tag:blogger.com,1999:blog-20484515.post2102424725720747011..comments2024-02-02T07:28:01.994-08:00Comments on आनंदघन: कारवाँ बनता गया ।Anand Gharehttp://www.blogger.com/profile/16469879163774743077noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-20484515.post-63464058415465343082009-02-03T09:42:00.000-08:002009-02-03T09:42:00.000-08:00आदरणीय श्री. आनंद घारे,नमस्कार.मी नुकताच महाजालावर...आदरणीय श्री. आनंद घारे,<BR/>नमस्कार.<BR/>मी नुकताच महाजालावर एक मराठी ब्लॉग सुरु केला. तसं मी संगणकशास्त्राचा विद्यार्थी असल्यामुळे महाजाल आणि ब्लॉग हे मला काही नवीन नाहीत. पण मराठीत ब्लॉग लिहिणार्यांविषयी मला नेहमीच एक कुतूहलमिश्रित आदर वाटत आलेला आहे. आपलाही एक मराठी ब्लॉग असावा, अशी बर्याच दिवसांपासून माझी तीव्र इच्छा होती, आणि एकदाची ती पूर्ण केली. आता जमेल तसं मी त्यावर लिहिण्याचा प्रयत्न करीत असतो. असो.<BR/>मराठी ब्लॉग विश्वावरील इतर उत्कृष्ट ब्लॉगप्रमाणेच आपलाही ब्लॉग वाचनात आला. आपण निवडलेल्या विषयांची व्याप्ती आणि विविधता पाहून मी तर थक्कच झालो. इतके विविध विषय सामान्यातल्या सामान्य माणसालाही समजतील अशा सोप्या भाषेत मांडणं म्हणजे काही येरागबाळाचं काम नव्हे ! त्यातूनही आपण लिहिलेली प्रवासवर्णनं म्हणजे तर लाजवाबच ! ते वाचून डोळयासमोर संपूर्ण चित्रच उभं राहतं. एकूणच या ब्लॉगविश्वात मी एक क्षुल्लक पामर आहे, अशी जाणीव मला आपला ब्लॉग वाचून झाली. काहीही असो, शेवटी आपणांसारख्या मोठ्यांपासूनच आम्हांला प्रेरणा मिळत राहणार आहे. आपणांला शुभेच्छा देण्याइतपत तर मी मोठा नाहीच. पण आपल्यासारखी विचारांची प्रगल्भता थोड्या प्रमाणात का होईना, माझ्याही अंगी यावी, असा आपणच मला आशिर्वाद द्यावा !अमेय पत्कीhttps://www.blogger.com/profile/15886131284426254738noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-20484515.post-29526394379828331302009-02-03T04:14:00.000-08:002009-02-03T04:14:00.000-08:00ब्लॉगचा हा भाग प्रकाशित होता होता अनुयायांच्या संख...ब्लॉगचा हा भाग प्रकाशित होता होता अनुयायांच्या संख्येत आणखी एकाची भर पडली आहे. वेळ मिळेल तेंव्हा मी या सर्व अनुयायांच्या सुरेख ब्लॉग्जबद्दल लिहिणारच आहे. आता त्यांनी माझ्या ब्लॉगबद्दलची आपापली मते थोडक्यात मांडावी अशी त्यांना विनंती आहे.Anand Gharehttps://www.blogger.com/profile/16469879163774743077noreply@blogger.com