सहलीमधील निवासस्थाने
यापूर्वी मी कधीच कुठल्याही मोठ्या टूरिस्ट ग्रुपबरोबर फिरायला गेलो नव्हतो. ऑफिसच्या कामानिमित्य किंवा भटकंतीसाठी परगांवी गेल्यास विमानतळ किंवा रेल्वे स्टेशनच्या जवळच्या भरवस्तीमधील एखाद्या हॉटेलात रहात होतो. वेळ मिळेल तेंव्हा आजूबाजूचा भाग पहात फिरण्याचा मला छंद होता. त्यामुळे पटकन कुठेही जाण्यायेण्याला सोयीच्या अशा जागी मी मुक्काम करीत असे. रोम या युरोपातील एका मोठ्या देशाची राजधानी असलेल्या शहरातही अशाच एका मोक्याच्या जागेवरील आधुनिक सुखसोयींनी परिपूर्ण अशा हॉटेलमध्ये आपण राहू अशी खुषीची गाजरे मी मनात खात होतो. पण आमच्या निवासाची व्यवस्था एका उपनगरात किंवा त्याच्याही पलीकडील भागात कुठेतरी झाली होती. मुद्दाम मुंबई पहायला येणा-या माणसाच्या राहण्याची सोय घणसोळी किंवा कळंबोळी इथल्या लॉजवर व्हावी तशागत अवस्था होती.
ते हॉटेल तसे ठीकठाकच होते. दिवसभर फिरून दमून भागून परत आल्यानंतर झोपायला मऊ गादी आणि सर्व सोयींनी सज्ज असे स्वच्छ बाथरूम याशिवाय सर्वसामान्य माणसाला आणखी कशाची गरज नसते. तेवढ्या गोष्टी तेथे अगदी व्यवस्थितपणे उपलब्ध होत्या. मात्र त्यांच्या व्यतिरिक्त फारसे विशेष असे कांही नव्हते. इटलीमध्ये असेपर्यंत पुढील तीन चार दिवसही मुक्कामासाठी अशाच प्रकारची वेगवेगळी छोटी हॉटेले मिळाली. तिथला उन्हाळा अजून ऑफीशिअली सुरू झाला नसल्याने रूममधील एअरकंडीशनर चालणार नाही असे सांगितले गेले. ओळीमधील सगळ्या खोल्यांना मागील बाजूने जोडणारी चिंचोळी उघडी बाल्कनी असायची पण तिचा दरवाजा सहजपणे उघडत नसे. ताज्या हवेची गरज असल्यामुळे खटपट करून तो थोडा वेळ उघडावा तर लागत असे आणि झोपी जाण्यापूर्वी पुन्हा बंद करावा लागत असे. एका जागी त्याचे हँडल एका दिशेने फिरवताच तो धाडकन अंगावरच तिरपा झाला. आता तो पडणार की काय या भीतीने हँडल उलट फिरवताच जँम होऊन बसला. अखेर एका हाताने ते हँडल मधोमध पकडून दुस-या हाताने धक्के दिल्यावर एकदाचा उघडला. त्या भानगडीत एका प्रवाशाच्या करंगळीचे टोक फटीत सापडून काळेनिळे झाले आणि बरोबर दिलेल्या फर्स्टएडच्या सामानाचाही उपयोग झाला.
आपण इथे मौज करण्यासाठी आलेलो आहोत, कुरकुरण्यासाठी नाही असा सकारात्मक विचार करून मनाची समजूत घालत होतो. पण एवढे आंतरराष्ट्रीय पर्यटक रोज इथे येत असून सुद्धा इटली हा देश सेवाक्षेत्रात भारताच्या बराच मागे आहे असे माझे मत मात्र झाले. आमच्या बजेटमध्ये ताज किंवा ओबेरॉयशी तुलना करणा-या अद्ययावत हॉटेलांची अपेक्षा मला नव्हतीच. पण चिपळूण किंवा सुरेन्द्रनगर अशा गांवी मी ज्या अप्रसिद्ध हॉटेलांमध्ये उतरलो होतो तीसुद्धा मला इटलीत लाभलेल्या कोणत्याही हॉटेलपेक्षा सर्व दृष्टीने उजवी वाटली होती. त्यानंतर ऑस्ट्रियामधील इन्सब्रुक येथील हॉटेलसुद्धा त्याच पठडीतले होते. पण हा गांव रम्य निसर्गाच्या कुशीत वसलेला असल्यामुळे तेथील एकंदर वातावरणच खूप प्रसन्न होते. आमच्या खोलीच्या खिडकीतूनच समोर हिरवी गर्द झाडी, त्याच्या पलीकडे उंच पहाड आणि शेवटी मागील हिमाच्छादित शिखरे दिसत होती. तिकडे पहात असतांना इतर गोष्टींची जाणीव होत नव्हती.
