुंब होते मोठ्या मारुती देवळाजवळ त्यांचे स्टेशनरीचे दुकान होते .
गिरणीचे पलीकडे पेंडसे वकीलांचे घर होते ते संघाचे कार्यकर्ते होते राखी पौर्णिमेला राख्या तयार करायला त्यांच्याकडे जायचो. त्यांचेकडून तूप आणत असू त्याच्या घरासमोर जोशी राहत होते......आपल्याला आवडलं असेल तर पुढे
भाग 2
गणपती मंदिरासमोर पटवर्धन वाडा होता मी वकील होते. एक शेती पाहत होते त्यांची उदय अरुण दोन मुले माझ्या वर्गात होती
करमरकर वाड्याच्या मागील दारातून बाहेर पडल्यावर काशीबाई साळुंखे यांचा वाडा होता त्यापूर्वीच्या काळात शाळेत हेडमिस्त्रेस होत्या त्या अधूनमधून आमच्या घरी यायच्या. त्यांच्याशिवाय घरात कोणी नव्हते त्याने शिवाजी शहाजी बर्गे यांना दत्तक घेतले होते शिवाजी बर्गे यांचा विजय नावाचा मुलगा काही दिवस माझ्या वर्गात होता .काशीबाईंचे अक्षर सुंदर होते त्यांची हस्तकलाही चांगली होती. आमचे उपाध्याय श्री दत्तंभटजी. जोशी होते त्यांनी आमच्या घरातील सर्वांच्या जन्मपत्रिका तयार केल्याआहेत। घरात काही धार्मिक कार्य असले तर त्यांनाच बोलावणे जायचे . मुंज झाल्यावर आम्ही संध्या शिकण्यासाठी दत्ताच्या देवळात जात होतो.
आठवणी ह्या नथीसारख्या.असतात.नथ घालाविशी वाटते.पण नथ घातल्यावर टोचत राहते.आणि डोळ्यातून पाणी येते. पहिली ते चवथीची मराठी शाळा पागेत भरत असे.दर आठवड्याला जमीन सारवावी लागे.शेवटच्या तासाला पाढे आणि जमखंडी जवळची गावाची नावे मोठ्या आवाजात म्हणावी लागत. ती अजूनही लक्षात आहेत. जमखंडी कडपट्टी हंचनाळ हुन्नुर बनहट्टी रबकवी शिवापूर मदरखिंडी
इ.पाचवीला फेरीस स्कूलला गेलो. त्या शाळेत बसायला बाके होती. सर परशुरामभाऊ मध्ये सहावीपासून इंग्रजी असल्याने फेरीस स्कूल.सोडून पी.बी.हायस्कूल मध्ये आलो या शाळेत पटवर्धन अपसंगी अथणी शेट्टी अग्निहोत्री अभ्यंकर के.बी.।जोशी व्ही.बी. जोशी शिक्षक आम्हाला असत अमलादी हेडमास्तर होते त्यांचे संस्कृत इंग्रजी चांगले होते गोखले वाड्यात राहत होते त्यांचा मुलगा प्रसाद. माझ्या वर्गात होता आम्ही क्रिकेट खेळायला जायचो।
आपल्या शाळेची रचना अशी आहे की एका वर्गात प्रवेश केला की वर्गाबाहेर न येता आतल्या आत.कोणत्याही वर्गात जाता येत असे. संस्कृतला अभ्यंकर मास्तर होते गोरे पान होते .धोतर शर्ट आणि टोपी असा त्यांचा पोशाख असायचा. एकदा संस्कृतच्या तासाला मी पिता ऐवजी पीता असा उच्चार केला .त्यांनी धाडदिशी पाठीत मारले आणि म्हणाले. ब्राह्मणाच्या मुलाला पिता म्हणता येत .नाही. शिक्षा म्हणून मला पिता हा शब्द दहा वीस वेळा म्हणायला सांगितले . दहावीच्या वेळी संस्क्रुतच्या जादा तासासाठी पोलो ग्राऊंड जवळील क्लबमध्ये पहाटे बोलवत असत.आम्ही डोळे चोळत तासाला जायचो.मऊमऊ कोचावर बसल्यावर पेंग यायची.
चित्रकलेला अग्निहोत्री मास्तर होते. चित्रकलेचा तास मधल्या मोठ्या हाँलमधे असे. त्यांचेकडे मोठे टोक यंत्र होते. ते प्रत्येक विद्यार्थ्यांला अणुकुचीदार टोकाची पेन्सिल द्यायचे.चित्र काढताना काही चूक झाली तर माझ्या दादाचा उल्लेख करून मला बोलायचे. दादा त्यांचा आवडता विद्यार्थी होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या चित्रकलेच्या दोन परीक्षा झाल्या आहेत.
शाळा सुटल्यावर घरी जाऊन काही तरी खाऊन परत शाळेत यायचो. शाळेच्या इमारतीला चार पाच फेर्या मारायचो. तालमीत जाऊन खोर्याने लाल माती उपसायचो. त्यानी चांगला व्यायाम होतो. तेथे बाबू नावाचा शिपाई होता.नंतर कधी कधी सिंगल डबल रींग टेनीस खेळायचो.
.......पुढील भाग उद्या.
धन्यवाद
Arvind Limaye
भाग तिसरा
पी बी.हाय स्कूल चे एक.हूशार माजी विद्यार्थी तत्वज्ञ श्रीरामभाऊ रानडे यांची जन्मशताब्दी साजरी झाली त्यांची मोठी मिरवणूक निघाली होती मिरवणुकीत आम्ही सर्व विद्यार्थी सहभागी झालो होतो या समारंभात भाग घेता आला हे आमचे सद्भाग्य समजतो.
एकदा शाळेच्या समारंभाचे आमच्या वर्गाचे नाटक करायचे ठरले नाटकाचे नाव होते काकांचा चहा. या नाटकासाठी कुणी पातेली.स्टोव्ह.चहा साखर कपबशा अशा वस्तू गोळा केल्या. नाटक सर परशुरामभाऊ थिएटरमध्ये करायचे होते .आम्ही बराच वेळ वाट पहात बसलो होतो आणि शेवटी नाटक रद्द झाले. त्यावेळी माझा भाऊ शरद चा एक नाच होता कुजबुज कुजबुज रे. तो नाच चांगला झाला.
अलजेब्रा जॉमेट्रीशिकवणी साठी गुरु मास्तरांच्या कडे जात होतो आमच्या घरातील सर्व जण त्यांचे शिष्य होते गणितासारखा रुक्ष विषय ते नाचत-गात शिकवत असत. त्यांची वर्गाची फी फक्त अठरा दखल वर्षाची फी 18 रुपये होती ती देखील अनेक विद्यार्थी बुडवत असत. त्याबद्दल त्यानी कधी तक्रार केली नाही .त्याचे शिकवणे खेळकर होते कोणावरी रागावले नाहीत त्यांचे शिकवणीचे तास दिवसभर चालत. जमखंडीचे श्री. साबडे मास्तर सातारा येथे ईंग्रजी चा क्लास चालू केला होता.त्या क्लासला मी जात होतो।
शाळेजवळच भास्कर जोगळेकर यांचे घर होते त्यांचे सांगलीला गणित क्लास होते भास्कर यांचे भाऊ श्रीधर आणि श्रीपाद माझ्या वर्गात होते श्रीधर खूपच हुशार होता त्यांचे भाऊ गंगाधर काही काळ ते आमच्या शाळेत सातारा शिक्षक होते त्यांना गं.ना. म्हणत होतो ते फर्ग्युसनचे प्राचार्यही झाले ते सोसायटीचे लाइफ मेंबर झाले.
दर श्रावणी सोमवारी रामतीर्थ येथे यात्रा भरायची शाळेत असताना स्काउट मध्ये होतो स्काऊट मास्टर पुराणिक मास्तर होते श्रावणी सोमवारी स्काऊट चा ड्रेस घालून यात्रेत स्वच्छता करीत असून त्या कामासाठी खरी कमाई म्हणून काही रक्कम मिळत असे .
श्रावणी सोमवारी रामतीर्थ शंकराला भाताची पूजा बांधतात त्याला बुत्ती पूजा म्हणत.
आपल्या शाळेला s s c केंद्र मिळाले त्यापूर्वी या परीक्षेसाठी विजापूरला जावे लागे.
श्री ए टी पाटील चीफ कंडक्टर होते त्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पाणी पुरवणे पुरवण्या वगैरे देण्याचे काम आम्ही करत होतो
नगर वाचनालय शाळेचे समोर च होते. त्याचे काका सभासद होते त्यांना वेळ मिळत नसे तेव्हा मी जात असे .त्यावेळी कू़ंट। बाळू नावाचे एक नोकर होते.
उद्या शेवटचा भाग
-----------------------
Arvind Limaye
जमखंडी
अशी आमची जमखंडी
नाही इथे कोणी पाखंडी
नाही सापडणार त्रिखंडी
नाही कोणाच्या भानगडी
. . . अशी आमची जमखंडी।१।
इथे नाही कोणी शिखंडी
सापडणार नाही. ब्रम्हांडी
इथले सावकार अनिखिंडी
जणूबहिणी मराठी कानडी
. . . अशी आमची जमखंडी
टेकडीवर राजधानी रामतीर्थ
जल इथले गंगेइतके पवित्र
उमा रामेश्वराची कमान मोठी
. . . अशी आमची जमखंडी।
आणि इथल्या मातीचे सुपुत्र
रामभाऊ विठ्ठल वअच्युत
घेतली उडी समाजसेवेत
त्यांना आमचे दंडवत
. . अशी आमची जमखंडी।।
करावी यात्रा सकाळी
देवाच्या द्वारी घ्यावी विश्रांती
आपली शालामाऊली।
ती तर ज्ञानाची सावली।
आपल्यावर पावलोपावली।
पी.बी.हायस्कूल तीचे नाव।
तीचे चरणीं माझाभक्ती भाव
जमखंडीचे सरकार पटवर्धन
आम्ही त्यांना करतो नमन।।
वेळोवेळी येत रहावे
होतील मित्रांच्या भेटी
येऊन उभी करावी गुढी
. . . अशी आमची जमखंडी
अरविंद लिमये
------------------
---
राजू वाटवे : छानच आठवणी. फेरी स्कूल म्हणजे कुठे होते ?
उत्तर : गवळी गल्ली पुढे फेरिस्कूल होते बाजूला कचेरी आणि जवळच सदानंदाचे देऊळ आहे असे आठवते
राजू वाटवे: या फेरी स्कूलचेच आमच्या वेळी पहिली ते सातवी बनशंकरी कन्नड गंडू मक्कळू शाले पुढील बाजूस आणि हेण्णू मक्कळू शाले मागील बाजूस झाली होती...
---------------------
अरविंद गोविंद लिमये
आठवणी करिती पाठलाग
आमची आँन लाईन टूर
मागील करोना वर्षात आम्ही घरची मंडळी आँन लाईन टूर वर गेलो होतो. फार मजा आली. आता चालू करोना वर्षात पुन्हा आँन लाईन टूर वर जाणार आहोत.
मागील करोना वर्षात आम्ही घरची सर्वजण आमच्या मूळगावी म्हणजे जमखंडीला गेलो होतो. माझ्या एका मित्राच्या ओळखीचा ट्रँव्हल कंपनीचा मँनेजर होता. त्याला कानडी येत होते. म्हणून त्याची निवड केली.
रविवारी सकाळी निघायचं होतं.त्या मित्राचं नाव.होत .रमेश निंबरगी.ठरल्याप्रमाणे तो रविवारी सकाळी आला. आमच्या अंघोळी वगैरे लवकरच आवरलं.रमेशने सांगितले प्रमाणे आम्ही बसलो. आणि आमची आँन लाईन टूर सुरु झाली. आम्ही सर्वजण जण मिळून बारा जण होतो.. सामान भरले.आणि गर्जना केली गणपती बाप्पा मोरया।हरहर महादेव. शिवाजी महाराज की जय..आणि आम्ही आँन लाईन निघालो.
घाटातून खाली उतार लागल्याने उकडायला लागलं म्हणून खिडक्या उघडल्या.फँन सुरु केले. नातीने हट्ट केला तीला त्याच खिडकीत बसायचे होते. ती ताईला म्हणाली रोज त्या खिडकीतून राजाशी खुणा करून बोलत असतेस.
मी ताईची समजूत काढून नातीला वरदाला खिडकीत बसवले.
