Thursday, August 23, 2012

प्लॅस्टिक - ब्रह्मराक्षस की बागुलबोवा ?

"वाचवा हो, वाचवा या वसुंधरेला ! हा प्लॅस्टिकचा ब्रह्मराक्षस तिला मारायला लागलाय् !" असा आरडाओरडा हल्ली जरा जास्तच ऐकू येतो. अलीकडेच मुखपुस्तकाच्या (फेसबुकच्या) एका पानावर ही आरोळी वाचली आणि तिकडे लक्ष गेले. या पानावर प्लॅस्टिकबद्दल खाली दिलेली माहिती दिली होती.


History of Plastic

First used commercially in 1947,

Relatively expensive until the early 1960s when high-density polyethylene was introduced.

Gained popularity due to their lightweight nature

Relatively low production costs compared with glass bottles.

Food industry has now completely replaced steel n glass with plastic.

Plastic is ruling us….We have become slaves.

--------------------------------------------------------------------



What is so bad about plastic…???

Chemical used in plastic bottles that could cause severe health issues is BPA (Bisphenol-A)

What are the potential hazards?

an increase in prostate and breast cancer, uro-genital abnormalities in male babies, early onset of puberty in girls, metabolic disorders including insulin-resistant diabetes, obesity and Neurobehavioral problems. (EWG Guide to BPA)

--------------------------------------------------------------------

How to be careful??

Way to check the grade of plastic:

Resin identification code

(mentioned at the bottom of every bottle)

• 1 - PET (Polyethylene Terephthalate)

• 2 - HDPE (High Density Polyethylene)

• 3 - PVC (Polyvinyl Chloride)

• 4 - LDPE (Low Density Polyethylene)

• 5 - PP (Polypropylene)

• 6 - PS (Polystyrene)

• 7 - Other

USE #5 bottles

Look at the reverse side of bottle or container.

If you find plastic bottles made from #1 or #2 plastic try not to reuse them as they are intended only for single use.

If you are using a #1 plastic water bottle, try to consume the contents as soon as possible because leaching of antimony increases with time.

Never ever use #3 bottles.

ही माहिती खरी असेल तर नक्कीच मार्गदर्शक आहे. माझ्याकडे असलेले अनेक डबे आणि बाटल्या मी उलटसुलट करून पाहिल्या. त्या कोणत्या प्रकारच्या प्लॅस्टिकपासून तयार केल्या आहेत याचे नाव किंवा क्रमांक कुठेच दिसला नाही. त्यामुळे ते वापरतांना कसली काळजी घ्यायची ते काही कळले नाही. शुध्द पाण्याच्या बाटल्यांवर आयएसआय मार्क असतो, पण तो बाटलीसकट त्यातल्या पाण्याला असतो का? माझ्या मते असायला हवा. पण पाणी पिऊन झाल्यानंतर ती बाटली तोडून फोडून टाका असे लिहिले असते. यामागचा मुख्य उद्देश असा असतो की रिकामी बाटली कोणीतरी भलतेसलते पाणी त्यात भरून ते पाणी त्या कंपनीच्या नावाने विकू नये. शिवाय कंपनीच्या मालाचा खप वाढवण्याच्या दृष्टीने जुन्या बाटल्या नष्टच करायला पाहिजेत. पण यात एक अशी गोची आहे की ती मोडून तोडून टाकून दिलेली बाटली पर्यावरणाच्या बोडक्यावर जाऊन बसते. वर दिलेल्या माहितीचा उपयोग करायचा झाला तर ती पॉलीप्रॉपेलिनची असायला पाहिजे. तशी सक्ती या बॉटलिंग कंपन्यांवर केलेली आहे का?



एका वाचकाने असा प्रतिसाद दिला होता.

काय आहे हे प्लास्टिक?
 ते कशापासून बनते? जगभरात इतके लोकप्रिय कसे झाले? हानीकारक असूनही त्याचा वापर वाढतच का जातो? हे प्रश्न अनेक लोकांना पडत असतात.

विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मानवाला प्लास्टिकसारखे पदार्थ तयार करणे शक्य झाले. ज्यामध्ये आकर्षकपणा, हाताळण्यास सुलभ, दीर्घायुष्य हे गुणधर्म आहेत. प्लास्टिक अत्यंत घातक असून त्याचे जैविक विघटन होत नसल्यामुळे पर्यावरणावर फार दूरगामी दुष्पपरिणाम होत असतात. प्लास्टिक उत्पादन, वापर, पुनर्वापर या सर्व बाबतीत खलनायकाच्या भूमिकेत असते. या विविध टप्प्यांमध्ये हवा, पाणी व पृथ्वी या सर्वासाठी येणारी रसायने, वायू, द्रव्ये हे घातक व प्रकृतीला अपायकारक आहेत. ज्वलनशील असल्यामुळे त्याचा वापर अत्यंत धोकादायकदेखील ठरू शकतो. प्लास्टिक निर्मितीत हवेत सोडले जाणारे इथिलीन ऑक्साईड, बेन्झिन, झायलीन यांच्यामुळे शरीरातल्या मेंदू, किडनी, रक्त व हृदय या भागांवर परिणाम तर होतोच पण, कॅन्सर होण्याचाही संभव असतो.

