जमीनीखालून बाहेर काढलेल्या खनिज तेलाचे रिफायनरीमध्ये पार्श्य़ल डिस्टिलेशन केल्यावर त्यामधून निरनिराळी उत्पादने तयार होतात. त्यांचे वर्गीकरण करून ती वेगवेगळ्या नावांनी ओळखली जातात. या क्रियेमध्ये क्रूड पेट्रोलियम तेल गाळून एका खास निर्वात पात्रामध्ये तापवून उकळत ठेवतात. सर्वात आधी कमी तपमानावर (टेंपरेचरवर) बाष्पीभवन झालेल्या त्यातील द्रवांची वाफ वेगळी बाहेर काढून थंड केल्यावर त्यातून पेट्रोल (गॅसोलीन) निघते. त्यानंतर त्या तेलाचे तपमान वाढवून नेत त्याला तसेच उकळत ठेवतात. थोड्या थोड्या उच्च तपमानावर ते नेत असतांना त्यांतून केरोसीन, डिझेल, ल्युब्रिकेटिंग ऑइल्स वगैरे निरनिराळ्या तेलांची क्रमाक्रमाने वाफ होऊन ती बाहेर निघत जाते. तिला थंड करून ती द्रवरूपात आल्यानंतर त्या तेलांना वेगवेगळ्या टाक्यांमध्ये साठवतात.
ही सगळी तेले म्हणजे हैड्रोकार्बन्सच असतात, पण त्यांच्या रेणूंच्या (मॉलेक्यूल्सच्या) रचनेमधील कार्बन आणि हैड्रोजन अणूंची संख्या निरनिराळी असते. त्यामुळे त्यांची घनता (डेन्सिटी), उत्कलनबिंदू (बॉइलिंग पॉइंट), ज्वलनबिंदू (फ्लॅश पॉइंट) वगैरे गुणधर्म निराळे असतात. पाणी (H2O), मीठ (NaCl), चुना (CaCo3) या पदार्थांप्रमाणे पेट्रोल, केरोसीन, डिझेल वगैरे पदार्थांचा एकच केमिकल फॉर्म्यूला नसतो. यातले प्रत्येक तेल हे अनेक निरनिराळ्या संयुगांचे (काँपाउंड्सचे) मिश्रण असते. उदाहरणार्थ पेट्रोल हे एकच द्रव्य नसून काही द्रव्यांचा एक गट किंवा समूह असतो. सेंद्रिय (ऑर्गॅनिक) पदार्थांचे हे एक सोपे उदाहरण आहे. एका प्रकारचे पण थोडे वेगळे असे अनेक पदार्थ एकेका गटात असणे ही गोष्ट बहुतेक सगळ्याच सेंद्रिय (ऑर्गॅनिक) पदार्थांमध्ये दिसते. पिष्टमय पदार्थ (कार्बोहैड्रेट्स), प्रथिने (प्रोटीन्स), स्निग्ध पदार्थ (फॅट्स) वगैरे अन्नपदार्थांच्या गटांमधील पदार्थांच्या रेणूंची रचना प्रचंड गुंतागुंतीची (काँप्लेक्स) असते. साधारणपणे एका प्रकारची अशी अनेक रासायनिक संयुगे (केमिकल काम्पाउंड्स) एकेका गटात असतात. ते पदार्थ त्या गटाच्याच नावाने ओळखले जातात. त्यातल्या स्निग्धपदार्थांना 'लिपिड' असेही संबोधले जाते. कोलेस्टेरॉलचा समावेश त्यात होतो.
