माझा आणि कॅमेराचा नेहमी छत्तीसाचा आकडा असायचा. माझे फोटो किंवा मी काढलेले फोटो यातले कांहीच कुणाला दाखवण्यासारखे येत नसत. इतर लोकांच्या घरातअसतो म्हणून माझ्या घरातही एक काळा डब्बा (बॉक्स कॅमेरा) असायचा, त्याच्या पोटात अधून मधून फिल्मांची भेंडोळी टाकली जात आणि त्यांच्या धुलाईसाठी फोटो स्टूडिओंना दक्षिणाही दिली जात असे. पण त्या सर्वांच्या मागील जन्मात घेतलेल्या ऋणामधून मुक्त होण्यापलीकडे त्यातून फारसे कांही निष्पन्न होत नसे. डिजिटल टेक्नॉलॉजीच्या आगमनाने हे थांबवले. माझे जुने कॅमेरे अडगळीत जाऊन विसावले. काही वर्षे मी हातात कॅमेरा घेतला नाही. पण माझा विरह कॅमेरालाच सहन होईनासा झाला आणि नवा जन्म घेऊन तो सेलफोनमध्ये शिरून थेट माझ्या खिशात येऊन स्थानापन्न झाला.
तरीही मी वर्षभर त्याच्याकडे दुर्लक्षच केले. पण मध्यंतरीच्या काळात "कुछ भी कर फेसबुक में डाल।" सुरू झाले. त्यानंतर वॉट्सअॅपवर तर कुछभी, अगदी कांहीही पोस्ट यायला लागल्या आणि सगळे चित्रमय होऊन गेले. मी मात्र अजून शब्दच लिहित होतो. त्यामुळे मलाही थोडी चित्रे काढायची लहर आणि थोडे धाडस आले. ती या पोस्टवर टाकली आहेत. यातली बहुतेक छायाचित्रे हिंजवडीच्या रम्य अशा ब्ल्यू रिज परिसरातली आहेत.
घे उंच भरारी

महाचंद्र
संक्रांतीचे उत्साही पतंगवीर
--------------------------------------------------------------
घे उंच भरारी
---------------------------------------------
पूर्व दिशा उजळली
---------------------------------------------------
सूर्यास्त
---------------------------------------------------------------
विहंगम दृष्य
-------------------------------------------
फुललेला चाफा
-------------------------------------
राक्षसाची छाया
--------------------------------------
कण्हेरीचा गुच्छ
--------------------------------------------------
कण्हेरी बहराला आली
----------------------------------------------
फुले
---------------------------------------------
फुले
No comments:
Post a Comment