स्विट्झरलंडमधील ल्यूसर्न इथे गेल्यावर मात्र या परिस्थितीत चांगल्या दिशेने फरक पडला. तेथील 'एक्सप्रेस हॉलिडे इन' हे हॉटेल शहरापासून दूर असले तरी चांगले तसेच मोठे होते. तेथील रिसेप्शन काउंटरपासून रूम्स आणि रेस्टॉरेंट्सपर्यंत सगळीकडे आंतरराष्ट्रीय प्रतीची गुणवत्ता जाणवत होती. हवेशीर आणि सुसज्ज रूममधील भिंतींवर सुंदर चित्रे लावलेली होती. त्यामधील फर्नीचर, दारे, खिडक्या, पडदे, कार्पेट, टेलीव्हिजन सेट वगैरे सगळे कांही व्यवस्थित होते. हॉटेलच्या शेजारीच एक मॉलवजा मोठे दुकान होते. तिथे ब-याच उपयोगी वस्तू मिळत होत्या. त्यानंतर पुढेसुद्धा सगळीकडेच चांगली हॉटेले मिळाली. एमस्टरडॅम येथील एनएच ग्रुपचे हॉटेल तर इतके विशाल होते की त्यातील रूमचे नंबर चार आंकड्यात दिलेले होते आणि ती शोधण्यास मदत करणारा हॉटेलचा नकाशा प्रत्येकाला दिला गेला होता. पॅरिसलासुद्धा याच ग्रुपचे गगनचुंबी इमारत असलेले हॉटेल मिळाले होते व त्यातील दहाव्या मजल्यावरील आमच्या खोलीच्या खिडकीतून दूरपर्यंतचा सुरेख व्ह्यू दिसत होता. ही सगळीच हॉटेले मुख्य शहरांपासून दूर असायची. मोठ्या संख्येने येणा-या प्रवाशांची एकत्र व्यवस्था करण्याच्या दृष्टीने ते सोयीचे होत असावे, तसेच आर्थिक दृष्ट्या किफायतशीर पडत असेल. स्वतंत्र बस असल्यामुळे कोठेही जाण्यायेण्याची सोय होती आणि एका शहरातून पुढच्या शहराला जातांना शहराच्या मुख्य भागातील ट्रॅफिकचा त्रास होत नव्हता. असे अनेक पैलू त्यामागे होते असे समजत गेले.
"तिकडच्या हॉटेलांत गडी नसतात, त्यामुळे सगळीकडे आपले सामान आपल्यालाच उचलून जिन्यांवरून माडीवर चढवावे लागते. हे एक मोठे जिकीरीचे काम असते. आपल्या तब्येतीला सांभाळून ते करा बरे." असा भीतीयुक्त सल्ला भारतातून निघतांना कोणीतरी आम्हाला दिला होता. त्यातला पहिला भाग खरा ठरला, पण सुदैवाने सगळ्या जागी लिफ्टची सोय असल्यामुळे ओझे उचलायचे कष्ट मात्र पडले नाहीत. लिफ्टमध्ये मर्यादित जागा असल्यामुळे कांही तरुण मंडळींनी रांगेत उभे राहून आपला नंबर येण्याची वाट न पाहता आपले सामान उचलून जिना चढून जाणे पसंत केले, ती गोष्ट वेगळी. त्यातही अत्यावश्यक व अनावश्यक असे सामानाचे दोन भाग करून रोज उचलायचा भार सगळ्या लोकांनी कमी केलेला होताच.