रमेश ला विचारले जमखंडीला रहायची सोय केली आहेसना.तो म्हणाला काही काळजी करू नका।आपलं पाँप्यूलर लाँज आहेना.मी विचारले अजून चालू आहे.मी तिथं एकदा पाणी प्यायला गेलो होतो. माझा मित्र महाबळ होता. त्याचे बरोबर गेलो होतो. रमेश म्हणाला आता पुष्कळ सुधारणा केल्या आहेत।
मी विचारलं आपण कसे जाणार आहोत.तो.म्हणाला आपण उगारमार्गे जाऊ।तेथे थोडी विश्रांती घेऊन पुढे डायरेक्ट जमखंडीला. तासाभराने मुले खायला मागू लागली. तो म्हणाला पाच दहा मिनिटे थांबा.आपले स्वैपाक घर येते आहे. तेथे चहा खिचडी सांगून ठेवली आहे. मी विचारलं स्वैपाक घर काय भानगड आहे. तो.म्हणाला आपल्या हाँटेलचे नाव आहे. होय ना वैनी.त्यांनी मान डोलवली. आणि पंधरा मिनिटानी गाडी थांबवली. चहा खिचडी पोटभर झाली. खिचडी अगदी घरच्या सारखी झाली होती. सगळे आपल्या जागेवर बसले.आँन लाईन प्रवास सुरू झाला।मी रमेश विचारले जमखंडीला कोठे कोठे जायचं आहे.
तो म्हणाला. आपण जमखंडीला गेल्यावर पाँप्यूलर लाँजवर जायचं।आपण दुपारी चार.वाजता पोहोचू.चहापाणी झाल्यावर फ्रेश होऊन उमारामेश्वरला जाऊ.नातीने विचारले गाडीतून जायचं ना. रमेश म्हणाला आपल्या आजोबांच गाव पहायचं ना. आपण सर्वजण चालतच जाणार।
अशा गप्पा मारत असताना जमखंडीला केव्हा पोहोचलो ते कळलेच नाही.
रमेश सांगत होता उजव्या बाजूला दिसतंय ना ते पोलोग्राऊंड.मी म्हणालो हो तेच ते पोलोग्राऊंड. येथे एकदा पंडित नेहरुंची सभा झाली होती. तैवढ्यात नात म्हणाली. ते गुलाबाचे फुल कोटाला लावायचे तेच ना.मी म्हणालो हो तेच ते.पं.नेहरू. बोलता बोलता पाँप्यूलर लाँज कधी आले ते कळलेच नाही.
चहापाणी झाल्यावर सौ.म्हणाली आपण अगदी आपल्या घरी असल्यासारखे वाटत आहे. मी म्हणालो ही च पाँप्यूलर लाँजची खैसियत आहे.
उमारामेश्वर मंदीराकडे निघालो. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. उजवीकडे गोखले यांचे घर होते. असे चालत राहीलो. जरा वेळाने वाटवे डाँक्टर यांचा दवाखाना लागला.येथे औषथासाठी येत होतो. जरा पुढे गेल्यावर चौक लागला.उजव्या बाजूस पोस्टाकडे जाण्याचा रस्ता आणि डावीकडे बुरुड गल्लीत जाताना जोग ड्राईंग मास्तर यांंचे घर पुढे गोखले यांचा वाडा.पुढे उजव्या बाजूला डॉ. परांजपे या़ंचे घर आणि दवाखाना. त्यांच्या समोर पोंक्षेंचा छापखाना।तेथून परत मेन रोडला लागलो.साडीची दुकाने दिसल्यावर सौ.ला आपल्या कडे घरी नेसायला साडी नसल्याचे आठवले.तेथील एका दुकानात गेलो तर मालक धावत आला आणि म्हणाला या पटवर्धन साहेब. किती वर्षानी पाहतो आहे. मी आजुबाजुला पाहिले आपल्यात पटवर्धन कोण आहे. मग लक्षात आले।तो मलाच पटवर्धन समजत होता. मी खुलासा केला।मी लिमये आहे. पटवर्धन नाही.कारण पटवर्धन आणि मी मित्र होतो. एकत्र अभ्यास करायचो.एकत्र खेळायचो.
सौ.ने एक साडी खरेदी केलीच.साडीच्या दुकानातून बाहेर पडल्यावर समोर उमारामेश्वरची मोठी कमान दिसू लागली.चार पावले चालल्यावर डाव्या बाजूला दोन नंबरची शाळा होती. पूर्वी आईला घेऊन दोन नंबरच्या शाळेत मतदानाला गेलो होतो. त्यावेळी बी.डी.जत्ती निवडणुकीसाठी उभे होते.
उमारामेश्वरच्या मोठ्या कमानीतून आत गेलो.. मंदीराचे आवार स्वच्छ आणि शांत होते.येथे. काही काळ संस्थानचे खाजगी कारभारींचे आँफिस असावे. काही कामानिमित्त मी येथे आलो होतो. श्रीउमारामेश्वरचे दर्शन घेऊन उजवीकडे वळून फडके यांच्या वाड्याजवळ आलो.आता मुलांना भुका लागल्या होत्या. तेवढ्यात मागून आपल्याला कोणीतरी बोलवत असल्याचे दिसले. अहो लिमये इकडे कोठे. या चहा प्यायला मुलेही कंटाळून गेलेली दिसताहेत.पहातो तो सौ.ने लाडू चकली तयार केली होती. त्यावर मुलांनी फडश्या मारला. कोणीतरी म्हणालेच.अगदी आईसारखी चकली झाली आहे.तेथून मोठ्या मारुतीला आलो.समोरच मुलींची शाळा ओकळीचे खांब त्याची माहिती मुलांना दिली. ती मागेच लागली आम्हाला ओकळीचे खांब दाखवा.मी त्यांची समजूत घातली आता आपण त्यावेळी पुन्हा येऊ.़नंतर मार्केट वरुन मुरगोडच्या दुकानावरून फौजदार कचेरी जवळ आलो।तेथून भाऊराव आपटे यांच्या घरावरुन पुढे गेल्यावर करमरकर वाडा होता. आज तेथे मोठी इमारत झाली आहे. आता चालून चालून मुले दमली कंटाळली.म्हणून लाँ जवर गेलो.
।आई म्हणाली चला रे पोरानो. जेवण झाल्यावर रमेश काकानी सांगितले आहे त्या ठिकाणी मुकाट्याने झोपा.आपल्याला सकाळी रामतीर्थ ला जायचय वरदा म्हणाली मी राणीसाहेबांच्या मांडीवर बसणार. सुरेश म्हणाला. काका तीला माडीवर जायचं आहे. आई.म्हणाली अरे झोपा आता.
सकाळी उठून सगळं आवरून ब्रेकफास्ट केला आणि बरोबर आठ वाजता गाडी पाँप्यूलर लाँजच्या दारी उभी होती. सर्वजण आपापल्या जागेवर बसलेआणि आमचा प्रवास रामतीर्थ च्या दिशेने.सुरू झाला. समोर राजवाडा दिसू लागला. आणि एक वळण घेताच गाडी गेटसमोर उभी राहिली.
प्रवेशद्वारी सोपस्कार उरकून चालत निघालो. आत जाताच समोरा समोर दोन मोठे तलाव पाहून मन पूर्वीच्या काळात गेले.
येथे दर श्रावणी सोमवारी जत्रा भरायची.साखरेची चित्रे लाकडी खेळणी लाकडी बाहुली.अशी त्रिकोणी रंगीत बाहुली कित्येक वर्षी आमच्या घरी होती. काकांनी एक आणा दिलेला असायचा.आम्ही चुरमुरे भेळ बत्तासे घ्यायचो.
त्या आधी शंकराच्या पिंडीवर हरकंगी यांनी बुत्तीपुजा बांधलेली असायची.
.आठवणी मधून बाहेर पडावे लागले कारण.मुलांचा आरडाओरडा सुरू झाला होता. आबा कोठे हरवला होतात.त्यांना काय सांगायचे.राजवाडा बंद होता. तीथे आता इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु झाल्याचे कळले.।फोटोसेशन झाले.
तेथून गाडीने कल्लोळीला गेलो. तैथील व्यंकटरमणाला सांकडे घातले. सर्वांना सुखी ठेव बाबा.नेहमीच्या रिवाजाप्रमाणे दगडी घरे बांधली. मुलांनी विचारले आबा हे कशासाठी करायचे।त्यांना म्हणालो चला गाडीत बसा मग सांगतो.
जेवणाची वेळ झाली होती ऊन ही वाढले होते. झाडाखाली बसून सर्वानी आपापली केळीची पाने घेतली. आज जमखंडीचा खास मेनू म्हणून कडबू करण्यास रमेश निंबरगी ने सांगितले होते. मुलेच नव्हे तर मोठी माणसे देखील खुष झाली. आग्रह करून तो वाढत होता. सर्वानी पोटावर हात फिरवित त्रुप्तीची ढेकर दिली. आणि तीथेच आडवे झाले.
दुपारी चार वाजता कल्हळीवरुन निघालो आणि पी.बी.हायस्कूल ।। आलो.आबांची शाळा कशी असेल याची सर्वांना उत्सुकता होती.
शाळेची मोठी इमारत पाहून त्यांना आश्चर्य वाटलं साठ सत्तर वर्षापूर्वी इतकी चांगली शाळा आबांची होती. कै.रामभाऊ रानडे यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. शाळेच्या व्हरांड्यातून दोन चकरा मारल्या.ः
आता परतीचे वेध लागले होते.
मुले मोठी माणसे गाडीत बसून कंटाळली होती. मग कसे बसे चार घास खाऊन झोपी गेले..
दुसर्या दिवशी वरदाने आजीकडे काल उरलेल्या पैकी कडबू मागितले. आजी म्हणाली काल सारसबागेत बसून खाल्ले नाहीत का.
काल आपण कल्लोळीला गेलो होतो ना.आबा म्हणाले तू रोज काँलेजला जातीस ना.ती म्हणाली हो..आबानी विचारले मग घरीच असते ते कसं?अहो आबा! त्याला आँन लाईन काँलेज म्हणतात. आबा म्हणाले. म्हंजे काल आपण आँन लाईन टुर केली. त्यावेळी आपण कडबू खाल्ले होते।
अशी आमची आँन लाईन टूर झाली.
अरविंद लिमये , 9146025754
दि.०४-०४-२०२१
------------------------------------
Anand Kulkarni
जमखंडीच्या दोन आठवणी
एक जादुगार रघुवीर आले होते तेंव्हा
दुसरी फाटक सर निजधामास गेले तेंव्हा
~~~~~~~~
जादुगार रघुवीरांचे प्रयोग होणार हे जमखंडीत गाजत होते.प्रयोगतर छान झालाच.पण त्या दिवशी सकाळी त्यानी डोळ्याना पट्टीबांधून जमखंडीच्याभर बाजारात मोटरसायकल चालवली त्यामुळे लोक थक्क झाले.ST स्टँडच्या समोरील पटांगणात प्रतिष्ठित लोक जमले.रघुवीरांच्या डोळ्यांवर कणकेचे गोळे ठेवले. डोळे आधी पातळ व नंतर जाड कापडी पट्टीने बांधले. उपस्थितानी समाधान व्यक्त केल्यावरच रघुवीर मोटरसायकलवर स्वार झाले मौटर सायकलचा रूट स्टॅंड उमा रामेश्र्वर धान्प बाजार दत्तमंदीर मारूती मंदीर मुधोळ रोडपरत याच वाटेनेपोस्ट थिएटर वरूनपरत स्टॅड असारूट ठरला होता. मोटरसायकल सूंसाट निघाली. बघ्यांची ही गर्दी. वाटेत महिला तबक हळदी कुंकू निरांजने घेऊन ठायी ठायी उभ्या होत्या. प्रत्तेक ठिकाणी रघुवीर थांबत ओवाळून घेत व सूंसाट पुढे जात. सर्व जमखंडी थक्क् !
नव्वन ह्यांग नडसतानो? नमग न्यट्टग नडीलिक्क बरल्ला मत्त ईंवा गाडी नडसतान नौडरी अशा गांवभर चर्चा.
संध्याकाळचा प्रयौग हाऊसफुल्ल. तिकिटे संपलीप्रयोग सुरू झाला तिकट नसलेल्यानां फुकट आत सोडले अट एकच जमिनीवर बसायचे. तेही फुल्ल.
रघुवीरानी अनेक जादू सादर केल्या. तूफान टाळ्या मिळवल्या. त्यातील एकच इथे सांगतो. रघुवीरानी कोणत्याही तरुणाने मंचावरयावे असे आवाहन केले. मी गॅलरीत होतो. पहातो तर काय आमचा वर्गमित्र शरद आपटे स्टेजवर. रघुवीरानी त्याचे स्वागत केले व म्हणाले घाबरू नकोस तुला स्टेजवर फक्त उभे रहायचे आहे.
रघुवीर प्रेक्षकाना म्हणाले हे पहा आजकाल जळण किती महाग झालंय. मी पहा उपाय काढलाय. तांदुळ धुऊन मी हा कुकर लावलाय तो मी माझे मित्र शरद आपटे यांच्या डोक्यावर ठेवतो. बघू पंधरा मिनीटात काय होते ते.
मग इतर कांही बडबड त्यानी केली .शरद डोक्यावर कुकर घेऊन उभा. येवढ्यात कुकरची शिट्टी झाली. कुकर खाली घेतला गेला. रघुवीर म्हणाले
पहा या पोराची जादू. गॅस नको रॉकेल नको. कोणतही जळण नको .भात शिज वायचा असेल तर कुकर तयार करा या मुलाला घरी बोलवा व त्याच्या डोक्यावर कुकर ठेवा. भात तय्यार. टाळ्यांचा कडकडाट.
