गणेशोत्सवाशी या ब्लॉगचे जवळचे नाते आहे. पहिल्याच वर्षी आलेल्या गणेशोत्सवात मी गणपतीची कोटी कोटी रूपे पाहून त्यांच्यावर एक लेखमाला लिहिली होती. त्यानंतर बहुतेक दरवर्षी मी या उत्सवाच्या काळात गणपतीसंबंधी चार शब्द लिहीत होतो. या ब्लॉगवरील लेखांची संख्या मला हजाराच्या आंतच ठेवायची आहे म्हणून या वर्षी मी एकाच लेखात रोज थोडी भर घालून तो पूर्ण करणार आहे.
सूर निरागस हो
सूर निरागस हो. गणपती,
सूर निरागस हो.
सूर निरागस हो. गणपती ,
सूर निरागस हो.
शुभनयना करुणामय गौरीहर श्री वरदविनायक.
शुभनयना करुणामय गौरीहर श्री वरदविनायक.
ॐकार गणपती. ॐकार गणपती.
अधिपती. सुखपती. छंदपती गंधपती
लीन निरंतर हो. लीन निरंतर हो,
सूर निरागस हो.
सूर निरागस हो. गणपती सूर निरागस हो.
मोरया. मोरया. गणपती बाप्पा मोरया.
मोरया. मोरया. गणपती बाप्पा मोरया.
गजवदना तु सुखकर्ता. गजवदना तु दु:खहर्ता.
गजवदना मोरया. मोरया…
मोरया. मोरया. गणपती बाप्पा मोरया.
मोरया. मोरया. गणपती बाप्पा मोरया.
गजवदना तु सुखकर्ता. गजवदना तु दु:खहर्ता.
गजवदना मोरया. मोरया…
सूर निरागस हो. गणपती सूर निरागस हो.
सूरसुमनानी भरली ओंजळ
नित्य रिती व्हावी चरणावर.
तान्हे बालक सुमधुर हासे
भाव तसे वाहो सूरातुन.
ॐकार गणपती. अधिपती. सुखपती छंदपती. गंधपती.
अधिपती. सुखपती. छंदपती. गंधपती. सूरपती.
लीन निरंतर हो. लीन निरंतर हो.
सूर निरागस हो.
सूर निरागस हो. गणपती
सूर निरागस हो.
मोरया. मोरया. गणपती बाप्पा मोरया.
मोरया. मोरया. गणपती बाप्पा मोरया.
गजवदना तु सुखकर्ता. गजवदना तु दु:खहर्ता.
गजवदना मोरया. मोरया…
मोरया. मोरया. गणपती बाप्पा मोरया.
मोरया. मोरया. गणपती बाप्पा मोरया.
गजवदना तु सुखकर्ता. गजवदना तु दु: खहर्ता.
गजवदना मोरया. मोरया…
सूर निरागस हो. सूर निरागस हो.
ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ
मोरेश्वर किंवा मोरोपंत ही नांवे पूर्वीच्या काळात प्रचलित होती. मोरोपंत या अठराव्या शतकांतल्या पंतकवींनी आर्या या वृत्तामध्ये अनेक इतक्या सुंदर काव्यरचना केल्या होत्या की महान संतकवि तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माउली आणि पंतकवि वामन पंडित यांच्याबरोबर त्यांची गणना केली जाते. "सुश्लोक वामनाचा अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची ओवी ज्ञानेशाची आर्या मयूरपंताची।" असे समजले जाते. छत्रपति शिवाजी महाराजांच्या प्रधानमंडळात मोरोपंत पिंगळे मुख्य प्रधान होते. मोरोबा विजयकर या लेखकाने घाशीराम कोतवाल ही मूळ कादंबरी लिहिली होती.