शरीरामधल्या प्रत्येक पेशीमध्ये कोलेस्टेरॉल असतो, पण तो इतर संयुगांच्या रेणूंशी (मॉलेक्यूल्सशी) जोडलेला असतो. त्याला वेगळा काढून त्याचे प्रमाण मोजण्याचे काम साध्या प्रयोगशाळेत होऊ शकत नाही. आपल्या जवळच्या पॅथॉलॉजी लॅब्जमध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण मोजण्यासाठी रक्ताची 'लिपिड प्रोफाइल' काढली जाते. रक्तांमधली लिपिड्स काही प्रोटीन्सना सोबत घेऊन 'लिपोप्रोटीन्स' या नावाने वावरत असतात. त्यांचे एचडीएल (हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन्स), एलडीएल (लो डेन्सिटी लिपोप्रोटीन्स), व्हीएलडीएल (व्हेरी लो डेन्सिटी लिपोप्रोटीन्स), ट्रायग्लिसराईड्स वगैरे ढोबळ गट करतात. यामधील प्रत्येक गटात असलेल्या कोलेस्टेरॉलची टक्केवारी वेगवेगळी असते आणि त्यांचे गुणधर्मसुध्दा वेगळे असतात. ज्या लिपोप्रोटीन्समध्ये कोलेस्टेरॉलची टक्केवारी जास्त असते ते वजनाने हलके असतात, यामुळे त्यांना एलडीएल (लो डेन्सिटी लिपोप्रोटीन्स) असे म्हणतात, तर याच्या उलट एचडीएल (हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन्स)मध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण त्या मानाने कमी असते. रक्ताची तपासणी करतांना या सगळ्या गटांच्या मात्रा मोजल्या जातात.
यात एलडीएल (लो डेन्सिटी लिपोप्रोटीन्स)चे रक्तामधले प्रमाण सर्वात जास्त असते. तसेच एलडीएलमध्ये कोलेस्टेरॉलही जास्त प्रमाणात असतो. शरीरामधील सर्व पेशींना कोलेस्टेरॉल पुरवण्याची जबाबदारी एलडीएलकडे असते. ती बजावत असतांना जास्तीचा कोलेस्टेरॉल रक्तवाहिन्यांमध्ये साठून त्यांना अरुंद करू शकतो. यामुळे त्याला 'बॅड कोलेस्टेरॉल' असे म्हंटले जाते. एचडीएल (हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन्स)चे काम याच्या उलट असते. एचडीएलमध्ये कोलेस्टेरॉलचा अंश कमी असल्यामुळे शरीरामधील पेशींमधले थोडे कोलेस्टेरॉल शोषून घेऊन ते त्यांना यकृताकडे घेऊन जातात. हे करत असतांना ते रक्तवाहिन्यांची थोडी सफाईही करतात, एलडीएलमधले कोलेस्टेरॉल तिथे रेंगाळत बसले असल्यास एचडीएल त्यांना बकोटीला धरून यकृताकडे परत घेऊन जातात. (व्हेरी लो डेन्सिटी लिपोप्रोटीन्स)चे चिकटण्याचे गुणधर्म आणि त्यांचे रक्तामधले प्रमाण अगदी कमी असल्यामुळे त्यांचा उपद्रव कमी असतो. रक्तामधल्या लिपोप्रोटीन्स या घटकांचे मिळून जे एकंदर प्रमाण असते त्याला टोटल कोलेस्टेरॉल असे सुटसुटीत नाव दिले आहे. प्रत्यक्षात त्यातला फक्त काही हिस्सा कोलेस्टेरॉलचा आणि उरलेला इतर द्रव्यांचा असतो, पण या बेरजेलाच 'टोटल कोलेस्टेरॉल' असे म्हणायची पध्दत आहे. ट्रायग्लिसराईड्सचा मुख्य उपयोग साखरेप्रमाणेच ऊर्जा मिळण्यासाठी होतो. प्राणवायूशी त्यांचा संयोग होऊन त्यापासून जास्त प्रमाणात ऊर्जा निघते. रक्तामध्ये या द्रव्याचा अतिरेकही धोकादायक असतो.