आजकाल पाश्चिमात्य देशात 'रूम सर्व्हिस' हा प्रकार सहसा नसतोच. तिकडे सगळ्याच बाबतीत स्वावलंबन आणि स्वयंसेवा हे मूलमंत्र झालेले दिसतात. त्यामुळे मनात आल्यास तोंडात टाकण्याजोग्या भरपूर खाद्यवस्तू केसरीने आम्हाला बांधून दिलेल्या होत्या, तसेच चहा कॉफी बनवण्यासाठी विजेची किटली आणि त्यांच्या मिश्रणांची तयार पाकिटे दिलेली होती. सकाळच्या चहाची ज्यांना तलफ असेल त्यांचीही अशी छान सोय झाली होती. तेथील प्रवासातील सर्व हॉटेलांत सकाळी कॉँटिनेंटल ब्रेकफास्ट मिळाला आणि माझ्यासाठी तर तोच दिवसातील मुख्य आहार झाला. तृणधान्ये, ब्रेड, फळे व दुग्धजन्य पदार्थ यांचे दहा बारापासून पंचवीस तीसापर्यंत विविध प्रकार त्यात उपलब्ध असत. तांदूळ किंवा भातापासून बनवलेले चुरमुरे व पोहे आपण खातोच, ज्वारीच्या व मक्याच्या लाह्या खातो, पण गव्हापासूनसुद्धा ते बनवता येतात असे क्वचितच कोणाला माहीत असेल. मका व गहूच नव्हे तर ओट, मिलेट आदि इतर कांही स्थानिक तृणधान्यांचे फ्लेक व पफ केलेले अनेक प्रकार तिकडे दुधात बुडवून खातात. ब्रेडमध्ये सुद्धा पांढरी, ब्राऊन, चौकोनी कापा केलेली, लांबट आकाराची वगैरे विविध रूपे असलेली तसेच सपक, गोड, मसालेदार वगैरे चवीचे प्रकार असतात. क्रॉइसॉँ, मुफिन, पॅस्ट्री, रस्क आदि खास प्रकार वेगळेच. त्यांना लावण्यासाठी दोन तीन प्रकारचे लोणी असते, त्यात 'स्निग्धपदार्थ विरहित' असे लेबल लावलेलासुद्धा पहायला मिळाला. स्ट्रॉबेरी, रासबेरी वगैरे आपल्याकडे फारसे माहीत नसलेले जॅम असतात, पण मला तर मधच आवडत असे. 'आपला हात जगन्नाथ' पद्धत असल्यामुळे त्यातील बरीच निवड करून आपल्याला हवे ते वाढून घेता येत असे. दुपारच्या जेवणात एकदा पास्ता होता, एकदा मॅकडोनल्डचे बर्गर होते, तीन वेळा पॅक करून नेलेला पुलाव किंवा बिरयाणी होती आणि उरलेल्या दिवशी 'महाराजा', 'महाराणी' किंवा 'रामा' यासारख्या नांवाच्या भोजनालयांचा आश्रय घेतला. रात्रीची एकूण एक जेवणे भारतीय पद्धतीचीच होती. यातली बहुतेक पंजाबी स्टाईलची होती. तुरीच्या डाळीऐवजी चण्याची किंवा उडदाची डाळ एक दोन वेळा बरी वाटते. कॅनमध्ये गोठवून ठेवलेले मटार आणि छोलेही सुरुवातीला चवीने खाल्ले पण नंतर त्यात तोचतोपणा आला. ओव्हनमध्ये भाजलेले नान तंदूरमध्ये भाजून काढल्यासारखे कांही लागत नव्हते. भाताची थोडीशी कणी कधी राहिली असली तरी कच्च्या मैद्यापेक्षा ती पचायला तरी बरी असते. तीन चार दिवस नव्याची नवलाई गेल्यानंतर अन्नातील उणीवा जाणवू लागल्या. मी तर डाळ व भाजी या गोष्टींचे घास दोन घास चटणी कोशिंबिरीसारखे शोभेसाठी पानात मांडून घेऊन दहीभात आणि पापड हा माझा मुख्य मेनू बनवला. रुचिपालट म्हणून कधी मिळाल्यास चिकनचे दोन तुकडे त्यांच्यासोबत घेत असे आणि दही नसल्यास रायताच भातामध्ये कालवून खात असे. आता 'रायताराईस विथ चिकन' या कॉँबिनेशनचे पेटंट मला मिळायला कोणाची हरकत नसावी. असे सगळे असले तरी मी कधीही उपाशी मात्र राहिलो नाही. पॅरिसला गुजराती पद्धतीचा खाना मिळाल्यावर माझा आनंद गगनात मावला नाही. तीन्ही त्रिकाळच्या भोजनांशिवाय मध्यंतरांमध्ये फाकण्याचे चकल्या, चिवडा, वेफर्स, सुका मेवा, बिस्किटे, कुकीज वगैरे पदार्थसुद्धा सदोदित बरोबर असायचेच.