मोरेश्वर, मोरोपंत, मोरोबा किंवा मोरू, मोऱ्या वगैरे नावे असलेली पात्रे साठ सत्तर वर्षांपूर्वीच्या कथाकादंबऱ्या, सिनेमे नाटके यांचेमध्ये सर्रास आढळत असत. त्यातला मोरेश्वर शास्त्री म्हणजे एक वेदशास्त्रसंपन्न विद्वान, पण परंपरावादी, हटवादी आणि उग्र तिरसिंगराव असावा, मोरोपंत हा हुषार, धूर्त पण सहृदय असा सद्गृहस्थ असावा, मोरोबा म्हणजे साधासुधा, परोपकारी, लोकांना सढळ हाताने मदत करणारा भलामाणूस असावा आणि मोरू म्हणजे जरा जास्तच सरळमार्गी, भोळसट आणि बावळट असावा, त्याला कुणीही आणि केंव्हाही मोरू करावे असा संकेत होता. त्या अर्थाचे बुद्दू बनवणे, पोपट करणे किंवा वडा होणे वगैरे वाक्प्रचार नंतर आले. आचार्य प्र.के.अत्रे यांनी लिहिलेले मोरूची मावशी हे नाटक त्या काळात गाजले होतेच, पण त्यांच्या निधनानंतर कित्येक वर्षांनी ते पुन्हा रंगमंचावर आले आणि विजय चव्हाणांनी टांग टिंग टिंगा कि टांग टिंग टिंगा म्हणत त्या नाटकाला आणि स्वतःच्या कारकीर्दीला यशाच्या शिखरावर नेले. ज्या कोण्या महाभागाने बुद्धी आणि विद्येचे दैवत असलेल्या गणेशाच्या नावाचा असा मोरू केला होता त्याची शिक्षा म्हणून पुढील अनेक जन्म त्याचा पोपट किंवा वडा होत राहील यात शंका नाही.
आपले गणपतीबाप्पा उत्तर भारतात गणेशजी आणि दक्षिणेकडे विनायक या नांवांनी जास्त ओळखले जातात. तशी त्याची शेकडो नांवे आहेत. गणपती, तुझी नांवे किती? या नांवाने मी लिहिलेल्या ब्लॉगची सर्वाधिक वाचने झाली आहेत आणि अजूनही होत आहेत. नारदमुनींनी लिहिलेल्या संकटनाशन गणेशस्त्रोत्रातील आणि गणेशद्वादशनामस्तोत्रातील प्रत्येकी बारा नांवांमध्ये मोरेश्वराचा समावेश मात्र होत नाही आणि मला आंतर्जालावर मिळालेल्या ११० नांवांमध्येसुद्धा नाही. महाराष्ट्रातल्या अष्टविनायकांमध्ये मात्र मोरगांवच्या मोरेश्वराचा पहिला नंबर लागतो. मोरेश्वर हा शब्द जरी संस्कृत असला तरी संस्कृत किंवा हिंदी भाषांमध्ये लिहिलेल्या कुठल्याही स्तोत्रांमध्ये हा शब्द आल्याचे मला वाचल्याचे स्मरत नाही.
ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ
मोरगांवचा मयूरेश्वर
ज्यांना धड बोलताही येत नाही अशी लहान बालकेसुद्धा "गम्पतीबप्पा" म्हंटले की "मोय्या" असे किंचाळतात इतकी या शब्दांची जोडी आपल्या मनात घट्ट बसली आहे. कुठेही गणपतीबाप्पा ऐकले की मोरया हा शब्द आपोआप ओठावर येतो, इतकेच नव्हे तर तो कुणीही जोरात उच्चारला नाही तरी आपल्या कानावर आल्याचा भास होतो. 'मोरया मोरया मी बाळ तान्हे, तुझीच सेवा करू काय जाणे। अन्याय माझे कोट्यानकोटी मोरेश्वरा बा तू घाल पोटी।।' हा श्लोक लहान मुलांना शिकवतात. मोरया म्हणजे गणपती हे सगळ्यांना माहीत असले तरी ते कशासाठी? हे बहुतेक लोकांना माहीत नसते, मलासुद्धा नव्हते.यावर थोडा शोध घेतल्यानंतर असे समजले की पुणे जिल्ह्यात मोरगांव नावाचे एक गांव आहे. पूर्वीच्या काळी तिथे खूप मोरांची वस्ती असायची म्हणून ते नांव पडले होते. पुराणकाळात सिंधुरासुर नांवाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी घेतलेला गणपतीचा एक अवतार तिथे झाला होता अशी कथा आहे. त्या अवतारात ते मोर या वाहनावर स्वार होऊन आले होते म्हणून त्याला मयूरेश्वर असे म्हणतात. पुढे मयूरश्वरचे मोरेश्वर झाले. मोरगांव येथे गणपतीचे मोठे देऊळ आहे. अष्टविनायकांमध्ये त्याची गणना होते.