रक्ताची तपासणी करून आलेल्या रिपोर्टमध्ये टोटल कोलेस्टेरॉलचे प्रमाण २०० mg/dL यापेक्षा कमी असले तर चांगले, २०० ते २४० mg/dL मध्ये असले तर ते कमी करण्याचे प्रयत्न करायला हवेत आणि २४० mg/dLच्या वर गेले तर मात्र नक्कीच त्यावर उपचार करायला हवेत असे सर्वसाधारणपणे मानले जाते. ट्रायग्लिसराईड्सचे प्रमाण १५०-१६० यापेक्षा जास्त असल्यास तेही कमी करणे हिताचे असते. हे झाले सर्वसामान्य माणसांसाठी, पण ज्यांना हृदय किंवा मेंदूचा विकार झालेला आहे किंवा एकदा होऊन गेलेला आहे त्यांच्या रक्तवाहिन्या आधीच काही जागी अरुंद झाल्या असतात. त्या आणखी बिघडू नयेत यासाठी त्यांनी कोलेस्टेरॉलचे प्रमाण आणखी कमी ठेवावे. मधुमेह (डायबेटिस) किंवा उच्च रक्तदाब (हाय ब्लडप्रेशर) हे विकार जडले असतील तर त्यांनीसुध्दा कोलेस्टेरॉलवर जास्त नियंत्रण ठेवणे आवश्यक असते. ज्या लोकांचे कोलेस्टेरॉल २००च्या वर किंवा जवळ गेले असते, ज्यांना वर दिलेले विकार जडलेले असतात किंवा ते होण्याची संभावना असते, त्यांच्या एचडीएल, एलडीएल वगैरेंचा विचार करून त्यासाठी वेगवेगळ्या मर्यादा दिल्या जातात. त्यातला एचडीएल हा (चांगला) गु़ड कोलेस्टेरॉल (एकूण) टोटल कोलेस्टेरॉलच्या एक चतुर्थांशपेक्षा जास्त असायला हवा. किंवा टोटल कोलेस्टेरॉल एचडीएलच्या चौपटीवर असता कामा नये. हा रेश्यो (गुणोत्तर) ३,२ किंवा त्याहूनही कमी असले तर ते चांगले समजले जाते.
सामान्यपणे आपले शरीर आपण होऊनच कोलेस्टेरॉलवर चांगले नियंत्रण ठेवत असते. पण काही कारणांमुळे ते पुरेसे प्रभावी ठरत नाही आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते. यातली प्रमुख कारणे अशी दिली जातात.
१. आहारामधील स्निग्ध पदार्थांचे प्रकार आणि प्रमाण - हा एक मोठा आणि वेगळा विषय आहे. पुढील परिच्छेदात याची माहिती थोडक्यात दिली आहे.
२. स्थूलपणा - आहार, पचनशक्ती यामधून शरीराला मिळणारी ऊर्जा आणि शारीरिक क्रिया, व्यायाम यामधून होणारा तिचा व्यय यात असंतुलन झाल्यामुळे हा येऊ शकतो.
३. आनुवंशिकता - याला कोणाचाही इलाज नसतो.
४. वयोमान - जसजसे माणसाचे वय वाढत जाते त्याप्रमाणे शरीरातल्या सगळ्याच इंद्रियांच्या कार्यक्षमतेवर त्याचा प्रभाव पडतो.
५. इतर आजार - मधुमेह (डायबेटिस) किंवा उच्च रक्तदाब (हाय ब्लडप्रेशर) यासारख्या व्याधी असल्या तर कोलेस्टेरॉलच्या वाढण्यामुळे होणारे परिणाम जास्त धोकादायक ठरू शकतात.
कोलेस्टेरॉलवर नियंत्रण ठेवण्याचे, किंबहुना एकंदरीतच निरोगी रहाण्याचे व रोगमुक्त होण्याचे तीन प्रकारचे उपाय असतात. ते आहेत आहारावरील नियंत्रण (पौष्टिकता, पथ्यपाणी वगैरे), व्यायाम आणि औषधोपचार.
१. आहार - कोलेस्टेरॉलवर नियंत्रण ठेवण्यासाठी काय खावे आणि काय खाऊ नये यावर निरनिराळ्या प्रकारची माहिती सारखी दिली जात असते आणि त्यात मतभिन्नता दिसते. वनस्पती तेले (डालडा) किंवा मार्गारिन यासारखे प्रक्रिया केलेले स्निग्ध पदार्थ धोकादायक असण्याची शक्यता जास्त असते असे बहुतेक लोक म्हणतात. काही तेलबिया चांगल्या आणि काही वाईट असल्याचे सांगितले जाते. निरनिराळ्या भागातल्या लोकांचे त्यावर वेगवेगळे मत असते. आयुर्वेदाप्रमाणे तूप हे अत्यंत चांगले अन्न समजले जाते असे बहुतेक वैद्य सांगतात. "आमच्या गोशाळेतल्या गायींना आम्ही निवडक चारा खायला देतो त्यामुळे त्यांच्या दुधापासून आम्ही शास्त्रशुध्द पध्दतीने तयार केलेले तूपच तेवढे सुरक्षित असते." असेही त्यातले काही हुषार वैद्यराज सांगतात. काही कंपन्यांकडून त्यांच्या कंपनीच्या तेलांमध्ये बॅड कोलेस्टेरॉल नसते असे दावे केले जातात, पण ते तेल खाल्ल्यानंतर शरीरात ते तयार होत असले तर त्या दाव्याला अर्थ उरत नाही. माझे व्यक्तीगत मत असे आहे की काय खावे किंवा खाऊ नये यापेक्षा ते किती प्रमाणात खावे हे महत्वाचे आहे. त्यामुळे काजूबदामांपासून ते तीळ, खोबरे किंवा शेंगदाण्यापर्यंत काहीच मी वर्ज्य समजत नाही. कोणतेच अन्न गरजेपेक्षा जास्त खाऊ नये, तळलेले पदार्थ फक्त रुचीपालट म्हणून चवीपुरतेच खावेत आणि वेळोवेळी रक्ताची तपासणी करून कोलेस्टेरॉल किती आहे यावर नजर असू द्यावी. एवढी सावधगिरी माझ्या मते पुरेशी आहे. ज्यांना काही व्याधी जडलेल्या आहेत त्यांनी मात्र डॉक्टरांचा आणि डायटीशियनचा सल्ला घ्यावा आणि तो पाळावा.