शरदला हा प्रसंग आठवतो की नाही कुणास ठाऊक पण माझ्या मात्र तो लक्षात राहिलाय,
आता दुसरी आठवण
शाळासुरू होती,आम्ही वर्गात होतो. शिपाई नोटीस घेऊन आला.शाळेला सुट्टी जाहीर झाली होती.कारण त्या दिवशी सकाळी आमच्या विद्यार्थीप्रीय गणित शिक्षकांचे फाटक सरांचे निधन झाले होते. फाटक सर अगदी साधे. धोतर व पांढरा सदरा हा कायमचा वेश ,त्यानी कधी पँट वा कोट घातल्याचे मला स्मरत नाही. त्यांचा विद्यार्थ्यांवर वचक फार होता. सर आले की वर्ग शांत.. सरांच्या डोळ्यात कांही दोष होता. एखाद्या मुलाला त्यानी बोट करून उभे रहायला सांगीतले तर दोन मुले उभी रहायची. एकजण ज्याच्याकडे ते बोट दाखवतात तो व दुसरा ज्याच्याकडे ते बघतात तो.असं confusion.
एकदा शाळेच inspection होत. तेंव्हां या मोठ्या मनामाणसानं वर्गात चक्क सांगून टाकलं की', "मुलानो inspection च्यावेळी मी प्रश्र्न विचारल्यावर मी ज्याच्या कडे बोट करतो त्यानेच उभे रहायचे.च्याच्याकडे पाहतो त्याने नव्हे. इतका हा सरळ मनाचा माणूस.
शाळा सोडण्यात आली. मुले घरोघरी परतली. सरांच घर आमच्या घराच्या वाटेवर होतं. मी व दोन तीन मित्र सरांच्या घरी गेलो.अंत्यदर्शन घेत बाहेर येऊन लोकांच्या घोळक्यात उभे राहिलो. बाहेर एक ट्रक उभा होता फुलानी सजवलेला.सरांचे पार्थीव ट्रकवर चढवण्यात आले. बायका हळू आवाजात कुज बुजत होत्या बाकी वातावरण गंभीर.थोड्याच वेळात अंत्ययात्रा निघणार होती. पुष्कळ विद्यार्थीही जमले. एवढ्यात एकमाणूस ट्रकवर चढला व मोठ्यांदा जमलेल्या विद्यार्थ्यानां म्हणाला,
"मुलानो सरआता निघालेत. सरांची फी द्यायची राहिली असल्यास माझ्याकडे जमा करा. मला त्या माणसाचा भयंकर संताप आला त्याच्या दोन कानाखाली वाजवाव्या असं मला वाटलं. वेळ काय प्रसंग काय आणी हा माणूस बोलतोय काय? वय लहान असल्याने व वातावरण गंभीर असल्याने मी स्वतःला कसेबसे सावरले. ही घटना माझ्या मनातुन जात नव्हती.
पुढे अनेक अंत्ययात्रा attend केल्या तेंव्हा हे लक्षात आलं की अंत्ययात्रेत असे विनोद केले जातात जेणेकरून वातावरणातील तणाव दूर व्हावा. ते खरही असेल .पण मला वाटते असे प्रयोग स्मशानात करावे .मृत व्यक्तीच्या दारात नव्हे.
Anand Kulkarni
जमखंडीच्या आठवणी
जमखंडीत असताना मी पुष्कळ भाषणे कीर्तने प्रवचने ऐकली. सुधीर फडके यानी जमखंडीच्या राजवाड्यात गीत रामायण सादर केल्याची आठवण त्यांच्या आत्मचरित्रात आहे. अर्थात तेंव्हां मी नव्हतो. पण कलाकार प्रवचनकार कीर्तनकार व्याख्ख्याते याना जमखंडीत नेहमीच दाद मिळाली आहे.
इंदिराजी जमखंडीस आल्या होत्या.मुधोळ रोड ला त्यांची जंगी सभा झाल्याचे मला आठवते तेंव्हाचा त्यांचा रुबाब फक्त आठवतो.भाषण समजावे येवढे माझे वय नव्हते
नंतर मला आठवतो तो अतीशय प्रभावी वक्ता म्हणजे बाबू रेड्डी तुंगळ. हा काँग्रेस विरोधी त्याचे भाषण जमखंडीत कुठेही असलं तरी मी आवर्जून जायचो. त्यांच बोलणं अर्थात कन्रडमधे असायचे ते ऊर्जा देऊन जायचे. पण निवडणुकीच्या राजकारणात त्याना यश मिळाले नांही. आज ते हयात आहेत की नांही ते माहीत नांही
गवळी विठोबा मंदिरात अप्पाबापूनाना यांचे आजोबा नियमीत प्रवचन करीत. उपस्थिती दहा बारा येवढीच पण त्यांची चिकाटी दांडगी. बसण्यासाठी त्यानी सुबक लाकडी बैठक करून घेतली होती. पांढरे शुभ्र धोतर व उपरणे हि कायमचा वेष. पाठ पन्नासअंशात वाकलेली पण मनाने ताठ. वाकयज्ञाचे अजून एक ठिकाण म्हणजे श्री.गुरूदेव रामभाऊ रानडे यांचे जन्मस्थान असलेले परमार्थ मंदीर. या ठिकाणी व्यवस्थाफनातर्फे रोज एका मान्यवराचे व्याख्यान होई
+91 73508 04294: Babu Reddi is no more
-------
Anand Kulkarni
: मीजमखंडीत असताना परमार्थ मंदिरात दादा डसे वकील सी व्ही आपटे वकील भाऊराव आपटे प्रा.NG देशपांडे आदींची व्याख्ख्याने व्हायची. परंपरा सुरू आहे की खंडित झाली ठाऊक नांही.
: करमणुकीचे अजून एक भन्नाट दालन म्हणजे बैलाटा हे होय.रात्रभराचे नाटक.रात्री केंव्हातरी हा खेळ सुरू होई व सकाळ पर्यंत चाले नाटकाला पौराणिअ सामाजिक व राजकीय संदर्भ असे.मारूतीच्या देवळामागे भलेमोठे लाकडीव्यासपीठ घालून त्यावर हा खेळ चाले .लोक सतरंजी व चादरघेऊन येत सकाळी खेळ संपे मग लोक घरी जात..तरीही कांही मंडळी रस्त्यावर वाकळ घेऊन झौपलेली असत.नगरपालिकेची झाडू वालीच त्यानां उठवीत असे.याचे अर्थ कारण कसे असे कोण जाणे!तेंव्हांमला हा प्रश्र्न पडला नांही .पण आज पडतो .कारण या खेळाला तिकीट नसायचे.
द्वारकानाथाच्या देवळात रोज प्रवचन चाले.पुराणकथा सांगीतली जाई.माझीआई रोज वाटीभर तांदूळ दक्षिणा व वाती वळायला कापूस घेऊन जाई.मी तिच्या बरोबर खूपदा गेलोय. प्रवचनकार गुरू जींचे नांव शुकाचार्य होते .बहुतेक गणेशोत्सवात जोरदार कीर्तने होत.गणपतीच्या देवळात पुष्कळ वर्षे काणेबुवांचे रसाळ कीर्तन होई. पूर्वरंगात बुद्धीला खाद्य देणार्या तात्विक विषयांचे विवेचन बुवा करीत.मग गळ्यातले उपरणे कमरेला बांधत व मग उत्तरार्धात रसाळ कथाकथनाला प्रारंभ होई.
याही उपक्रमाचे प्रायोजक कोण हे मला अजून कळले नांही. आमच्या बालमनांवर या शाला बाह्य शिक्षकानी संस्कार केले पण आम्ही त्यांच्यासाठा कांही करू शकलो नांही.
कांही कन्नड कीर्लनकारहही यायचे.
पोस्टाजवळ नगरपालिकामंडप घालीतेथे नगरपालिकेचा गणपती तिथेबसे
: एकावर्षी मला आठवत एक अच्च कन्नड कीर्तनकार आलै होतेनांवपुरंदर दासकनकदासअसे कांहीतरी होते. त्यानां सर्वजण दासरू म्हणत असत.
: .काणेबुवा मराठीत कीर्तन करीत तर दासांच कीर्तनमराठीत होई. माफ करा दासांच कीर्तन कन्नड भाषेत हौई.आम्ही दोन्ही कीर्तने enjoy केली.
काणेबुवा धवल वेशधारी तर दास काषाय वस्रधारी.भगवी लुंगी भगवे उपरणे. काणेबुवांच्या कीर्त नाचीTag line असायची,पुंडलीकवरदा हारी विठ्ठल.तर दासांची Tag line होती कोलू कोलन्न कोले.
मला आठवतं त्या वर्षी मिरजकर नांवाचे नगराध्यक्ष होते.गणेशोत्सव आला. दासांचे कीर्तन ठरले. : नगराध्यक्षआलै .टिपिकलमुसलमानी दाढी ववेषही तसाच.फरची टोपी.दासांचे कथा कीर्तन झालै.मंडपातील श्रोते मंत्रमुग्ध .मिरजकर तपणे बसून ऐकत होते.शेवटी गणेशाची आरती व्हायची.कुणीतरी न: मिरजकरानां कुणीतरी आरती घ्यायची विनंती केलीँ.क्षणाचाही विलंद न करता तबक हातात घेतले व सर्व आरत्या संपेपर्यत गणेशाला ओवाळले.मंत्र पुष्पांजली होईपर्यंतउभे राहिले.प्रसाद घेउन गेले. हा गणैशोत्सव माझ्याकायमचा लक्षात राहिला.
एक मला अजून पर्यंत कळले नांहीते म्हणजे कोलू कोलन्न कोले या दासांच्या वाक्याचा अर्थ काय?की शेगांवच्या गजानन महारांजांच्या गण गण गणात बोते यासारखै कोलू कोलन्न कोले हे हीरहस्यमय वचन आ जाणकारानी प्रकाश टाकावा.
विश्वास पटवर्धन : तो कार्यक्रम ( हल्ली प्रमाणे) कोणी धनवान प्रायोजित करायचा.👍
उज्वला : आमचे शेतीचे गाव आसंगी तेथे आमचे वेणू गोपाळ देवस्थान आहे. तेथे रात्रभर बैलाटा हा कार्यक्रम होत असे. मी रात्रभर पहात असे.साल 1960 ते1963
दि.७-०३-२०२१
---------------------------------
विषय - भातुकली. आपल्या जमखंडीला मार्केट डे गुरूवारी असे. म्हणून आमच्या शाळेची सुट्टी गुरुवारी असे.महणून आम्ही मैत्रिणी गूरूवारी भातुकली चार खेळ खेळत असू. माझी आई झोपाळयावर बसून स्वयंपाक कसा करायचा शिकवत असे. आई शेगडी पेटवून देत असे. पत्र्याची शेगडी धगधगत्या कोळ्याने भरलेली असायची. भात पिठलं दाण्याची चटणी शिकरण आणि पोळ्या मी भात टाकायची कममू गाडगीळ शिकरण करायची. अंबू गोखले पोळ्या करायची (तिला घरी करायची सवय होती.) आणखी दोघी होत्या नावे आठवत नाहीत.पिठलं चटणी त्या दोघी करत. मग सगळं तयार झालं की आम्ही गोल बसून जेवण करत. आमचे भाऊ पण यायचे. कुमार बबन(बाळ्या) सगळे पदार्थ चविष्ट असायचे. हे सर्व सोप्या मध्ये तयार करायचो आणि तेथेच जेवायचे. अशी मजा यायची. मगाशी कोणीतरी अंबू गोखले चे नाव लिहिले. त्यावरून भातुकली ची आठवण झाली.अंबू पुण्यात असते. ती जबूकेशवर देवळाजवळ रहायची. 😁😁
खरं सांगतो.आताशा मला जमखंडीला जावेसे नांही वाटत.त्याच एक प्रमूख कारण म्हणजे ज्या घरांततीन पिढ्या आम्ही राहिलोते घर आम्हीं विकलं वआम्ही पुण्यात स्थाईक झालो. माझ्या प्रमाणेच अनेकानी गांव सोडले. हा सर्व मानवी जीवनातील व्यवहार होता त्याचे वाईट वाटून घेण्याचे कारण नांही.माझ्या बुद्धीला हे पटते पण मनाला कसे पटवायचे?कांही मित्रानीमला समजावले तेम्हणाले Be practical यार.मीही practical झालो. नोकरी लागली लग्नझालं मुलं झाली संसारात रमलो,खरं म्हणजे अडकलो
श्री आनंद कुलकर्णीजी खूपच मनाला भिडणारी आठवण शेअर केलीत. स्पेशली जे आपले मैत्र गेल्या २५-३० वर्षात जमखंडीला भेट देऊ शकले नाहीत त्यांच्यासाठी तर ही मर्मबंधातली ठेवच. त्याबद्दल तुमचे शतःश अभिनंदन. त्यात गुरु मास्तरांचे घर आणि क्लासचे वर्णन म्हणजे कळसच. आम्हाला गुरु मास्तरांच्या कडे एकच वर्ष शिकायला मिळाले. १९७२ साली ते गेलेच. तुमच्या मेमरीला आणि लिखाणाच्या शैलीला सलाम...