चौदाव्या शतकात चिंचवड येथे मोरया गोसावी नावाचे एक साधू रहात असत. ते गणपतीचे भक्त होते आणि नेहमी चिंचवडहून मोरगांवला चालत जाऊन गणेशाचे दर्शन घेत असत. एकदा त्यांना प्रकृतीअस्वास्थ्यामुळे ते शक्य झाले नाही. पण त्यांच्या असीम भक्तीभावावर गणपती प्रसन्न झाले आणि स्वतःच चिंचवडला येऊन त्यांना दर्शन दिले, तसेच "माझ्या नावापुढे मोरया हे तुझे नांव घेतले जाईल" असा आशीर्वाद त्यांना दिला अशी आख्यायिका आहे. तेंव्हापासून "गणपतीबाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया" असे म्हणण्याची रूढी महाराष्ट्रात पडली.
छायाचित्र विकीपीडियावरून मूळ छायाचित्रकाराच्या सौजन्याने
Redtigerxyz - स्वतःचे काम,CC BY-SA 3.0,https://commons.wikimedia.org/w/index.php?curid=8913180 द्वारे.
ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ
मोरया रे बाप्पा मोरया रे
मोरया रे बाप्पा मोरया रे या श्री.प्रल्हाद शिंदे यांनी गायिलेल्या धडाकेबाज चालीवरील गाण्याने एका काळात खूप धमाल उडवली होती. गणेशोत्सवांमध्ये या गाण्याची ध्वनिफीत जिकडे तिकडे ध्वनिवर्धकावरून (लाउडस्पीकर) वाजवली जात असे. कित्येकांना हे गाणे ऐकून ऐकून तोंडपाठ झाले होते.
https://www.youtube.com/watch?v=shw04gHOUl0
हलाखीच्या परिस्थितीमधल्या कुटुंबात गणेशोत्सव साजरा करतांनासुद्धा किती कष्ट पडतात, पण ते समजून घेऊन बाप्पाने त्यांच्यावर कृपा करून जरा बरे दिवस आणावेत अशी विनवणी या हृदयद्रावक गाण्यामध्ये केली आहे. या गाण्याचे शब्द असे आहेत.
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ति मोरया
तूच सुखकर्ता तूच दुखहरता
अवघ्या दिनांच्या नाथा
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा || ध्रु ||
पहा झाले पुरे एक वर्ष
होतो वर्षान एकदाच हर्ष
गोड अन्नाचा होतो रे स्पर्ष
घ्यावा संसाराचा परामर्ष
पुऱ्या वर्षाची साऱ्या दुखाची
वाचावी कशी मी गाथा || १ ||
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा
नाव काढू नको तान्दुळाचे
केले मोदक लाल गव्हाचे
हाल ओळख साऱ्या घराचे
दिन येतील का रे सुखाचे
सेवा जाणुनी गोड मानुनी
द्यावा आशिर्वाद आता || २ ||
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा
आली कशी पहा आज वेळ
कसा बसावा खर्चाचा मेळ
प्रसादाला दूध आणी केळ
साऱ्या प्रसादाची केली भेळ
गुण गाईन आणि राहीन
द्यावा आशिर्वाद बाप्पा || ३ ||
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा
गायक : प्रल्हाद शिंदे
संगीत : मधुकर पाठक, हरेन्द्र जाधव
अल्बम : गणपती आरती
ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ
अष्टविनायक या गाजलेल्या मराठी चित्रपटात आठही विनायकांच्या देवळांची सुरेख वर्णन करणारे अष्टविनायका तुझा महिमा कसा हे गाणे स्व.जगदीश खेबूडकरांनी लिहिले होते. त्या गाण्याच्या अखेरीलासुद्धा मोरया मोरयाचा गजर आहे.
मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया।
मोरया मोरया मयुरेश्वरा मोरया ।।
मोरया मोरया चिंतामणी मोरया ।
मोरया मोरया सिद्धिविनायक मोरया ।।
मोरया मोरया महागणपती मोरया ।
मोरया मोरया विघ्नेश्वरा मोरया ।।
मोरया मोरया गिरिजात्मजा मोरया ।
मोरया मोरया वरदविनायक मोरया ।।
मोरया मोरया बल्लाळेश्वर मोरया।
मोरया मोरया अष्टविनायक मोरया ।।
सातआठ वर्षांपूर्वी आलेल्या उलाढाल या चित्रपटातल्या ढोलताशांच्या आवाजाबरोबर होणाऱ्या मोरया मोरयाच्या गजराने त्या काळातल्या सगळ्या गणेशोत्सवाचे मांडव दणाणून गेले होते. अजय अतुल या संगीतकार जोडगोळीने गाजवलेले हे गाणे आजही लोकप्रिय आहेच. या क्षणी टीव्हीवर चालू असलेल्या सूर नवा ध्यास नवा या मालिकेत मी हे दणकेदार गाणे ऐकत आहे. याचे शब्द असे आहेत.
हे देवा तुझ्या दारी आलो गुनगान गाया
तुझ्याइना मानसाचा जन्म जायी वाया
हे देवा दिली हाक उध्दार कराया…
आभाळाची छाया तुझी समींदराची माया
मोरया…..मोरया…..मोरया…..मोरया…..
मोरया…..मोरया…..मोरया…..मोरया…..
ॐकाराचं रुप तुझं चराचरामंदी
झाड, येली, पानासंगं फूल तू सुगंधी
भगताचा पाठीराखा गरीबाचा वाली
माझी भक्ती तुझी शक्ती एकरुप झाली
हे देवा दिली हाक उध्दार कराया…
आभाळाची छाया तुझी समींदराची माया
मोरया…..मोरया..मोरया…..मोरया…..
मोरया…..मोरया…..मोरया…..मोरया…..
आदि अंत तूच खरा, तूच बुध्दीदाता
शरण मी आलो तुला पायावर माथा
डंका वाजं दहा दिशी गजर नावाचा
संकटाला बळ देई अवतार देवाचा
हे देवा दिली हाक उध्दार कराया…
आभाळाची छाया तुझी समींदराची माया
मोरया…..मोरया…..मोरया…..मोरया…..
मोरया…..मोरया…..मोरया…..मोरया…..
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया
मोरया…..मोरया…..मोरया…..मोरया…..
मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करु काय जाणे
https://www.youtube.com/watch?v=oRDmUYblLq8
ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ
मोरया या नांवाचा एक चित्रपट सात वर्षांपूर्वी येऊन गेला. संगीतकार गायक आणि गीतकार श्री अवधूत गुप्ते यांनी लिहिलेले त्यातले शीर्षक गीत अर्थातच बाप्पा मोरयावर आहे. गणपती बाप्पा मोरयाने पुन्हा अवतार घेऊन चुकलेल्या लोकांना योग्य वाट दाखवावी अशी विनंती या गाण्यात केली आहे.
