आली आई भवानी स्वप्नात ।
श्रीवरदा सुप्रसन्न मूर्ती,
जशी वीज चमके गगनात ।। आली आई भवानी स्वप्नात ।
सरळ भांग निज भुजंगवेणी,
काजळ ल्याली नयनात ।
रत्नजडित हार कासे पीतांबर,
कंचुकी हिरवी अंगात ।। आली आई भवानी स्वप्नात ।
केशर कस्तुरी मिश्रित तांबुल,
लाल रंगला वदनात ।
कंकणी कनकांची खणखणती,
वाजती पैंजण पायात ।। आली आई भवानी स्वप्नात ।
विष्णुदास म्हणे अशी निरंतर,
दे आवडी मज भजनात ।। आली आई भवानी स्वप्नात ।
No comments:
Post a Comment