I visited JKD one year back. The bus stand frontage is beautiful. But lacks many things. Front age platform is heighted one with out safety railing. Toilets are half constructed. Buses stops anywhere other than platform.
जयश्री जोशी - : मी सदाशिव आपटे यांची मोठी मुलगी. मी 1963 मध्ये 11 वी पास झाले माझा भाऊ शरद व बहीण शैला (बापट) आहे .माझ्या वडिलांचे पूर्वी किराणा मालाचे दुकान होते (आपटे जोशी) मग माझ्या वडिलानी स्वतंत्र दुकान काढले फक्त तांदुळाचे . त्याना तांदुळवाले आपटे म्हणूनच ओळखले जात होते नंतर माझा भाऊ शरद आपटे याने तीच परंपरा चालू ठेवली आता त्याचा मुलगा संदीप हा पण तेच बघतो. आमचे घर पागा शाळेजवळ आहे. माझे मोठे काका भालचंद्र आपटे ते जमखंडीला civil hospital doctor होते त्यांचा मुलगा राजाभाऊ.
***********************
डॉ.सुभाष दोडवाड यांनी लिहिलेल्या आठवणी
जमखंडीच्या हृद्य आठवणी
डॉ.सुभाष दोडवाड, पुणे
विषय : सर्व परिचित प्रसिद्ध स्थळे आणि त्यांचे वैशिष्ट्ये
1) सकाळी आंघोळ झाल्यावर दर्शन घेण्याचे सर्वांचे आवडते ठिकाण: मारुती मंदिर हनुमान जयंतीच्या प्रसंगी होणारी प्रसिध्द ओकळीचे वर्णन आपले आनंद कुलकर्णी यांनी केलेलीच आहेत
2) गुडदाणी व बत्तासे मिळण्याचे एकमेव ठिकाण: मारुती च्या देवळासमोर गाडीत सर्व मांडून बसलेला हलवाई कल्लाप्पा
3) भट्टीचे चुरमुरे, शेंगदाणे, चणे पुठाणे मिळणारे ठिकाण:मारुती मंदिराच्या उजवीकडे असलेली गैबीची भट्टी हाच गैबी दुपारी चार वाजता चुरमुरे व दाण्याची टोपली घेऊन गल्लोगल्ली " चुरमुरे पुठाणे "असे ओरडत फिरणार आणि आपण पावली देऊन शेरभर चुरमुरे आणायचा आणि घरी आईला सांगून फोडणी चे भडंग करायला सांगायचा,चहा बरोबर 4 वाजता सायंकाळी सर्वाना अल्पोपहार.
4) मस्त चविष्ट व खमंग खवा भाजुन तयार केलेले उत्कृष्ट पेढे मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे बाळबा चोपडे
5) ताजी भाजी मिळण्याचे मस्त ठिकाण जुनी भाजी मार्केट, आत बाहेर बसलेले सर्व बागवान, फुल विक्रेते आणि आमचा वर्गमित्र बागवान सर्व आठवते, तो नंतर M.Com करून निपाणीला कॉमर्स कॉलेज मध्ये प्राध्यापक झाला
6) सर्व भांडी मिळणारे ठिकाण - माझा मित्र गणाचारी चे दुकान
7) कपडे खरेदी- श्रीरामाच्या आजोबा व वडिलांचे लाहोटीचे दुकान व पंचे धोतर घेण्यासाठी-
टोपी,जाकीट,धोतर परिधान केलेले साबडेंचे दुकान. . !!
8)घरी लग्न,मुंज असले की, सोने,दागदागिने खरेदी साठी-
तम्मा देसाई यांच्या वडिलांचे दुकान: श्री रामणा देसाई, त्याना तलघट्टी रामण्णा म्हणायचे.
9) आजारपणात उपलब्ध दवाखाने: डॉ. वाटवे, डॉ. परांजपे, डॉ. फडके, डॉ. श्रीपाद देसाई
10) मेडिकल स्टोअर्स: परांजपेंचेच-तिथे- पहिल्यांदा दिसणार म्हणजे श्री. घाणेकर व सुधीरचा भाऊ. त्या शिवाय राजा फडके, मेहता- यांचे औषधाचे दुकान - पोस्ट गल्लीत. . !!
11) घाण्याचे तेल: मारुतीच्या देवळा समोर तेलाचे कोपण्णा चे दुकान.
12) सांयकाळी चौघडा वाजण्याचा एकमेव देऊळ: उमारामेश्वर देऊळ,अमृतमहोत्सवा वेळी (जुलै 2,1956) पूज्य गुरुदेवांनी या बद्दल चौकशी केली होती.
13) सर्व पी.बी हायस्कूल विद्यार्थ्यांचे ग्रुप फोटो व कोणत्याही प्रसंगाचे तसेच लग्नसमारंभात उपलब्ध असणारा एकमेव फोटोग्राफर म्हणजे M C हरकंगी , आडनांव ऐकून आम्ही लहानपणी हसायचो.
14) हरकंगी आणि वर नमूद केलेल्या सर्व डॉक्टरांच्या यादी वरून आठवण झाली,आम्ही दोन भाऊ आई बरोबर पाहिलेले प्रसिद्ध नाटक ' एकच प्याला' रात्री नाटकाला न झोपता आम्ही दोघेही भाऊ त्या वयातही म्हणजे मी सहावीत आणि मोठा भाऊ सुरेश नववीत असेल,
नाटक सुरू झाले रात्री 10 वाजता आणि संपले पहाटे 3 वाजता,
स्थळ अर्थातच एकमेव ठिकाण "सुवर्ण चित्र मंदिर" पात्र परिचय फक्त (आठवतात तेव्हडी) सुधाकर - डॉ. R.P. वाटवे, तळीराम - डॉ. परांजपे, त्यांचा एक दारुड्या साथी - अनंत चिगरी , सिंधू M C हरकंगी. इतर पात्रे आठवत नाहीत
पण संगीत एकच प्याला खूप रंगले होते
15) सुवर्ण चित्र मंदिर म्हंटल की त्या वयात पाहिलेले गाजलेले प्रसिद्ध सिनेमे आठवतात. . . देवानंद, मधुबाला ,यांचा कालापानी - टॅक्सी ड्रायव्हर, चोरी चोरी, आवारा,यहूदी, मधुमती, नागीन,छोटी बहेन
सर्व विद्यार्थ्यांना कन्सेशन रेट मध्ये दाखवलेला - व्ही शांताराम यांचे. दो आंखे बारा हाथ
सायंकाळी 6 वाजता ऐकलेली प्रसिध्द गाणी
मधुमती मधले. . . घडी घडी मेरा दिल धडके, आजा रे परदेसी
कोहिनुर मधले. . . दो सितारोंका मिलन
नागीन: मन डोले
पाहिलेले कन्नड सिनेमे:
रत्नगिरी रहस्य शनिमहात्मे
गुणसागरी-पंढरीबाई, शिवाजी गणेशन (बहुतेक)
कित्तुर चन्नम्मा
मराठी : स्वराज्याच्या सीमेवर, मोलकरीण, चिमणी पाखरे, जगाच्या पाठीवर
16) कॉलेज ला असताना संध्याकाळी भावा बरोबर फिरायला जायचे ठिकाण, अनेक मित्र सोबत पोलो ग्राउंड, दरबार हॉल जवळील उजव्या सोंडेचा गणपतीचे दर्शन आणि
शेज्जी हणमंप्पा, आता तिथे स्टेट बँक कॉलनी झाली आहे.
खिशात पैसे असेल तर नवीन झालेल्या गिरीष नगर येथील काटा मार्केट जवळील कृष्णा रेस्टॉरंट मध्ये मस्त डोसा व इडली सांबार खायचे पंप
जगदीश्वर गुडी ,एखाद्या दिवशी मेलगिरी निंगाप्पा डोंगर चढताना मात्र फार मज्जा यायची
17)त्या रस्त्याला लागल्यावर आठवतंय, आपल्या सगळ्यांचे आवडते- रामतीर्थ आणि दर श्रावण सोमवारी भरणारी छोटीशी यात्रा. या रामतीर्थ यात्रे ला हमखास चारी सोमवारी मित्रांसोबत आम्ही जायचोच, रामेश्वर दर्शना नंतर सिंहाच्या आडव्या मूर्तीच्या पोकळीतून पालथे झोपून बाहेर पाडायचे. एखादा मित्र लठ्ठ असल्यास दोघांनी मिळून ढकलून ओढत बाहेर काढताना खूप मजा यायची. या जत्रेतील खास आकर्षण म्हणजे- साखरेच्या रंगीत बाहुल्या- रामेश्वर चे रथ, राम,लक्ष्मण, सीता,मारुती या छोट्या मूर्ती पण अंत्यत आकर्षक असायच्या.
चुरमुरे, दाणे,शेव घेऊन पिशवीतून घोळायचे, आणि सर्व मित्रांनी मिळून, देवळाच्या बाजुला असलेल्या धर्मशाळेत जाऊन,वर्तमानपत्र अंथरून सर्व भेळ ओतायचे आणि सर्वांनी मिळून फडशा पाडायचे, आणि झाली यात्रा की परत पायी प्रवास. तेथून जाता येता हुलीगवी (वाघबीळ) मध्ये दगड मारायचे, जणू काय वाघालाच मारतोय असे आणि दगड मारल्या वर गुह्यातले वाटवाघुळ बाहेर पडायचे आणि आम्ही सर्व भिऊन पळून जायचो.संध्याकाळी सोमवार सोडणे असल्याने, आईने केलेल्या शेवयाची खीर व पुरणपोळी या वर ताव मारायचा.
19) रामतीर्थ नंतर कल्लळी न आठवलं तरच नवल. दर माहा नवमीला कल्लळी यात्रा,रथोत्सव म्हणजे सर्व जमखंडीकरांचा श्रध्दास्थान. गाडीतून उतरल्यावर प्रथम दर्शन गोविंदाचे , माप डोक्याला घेऊन झोपलेला गोविंदा च्या दर्शनानंतर, सर्वांनीच खास करुन नवदाम्पत्यानी चार दगड घेऊन घर बांधण्याचा कार्यक्रम असायचा, त्या मुळे देवळाच्या भवती आता इतकी घर झालेत की बस! जागा आणि दगड आता शिल्लकच राहिली नाहीत. . या पुढे गोविंदलाच काळजी. . ! गोविंदा. . .गोविंदा. . . गोविंदा. .
पुढे चला पुढे चाला म्हणत पुढे चालायचे बेडी हणमाप्पाचे दर्शनाला, मग पायऱ्या चढून गेलो की महाद्वार , आत गेलो की, व्यंकटेश देवस्थान, प्रवेश करण्या आगोदर गरुड स्तंभ व गरुड मूर्ती यांचे दर्शन घ्यायलाच हवे
देवळात जाऊन नवस फेडून मंगळारती करायची व पुजाऱ्यांकडून नारळ फोडून बाहेर आलो की, आचार्यांन कडून तीर्थ प्राशन करायचे
पुढे प्रदक्षिणा- पहिलं देऊळ तूगलेप्पाचे , नवदाम्पत्यानी आपला पाळणा लवकर हलविण्या साठी येथील पाळण्याला हात लावणे, आपण झोका देतोय म्हणून तूगलेप्पा. . कानडीत तूगू म्हणजे पाळणा हलवणे म्हणून तो देव लवकर घरी पाळणा हलण्या साठी असावा.
तूगलेप्पा की जय
पुढे बोळातले छोटस राम पंचायतन दर्शन
राम लक्ष्मण सीता मारुती की जय
शेवटी आला वराह मूर्ती, देवळा समोर थांबलो की उजवीकडे दिसते ते स्वयंपाक गृह व छोटी धर्मशाळा, हे स्वयंपाक घर म्हणजे तिथे जत्रा झाल्यावर व्यंकटेशा ला गोपालकावला करून द्वादशी ला गरमागरम काढा वाटला जातो ते
त्या काडयाला लोकांची तोबा गर्दी असायची.
मला आठवतंय की , मी ही लहानपणी एक पेला घेऊन " बाबाचारी सवंदी" हे काढा करणारे सेवक यांच्या कडून उंचावरून काढा वाटताना मी हात जबरदस्त पोळून घेतलो होतो.
नंतर गरम सुंठ गूळ घातलेला काढा पितांनाची मजा कांही औरच असायची
नंतर तेथून बाहेर पडल्यावर गावाकडे मार्गस्थ व्हायचे
उजवी कडे डोंगरात लहान मोठे दगडच दगड आहेत म्हणून त्या गावाचे नाव कल्लळी म्हणजेच दगडाचे गाव . . !
मित्रांनो म्हणा
" गोविंदा गोविंदा गोविंदा "
आता परत फिरायचे
आताच्या जमखंडी कडे प्रथम गांव लागते ते " मदरखंडी ", गुरुदेव या गावाला म्हणायचे " मधुरखंडी " ते निंबाळाचा अर्थ सांगायचे " निर्मल बाळ" काय सुंदर विश्लेषण गावांची करायचे पहा.. . . !!