पिण्याचे पाणी हा एक युरोपच्या सहलीतला मोठा महत्वाचा विषय होता. आपणा भारतीयांना इतर कांही 'पिण्याची' संवय नसल्यामुळे मुळातच फार तहान लागते. त्यात "उन्हात हिंडता आहात, भरपूर पाणी पीत जा." असा वैद्यकीय सल्ला सगळ्यांनी इथून जातांना पुन्हा पुन्हा पाजवला होता. भारतीय पद्धतीच्या भोजनालयात पुरेसे पाणी प्यायला मिळत होते खरे, पण इतर वेळी काय करायचे? पहिल्याच रात्री झोपण्यापूर्वीची औषधाची गोळी गिळण्यासाठी पाण्याची गरज पडली. मुंबईमधील साथीच्या रोगांना घाबरून एक्वागार्डचे पाणी पिण्याची संवय लागलेली होती. बाथरूममधल्या बेसिनचे पाणी पिण्याची हिंमत होत नव्हती. रेफ्रिजरेटरमधील मिनरल वॉटरची बाटली काढली. पण शंभर रुपयांहून अधिक किंमतीच्या या पाण्याची चंव जरा विचित्रच लागत होती. मिनरल्सच्या नांवाने त्यात काय काय भरले होते कोण जाणे. हा अनुभव नंतरच्या प्रवासात मात्र आला नाही. त्या दिवशी कसेबसे घोटभर पाणी गिळले आणि उरलेले ओतून टाकून त्या बाटलीत सरळ नळाचे पाणी भरले. एवीतेवी जेवणाच्या हॉटेलमध्ये सुद्धा नळाचेच पाणी पीत होतो. "हॉटेलातून निघण्यापूर्वी बाटली पाण्याने भरून घेणे" हा आयटम त्यानंतर रोजच्या दिनचर्येमध्ये समाविष्ट झाला.
टूरमध्ये सगळीकडेच आम्हाला एक तान्त्रिक प्रॉब्लेम येत होता. युरोपमधील विजेच्या कनेक्शनची सॉकेट्स भारतातील सॉकेट्सपेक्षा वेगळ्या प्रकारची असतात. त्यातही जागोजागी थोडा फरक असे. आमच्या चहाच्या किटलीचा दोन पिनांचा प्लग प्रयत्न करून कसाबसा कांही जागी घुसवता येत होता, पण कॅमे-यासाठी लागणा-या बॅटरीच्या चार्जरला अमेरिकन पद्धतीच्या चौकोनी पिना होत्या व भारतात उपयोग करण्यासाठी आम्ही तीन पिना असलेले एडॅप्टर त्याला जोडले होते. तिकडच्या कोठल्याच रूममधील सॉकेटबरोबर या दोन्हीपैकी कांहीही जुळत नव्हते. कांही जागी बाथरूममध्ये हेअर ड्रायरसाठी अमेरिकन पद्धतीचे सॉकेट दिलेले होते आणि कांही ठिकाणी आम्हाला पाहिजे तसा 'अमेरिकन ते युरोपियन एडाप्टर' हॉटेलच्या रिसेप्शनवर उसना मिळाला. त्यामुळे कसेबसे काम भागले खरे. पण रस्त्यातील कोठल्याही दुकानात मात्र आम्हाला तो मिळाला नाही. प्रत्येक गांवी गेल्यावर आधी त्याचा शोध घ्यावा लागत असे आणि नाही मिळाला तर काय करायचे या भीतीपोटी रेकॉर्डिंगवर मर्यादा घालाव्या लागत. एका दृष्टीने तेसुद्धा बरेच झाले असे म्हणावे लागेल कारण ते रेकॉर्ड केलेले व्हीडिओ पहायला तरी परत आल्यानंतर कोठे वेळ मिळतो?

No comments:
Post a Comment