२. व्यायाम - याचा अर्थ व्यायामशाळेत जाऊन जोरबैठका काढणे किंवा जिममध्ये जाऊन वर्कआउट करणे एवढाच नाही. ज्यांना ते शक्य असेल त्यांनी ते अवश्य करावे, पण इतरांनीसुध्दा नेहमीच आपल्या शरीराच्या भरपूर हालचाली करत रहायला हवे. आळशीपणावर ताबा ठेवला तर रोजच्या आयुष्यातही हातपाय चालवून करण्यासारखी अनेक कामे असतात. तीही नसतील तर मोकळ्या हवेत नियमितपणे सलग वीस पंचवीस मिनिटे तरी चालत जाऊन येणे शक्य असते. आपल्या आहारातून जेवढ्या कॅलरीज शरीराला मिळतात तेवढ्या त्या खर्च झाल्या तर कोलेस्टेरॉलवर शरीरच नियंत्रण ठेवते.
३. औषधोपचार - आनुवंशिक कारणांमुळे किंवा मध्यमवय उलटून गेल्यानंतर पथ्य आणि व्यायाम करूनसुध्दा कोलेस्टेरॉलच्या वाढण्यावर समाधानकारक नियंत्रण रहात नाही. त्यामुळे डॉक्टरांच्या किंवा वैद्यांच्या सल्ल्याने योग्य तेवढा औषधोपचार करणे आवश्यकच ठरते. पण औषधे घेणे हा आहारनियंत्रण आणि व्यायाम याचा पर्याय मानू नये, त्याला पूरक मानावे. कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराईड्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी कदाचित दोन वेगवेगळी औषधे किंवा त्यांचे काँबिनेशन्सही घ्यावी लागतात. औषधे घेण्याबरोबरच नियमितपणे रक्ताची तपासणी करून घेणेसुध्दा आवश्यक असते.
याखेरीज योगासने, प्राणायाम वगैरें उपचारसुध्दा आरोग्यासाठी लाभदायक असतात. ते आधीपासून नियमितपणे चालू ठेवले तर कदाचित कोलेस्टेरॉलवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणखी काही करण्याची गरजच पडणार नाही. आपल्याला मनःशांतीचीही खूप गरज असते किंवा तिचा शरीरावर चांगला परिणाम होत असतो असे म्हणतात. मन अस्वस्थ असेल तर निश्चितच त्याचा त्रास होतो हे सर्वांनाच ठाऊक असते. त्यामुळे कदाचित रक्तचाप (ब्लडप्रेशर) वाढेल, शांत झोप लागणार नाही आणि त्यामुळे इतर व्याधी निर्माण होतील अशा शक्यता असतातच.
कोलेस्टेरॉलवर मला ठाऊक असलेली माहिती थोडक्यात देण्याचा प्रयत्न मी या लेखात केला आहे. मी या विषयावरला तज्ज्ञच काय पण विद्यार्थीसुध्दा नाही, पण मी दिलेली माहिती शक्य तितकी अचूक असावी हे तपासून घेण्याचा थोडासा जाणीवपूर्वक प्रयत्न मात्र मी केला आहे.

No comments:
Post a Comment