रस्त्याला लागल्यावर माझ्या मोठया भावाला (सुरेश) रस्त्याच्या क्रॉस च्या टपरीवर चहा हवाच असायचा
एक खारा (चुरमुरीचे) आणि एक केटी-म्हणजे स्पेशल चहा
आपले कटिंग नव्हे बर का .....!!
केटी चा स्वाद कांही औरच. .!
19)पुढे रस्त्याच्या शेवटचं गाव बसवाणाचे कडपट्टी
मित्रानो कडपट्टी जत्रेचे वैशिष्ट्य वेगळेच आहे
तिथल्या शंकराचे नव्हे तर त्याच्या पुढे ठाम मांडून बसलेल्या नंदी च बर का. .! जगात हे एकमेव देऊळ आणि जत्रा असेल की तिथे शंकराची नव्हे तर नंदीची म्हणजेच बसवांण्णाची जत्रा भरते,म्हणून खिलारी बैलांची आणि खोडांची इथे प्रचंड प्रमाणात खरेदीविक्री असायची. त्या वेळी निदान पाचशे कोटींची तरी उलाढाल असायची असे आमचे तीर्थरूप सांगायचे .
परशुराम उद्याना पासून कमीतकमी पाच किलोमीटर पर्यंत दुतर्फा बैलच बैल असायचे. रस्त्याच्या दुतर्फा शंभरावर तंबू हॉटेल्स आणि पन्नासा च्या वर उसाचे गुर्हाळे असायचे. वडील आम्हा भावंडांना उसाचा रस प्यायला घेऊन जायचे,
मित्रानो या जत्रेचे नाव " आमराई जात्री"
20) जमखंडी जवळील अजून एक जत्रा म्हणजे नृसिंह लक्ष्मी ची शुर्पाली यात्रा. नृसिंह पौर्णिमे दिवशी,आम्ही लहानपणी जकनूर रस्त्याला चालत जायचो,आणि देवळाला जायला कृष्णा नदीत होडीत बसून पैलतीर गाठायचे.आता तिथे पूल झाला आहे म्हणे. .! बारा वाजता पूजा अर्चा झाल्या नंतर, देवाला आमटी भात आणि हुग्गीचे (गव्हाची खीर) नैवेद्य असतो, त्या नंतर देवळा समोर पंक्तीत बसून ,जमिनीवर पत्रावळी मांडून, सर्वाना प्रसाद मिळतो मिळायचा. . . . . .
क्रमशः. . . . !!!
जमखंडीच्या हृद्य आठवणी, भाग २
डॉ. सुभाष दोडवाड पुणे:
21) यात्रा पुराणानंतर आपल्या मारूती मंदीर जवळच्या अजूनी 3-4 ठिकाणांची आठवणी पाहू.
अ) मारूतीच्या देवळाजवळच्या यादवाडकर वाडा लाईन. वाड्याच्या डावीकडे रस्त्यावर पसरलेला संगप्पा मुरगोडचा (आण्णा मुरगोडचा धाकटा भाऊ) All Plastic बर्तनचे दुकान जमखंडीतले पहिले वाहिले - मग, बादल्या, सोपकेस, हंगर्स, हवाई चप्पल पर्यंत, and what not!
ब) डावीकडे पुढे गेल्यावर दर गुरूवारी भरणारा केळ्यांचा पानांचा हिरवागार बाजार. सणासुगीला लागणारे केळीच्या पानांचे गुंडाळलेले पुडे किंमत 12 आणे. श्रावणात त्या पानांवर बसून सायंकाळी श्रावण सोमवार सोडतांना जेवणात त्या हिरव्यागार पानावर शेवयाचे खीर, पुरण, पोळी दूध, कटाची आमटी भात या जेवणाची मजा औरच. त्या केळीच्या पानाचे पुडे आणि आठवड्याच्या ताज्या भाज्या आणण्यासाठी वडिलांच्या बरोबर हमखास मी जायचो.
क) यादवाडकर वाड्याच्या उजवीकडे सरकलो कि बसप्पा गवळीच चहा हॉटेल. मे च्या सुट्टीत आईस्क्रीम मिळण्याचे एकमेव ठिकाण. तेही आईस्क्रिम म्हणजे पक्का Hand Made. लाकडी Pot च्या आतल्या बाजूला आवरणात बर्फ आणि मीठ घालून मधल्या भांडीत (थर्मास टाईप) गोड दूध आणि Vanila घालून बाहेरच्या बाजूच्या एका हँडलला धरून तासभर गरा गरा फिरविल्यावर तयार होत होता आईस्क्रीम. हे आईस्क्रीम आण्णां (म्हणजे माझे वडील) आम्हा भावंडांना मे सुट्टीत वार्षिक परीक्षेचा निकाल लागल्यावर बक्षीस म्हणून येथे आईस्क्रीम खायला घेऊन यायचे. मज्जाच मजा!
ड) पुढे उजवीकडे सरकल्यावर कृष्णा आणि रामभाऊ टेंबुर्जींचे कागद, वह्या, पेन, पेन्सिल, वर्तमानपत्र, कॅलेंडर मासिक मिळण्याचे दुकान, एकमेव ठिकाण.
22) आता आपण पुढे चालु सुवर्ण चित्र मंदीराकडे या थेटरला लागणाऱ्या सिनेमांचा गल्लोगल्ली प्रचार करण्याची त्या वेळची नाविन्यपूर्ण पध्दत आताच्या पिढीला हे काहीच माहित नसावी.
एक, दोन चाकी गाडी, गाडीच्या दोन्ही बाजूला Tilting कापडी Banners त्या बॅनरच्या एका कोपऱ्यात त्यावेळी भिंतीवर लावली जाणारी पोस्टर उदा. ‘‘मधुमती’’ कापडी बॅनरवर नट नट्यांची नावे, ती ढकलायला एक माणूस, मागे कर्णा किंवा माईक घेऊन ओरडणारा एक मुलगा ‘‘सुवर्णचित्र’’ मंदिरात आजपासून नवी कोरी कॉपी (आधी मधी न तुटणारी film), दिलीपकुमार, वैजंती माला ह्यांच्या उत्कृष्ट अभिनय पूर्ण सिनेमा 3 खेळ, दुपारी 3, सायंकाळी 6, रात्री 9. रोज हाऊसफुल्ल, अत्यंत प्रसिध्द गाणी असे म्हटलं की गाडीच्या पुढे असलेला, खंडू क्लोरोनेटवर ते गाणे वाजवायचा - घडी घडी, मेरे दिल धडके हा खंडू, रंगानी काळा कुळकुळीत ढेर पोट्या परंतु त्या Chloronate वर ते सुरेख गाणी वाजवणारा ‘‘लाजवाब’’. हाच खंडू पुढे पांढऱ्या Uniform व फौजदार style टोपी घालून सर्व लग्न, मुंजी समारंभात त्यांच्या टीमसह हजर. त्यावेळची सर्व गाणी त्याला तोंडपाठ. ही गाडी गल्लोगल्ली फिरायची जाहिरातीसाठी. शेवटी तो मुलगा ओरडायचा दोन्ही भाषेमध्ये कानडी व मराठी, तिकीट दरगळू 4 आणे नेला (जमीन), 8 आणे (बाकडा) 1 रू. खुर्ची मंहडीमेले म्हणजे माडीवर, आहे कि नाही मजा.
23) i) सुवर्ण चित्र मंदिरच्या समोरच्या बाजूस श्री.कै. शामराव वाटवे यांचा Philips Radio Shop कर्नाटक रेडिओ डिलर्स. जमखंडीतला एकमेव रेडिओ दुकान, रिपेअर व विक्री दोन्ही एक हाती. माझ्या MBBS नंतर नोकरी लागल्यानंतर 1970 साली Philips Transistor त्यांच्याकडून विकत घेतला. आणि माझ्या आईला भेट दिली. सकाळी मराठी भक्तीगीते ऐकायची तिची इच्छा पूर्ण झाली.
ii) दुसरे त्यांच्या बाजूला असलेला हिमालया कोल्ड्रिंक्स दुकान, सोडा लेमन आणि गोटी सोडा बाटलीसाठी सुप्रसिध्द मालक माझा मित्र नदाफ. सणा सुगीला खास दिवाळीच्या वेळी भरपेट फराळ व जेवण झाल्यावर सायंकाळी पोट हलक करायला आम्ही तिघे भाऊ मी माझे दोन्ही मोठे भाऊ सुरेश आणि जयंत हमखास या दुकानाला भेट देणार. त्या गोटी सोड्याचे वैशिष्ट्ये म्हणजे त्यात भरलेला गॅसयुक्त सोडा वॉटर, वर एक काचेची गोटी घट्ट बसविलेली. त्याला दाबून खाली एका रबर कॉर्कनी खाली जोरात ढकललेकी फट् आणि फस् म्हणून आवाज यायचा एक ग्लासमध्ये मीठ, लिंबू, चमचा. त्यात हा फेसाळणारा द्रव ओतला की ग्लास फुy Effervesce म्हणजे भरपूर फेस यायचा, पोटात हे द्रव ढकलले की तीन-चार डरा डर ढेकर आले की पोट झाले हलके, आहो हे Feeling औटघटकेचे.
i) बाहेर पडलो कि सायन्स बाबूच्या पान दुकानांतून बाबूकडून मस्त मसाला पान तोंडात घातला कि सणाची खरी मजा सफल संपूर्ण.
ii) आहो हिमालया कोल्ड्रिंक्सच्या समोर करमूसे टेलर शॉप त्याला विसरून कसे चालेल. आपल्या हायस्कूल आणि कॉलेजमधला जीवनातला कपडे शिवणारा एकमेव Expert Tailor. जमखंडीत कापड आणि (पँट व शर्टची) खरेदी आणि शिलाई उपलब्ध असण्याचे एकच ठिकाण.
२४) पुढे पाय मोकळे करण्यासाठी पुढे निघालो की पिलू सरकारांचा दुमजली सुबक बांधकामाचा वाडा, पुढे अशोक स्तंभ आणि हायस्कूल रोडला लागलो की उजवीकडे हायस्कूलच्या समोर रमाबाई साहेब वाचनालय. आपल्या श्रीमंत राजे आप्पासाहेब पटवर्धनांच्या पत्नीचे स्मरणार्थ बांधलेली लायब्ररी आणि याच नावाने पुण्यातील एस.पी. कॉलेजच्या डावीकडे बांधलेले रमाबाई हॉल. आपल्या राजे साहेबांनीच बांधलेला. इ.स. 1920 साली सप महाविद्यालयाच्या इमारतीच्या बांधकामाला त्याकाळी राजेसाहेबांनी २ लाख रू. देणगी दिली होती. सर्व वर्तमानपत्रे, मासिके सुट्टीत वाचावयास मिळणारे Timepass चे उत्कृष्ट ठिकाण आणि उजवीकडे पुस्तक संग्रहालय म्हणजे लायब्ररी. त्याचा सांभाळ करणारा लंगडा बाळू. कानडीत आम्ही त्याला कुंट बाळू म्हणायचो. (विचारा त्याचा पाय पंगू होता Polio affected) मराठी आणि कन्नड कादंबऱ्या वाचून आम्ही दोन्ही भावंड्यांनी फडशा पाडल्या. दिवाळी आणि मे सुट्टीत नांव टाकून पुस्तके घरी न्यायचो. मराठीतले ना.सि. फडके, व.पु. काळे, पु.ल. देशपांडे, वि.स. खांडकर आणि गडकरी यांचे सर्व कांदबऱ्या आणि नाटके व कन्नड मधील अनकृ, तरासु, व्ही.के. गोफाक, पुराणिक व बसवराज कट्टी मनी, त्रिवेणी या सर्व लेखकांच्या कादंबऱ्या वाचून काढल्या. त्या librarian बाळूला मी कधीच विसरू शकत नाही.
25) शेवटची आठवण आपल्या सर्वांची आवडती शाळा, म्हणजेच माध्यमिक शाळा. स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रसिद्ध असलेले आज मितीस ज्या इमारतीला जवळजवळ १५० वर्ष झाली असे परशुराम भाऊ हायस्कूल अर्थात P B High School, Jamkhandi. या शाळेतले आपले सुप्रसिद्ध तत्त्वज्ञानी, संतश्रेष्ठ गुरूदेवांनी इ.स. १८९८ पासून या शाळेत प्रवेश घेऊन मॅट्रिकला संस्कृतमधील शंकरशेठ स्कॉलरशिप मिळवली, ती शाळा.
या शाळेतील माझ्या आठवणी आठवून हा लेखन प्रपंच पूर्ण करतो.
माझ्या या हायस्कूलमधील कालावधी १९५८ ते ६१. मी १९६१ साली SSC पास झालो. १९६० मध्ये आमच्या P B High School चे ४ विद्यार्थी त्यावेळच्या मैसूर राज्याच्या SSC Board मध्ये पहिल्या १० मध्ये चमकले केवढा जाज्वल्यपूर्ण इतिहास पहा मित्रांनो.