प्लास्टिक पूर्ण वापरून फेकल्यावर तरी त्यापासून आपल्याला सुटका मिळेल का? तर मुळीच नाही! जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही ही म्हण प्लास्टिकला लागू पडत नाही! फेकून दिल्यावरही प्लास्टिकचे भूत तुमचा (पर्यावरणाचा) पिच्छा सोडत नाही. प्लास्टिकचे व्यवस्थापन, विनियोग निव्वळ काल्पनिक असून जाळून किंवा फेकून दिल्यावरही त्याचा भस्मासूर अधिकच उग्ररूप धारण करतो. अतिउच्च तापमानास विघटन होवून त्याचे अत्यंत हानीकारक असे विषारी वायू पर्यावरणात सोडले जातात. पुनर्निर्मितीद्वारे तयार होणारे प्लास्टिक हलक्या दर्जाचे असते. या प्रक्रियेत वायुप्रदूषण होते. शिवाय ही प्रक्रिया खर्चिकही असते. नुसतेच फेकून दिलेले प्लास्टिक नद्या, नाले, समुद्रात जाऊन पडते व सजीवसृष्टीला त्रासदायक ठरते. बरं, जमिनीत पुरावे तर तेही घातक! त्यातील विषारी घटक जमिनीतून पाण्यात जातात. यामुळे भूजल व जमिनीचा कस यावरही विपरीत परिणाम संभवतात. थोडक्यात, प्लास्टिकचा वापर म्हणजे दूरगामी दुष्पपरिणामांना आमंत्रणच. यावर उपाय म्हणजे प्लास्टिकचा अगदी कमीत-कमी वापर करणे! आपण सर्वानी जेथे जेथे व जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा प्लास्टिकचा वापर निकराने टाळावा.


ही माहिती त्या गृहस्थांनी कुठून मिळवली होती आणि त्यांनी ती किती पडताळून पाहिली होती कोणास ठाऊक, पण त्यांनी सकसकट अवघ्या प्लॅस्टिकविश्वाला मोडीत काढले होते.

या विषयावर माझी मते मी अशी मांडली होती.

Remove plastic and be prepared for a different lifestyle altogether. Just see how many things we get from market are wrapped in plastic bags / bottles. All solid things would be traded loose or wrapped in old newspapers and all liquids in metallic or erathen containers. Who is going to ensure that they are clean? Without plastis there would be no disposable seringes, saline bottles, no implanted lenses after cataract operations. Further no computers, cellphones, So no internet and no facebook. Life would be really as wonderful as it was before 1947.

The problem is not plastic, it is our own foolishness in discarding it carelessly and causing harm to the environment.

आपल्या जीवनांधून प्लॅस्टिकला काढून टाकाल तर एका वेगळ्या प्रकारच्या जीवनशैलीसाठी तयार रहा. आपल्या घरात येणारे किती पदार्थ प्लॅस्टिकच्या वेष्टनातून येतात ते पहा. यातले घनरूप पदार्थ सुटे किंवा जुन्या (घाणेरड्या) वर्तमानपत्रांमध्ये गुंडाळून मिळतील आणि द्रवरूप पदार्थ धातूंच्या किंवा मातीच्या भांड्यांमधून. ती भांडी स्वच्छ करून ठेवण्याचे काम कोण करणार आहे? (आणि त्यासाठी वापरल्या गेलेल्या डिटर्जंट्समुळे पर्यावरणाची जी हानी होईल त्याचे काय?) प्लॅस्टिक नसेल तर इंजेक्शनच्या सिरिंज, सलाईनच्या बाटल्या, मोतीबिंदूच् ऑपरेशन झाल्यावर डोळ्यात बसवले जाणारे भिंग (अशा असंख्यवस्तू) नसतील. संगणक (काँप्यूटर), भ्रमणध्वनी (सेलफोन), आंतर्जाल (इंटरनेट), मुखपुस्तक (फेसबुक) असले काही काही असणार नाही. आपले जीवन कसे १९४७ च्या पूर्वी होते तसे मजेदार होईल!

प्लॅस्टिक ही आपल्यापुढे उभी ठाकलेली समस्या नाही. आपल्या मूर्खपणामुळे आपण निष्काळजीपणे इकडे तिकडे टाकतो आणि पर्यावरणाची हानी करतो.