मोरया सिनेमा टायटल साँग
https://www.youtube.com/watch?reload=9&v=aZwIwU_k6SM
तूच माझी आई देवा, तूच माझा बाप ।
तूच माझी आई देवा, तूच माझा बाप ।
गोड मानुनी घे सेवा, पोटी घाल पाप।
गोड मानुनी घे सेवा, पोटी घाल पाप।
चुकलेल्या कोकराया, वाट दाखवाया
घ्यावा पुन्हा अवतार, बाप्पा मोरया ।
गणाधिशा, भालचंद्रा, गजवक्रा, गणराया,
वक्रतुंडा, धूम्रवर्णा, गणपती बाप्पा मोरया।
गणाधिशा, भालचंद्रा, गजवक्रा, गणराया,
वक्रतुंडा, धूम्रवर्णा, गणपती बाप्पा मोरया।
काय वाहू चरणी तुझ्या माझे असे काय,
माझा श्वास हि तुझिच माया तुझे हात पाय,
काय वाहू चरणी तुझ्या माझे असे काय,
माझा श्वास हि तुझिच माया तुझे हात पाय।
कधी घडविसी पापे हातून कधी घडविसी पुण्य,
का खेळीसी खेळ असा हा सारे अगम्य
तारू माझे पैलतीरी ताल कराया।
गणाधिशा, भालचंद्रा, गजवक्रा, गणराया,
वक्रतुंडा, धूम्रवर्णा, गणपती बाप्पा मोरया।
गणाधिशा, भालचंद्रा, गजवक्रा, गणराया,
वक्रतुंडा, धूम्रवर्णा, गणपती बाप्पा मोरया।
ठाई ठाई रूपे तुझी चराचरी तूच,
कधी होशी सखा कधी वैरी होशी तूच।
ठाई ठाई रूपे तुझी चराचरी तूच,
कधी होशी सखा कधी वैरी होशी तूच।
देवा तुला देवपण देती भक्तगण,
दानवांना पाप कर्म शिकवितो कोण
निजलेल्या पाखरांना सूर्य दाखवाया।
गणाधिशा, भालचंद्रा, गजवक्रा, गणराया,
वक्रतुंडा, धूम्रवर्णा, गणपती बाप्पा मोरया।
गणाधिशा, भालचंद्रा, गजवक्रा, गणराया,
वक्रतुंडा, धूम्रवर्णा, गणपती बाप्पा मोरया।
ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ
पं.हृदयनाथ मंगेशकर आणि स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर या भावाबहिणीच्या जोडीने अवीट गोडी असलेल्या अनेक गीतांची भर मराठी सुगम संगीतामध्ये घालून त्याला अत्यंत समृद्ध केले आहे. सुप्रसिद्ध कवयित्री शांताबाई शेळके यांनी त्यांच्यासाठी लिहून दिलेले गजानना, श्री गणराया हे मोरयाला वंदन करणारे भक्तीगीत अजरामर झाले आहेच.
https://www.youtube.com/watch?v=fV8WIzEHD-E
गजानना, श्री गणराया
आधी वंदू तुज मोरया
मंगलमुर्ती, श्री गणराया
आधी वंदू तुज मोरया
सिंदुरचर्चित धवळे अंग
चंदन उटी खुलवी रंग
बघता मानस होते दंग
जीव जडला चरणी तुझिया
आधी वंदू तुज मोरया
गौरीतनया भालचंद्रा
देवा कृपेच्या तू समुद्रा
वरदविनायक करुणागारा
अवघी विघ्ने नेसी विलया
आधी वंदू तुज मोरया
ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ
मागच्या वर्षी आलेल्या व्हेंटिलेटर या एका वेगळ्याच विषयावरल्या चित्रपटामध्येसुद्धा गणेशोत्सवावर एक गाणे आहे. गीतकार मनोज यादव व शांताराम मापुसकर या जोडीने लिहिलेले या रे या सारे या हे गीत रोहन रोहन या संगीत दिग्दर्शकांनी बांधलेल्या चालीवर गायक रोहन प्रधान यांनी गायिले आहे. त्यातले समूहगान म्हणजे कोरस तर खूपच बहारदार आहे.
https://youtu.be/HzGE_WaSqE4
या रे या सारे या
गजाननाला आळवूया
नाम प्रभूचे गाऊया
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया
गुणगान तुझे ओठांवर राहू दे
चरणी तुझ्या हे जीवन वाहू दे
नाथांचा नाथ तू, मायेची हाक तू
भक्तीचा नाद तू, माऊली तुझी दया
या रे या सारे या ....
उपकार तुझे सुखदायक सुखकर्ता
आधार तुझा तू तारण करता
तू माता, तूच पिता
तू बंधू, तूच सखा
आम्हावरी राहू दे माऊली तुझी दया
या रे या सारे या ......
ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ
आपल्या समाजामध्येच कुठल्याही निमित्याने मोठमोठ्याने कर्ण्यावर (लाऊडस्पीकरवर) गाणी वाजवत राहणे आणि कार्यक्रमांमध्ये त्याचप्रमाणे मिरवणुकींमध्ये डी जे वर गाणी लावून त्यावर नाच करणे यालाच आता खूप जोर आल्यामुळे त्यासाठी कर्कश आवाज आणि उडत्या चालींच्या गाण्यांनाही उधाण आले आहे. यात सिनेमातली गाणी, आल्बम्स, लोकगीते वगैरे सर्वांचाच समावेश होतो. गणेशोत्सवांमध्येसुद्धा ते लोण आल्याशिवाय कसे राहील? तिथे देवाशी कसलाही संबंध नसलेली पॉप्युलर गाणी तर वाजवली जातातच, मुद्दाम गणपती बाप्पाचा उल्लेख असलेली अनेक गाणीसुद्धा गणेशोत्सवाच्या सुमाराला बाजारात यायला लागली. गेल्या तीन वर्षांमधल्या अशा गाण्यांचे दुवे खाली दिले आहेत.
२०१६ मोरया गाणी
https://www.youtube.com/watch?v=z7W9gEtIXbU
२०१७ मोरया गाणी
https://www.youtube.com/watch?v=OHUy2KJlINk
२०१८ ढोल ढोल ढोल घुमू लागला
https://www.youtube.com/watch?v=esBHy_ky-PQ
प्रारंभी नमुया महेशतनया, विघ्नांतका मोरया ।
ब्रह्मा विष्णु शिवा, उमा, कमलजा, त्रैमूर्ति दत्तात्रया ।।
मोरया मधील मोर च्या ऐवजी More हा शब्द घालून Moreया, Moreघ्या. Moreन्या, Moreद्या असे शब्दप्रयोग केलेल्या जाहिराती या दिवसात पहायला मिळतात.
आपला गणपती बाप्पा आपल्या भक्तांना तुम्ही मागे राहू नका म्होरं या, म्हणजे पुढे या असा आदेश देत असतो म्हणून त्याला मोरया म्हणतात असा अजब शोधसुद्धा कोणा डोकेबाज माणसाने लावला आहे.
आज अनंतचतुर्दशीला सर्व ठिकाणचे उत्सव संपून विसर्जनाच्या जंगी मिरवणुकी निघतील आणि गणपतीबाप्पा मोरयाला पुढच्या वर्षी लवकर या असे सांगून रात्री उशीरापर्यंत किंवा कदाचित उद्या सकाळपर्यंत त्या चालत राहतील. मी या वर्षीच्या गणेशोत्सवात लिहिलेला मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया हा लेख रोज थोडी भर घालून पुढे नेला होता. त्या बाप्पाला मनोमन वंदन करून आज तो पूर्ण करीत आहे.
ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ

आता मोरयासंबंधीचे थोडेसे अवांतर
मोरया हा शब्द शार्दूलविक्रीडित या वृत्तातल्या ओळींच्या शेवटी चपखल बसत असल्यामुळे बहुतेक मंगलाष्टकांमध्ये तो येतोच. उदाहरणार्थप्रारंभी नमुया महेशतनया, विघ्नांतका मोरया ।
ब्रह्मा विष्णु शिवा, उमा, कमलजा, त्रैमूर्ति दत्तात्रया ।।
मोरया मधील मोर च्या ऐवजी More हा शब्द घालून Moreया, Moreघ्या. Moreन्या, Moreद्या असे शब्दप्रयोग केलेल्या जाहिराती या दिवसात पहायला मिळतात.
आपला गणपती बाप्पा आपल्या भक्तांना तुम्ही मागे राहू नका म्होरं या, म्हणजे पुढे या असा आदेश देत असतो म्हणून त्याला मोरया म्हणतात असा अजब शोधसुद्धा कोणा डोकेबाज माणसाने लावला आहे.
आज अनंतचतुर्दशीला सर्व ठिकाणचे उत्सव संपून विसर्जनाच्या जंगी मिरवणुकी निघतील आणि गणपतीबाप्पा मोरयाला पुढच्या वर्षी लवकर या असे सांगून रात्री उशीरापर्यंत किंवा कदाचित उद्या सकाळपर्यंत त्या चालत राहतील. मी या वर्षीच्या गणेशोत्सवात लिहिलेला मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया हा लेख रोज थोडी भर घालून पुढे नेला होता. त्या बाप्पाला मनोमन वंदन करून आज तो पूर्ण करीत आहे.
ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ
No comments:
Post a Comment