१) मेरिट नं. २ – रवी काळे (मराठी मीडियम)
२) मेरिट नं. ४ – नंदा आपटे (मराठी मीडियम)
३) मेरिट नं. ६ – रमेश देशपांडे (कानडी मीडियम)
४) मेरिट नं. ८ – श्री हुणशीकट्टी (कानडी मीडियम)
या हायस्कूलचे नाव कर्नाटक राज्यात त्यावेळी खूप गाजले.
आता हायस्कूलच्या प्रवेशपासून अनेक आठवणी आहेत. आत मेन गेटमधून प्रवेश करताच आपल्या हायस्कूलच्या मधोमध असलेल्या ड्राईंग हॉल आणि समोरील गोलाकार उद्यान. आत प्रवेश केल्यावर ड्राईंग हॉलच्या मधोमध समोरून दिसणारा पूज्य गुरूदेवांचा पुतळा या उद्यानाचा मधोमध असलेल्या आवळ्याचे झाड माझ्या अजून आठवणीत आहे. मधल्या सुट्टीत झाडाखाली पडलेला हे आवळे निवडून खाण्यातली मजा अजून आठवते. या उद्यानाचा व शाळेतील सर्व झाडांचा राखण करणारा भीमा माळी अजून आठवतो.
पुढे ड्राईंग हॉलमध्ये प्रवेश करताच समोर भिंतीवर सजवलेली पूज्य गुरूदेव रानडेंचा तैलचित्र हॉलमध्ये डावीकडे आपले जमखंडीचे पहिले संस्थानिक व आपल्या हायस्कूलचं सुबक इमारत निर्माण करणारे श्रीमंत रामचंद्र आप्पासाहेब पटवर्धनांचा अर्धपुतळा. ड्राईंग हॉलमधून बाहेर पडताच दोन्हीकडे पाच पाच वर्ग. मला माझा वर्ग अजूनी आठवतो. दोन शिफ्टमधील शाळा, सकाळी ७ ते १२ आणि दुपारी १२.३० ते ५.३० ड्राईंग हॉलच्या बाहेर डावीकडे शाळेची मोठी घंटा. पिरियड संपलेली घंटा वाजविणारा शंकर शिपाई अजूनी लख्ख आ़़ठवतो. शाळेच्या मागील बाजूस असलेला मोठा ग्राऊंड, शाळेची प्रार्थना व स्पोर्टस् गाऊंड, या ग्राऊंडमध्ये तसेच आपले नाव गाजविणारा खेळाडू श्रीहरी आपटे अजूनही आठवतो. कबड्डी, खोखो, फुटबॉल सर्व खेळ ह्याच मैदानात, तसेच खेळण्यास लागणारे बॉल, नेट पुरविणारा रामा अजूनही स्मरणात आहे. जिमखानात खोलीत मधोमध असलेला छोटाखानी कुस्तीचा आखाडा हे काही मुलांची कुस्तीची आवड भागवत होते. समोर बॉस्केटबॉल ग्राऊंड व बाजूला व्हॉलीबॉल नेट व खेळ अनेक मुलांनी येथे खेळून आपले प्राविण्य दाखविले.
वर्ग खोल्या संपल्यानंतर डावीकडे कॉमर्स हॉल, कॉमर्स हॉलच्या डावीकडे सायन्स हॉल व सायन्स बाबू आणि Chemistry & Physics Practicals केलेली जागा आणि शिक्षकांची आठवण अजूनी ताजी आहे. कॉमर्स हॉलच्या बाजूला उजवीकडे विराजमान ऐतिहासिक वडाचा झाड. त्या झाडाच्या पारंब्या धरून मित्राबरोबर नागपंचमीच्या वेळी घेतलेला झोका अजूनी आठवतो.
आता आपण सर्व शिक्षकांची नावे घेऊ. आम्हाला पहिले तीन वर्षे हेडमास्तर आपसंगी सर होते. शेवटच्या वर्षात के.बी. जोशी सर. स्पोटर्स म्हटल की पांढरे पँट आणि टी शर्टमधले पळणारे ए.टी. पाटील सर, आम्हाला शिकविणारे श्री. सौदी, अठणी, जेरे, आर.जी. जोशी, ड्रॉईंग टीचर अग्निहोत्री व संस्कृतचे पटवर्धन व टेरदाळशास्त्री सर, इंग्रजी शिकविणारे माझे वडील दोडवाड सर (निवृत्तीनंतर दहा वर्षे इंग्रजी शिकवून माझ्या वडीलांनी अनेक विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भवित्तव्य घडविले.) तसेच करजगी, सायन्सचे तळेगाव व शेट्टी सर, मराठीचे तात्यासाहेब जोशी पाठक सर, पेडणेकर, वाईकर, कन्नडचे सावकार, बीजगणित शिकविणारे कवटगी सर एवढी नावे आठवतात.
माझ्या वर्गात (मी कानडी मीडियम) माजी उपराष्ट्रपती व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.डी. जत्ती यांचे चिरंजीव दानप्पा, मुधोळचे त्यावेळचे आमदार येडहळ्ळी देसाईंचा मुलगा कुमार देसाई. हुल्याळकर गल्लीतले आठ ते दहा मुले मुली माझ्या वर्गात होती. हुल्याळकर गल्ली म्हटले की गणिताचे ट्युशन घेणारे गुरू मास्तर व होळगी मास्तर हे आयुष्यातील अविस्मरणीय शिक्षक. याशिवाय माझ्याबरोबर मराठी मिडीयमचे माझे वर्ग मित्र दिलीप पेंडसे, आनंद घारे, प्रमोद जोशी (तात्यासाहेबांचे चिरंजीव), कै. दीपक रास्ते, वासु आपटे, राजा पाठक हे आठवणीतले काही नावे.
या सुंदर सुबक इमारतीला व आपल्या मातृ संस्थेला त्रिवार वंदन. आपल्या सर्वांचे व पूज्य गुरूदेव रानड्यांचा व माझ्या जन्मभूमीला प्रणिपात करून माझ्या आठवणींचा बाडविस्तारा आवरतो.
हा लांब लचक आठवणी माझ्या जमखंडीकर मित्रांनी वाचल्याबद्दल धन्यवाद.
(या लेखनाचा पूर्वार्ध सोशल मिडीयावर प्रसिध्द झाल्यावर जमखंडीस्थित आणि कर्नाटक महाराष्ट्रातील अनेक मित्रांनी त्यांची बालपणीच्या आठवणींना उजाळा करून दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला. त्या सर्वांना प्रणाम.)
(सरतेशेवटी या लेखनाचा पूर्वार्ध टंकलिखित करून दिल्याबद्दल माझा भाचा आनंद औरसंग, रा. कोल्हापूर व पुण्याचे माझे मित्र गौतम गेलडा व त्यांचे प्रेसमधील सहाय्यक लक्ष्मण व्यवहारे यांचे हृत्पूर्वक आभार)
डॉ. सुभाष दोडवाड, पुणे
----
या सविस्तर लेखावर आलेले प्रतिसाद :
दिलीप पेंडसे
जमखंडीचे अवती भवती,दोन मोठे साखर कारखाने..एक पडसलगीचा जमखंडी शुगर्स,शिद्दू न्यामगौडाचा,दुसरा शिद्दापूरचा गुडगुंटी यांचा.यामुळे आजुबाजूचे खेड्यात संपन्नता आली.संपन्नते बरोबर शिक्षण संस्था उभ्या राहिल्या,आरोग्य केंद्रे खूप झाली.रिंग रोड झाला.यापण वर्तमान प्रगतीच्या काही द्योतक आहेत.मी जरी वृद्ध असलो तरी,आपली जमखंडी फळावी फुलावी,बहरावी.नाविन्याचा भविष्याचा वेध घेत पुढच्या पिढ्यांनी ती नावारूपास आणावी असेच मला वाटते..
नित्यनूतन चिरपुरातन!
डॉ.सुभाष तुझ्या जमखंडीच्या आठवणी फार हृद्य आहेत रे.
--
श्रीरंग घारे
वावा जमखंडीची सफर झाली.पुर्वीचि अनुभवलेली सर्व ठिकाणे व यातल्या यात्रा यांची आठवण जागी झाली. कल्लदहळ्ळी कल्हळीची जत्रा रामतीर्थची श्रावणीसोमवारची जत्रा
कडपट्टी बसवणं गुडी शुरपाली यात्रा अगदीस्वता: आत्ताच जाऊन आल्यागत वाटते. खुप खूप रम्य होते ते दिवस . मिरगिरी लिंगप्पाला गेलो की दगडा खालचे विंचू पकडून करदोटृयाच्या दोरात माळ करणे हा उद्योग असे. आठवणी च आठवणी. छान वाटलं.
वा वा आठवणींच इतकं सुंदर माहितीपूर्ण सविस्तर लिखाण वाचून खूप खूप आनंद झाला. मी तर मनोमनी लगेच जमखंडीसच पोचलो. आपण वर्णन केलेल्या सर्व ठिकाणी फेरफटका मारला. ही अदृश्य पण दृश्यसम भेट भावली मना. आपणास खूप खूप धन्यवाद.
सर्वांच्या आठवणीत मलाही एक प्रश्न विचारायचा आहे. शाळेत जिमखान्या जवळ बास्केट बॉल, व्हालीबॉल खेळता येत असे तसेच शाळेच्या इमारतीला लागून एका छोट्या मैदानात सिंगल बार डबल बार जंम्पींग बार होता व इतरही तेथे खेळत असू. पलीकडे परसप्पाची विहीर होती मी सत्तेचाळीस ते ** एकोणीसशे पन्नास सालची स्थिती सांगतोय
नंतर हे खेळ व मैदान उपलब्ध नव्हतं का? कोणीच त्याचा उल्लेख न केल्याने प्रस्तूत प्रश्र्न.
मल्लखांब वरून आठवलं माझा मित्र राजा आपटे दसरंग करत वर चढण्यात पटाईत होता.त्याच्या इतकं चांगलं कधी जमलंच नाही.
रवींद्र आपटे : तुम्ही लिहिलेल्या सर्व गोष्टी होत्या. रोमन रींगस् पण होत्या. Baseballचा वेगळ्या धाटणीचा ball मी शाळेत प्रथम पाहिला. Baseball मात्र कोणी खेळत नसे. नंतर शाळेच्या विस्तारात सर्व गोष्टी गायब झाल्या.
राजू वाटवे : तुम्ही म्हणता या सर्व सोयी आम्ही दहावी पास झालो, १९७४ साली पण होत्या.
गेल्या दहा वर्षांतील डेव्हलपमेंट. २०१३ साली श्रीकांत कुलकर्णी (रावबहादूर कुलकर्णी यांचा मुलगा) हा भारतीय जनता पार्टीचा आमदार म्हणून निवडून आला. त्यांने हायस्कूलच्या या जागेत (तालीम खाना वगैरे पाडून) आमदार निधीतून एक मोठा असेंब्ली हॉल बांधण्याचा प्रकल्प सुरू केला. त्याला गुरुदेव रानडे यांचे नाव देणार होते. प्रोजेक्ट सुरू झाला, पण पुढे २०१८ साली त्याची आमदारकी गेली आणि निधी अभावी प्रोजेक्ट अर्धवट बांधलेल्या अवस्थेत आहे....
तालीम ही गेली हालही गेला। हाती आला अर्धवट हाल😄😄😄
दिलीप पेंडसे : पहिली चुकीची दुरुस्ती आमदार..माजी आमदार श्रीकांत कुलकर्णी हा पडसलगीचा,पण तो रावबहादूर कुलकर्णींचा मुलगा नव्हे. दुसरे अशा अपूर्ण वास्तू सकारणच तशा राहतात.न्यामगौडाना रानड्यांचे नाव मान्य नसावे.पण मी म्हणतो..सिद्धेश्वर स्वामींचे नाव द्या काही हरकत नाही!
--
हेमंत : 🙏 दोन्ही भाग खूप छान
अत्यंत्य बारीक निरीक्षण आणि मनाला भावणारे शब्दांकन👌
--
राजू वाटवे
काका तुम्ही पाठविलेल्या आठवणी काल सकाळी शांतपणे वाचल्या. अभिप्राय खालील प्रमाणे
१ आठवणी आणि लेखन सुंदरच
२ तुम्ही माझ्या पेक्षा सोळा वर्षांनी मोठे असल्याने तुमच्या बालपणीच्या आठवणी नवीन आणि मजेशीर वाटल्या. उदा. एकच प्याला नाटक, तुमच्या वेळचे गाजलेले चित्रपट
३ आमराईची बैलांची जत्रेशी मी बऱ्यापैकी जोडला गेलो आहे. कारण त्या जत्रेत आमचा रेडीओचा स्टाॅल असायचा आणि व्यापार पण चांगला व्हायचा.
पुढील भागाची वाट पहात आहे....
१ कडपट्टीची जत्रा अजूनी दरवर्षी भरते
२ शूरपाली जत्रेसाठी आम्ही लहानपणी कृष्णा नदी नावेतून क्राॅस करून जायचो. आता नदीवर पूल झाला आहे...