प्लॅस्टिकच्या विरोधात अशा प्रकारचा अपप्रचार अलीकडे फार होत आहे. वस्तुस्थिती अशी आहे की प्लॅस्टिक हे द्रव्य गंजत नाही, कुजत नाही, पाण्यात विरघळत नाही आणि कुठल्याचा मार्गाने आपल्या अन्नपदार्थांच्या साखळीत ते येत नाही, त्याचा कण चुकून पोटात गेला तरी तो पचत नाही आणि आपल्या शरीरातून उत्सर्जित केला जातो. हीच गोष्ट वनस्पतींच्या बाबतीत आहे. झाडावर किंवा त्याच्या मुळाशी प्लॅस्टिक टाकले तर त्यामुळे ते मरत नाही. त्यामुळे प्लॅस्टिकला विषारी म्हणता येणार नाही. कँसर, लिव्हर, किडनी, मेंदू वगैरेंबद्दल जे सांगितले जाते ते इतर अनेक रासायनिक पदार्थांच्या बाबतीत, विशेषतः खते, जंतूनाशके, रंग, स्फोटके, सौंदर्यप्रसाधने, साबण वगैरेंच्या बाबतीत फार मोठ्या प्रमाणात लागू आहे आणि त्यांचे प्रत्यक्ष परिणाम दिसतात. प्लॅस्टिकच्या उपयोगाने खाद्यपदार्थ जास्त काळ टिकवणे आणि रोगजंतूंचा संसर्ग टाळणे शक्य झाले आहे. त्यामुळे आरोग्यरक्षणाला त्याची मदतच झाली आहे. प्लॅस्टिकमुळे पर्यावरणावर थेट प्रभाव पडत नाही. प्लॅस्टिकच्या दीर्घायुष्यामुळे त्याची विल्हेवाट लागत नाही, ते साचून राहते, पाण्याच्या प्रवाहाला त्याचा अडथळा होतो, अशा प्रकारचे दुष्परिणाम होतात. प्लॅस्टिकच्या पदार्थांचा वापर करतांना योग्य ती शिस्त बाळगली तर हे टाळता येण्याजोगे आहे आणि पाश्चिमात्य देशात प्लॅस्टिकचा उपयोग आपल्या देशापेक्षाही जास्त होत असला तरी त्याचे पर्यावरणावरील दुष्परिणाम टाळले जातात.

मी प्लॅस्टिकचा कारखानदार किंवा व्यापारी नाही आणि माझे त्यात कसलेही हितसंबंध नाहीत हे स्पष्ट करू इच्छितो. केवळ अपप्रचाराला बळी पडून प्लॅस्टिकसारख्या अत्यंत उपयुक्त पदार्थाचा सरसकट त्याग करणे आपल्या हिताचे नाही. समतोल बुध्दीने विचार करावा. मीसुध्दा ओल्डफॅशन्ड कापडाच्या पिशव्या घेऊन खरेदीला जातो, दुकानदाराकडे कॅरीबॅग्ज मागत नाही आणि आलेल्या पिशव्या इतस्ततः भिरकावून देत नाही. प्लॅस्टिकला नाक मुरडणारे लोक पत्र्याच्या ट्रंका आणि पितळेचा फिरकीचा तांब्या घेऊन प्रवासाला निघणार आहेत का?

प्लॅस्टिक हे वरदान आहे की अभिशाप?

4 comments:

ऊर्जस्वल said...

उत्तम प्रबोधन करणारा संतुलित लेख आहे हा!

आवडला. आपल्या यथातथ्य विचारांना माझे अनुमोदन आहे.

Anand Ghare said...

धन्यवाद. अहो मी व्यवस्थित असा लेख लिहिलाच नाही. फेसबुकवर मित्रांच्या ज्या चर्चा चालतात, त्यातला एक मासला अथे सादर केला.

ऊर्जस्वल said...

आणखी सुव्यवस्थित असे काही लिहिता येण्यासारखे असेल तर अवश्य लिहावे!

http://anuvad-ranjan.blogspot.in/2012/03/blog-post_6081.html ह्या दुव्यावर भारत सरकारच्या एका लेखाचा मी केलेला अनुवाद आहे. शक्य झाल्यास अवश्य वाचावे.

Dr. A. J. Tamhankar, National Coordinator for Indian Initiative for Management of Antibiotic Resistance (IIMAR) said...

Priya Ghareji
He maraathit kaa umTat naahi, maahit naahi. aaj lokasattet tumachyaa blog varachaa abhipraay vaachalaa. aattaa to chaLalaa. Abhinandan. Tumachyaat lekhanachI prachand urmI disate. .... aaNi bharapur WeLahI disato. Asech prayatna chaalu thevaa.
Plastikachyaa baabatIt mI ase vaachale aahe ki trikoNaat 1 te 7 asa aakaDaa asato plastikachyaa vastuvara. jitakaa aakaDa jasta titake jasta velaa ti vastu vaaparataa yete. ....pana yaabaddala vishesha maahiti kuNaalaahi nasate. chaangalyaa udyogaane tayaara kelelyaa vastunvar food grade, ovenable vagaire khuNaa asataat.
jamalacha tara mi chalavat aslelaa save-antibiotics.blogspot.com haa blog vaacha. to english madhe asalaa tari janopayogi asalyaamuLe tyaachi link tumhi tumachyaa blogvar deu shakataa.
punhaa abhinandan.
ashok taamhankar
antibio.resistance.blogspot.com