---
आनंद घारे
सुभाषने तर सिक्सर मारला. मी सुभाषचा क्लासमेट. आमचा जमखंडीतल्या वास्तव्याचा काळ एकच. मी विसरलेल्या अनेक आठवणींची छान उजळणी झाली. शूरपाली बरेच दूर होते, चालत जाण्यासारखे नव्हते, पण कडपट्टी तर पोलोग्राउंडच्या लगेच पलीकडे होते. आता त्याचा जमखंडीत समावेश झाला आहे असे ऐकले.
सुभाषने सगळ्या आठवणी खूपच सविस्तर आणि छान रंगवून सांगितल्या आहेत. माझे शाळेतले दिवस डोळ्यांपुढे उभे राहिले. शाळा सोडल्यानंतरही तो अनेक वर्षे जमखंडीला जाऊन येत होता असे दिसते.
पी.बी.हायस्कूलच्या १९६० च्या बॅचमधली चार मुले बोर्डात पहिल्या दहांमध्ये आली होती. त्या वेळी फक्त मुंबई राज्यातून कर्नाटकात गेलेल्या बेळगाव, धारवाड, विजापूर आणि कारवार या चार जिल्ह्यांसाठी एक वेगळे एसएसएलसी बोर्ड होते. मागील बॅचच्या यशामुळे आमच्या १९६१ च्या बॅचकडूनही अपेक्षा केल्या जात होत्या. आमच्या कुमशी सरांचा मुलगा त्या वर्षी बोर्डात दहावा आला. मला टोटलमध्ये एक मार्क कमी पडल्यामुळे माझा नंबर आला नाही. पण मला मिळालेल्या मार्कांवर नॅशनल स्कॉलरशिप मिळाली.
--
उज्वला : कडपटटी जत्रेला मी पण दरवर्षी जात असे. तेथे साधू बाबा होते. ते भविष्य सांगायचे
--
Abhipray from Pandurang Kulkarni SSS 1963 batch...
वा , डॉ. सुभाष, लई भारी. तू Medical Doctor आहेस असे वाटतच नाही. मराठीतीलच Ph D पण केली का? Fun apart, great article.
--
आनंद कुलकर्णी:
डॉ.सुभाष दोडवाड सरांनीजमखंडी परिसरातील जत्रा आणी उत्सवांच्या आठवणीना मस्त उजाळा दिला.सार्या जत्रा व देवस्थाने मी शाळा व हायस्कूल पेक्षा जास्त मन लाऊन enjoy केली आहेत.त्यामुळे त्या आठवणी खूपच रंजक वाटल्या.
माझी कडपट्टी जत्रेतील एक आठवण माझ्या मनाला ढुशी देत होती.सांगावी की सांगूनये या संभ्रमात मी होतो.शेवटी ठरवलं टाकू सांगून.हुईल ते हुईल.
कडपट्टीच्या जत्रेत खूप मोठा जनावरांचा बाजारभरायचा. आम्हाला त्यातले काही कळायचे नांही.आम्ही निरूद्देश भटकायचो
तिथे जत्रेसाठी बनवलेला जंगी कुस्तीचा आखाडा असायचा.लांबलांबच्या खेड्या पाड्यातून नामवंत मल्ल कुस्तीसाठी येत.त्यांच्या कुस्तीपूर्वी किंवा नंतर इतर पैलवानांच्या कुस्त्या होत. एखादा इच्छुक पहिलवान आला तर त्याला
आखाड्यातून फिरवीत व त्या पैलवानाशी टक्कर घ्यायला कुणी तयार आहे का?अशी लाऊड स्पीकरवर घोषणा कम विचारणा होई.कुणीतरी तौडीचा बहाद्दर येईच.त्यानां तयारीला थोडा वेळ दिला जाई.त्यावेळात बारक्यांच्या कुस्त्या रंगत दिवभर हा उपक्रम चाले.अगदी फुकट.
मला नेहमी वाटायचे की आपणही कुस्ती करावी.लाल मातीत रंगून जावे. शड्डू ठोकतानाचे व चांदीची गदा उंचावल्याचेआपले फोटो असावेत.
पण लगेच दुसरे मन म्हणे अरे वेड्या अस कांही करू नकोस.तू कांही पैलवान नांहीस,तू कुस्ती शिकला नांहीस जर एखादा ग्रामीण पैलवान तुझ्यासमोर येऊन उभा राहिला तर काय करशील?गदा हार तुरे राहतील बाजूला
फुकट हाडं मोडून घेशील. तेही खरं होत.
मी माझ्या एका मित्राला माझी अडचणसांगीतली. तो म्हणाला,"अरे असं नसतं कुणाची तेकुणाशीही कुस्ती लावत नांहीत. दोघांची संमती असेल तरच कुस्ती लावली जाते.
मी त्या मित्राला विचारलं की समज
आपण दोघे एकमेकांच्या संमतीने
कुस्ती खेळायचं ठरवलं तर ते आपल्याला देतील का रे कुस्ती खेळायला? तर तो म्हणाला,हो नक्की!
आम्ही दोघे त्या Announcer कडे गेलो.आमची कुस्ती खेळायची इच्छा त्याला सांगीतली.
त्याने आमची नांवे व वजन उंची नोंदवून घेतली.व म्हणाला ,"आखाड्यातल्या कुस्त्या संपल्या की तुमचं नांव जाहीर करतो. तोवर तुम्ही कपडे काढून लंगोट बांधून तयार रहा व नंबर येईपर्यंत खुर्चीवर बसून रहा.मी बसून राहिलो. तयार व्हायचा प्रश्र्नच नव्हता.हापचड्डी शाखेची शर्ट वबनीयन काढली की मी कुस्तीला तयार .लंगौट बांधलेला होताच.
जोडिदारही तयार झाला मी स्वप्नपूर्तीच्या उबरठ्यावर उभा होतो.पन्नाससाठ ग्रामस्थ खुर्चांवर बसले होते.
आम्ही दोघेही गोल गोल धावत होतो.अनाउन्सरने माईक खाली ठेवला वतो आखाड्यात आला व वआम्हां दोघाना हाताला धरून अतीशय प्रेमाने बाहेर काढले.त्याने विचारले,"बाळानो कसले लंगोट घातलेत हे?इतके नाजुक? अरे यातूनतुमचं सगळं पौरूष बाहेर येतय. लोकानी काय पहायचं?
आम्ही दोघानी लंगोट टाईट केले.पण तो म्हणाला ,.तुम्ही आपल्या हाप चड्या घाला वकुस्ती खेळा.
तो आमच्या जंगी कुस्तीची Announcement करायला निघून गेला.कुस्ती झाली,. बरोबरीने सुटली.ही माझी पहिली व शेवटली कुस्ती.
कडपट्टी म्हणताच सारं आठवलं.कुस्तीतील माझा जोडीदार होता अशोक व्यंकटेश गोटखिंडी.दोन वर्षापूर्वी स्वर्गस्थ झाला.
आनंद कुलकर्णी
डाॅ.सुभाष दोडवाड सर आपल्या जमखंडीच्या आठवणी वाचल्या.मन अगदी भरून आलं. मला वाटायचं की,माझीच memory strong आहे.पण आपल्या लेखानी माझा भ्रम दूर केला. आपले मनापासून आभार व अभिनंदन.
आनंद कुलकर्णी.
---
वर्षा कुमठेकर : सुभाषदादा जमखंडी आठवणी अप्रतिम. मी पण माझ्या मैत्रिणी, ना पाठवल्या, माहिती अगदी सविस्तर. शब्दांकन छान! आणि, स्मरणशक्तीचे कौतुक तर करावे तेवढे कमीच. सर्व जमखंडी ग्रुप ला तुम्ही जमखंडी मध्ये फिरवून आणलत. आणि त्यांचं बालपण त्यांना परत एकदा एंजॉय करु दिलत असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. खूप खुप धन्यवाद.
--
सुरेश फाटक
खरचं जमखंडी आणि आसपासच्या सर्व ठिकाणांची चांगली सफर डॉ. दोडवाड यांनी घडवून आणली.रामतीर्थ कल्लळी कडपट्टी या सगळ्या जत्रा देवस्थानं या ठिकाणी फिरून आल्या सारखं वाटलं आणि सगळी उजळणी झाली. इतकं सगळ आठवायचा प्रयत्न केला असता तरी आठवलं नसतं.संगित नाटकं पहाटे पाच पर्यंत चालायची. कळल्लळीला डोंगरातून जातांना भोरंग्या पकडुन काड्यापेटीत ठेवून त्यात थोडा तुतीच्या झाडाचा खायला त्यात ठेवायचा,मजा यायची.सगळं आति आठवतयं.पुन्हा एकदा डॉ. दोडवाडानां धन्यवाद
--
रवींद्र आपटे
दोडवाड यांचा लेख छान आहे. माझ्या स्मुतीला तपासुन पाहण्या साठी काही प्रश्न / उल्लेख.
मी ६१ मध्ये Highschool ला आलो. ड्रॉइंग हॉल म्हणून ज्याचा उल्लेख केला आहे ती स्टाफ रूम होती. ड्रॉइंग हॉल साठी नवी इमारत वडाच्या झाडा पलीकडे नुकतीच झाली होती. शाळेतील पटवर्धन यांचा पुतळा पूर्णाकृती होता असे वाटते. पुतळ्यातील पटवर्धन पुस्तकांच्या चवडीवर हात ठेवून ऊभे होते. (खाली छायाचित्रे विभागात फोटो दिला आहे)
दोडवाड सर यांचा शिकवण्याचा लाभ ६ महिनेच मिळाला. व्यायाम शाळे समोर ३ Baobab ची झाडे होती. मला त्या झाडांच फार आकर्षण होते. मोठी लाल फुले उलटी लटकत असत. बाटलीच्या आकार असलेला प्रचंड बुंधा व टोकाला फांद्या इतरत्र न दिसणारे व बाओबाब असं विचीत्र नांव असलेलं झाड
अनिल पोंक्षे
बरोबर आहे🤔 स्टाफ रूम मध्यभागी. ड्रॉइंग हॉल वडाखाली नवी बिल्डिंग.
पुर्णाकृती पुतळा हे जाणवले पण कोणी बोललं नाही, सर्वजण तुझ्या पोस्टसाठी थांबले होते😊😊
एमके आपटे : Drawing room shejari 3 rooms hotya Ekamadhe typing class lagayache ani shejari juni building hoti. Ti science chya prayaogasathi laboratory hoti. Babu asstt. Hota
****************************
19-08-2021
माझा प्रवास-यात्रा - जमखंडी
- मधुकर आपटे
जमखंडी हे गांव कर्नाटक राज्यातील बागलकोट जिल्ह्यात येते. हे पुर्व राजाची राजधानी होती. जमखंडी हे जिल्हा मुख्यालयात पासुन पश्र्चिमेस ९० कि. मि. स्थित आहे. हे स्वतंत्र भारतात विलीन झालेले पहीले राज्य आहे. विलिनापुर्वी एक अट होती ती म्हणजे जमखंडी स स्वतंत्र जिल्हा घोषित करावा. परंतु जिल्हा घोषित न करता उप-संभाग घोषित करण्यात आला याच्याअंतर्गत मुधोळ,बिळगी,रबकवी-बन्हट्टी, व तेरदाळ याना जोडले गेले.
हे गाव कृष्णा नदीच्या जवळ असुन येथील संस्कृति मराठी व कन्नड अशी मिश्र आहे. हे गांव शैक्षणिक हब म्हणुन ओळखले जाते.
येथील जनसंख्या ई. स. २०११ च्या गणनेनुसार ६८,९३८ आहे.
येथील प्रमुख आकर्षण म्हणजे रामतीर्थ येथील पटवर्धन सरकारांचा रॉयल राजवाडा. परंतु असे ऐकीवात आहे की सध्या राजवाड्यात एक कन्नड प्राथमिक शाळा चालवली जाते जी दिवंगत नेते सिध्दराम न्यामगौडा यांचे द्वारे चालवली जात असे.
अशी पण एक कथा सांगितली जाते की एक संत जंबु (शिवभक्त) खिंडीत (गुहेत) बसुन तपश्चर्या करत होते म्हणून गावाचे नांव जमखंडी असे पडले. याबाबत दरबारी कवी राणा यांच्या कवितेचा संदर्भ मिळतो ज्यामधे या गावास जंबुखिंडी असे संबोधित केले गेले होते. त्याचा अपभ्रंश होत होत कालांतराने नाव जमखंडी झाले. जमखंडी गावाच्या सभोवताली दगडी पर्वतांच्या रांगा आहेत.
येथील दुसरे आकर्षण म्हणजे अबू बकर दरगाह. येथे सर्व धर्माचे लोक प्रार्थनेस येतात.
काही नामांकित व्यक्ति:
१. बी. जी. खेर : हे मुंबई राज्याचे प्रथम मुख्यमंत्री. (?)
२ . विठ्ठल रामजी शिंदे : भारतात दलीत चळवळ चालवणारे प्रमुख नेता.
३. बी. डी. जत्ती : हे जवळ-जवळ १५-२० वर्षे कर्नाटकाचे मुख्यमंत्री व भारताचे उपराष्ट्रपती होते.
४. डॉ. एम्. सी. मोदी : भारताचे सुप्रसिद्ध Eye-Surgeon. ज्यांचे प्राथमिक शिक्षण पी. बी. हायस्कूल मध्ये झाले. असे सांगितले जाते की त्यानी भारतातील विभिन्न ग्रामीण व खेडेगावात कँपस भरवुन जवळ-जवळ ५ लाख डोळ्यांची ऑपरेशन्स केली होती.
५. गुरुदेव आर्. डी. रानडे ; हे महान संत व उपदेशक होते. यांचे पण प्राथमिक शिक्षण जमखंडी येथेच झाले होते.
अशा या पावन व पवित्र भुमीत माझा जन्म व शिक्षण झाले याचा मला अभिमान वाटतो.
सायकलिंग:
साधारणपणे कर्नाटकातील सर्व सायकल रेसिंग चँपियन्स विजापूर जिल्ह्यातील होते.
जमखंडीचे सी. एम. कुरनी याना सायकलिंग चे फादर असेच संबोधित करण्यात येत असे. असे म्हणतात की ९०% रेसर्स जमखंडी चे च होते. जमखंडी व आसपासच्या गावातील दुधवाले सायकल वरून रेस करत येत व त्यानीच ही कला वाढवली.
परंतु मोटर सायकलच्या आगमनानंतर ही कला हळुहळु लुप्त होत चालली आहे..
जमखंडीच्या आसपास ऊसाची पण शेती होत असल्याने येथे साखर कारखाने पण बरेच आहेत. उदा. प्रभुलींगेश्र्वर सिद्दापुर; साईप्रिया शुगर, हिप्परगी ; जमखंडी शुगर्स, नागपुर ईत्यादी.
येथे बरीच मंदीरे पण आहेत ज्यांचे दर्शन आपण उद्या घेऊ.
- क्रमश:
माझा प्रवास - यात्रा - जमखिंडी
मधुकर आपटे
आज आपण जमखंडी मधील प्रमुख मंदीरे व ईतर प्रगति पाहु.
प्रमुख मंदीरे :
१. जंबूकेश्र्वर :
या मंदिरामुळे च या गावाला हे नांव पडले असे म्हणतात. अशी आख्यायिका आहे की या जागी जांभळाची बरीच झाडे होती म्हणून जंबु (जामुन) व शिव असे मिळून जंबुकेश्र्वर झाले. हे मंदीर फार जुने आहे जवळ जवळ १५००-२००० वर्षापुर्वी बांधलेले असावे असा अंदाज आहे. मंदीराच्या सभोवताली ४-५ विहरी आहेत व पाण्याच्या टंचाईच्या वेळी या विहरी उपयोगी पडायच्या. असे ऐकले आहे की हल्ली या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे.
या मंदीराच्या आत १९४० साली एक शाळा चालु करण्यात आली. ती शाळा अजुनही कार्यरत आहे. शाळेचे ऑफिशियल नाव नुतन विद्यालय - कन्नड गंडु (बॉईज) मक्कळ स्कुल असले तरी त्याला जंबुकेश्र्वर शाळा म्हणून च ओळखले जाते.
२. ऊमारामेश्र्वर :
हे मंदीर महाराजा पटवर्धन सरकारांनी बांधलेले असुन हे राम तीर्थाटन सारखे नसुन हे महादेवाचे मंदीर आहे. ईथे शिवाची वेगळया रीतीने पुजा केली जात असे. जशी बुत्ती पुजा, मुकुट अलंकार, पुष्प अलंकार वगैरे. मंदिरात प्रवेशद्वाराच्या डाव्या हाताला सरकारांचे ऑफिस होते जिथे दीवाणसाहेब श्री. बळवंतराव काळे व श्री. गुरुनाथ वाटवे बसुन कारभार पहात असत.
येथे रोज सकाळी सनई चौघडे वाजत असत. मंदीराच्या प्रांगणात डाव्या हाताला महीला मंडळ चालक असे.
बाहेर पटांगणात कारंजे होते व डाव्या हाताला सरकारी दवाखाना व उजव्या हाताला मॉंटेसरी जी बहुतेक प्रभाताई आपटे चालवत होत्या. नंतर जवळच भारतीय स्टेट बँक व कचेरी रोड वगैरे.
३. मेलगिरी लिंगप्पा :
हे मंदीर वरच्या रस्त्याने रामतीर्थ ला जाताना वर डोंगरावर स्थित आहे. ईथे पाण्याच्या टाक्या असुन गावाला पाण्याचा पुरवठा केला जातो. हे स्थान ब-याच लोकांच्या सकाळ-संध्याकाळ फिरण्याचे ठीकाण आहे
डोंगरावर वारे भरपुर असल्याने पतंग उडवण्यास ऊत्तम ठीकाण.
खाली रस्त्याजवळ एक मोठा तलाव आहे लेक्कनगिरी तलाव. व येथेच डोंगरावर पावसाळ्यात एक झरा वाहतो.
४. रामतीर्थ :
काल लीहल्या प्रमाणे रामतीर्थ येथे महाराजांचा राजवाडा होता व शिवशंकर, दत्तात्रय, गणपती यांची मंदिरे पण आहेत.
श्रावण महीन्यात प्रत्येक सोमवारी इथे जत्रा भरायची व बुत्ति पुजा (दही भाताची) हरकंगी ह्यांचे कडुन बांधली जायची. शेवटच्या श्रावण सोमवारी रथयात्रा असत असे.
वरील प्रमुख मंदीरा शिवाय अन्य म़दीरांचा उल्लेख :
- श्री रूद्रावधुत मठ
- श्री खंडोबा मंदीर
- श्री लक्ष्मी मंदिर
- परमार्थ मंदीर
- खरे विठ्ठल मंदिर
- अप्पासाहेब विठ्ठल मंदिर
- सज्जी हनुमान मंदिर, ऊमारामेश्र्वर रोड
- दत्त मंदिर
- सदानंद मंदिर
- जुने हनुमान मंदिर
जवळपास असलेले देवस्थान म्हणजे कल्हळ्ळी. येथे वेंकटरमण गोविंदाचे (भगवान विष्णू) भव्य मंदिर आहे. दरवर्षी नवरात्रात (दसरा) येथे उत्सव साजरा होतो.
आता आपण जमखंडीचे अन्य वैशिष्ट्ये पाहु:
शिक्षण संस्था:
पुर्वीच्या तुलनेत प्राथमिक, माध्यमिक, कॉलेज या संस्थांमध्ये भरपुर वाढ झाली आहे. विद्यार्थी नसल्याने मराठी माध्यम बंद झाले आहे. कला, वाणिज्य व सायन्स ची बरीच कॉलेजेस उघडली गेल्याने विद्यार्थ्याना शिक्षणासाठी बाहेर जाण्याची गरज नाही.
हॉस्पिटल्स:
पहील्यांदा बोटावर मोजण्या इतकेच डॉक्टर्स होते व गंभीर आजारांसाठी मिरज, बेळगाव येथे जावे लागे परंतु आता वैद्यकीय सुविधांमधे बरीच सुधारणा झाली आहे.
मनोरंजन :
पुर्वी मनोरंजनासाठी एकच चित्रपटगृह सुवर्ण चित्रमंदीर होते व मे महिन्यात नगरपालिकेच्या मागच्या बाजूस मैदानात कन्नड नाटके अथवा सर्कस येत असे. परंतु सध्या चित्रपट गृहांची संख्या वाढली आहे.
वाहतुक :
हा गांव रेल्वेने जोडलेला नाही. जवळचे रेल्वे स्टेशन कुडची पण आता बसेसची सोय चांगली असल्याने मिरजेला जाणे सोईचे पडते.
मालवाहतूकी साठी ट्रक्स चा वापर होतो. गावात फिरण्यासाठी रिक्षा उपलब्ध असतात.
ईतर:
बँकांची बरीच सोय उपलब्ध आहे. सरकारी, सहकारी व निजी क्षेत्रातील शाखा आहेत.
गावाच्या मध्यभागी पोस्ट ऑफिस आहे.
रहाण्यासाठी लॉजेसही उपलब्ध आहेत.
खेळ:
कुस्ती, कब्बडी, खोखो यामधे प्राविण्य मिळवलेले बरेच खेळाडू जमखंडी ने दीले.
नावेच घ्यायची झाल्यास कलुती कुटुंब, कब्बडी मधे काझी, ज्याला बेंगळुरू मधे जंबो हा खिताब मिळाला होता. बरेच खेळाडू ना सिंडीकेट बँकेत यास्तव नोकर्या मिळाल्या होत्या. खोखो मधे महिलांची भरीव कामगीरी होती (जोग भगिनी, आपटे भगिनी, संध्या वाटवे )
पोलो ग्राउंड हे मैदान वार्षिक खेळ , क्रिकेट वगैरे साठी उपलब्ध असे.
ईतर गावांप्रमाणेच हे गांव ही आधुनिकतेकडे वाटचाल करत आहे परंतु या आधुनिकते मुळे हे गांव पुर्वीचे वैभव कुठेतरी हरवत चालले आहे ह्याची खंत कुठेतरी ह्रदयाच्या कोप-यात वाटत रहाते.
*****
डॉ.रवींद्र आपटे
लंडन इथे स्थायिक झालेले डॉ.रवींद्र आपटे यांनी आपल्या हृद्य आठवणी छापून प्रसिद्ध केल्या आहेत. त्यांच्या स्मृतिसुगंध या पुस्तकातील काही पाने खाली दिली आहेत. इमेजच्या स्वरूपात दिलेली असल्यामुळे स्पष्ट दिसत नाहीत. क्षमस्व.
**************************
४. छायाचित्रे (Part 4 :Photo Gallery)
१. जमखंडीच्या संस्थानकाळातले फोटो
- जयश्री राहणार जमखंडी यांच्या सौजन्याने
जमखंडी संस्थानातील विधानसभा १९३२
---------------------------------------------------
२. श्री.श्यामराव वाटवे यांचे घर आणि रेडिओचे दुकान (पूर्वीच्या काळातला फोटो) आणि तिथे बांधलेली (सध्याची) नवी इमारत
३. सुप्रसिद्ध पागा शाळा. मी या शाळेत शिकत होतो तेंव्हा (१९५२-५४ मध्ये) इथे खरोखरच घोड्याची पागाच होती. नंतर या ठिकाणी शाळेची इमारत बांधली गेली.
16 comments:
खूप छान. तुमचा उत्साह आम्हालाही मिलुदे. मी तुमचा ब्लॉग आहात असते
मस्त छान आता आठवणी संग्रहित राहतील धन्यवाद
मस्त आठवणी संग्रहित राहतील
मस्त आठवणी संग्रहित राहतील धन्यवाद
आता ऊत्सुकता सर्वांचे लिखाण वाचण्याची
कल्पना प्रत्यक्षात अमलात आणली. आनंद झाला.
वर्षा कुमठेकर
छान कल्पना. आठवणींच्या संग्रहित
जमखंडीच्या आठवणींच्या संग्रहासाठी केलेली छान कल्पना धन्यवाद उज्वला
प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. बहुतेकांना आपल्या नावाने प्रतिसाद देता आला नाही असे दिसते. ते Unknown या नावने आले आहेत असे असेल तर वर्षाताईंच्या प्रमाणे प्रतिसादाच्या खाली आपले नाव लिहावे. आपापल्या आठवणीही Comments मधून पाठवल्या तर इथे संग्रहित होत राहतील. . . . आनंद घारे
चांगली कल्पना आहे. उज्वला नागपूर पटवर्धन
श्रीरंग घारे
माझी एक सूचना आहे हा ब्लॉग शोधण्या साठी बराचवेळ लागतो.जर एकग्रुप यासाठी
वनवला तर जेकेडी वर जाऊन ब्लॉग शोधणे
एवजी थेट त्यावर मजकूर लिहिता येईल
बरेच जण ब्लॉग वर कसे लिहायचे ते
स्टेफ बाय स्टेप सांगा म्हणताहेत त्यानाही
सोपे जाईल.
आम्ही आमच्या कोकण ट्रीपसाठी असा
Let us enjoy kokan असा ग्रुप केला
हौता सर्वाना सहभागी होता येत.होते
बघ.हे करण आनंद शक्य आहेका
Namaskar,
Mi Rajendra Narahari Ghare.
Amache Ajoba Shri Sadashiv Vitthal Ghare
Jamkhindiche.
Amache vadil Narahari sadashiv Ghare yanchya kadun khooop goshti aiklya aahet.
rajendranghare1@rediffmail.com
Ghare baddal aikun khoop bare vatat aahe.
Anand Kaka tumcha E-mail / Tel. Kalvava
प्रिय राजेंद्र, मी ई मेलवर उत्तर पाठवले आहे.
खूप चांगली माहिती ,अजित बाळकृष्ण गोटखिंडी
धन्यवाद, अजित गोटखिंडी
Post a Comment